बहुतेक जणांनी झी मराठीवर सोमवार १६ ऑगस्ट आणि मंगळवार १७ ऑगस्टला रात्री लहान मुलांचे सारेगमप बघितले असेल. त्यावर आपापल्या प्रतिक्रियाही नोंदवल्या असतील. मात्र मला जे आढळले ते मी लिहितो आहे.
सोमवारचा भाग पाहिल्यानंतर असे लक्षात येते की त्यातल्यात्यात गाणार्यांचा संच होता आणि मंगळवारी चांगले गाणार्यांचा. म्हणजेच सोमवारचे बेताचे ५ राहिले आणि मंगळवारचे २ चांगले गेले. त्यातही मंगळवारच्या भागात ज्या मुलाला 'ध' पर्यंत गूण मिळाले तो बाहेर गेला आणि 'प' पर्यंत गूण मिळूनही दुसरा स्पर्धक आत राहिला. म्हणजेच कोण आत कोण बाहेर हे आधीच ठरलेले असते काय?
दुसरे म्हणजे जसे टीव्हीवर दिसते तसे प्रत्यक्षात नसते. गुणतक्ता घेऊन ५ मिनिटे परिक्षक बाहेर असतात. पुन्हा मूळच्या जागी येऊन बसतात आणि शॉट सुरू होतो. टीव्ही बघणार्यांना वाटते की तिथुनच येतात की काय!
एखाद्याला नेमके का काढले याचे कोणतेही उत्तर मिळत नाही. एका परिक्षकाचे गूण दिसतात तर दुसर्याचे दिसत नाहीत. ते न दिसणारे गूण नेमके किती हे सांगितले जात नाही. फक्त कोण आत, कोण बाहेर इतकेच सांगितले जाते.
एकूणच पद्धत आणि सादरीकरण पूर्णपणे सच्चे वाटत नाही.
तसेही संगीतक्षेत्रातील अनेक मान्यवर सध्याच्या लिटिल चँप्स कार्यपद्धतीवर नाराज आहेतच.
माझी आपणा सर्वांना विनंती आहे की, बाहेर काढलेल्या बालगायकांचे गाणे ऐकून त्यावर प्रतिक्रिया द्याव्यात.
यातील विशेषकरून अनेक मान्यवरांना धक्कादायक वाटलेला निकाल म्हणजे अभिषेक सराफला काढून टाकण्याचा.
ही लिंक पहा...
http://www.youtube.com/watch?v=tMqnOA37w-8
प्रतिक्रिया
19 Aug 2010 - 8:59 pm | यशोधरा
झी मराठी काय खरोखर उत्तम गाण्यासाठी आणि गाणार्यांसाठी तो कार्यक्रम राबवतेय की काय? त्यांचा फक्त बिझनेस सुरु आहे! त्याला संबंधित असे आडाखे बांधून ते सगळं पूर्वनियोजित ठरलेलं असणार. चांगल्या बरोबर थोडी खराब पब्लिसिटी मिळणं त्यांच्या टीआरपी वाढायच्या दृष्टीन अधिक फायद्याचं असावं. :d
बाकी ती मुग्धा गोड असली तरी तिने ते 'लिटीssssल' म्ह्टलेलं ऐकायचा वीट आलाय आता. असो.
20 Aug 2010 - 10:50 am | भारतीय
झी बिझनेस चे हल्लीचे नाव झी मराठी झाले आहे...
19 Aug 2010 - 9:01 pm | वेताळ
रिअलिती शो म्हनजे के मुर्खपना आहे असे मला वातते. काय कोलिती आहे का त्याला.
19 Aug 2010 - 9:04 pm | चतुरंग
पण वर दिलेल्या दुव्यावरचा भाग बघून एक मात्र नक्की जाणवले की ह्या कार्यक्रमातली निरागसता झपाट्याने कमी होऊन एकप्रकारचा बाजारुपणा वेगाने वाढताना दिसतोय. प्रसिद्धी आणि चकचकाट ह्याला भुलून लहान वयात ओवरएक्पोजरचा धोका स्पष्टपणे जाणवतोय.
