व्यथा

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जे न देखे रवी...
16 Aug 2010 - 9:09 am

काय सांगू अंधकारा या चिरागाची व्यथा?
काय सांगू या प्रकाशा आंधळ्याची मी व्यथा?

ही मिजाशी आज कोत्या काजव्यां व्हावी कशी?
पौर्णिमेला ग्रासलेल्या चंद्रम्याची ही व्यथा

मेंढरांनी गांजलेला शक्तिशाली सिंह मी
काय सांगू या गजांना अंतरीची ही व्यथा

राजझेंडा होउनीया काय चिंध्या जाळती,
रक्तरंजी भर्जरी या क्रांतिवस्त्राची व्यथा?

बोलणेही खुंटले जेव्हा मला फर्मावले
कर्णदोषी, मूक लोकां सांग जा तूझी व्यथा

ब्राह्मणाची रक्तशोषी दानझोळी, तीतल्या
कुंडलांना का कळावी विद्ध कर्णाची व्यथा?

करुणगझल

प्रतिक्रिया

सुभाष् अक्कावार's picture

16 Aug 2010 - 10:04 am | सुभाष् अक्कावार

कविता आवडली. व्यथा काळजाला भिडली.

विसुनाना's picture

16 Aug 2010 - 3:30 pm | विसुनाना

काही कल्पना, मिसरे चांगले आहेत.

काय सांगू या प्रकाशा आंधळ्याची मी व्यथा?
मेंढरांनी गांजलेला शक्तिशाली सिंह मी

इ.

राजझेंडा होउनीया काय चिंध्या जाळती,

यावरून इथला हा शेर आठवला -

उकंड्यातल्या फडक्याला त्या मिंध्या चिंध्या ठिगळत जाती -
कुणा कळावे कशाकशाचा येथे झेंडा फडकत जातो?

:). असो.
अजून गझला याव्यात ही अपेक्षा.

असुर's picture

16 Aug 2010 - 4:50 pm | असुर

>>>ब्राह्मणाची रक्तशोषी दानझोळी, तीतल्या
कुंडलांना का कळावी विद्ध कर्णाची व्यथा? <<<

वा!!!!

--असुर