इतिहास

यशवंतकुलकर्णी's picture
यशवंतकुलकर्णी in जे न देखे रवी...
29 Aug 2010 - 1:24 am

आजकाल असं होत नाही; पण भालचंद्र नेमाड्यांच्या कादंबरीवरच्या धाग्यात प्रतिक्रिया देता-देता हात आवरला आणि झोपी गेलो. झोपेतल्या-झोपेत ह्या खालच्या ओळी बडबडत होतो म्हणे; कुणीतरी त्या लिहून घेतल्यात, मी त्या इथं टाकतो. आता जिथे प्रतिक्रिया द्यायची होती तो धागाच सापडत नाहीय (सवय होईपर्यंत असंच होणार).

इतिहास म्हणजे धूळ
इतिहास म्हणजे कचरा
इतिहास म्हणजे खून
इतिहास म्हणजे लढाया
इतिहास म्हणजे अन्याय
इतिहास म्हणजे साटलोटं
इतिहास म्हणजे कारस्थानं
इतिहास म्हणजे गुंता
इतिहास म्हणजे वर्तमानाच्या मानगुटीवरचा वेताळ
अरे मिशाळ माणसा
तुझा सव्वा किलोचा म्हातारा मेंदू आणि तुझी हजारबाराशे पानं
त्यात तुझी जात आणि ती वाचतील त्यांच्या जाती
पुन्हा आमचे मेंदू आणि आमची हवेसारखी मतं
हा सगळा चिखल-चिखल
सांग बाबा तुच आता, तुझी कादंबरी वाचू की नको??

करुणइतिहास

प्रतिक्रिया

इंटरनेटस्नेही's picture

30 Aug 2010 - 3:09 am | इंटरनेटस्नेही

गुढरम्य!

यशवंतकुलकर्णी's picture

30 Aug 2010 - 4:51 pm | यशवंतकुलकर्णी

तुमचा गूढरम्य शब्द वगळता काय गुढरम्य आहे बुवा यात??

मुक्तसुनीत's picture

30 Aug 2010 - 3:16 am | मुक्तसुनीत

कविता रोचक आहे. मिशाळ माणसाच्या मेंदूचे वजन कसे समजले या संभ्रमात आहे :-)

निखिल देशपांडे's picture

30 Aug 2010 - 8:19 pm | निखिल देशपांडे

ओ यशवंत राव काय कविता म्हणायची का काय??
त्या मिशाळ माणसाच्या पुस्तकाने तुमची वाट लावलेली दिसतेय??

यशवंतकुलकर्णी's picture

30 Aug 2010 - 10:23 pm | यशवंतकुलकर्णी

हा साहित्यातील एक नवा प्रवाह आहे.... (या प्रत्येक वाक्यानंतर डोळा मारणारी स्मायली पहावी)
या प्रकारचा हा अगदी पहिलाच प्रयत्न आहे...
मला आशा आहे की कवि इथून पुढं अशाच कविता करू लागतील...

निखीलजी,
पुस्तकानं नाही, मिशाळ माणसाच्या मुलाखतीनं वाट लावली...
त्यांच्या मुलाखतीतील काही मौक्तीके:
१. गागाभट्टाने शिवाजी महाराजांकडून भरपूर लाच उपटली
२. आज हिंदूंची परिस्थिती अत्यंत लाजीरवाणी आहे
३. ज्ञानेश्वरीची ओरिजीनल प्रत राजवाड्य़ांनी बदलली...या माणसाने ज्ञानेश्वरीमध्ये हुबेहुब हव्या त्या ओव्या लिहून काढल्या
इत्यादी...इत्यादी...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

31 Aug 2010 - 11:20 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मूळ पुस्तक वाचलेलं नाही, मुलाखत ऐकलेली नाही. तरीही सदर कवितारूपी प्रकटन आणि प्रतिसादामुळे थोडा थोडा उजेड पडला असं वाटत आहे.

फ्रॅक्चर बंड्या's picture

31 Aug 2010 - 11:17 am | फ्रॅक्चर बंड्या

खरे आहे ...सगळा चिखल-चिखल