मेहनत करा, रियाज करा, चांगले आणि भरपूर ऐका, स्टेज शोज करु नका, आवाज जपा ह्या सगळ्या गोष्टी फाट्यावर मारल्या जात आहेत हे स्पष्ट दिसते!
मुग्धा वैशंपायन सारख्या गुणी मुलीला अँकरच्या रोलमधे बघून गलबलून आले! :( (तिचे आईवडील लक्ष देतील का?)
(विचारात पडलेला)चतुरंग
19 Aug 2010 - 9:09 pm | अडगळ
पल्लवी ताई नाहीत वाटतं?
या खुषखबरीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पहिजेत.
19 Aug 2010 - 11:42 pm | माझीही शॅम्पेन
+१००००००००
हो बर झाल पल्लवी ताई नाहीत ! अगदी गाणकितीही फालतू झाल तरी सतत आपल
१ - वाह ! मस्त झाल गाण
२- कित्तती छान गायलस हे माझ खूप आवडत गाण होत
वैगरे वैगरे ऐकून अगदी कान किटले आता..
खर तर सर्व रियालिटी शोनना एका लाय्नित फट्कवला पाहिजे !
20 Aug 2010 - 12:59 am | अनामिक
असहमत.
पल्लवी जोशी एक अँकर म्हणून मला आवडायची. तिचा स्टेज प्रेझेंसही छान होता. स्पर्धकांना गाणं कसंही झालं तरी प्रोत्साहन द्यायची ती! तिची जागा दुसरा/री अँकर कदाचितच भरून काढेल.
लोक काहिही टिका करतात. ति म्हणे, छान झालं, सुरेख गायलीस, अप्रतिम झालं... अश्याप्रकारच्या रिअॅक्शनशिवाय दुसरं काही बोलतच नाही... अजून काय रिअॅक्शन देणार ते टिका करणारे मात्र सुचवत नाहीत.
20 Aug 2010 - 5:58 am | अरुण मनोहर
पल्लवी चे आणखी एक नेहमीचे वाक्य-
"आता कसं वाटतयं?"
कधी कधी मला वाटायचे, त्या स्पर्धकाने म्हणायला हवे "मघा जस वाटत होत तसच आताही वाटतं आहे!"
20 Aug 2010 - 7:54 am | नगरीनिरंजन
हा हा हा... किंवा मी काय आजारातून उठून आलोय का असं विचारायला पहिजे..
बाकी हे रिअॅलिटी शोज पब्लिक एवढं गंभीरपणे घेतंय हे पाहून फार्फार करमणूक होतेय.
20 Aug 2010 - 8:03 am | अजय जोशी
नगरीनिरंजन,
रिअॅलिटी शो हासुद्धा एक मंचच आहे. मात्र, यातील फोलपणा हळूहळू कळू लागलाय. यात रिअॅलिटी (वास्तवता) किती आणि शो किती हे गणित समजू लागले आहे.
19 Aug 2010 - 9:13 pm | अप्पा जोगळेकर
यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल झालीच पाहिजे. आणि देशव्यापी संपाची हाक दिली पाहिजे.
19 Aug 2010 - 9:28 pm | अविनाशकुलकर्णी
.जी तिवि च्या रोजगार हमी योजने अंर्तगत हा कार्यक्रम येतो..
पल्लविताई अवदुत..सल्लु कुलकरनी..देवकि पंदित..आदि लोकासाठी हि योजना झी राबवत आहे
19 Aug 2010 - 10:21 pm | अविनाशकुलकर्णी
मुग्धा वैशंपायन सारख्या गुणी मुलीला अँकरच्या रोलमधे बघून गलबलून आले
कमवायचे दिवस आहेत तिचे......
19 Aug 2010 - 10:56 pm | चतुरंग
वय वर्षे १०-११ ला??? मग काय बोलणेच संपले!!!
(गमावणारा)चतुरंग
19 Aug 2010 - 11:09 pm | अनामिक
मला वाटतं कमावण्यापेक्षाही तिच्या पालकांना तिची होणारी प्रसिद्धी भावली असावी. आमची मुलगी कित्ती कित्ती गुणी हे दाखवण्याचा अट्टहास म्हणावा का?
