मेंदूदुखापत एसएमएस???

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in काथ्याकूट
27 Aug 2010 - 11:12 am
गाभा: 

मेंदूदुखापत एसएमएस???

आज सकाळी ९.१८ मिनिटांनी माझ्या मोबाईलवर, +९२३४२७९३६५१५ या नंबरवरून एक कॉल आला.
काल सकाळी १०:४३ मिनिटांनी माझ्या मोबाईलवर, +९१९xxxxxxxxx या नंबरवरून एक एसएमएस आला.

त्यात मला एक सुचना आहे असे सांगण्यात आले.

एसएमएस इंग्रजीत होता. तो मी खाली देत आहे.
"Pls's do not attened any call frm 7888308001, 9316048121, 9876266211, 9888854137, 9876715587
These numbers comes in red colors. u may get brain hammerage due to high energy."

मराठी अनुवाद: 7888308001, 9316048121, 9876266211, 9888854137, 9876715587 या फोन नंबर्स वरून आलेला कोणताही फोन उचलू नका.
हे क्रमांक लाल अक्षरात असतात. जास्त उर्जे मुळे मेंदूदाह होवू शकतो.

बर्‍याच जणांच्या तोंडून असले अपघात या अशा एसएमेस मुळे झालेले ऐकण्यात आलेले आहे. असे फालतू एसएमेस महालक्ष्मी प्रसन्न झाल्याच्या एसएमेस ची पुढची आवृत्ती दिसते.

मोबाईल कंपन्याच असले सुरूवातीचे एसेमएस पाठवत असतील काय? त्यावरून हा प्रकार निव्वळ आर्थिक फ़सवणुकीचा असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मला वाटते.
.
.
. त्या एसएमएस चे काय करू?

जाणकारांनी मतप्रदर्शन करावे.

पाषाणभेद

प्रतिक्रिया

येडबंबू's picture

27 Aug 2010 - 11:27 am | येडबंबू

सगळी फेकाफेकी आहे हो.
साधे simple logic आहे:
आपला मोबाइल फक्त काही pre-defined frequencies च पकडू शकतो. त्यात असले जास्त किंवा कमी उर्जा वगैरे काही नसते.
आधूनीक भोंदूगिरी चा मला हा प्रकार वटतो.

आजून जास्त technical माहीती कोणाला असेल तर कळेलच.

--

केशवपुत's picture

27 Aug 2010 - 11:52 am | केशवपुत

'Death Calls' / 'Killer Phone Number' Warnings..
म्हणुन लोकाना घाबरवण्याचा प्रकार आहे...

केशवपुत's picture

27 Aug 2010 - 11:43 am | केशवपुत

असे एसएमएस पहिल्यादा delete करावेत...
कोणालाही forward करायच्या भानगडीत पडु नये..

याच सोबत...
ओम साई राम!!!
ओम गण गणपतेय नम। !!!
हा एसएमएस १० लोकाना send करा..तुम्हाला भाग्य मिळेल्...इत्यादि इत्यादि...
अन्यथा दुरभाग्य लाभेल..delete करु नका..

असे एसएमएस ही लोकाना मुर्ख बनवत असतात..
असे एसएमएस पटकन delete करावेत...

हा सगळा हाय-टेक अंधश्रद्धेचा प्रकार आहे...
बाकी आपण समजदार आहात...

नावातकायआहे's picture

27 Aug 2010 - 2:20 pm | नावातकायआहे

मोबाईल ध.मु.बाबांचा मोबाईलवाल्या फोटु फुड ठेवा......मंग बगा फरक
तुमाला आलेले आसले एसमेस बाबांच्या क्रुपेनि आपुआप डिलिट व्हतिल...

धमाल मुलगा's picture

27 Aug 2010 - 7:58 pm | धमाल मुलगा

=)) =)) =)) =))
करा तुमी बाबाच्या मेंदूला दुखापत. ;)

डॉ.श्रीराम दिवटे's picture

27 Aug 2010 - 3:30 pm | डॉ.श्रीराम दिवटे

ब्रेन हेमरेज होण्यामागे बरीच शारीरिक मानसिक (हायपरटेन्शन, स्ट्रोक इ.)किँवा अपघात वगैरे कारणे असतात. मोबाईल कॉल रिसीव्ह केल्याने असे होईल हे निव्वळ थोतांड आहे. विश्वास ठेवूच नका.

बाप्पा's picture

27 Aug 2010 - 4:54 pm | बाप्पा

बाप्पा !! असं बी होते का? मले तं माहितंच नव्हतं. लोकाले भोदु बनवते लेकाचे . असा SMS पाठवनार्याले भेटुन त्याच्या पुठ्यावर लात मारा म्हंजे असलं काहि भंगार पाठवनार नाही परत तुमाले.

मनि२७'s picture

27 Aug 2010 - 5:15 pm | मनि२७

आणि mobile जर black and white असला तर रेड कलर कुठून दिसणार आहे....???
सगळी फेकाफेकी आहे हि....

केशवपुत ह्यांच्याशी सहमत !!!

पाषाणभेद's picture

27 Aug 2010 - 9:39 pm | पाषाणभेद

फेकाफेकी आहे हे तर मान्य आहेच.
प्रश्न असा आहे की असल्या फालतू गोष्टी कोण करत असेल? यात कोणाचतरी नक्कीच फायदा असला पाहीजे. मोबाईल कंपन्यांचा तर वरवर नक्कीच फायदा लक्षात येतो आहे.

विराट's picture

28 Aug 2010 - 5:19 am | विराट

जर कोणा बाबा, देव यांचे message अथवा Email आल्यास, सर्वात प्रथम ते delete करा किंवा तोच message अथवा Email तुम्हाला पाठवणार्‍यालाच दहा वेळा पाठवा म्हणजे ती व्यक्ती तुम्हाला तसले message अथवा Email परत पाठवणार नाही........

शिल्पा ब's picture

28 Aug 2010 - 9:20 am | शिल्पा ब

SMS पाठवायला पैसे लागतात न? मग यात फायदा कोणाचा सांगा बरं?

पाषाणभेद's picture

28 Aug 2010 - 9:52 am | पाषाणभेद

तेच तर म्हणतोय. अगदी सुरूवातीचे एसएस्मेस हे बहुतेक मोबाईल कंपन्याच पाठवत असतील. आता दसरा दिवाळी गुढीपाडवा, डेज, (म्हणजे निरनिराळे येणारे दिवस जसे: मित्र दिवस, माय दिवस, बाप दिवस, भाऊ दिवस, रक्तदान दिवस, सर्दी दिवस, खोकला दिवस आदी) आदींना समस पाठवायचे असतील तर कोण कष्ट घेणार टायपायचे. आला समस तर कर फॉरवर्ड... तेच समस मोबाईल कंपन्या तयार पाठवतात अन आपण पाठवतो. मोबाईल कंपन्यांचे सर्व्हर तपासायला पाहीजे.