20 Aug 2010 - 11:23 am | वेताळ
हलकट साले इतर ठिकाणी बालमजुर म्हणुन ठाहो फोडणारे इथे का शेपुट घालुन बसतात देव जाणे. ही पण बालमजुरीच आहे ना. भले चांगल्या कपड्यात व लाईटीच्या झगमगाटात असणारी.
24 Aug 2010 - 6:33 pm | यशोधरा
+१
20 Aug 2010 - 12:25 am | योगी९००
तो आगाऊ अँकर अथर्व फार डोक्यात जातो..
आणि अवधूत नाही...
म्हणून इतकी मजा नाही येत..
आणि अभिषेक सराफ जरी चांगले गात असला तरी त्याचे सुरुवातीचे मुग्धाकडे आशिर्वाद मागणे विचित्र वाटले..
बाकी चतुरंग यांच्याशी सहमत..
20 Aug 2010 - 5:45 am | चित्रा
त्याचे सुरुवातीचे मुग्धाकडे आशिर्वाद मागणे विचित्र वाटले..
कसल्या कसल्या पद्धती आल्या आहेत.
हल्लीचे सारेगमप बघितले नाही. मुग्धा आवडत असे पण वाटते की अॅंकर होण्याचे तिचे वय नसावे. पण कोणाचे शीड कुठच्या दिशेने जाते आहे ते आत्ताच चूक का बरोबर सांगणे कठीण असते..
पल्लवी जोशी याच वयात नाटकात कामे करू लागली होती असे वाटते. तिचा भाऊही. तशीच ती उर्मिला मातोंडकर.
20 Aug 2010 - 2:13 am | रेवती
बाकीची गाणी अजून ऐकली नाहीत. मला गाण्यातलं ओ कि ठो कळत नाही. फक्त याच गाण्यावर बोलायचे झाल्यास मला ते आवडलं नाही. आजकालच्या मुलांच्या आगावूपणाबद्दल बोलायचे नाही कारण आमच्याकडे अजून नीट वागण्याचा उजेड पडायचाय! ;) बाकी सा रे ग म असू दे नाही तर कोणताही शो......प्रसिद्धीच्या शिखरावर असताना ते पैसे कमावून घेणार. ज्यांना मान्य नाही त्यांनी आपल्या मुलांना पाठवू नये असे वाटते. आजकाल मोठ्या संख्येनं पालकांना आपल्या मुलांकडे लक्ष देण्यास वेळ नसतो तर हे बिझिनेस करणारे आपल्या मुलांचे हित बघण्यास बांधील नाहीत. तरी एखादा स्पर्धक एलिमिनेट होतो तेंव्हा त्याचे गाणे कुठे चुकले किंवा जे काय असेल ते संगिताच्या भाषेत सांगितले तर ज्यांना त्यातले समजते अश्या प्रेक्षकांना काहीतरी समजू शकेल. सध्या कोणी आला/ गेला तरी आमच्यासारखे प्रश्नही पडू न देता निकालाचा स्विकार करतात (गाण्यातले समजत नसल्याने). अभिषेक गोड दिसतो हे मात्र खरे! :)
20 Aug 2010 - 7:59 am | अजय जोशी
चतुरंग,
पण वर दिलेल्या दुव्यावरचा भाग बघून एक मात्र नक्की जाणवले की ह्या कार्यक्रमातली निरागसता झपाट्याने कमी होऊन एकप्रकारचा बाजारुपणा वेगाने वाढताना दिसतोय. प्रसिद्धी आणि चकचकाट ह्याला भुलून लहान वयात ओवरएक्पोजरचा धोका स्पष्टपणे जाणवतोय.
मेहनत करा, रियाज करा, चांगले आणि भरपूर ऐका, स्टेज शोज करु नका, आवाज जपा ह्या सगळ्या गोष्टी फाट्यावर मारल्या जात आहेत हे स्पष्ट दिसते!
आपण म्हणता आहात ते काही अंशी खरेही आहे. मात्र, मला असे वाटते की प्रसिद्धी किंवा चकचकाट हे मुलांना समजत नसावे. त्यांच्या दृष्टीने आपल्या गाण्याचे ४ लोकांनी कौतुक केले की झाले. प्रत्येकच लहान मुलाला कौतुक हवे असते. तसे या बालगायकांनाही हवे असणार. त्यांना केवळ झगमगाटाची सवय लागू नये हेही खरेच.
रियाझाचे म्हणाल तर या मुलांचे गाणे ऐकल्यावर रियाझ जाणवतोच. मात्र, दंगा-मस्तीचे वय असल्याने तो रियाझ म्हणावा तेवढा परिणाम देत नाही. खरेतर, अजून ६-७ वर्षांनी ज्यावेळी या मुलांचा आवाज फुटेल किंवा पक्का होईल त्यावेळीच यांनी केलेला रियाझ खरोखर दिसेल.
मला अभिषेक माहित आहे. त्याच भागातील एलिमिनेट न झालेली भाग्यश्रीही माहीत आहे. हे दोघेही नियमित रियाझ करतात. शनि-रवि आपापल्या गुरूंचे मार्गदर्शनही घेतात. अभिषेकच्या आवाजाचे संगीतक्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी कौतुक केले आहे. तसेच, त्याने गायलेल्या या गाण्याचेही. त्यामुळे एकंदर परिस्थिती पाहता त्याला बाद करण्याचा निर्णय चुकला असे वाटते. (हे फक्त परीक्षकांवरच अवलंबून असते की नसते हाही प्रश्न.)
त्याचप्रमाणे, अभिषेकला मुग्धाच्या पाया पडायला लावणे हा एक निंदनीय प्रकार होता. दुसर्या एका मुलीलाही अथर्वचा गालगुच्चा घ्यायला लावला. तसेच 'क्यूट' म्हणजे 'गाढव' असे स्वप्नील बांदोडकरांच्या तोंडून वदवले. हे सर्वच चुकीचे आहे.
शोच्या आकर्षणाबद्दल म्हणू तर पालक मुलांना प्रेरीत करीत नाहीत तर मुलेच आकर्षित होतात. त्यांना कुठेतरी मंच हवा असतो. त्यांना या चॅनलवाल्यांकडून चढविले जाते आणि वेळेला पाडले जाते. मात्र, मुलांना ते नंतर सहन होत नाही. ती रियाझ वगैरे सोडून बसतात.
20 Aug 2010 - 10:01 am | अर्धवट
कोण झी मराठी?
कोण अभिषेक?
कसला लिरिल क्यांप?
धन्यवाद.
20 Aug 2010 - 10:49 am | परिकथेतील राजकुमार
कशाला असले काही बघत बसता हो ?
छानसे दोन पेग मारावेत आणि बोल्ड अॅंड द ब्युटीफुल अथवा ट्रू-ब्ल्ड बघत बसावे.
२४ तारखेला मिस युनिव्हर्स आहे, त्याची तयारी बघावी. छान छान ललनांचा लुत्फ लुटावा.
20 Aug 2010 - 11:05 am | इन्द्र्राज पवार
एका थोर संताचे बोल आहेत, ते या संदर्भात चपखल लागू होतील.
१. "झाडाच्या सावलीचे संरक्षण न सोडता सूर्याच्या तेजाचे कौतुक करावे"
२. "मोराच्या नृत्याचे आणि फुलविलेल्या पिसांचे दर्शन फक्त समोरून घ्यावे. ज्यादाचे पाहण्यासाठी मोराच्या मागे जावून पाहु नये."
आणि
३. (हे तिसरे तर 'जानलेवा' आहे, पण इथे नको.)
20 Aug 2010 - 1:02 pm | मृत्युन्जय
लोक अजुन मराठी पामागारेसा बघतात याचेच आश्चर्य वाटते आहे. मला कोणि सगळ्या स्पर्धकांची नावे सांगितली तर एकाचाही आवाज न ऐकता निकालाच्या २ आठवडे आधी मी विजेता कोण होणार हे सांगु शकतो.
20 Aug 2010 - 8:21 pm | विजुभाऊ
या प्रतिसादावर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत
20 Aug 2010 - 9:24 pm | विराट
@मृत्युन्जय : मस्त प्रतिसाद
मला हा कार्यक्रम चांगला वाटायचा जो पर्यंत देवकी पंडीत परिक्षक होत्या. काही स्पर्धक खुपच हुशार असतात. बाकी सगळे भंपक आहे. हिंदी कार्यक्रम तर भिक्कारडा असतो (स्पर्धक सोडुन).......
21 Aug 2010 - 10:38 am | विसोबा खेचर
एकूणातच संगीताचा जो काही बाजार आणि तमाशा झी-मराठी आणि इतर काही वाहिन्यांनी मांडला आहे त्याबद्दल आम्ही काहीच भाष्य करू इच्छित नाही.. कारण आम्हाला संगीतातले विशेष काही कळत नाही...
(गेली चाळीस वर्ष संगीतातला केवळ षड्जच समजावून घेत असलेला संगीताचा एक ढ विद्यार्थी) तात्या.
24 Aug 2010 - 5:22 pm | मृगनयनी
झी मराठीने "सारे गम प"ही मालिका बन्द करून त्याऐवजी "एकापेक्षा एक" पुन्हा सुरु केल्यास आणि एकापेक्षा एक'चा कन्टाळा आल्यावर दुसरा काहीतरी ऑप्शन शोधल्यास बरे होईल...
तसेही आम्ही सोमवारी इ-टीव्ही वरती "वॉव" बघतो... आणि मन्गळवारी "आय बी एन" वर निखील वागळे' ला ऐकतो! ;)
21 Aug 2010 - 4:33 pm | अमोल केळकर
स्पर्धा म्हणले की चालायचेच
अमोल केळकर
21 Aug 2010 - 4:36 pm | परिकथेतील राजकुमार
सारेगमप हि स्पर्धा आहे ?
भलतेच काहितरी काय केळकर साहेब :(
21 Aug 2010 - 5:05 pm | अनाम
नवे पर्व..जुनीच चर्चा...
नवे धागेप्रवर्तक्..जुनेच (तेच तेच) प्रतिसाद....
एवढे इमोशनल का होता बे.... एका कानाने ऐका नी सोडुन द्या ना राव.
किंवा जर एवढच त्रास होतो तर I hope तुमच्या टिव्हीला रिमोट असलचं. एखादा छानसा NG Wild, Discovery चॅणेल लावा त्यात विंटरेस्ट नसेल तर गेला बाजार FTVलावुन बसा.
हाय काय अन नाय काय.
21 Aug 2010 - 7:23 pm | मृत्युन्जय
आयला FTV मध्ये विंटरेस्ट लावायचे दिवस गेले आता. आता FTV आणि आस्था मध्ये फारसा फरक नसतो (असे लोक म्हणतात)
त्यामुळे आम्ही आजकाल चका सेट मॅक्स बघतो. काय छानछान शिनेमे लावतात त्यावर. डॉन नं १ काय, तेझाब (तेलुगु) काय. मज्जाच मज्जा. हे असले शिणेमे सेट मॅक्स वर लागायला लागल्यापासुन आम्ही दक्षिणेकडच्या शिनेम्यांमध्ये अंमळ जास्तच विंटरेस्ट घ्यायला लागलो आहोत. लवकरच त्यावर एक धागा टाकावा म्हणतो.
24 Aug 2010 - 9:47 am | अजय जोशी
कालच्या म्हणजे सोमवार दि.२३/०८/२०१० च्या भागातले गायक अगदीच सुमार होते. दोन लोकांना कसाबसा 'ध' तर ५ जणांना बळेच 'प' दिला गेला. दर्जाहीन कार्यक्रमाची ग्वाहीच होती जणू...!
24 Aug 2010 - 7:20 pm | अनाम
आय्ला एवढ रामायण सांगुन पण अजुन तुमचे ते चालुच =)) धन्य आहे.
जाउद्या एकडाव माफी द्या त्या 'सरगमप'वाल्यांना.