आपल्याला निरनिराळ्या विषयांवर लेख व चर्चा करायला मिळते . तसेच अस्सल मराठी माणसाप्रमाणे वादविवाद करायलाही मिळते. मिपा. हे एक खुले व्यासपीठ आहे.
आपला
कॉ.विकि
मिपावर हे, हे आणि हे आहे! शिवाय तुम्हाला स्वत:लाही काही लिहावंसं वाटलं तर ते तुम्ही येथे अवश्य लिहू शकता.
'या टोपीखाली दडलंय काय?' या चालीवर 'या मिपाखाली दडलंय काय?' :) असं तुम्हाला म्हणावंसं वाटणं हे साहजिकच आहे कारण नवख्या व्यक्तिला मिपा हा नक्की काय प्रकार आहे हे माहीत असेलच असं नाही...
इथे चार दिवस राहा, इथे प्रसिद्ध झालेलं जुन-नवं लेखन आणि त्याला आलेले प्रतिसाद वाचा, जमल्यास स्वत: काही लिहा, इथलं वातावरण कसं वाटतंय, काय वाटतंय ते बघा म्हणजे तुम्हाला मिपावर नक्की काय काय आहे आणि काय काय नाही हे कळेल!
मिपा आवडलं तर इथेच र्हावा, नाय आवडलं तर चार दिस आमचा पाहूणचार घिऊनशान चालू पडा!
मिसळ-पावात काय काय असतं?
झणझणीत तिखट, स्वल्प आंबट, किंचित गोड, मसालेदार, चिवड्यासारखं कुरकुरीत, पावासारखं खमंग, पोटभर, उत्साहवर्धक, लक्षात राहण्याजोगं, पुन्हा-पुन्हा यावसं वाटणारं, आठवणीनेच तृप्तीची भावना निर्माण करणारं, आपल्या सारख्याच अनेक तृप्तांना भेटण्याचे एक ठिकाण..... म्हणजेच मिपा....
पण सांभाळून.... सावकाश... समरस व्हा.....घाई कराल तर असा काही झणझणीत ठसका लागेल की पंचप्राण कंठाशी येऊ शकतात.
प्रतिक्रिया
5 May 2008 - 3:27 pm | धमाल मुलगा
त्यापेक्षा काय नाहीय्ये हे विचारणं जास्त संयुक्तिक ठरेल ऋचा!
शुध्दलेखनाचं अवास्तव स्तोम सोडून इथं सगळं काही आहे. फक्त शोधावं लागेल :)
5 May 2008 - 3:29 pm | विकि
आपल्याला निरनिराळ्या विषयांवर लेख व चर्चा करायला मिळते . तसेच अस्सल मराठी माणसाप्रमाणे वादविवाद करायलाही मिळते. मिपा. हे एक खुले व्यासपीठ आहे.
आपला
कॉ.विकि
5 May 2008 - 3:41 pm | ऋचा
इथे यायच्या आधी मी लेख वाचायचे फक्त अन् ते मला आवडले :):):):):)
अन् तुम्हा सर्वांची नाव पण छान आहेत ....
5 May 2008 - 3:41 pm | विसोबा खेचर
मिपावर हे, हे आणि हे आहे! शिवाय तुम्हाला स्वत:लाही काही लिहावंसं वाटलं तर ते तुम्ही येथे अवश्य लिहू शकता.
'या टोपीखाली दडलंय काय?' या चालीवर 'या मिपाखाली दडलंय काय?' :) असं तुम्हाला म्हणावंसं वाटणं हे साहजिकच आहे कारण नवख्या व्यक्तिला मिपा हा नक्की काय प्रकार आहे हे माहीत असेलच असं नाही...
इथे चार दिवस राहा, इथे प्रसिद्ध झालेलं जुन-नवं लेखन आणि त्याला आलेले प्रतिसाद वाचा, जमल्यास स्वत: काही लिहा, इथलं वातावरण कसं वाटतंय, काय वाटतंय ते बघा म्हणजे तुम्हाला मिपावर नक्की काय काय आहे आणि काय काय नाही हे कळेल!
मिपा आवडलं तर इथेच र्हावा, नाय आवडलं तर चार दिस आमचा पाहूणचार घिऊनशान चालू पडा!
कसं? :)
असो, मिपावर मनापासून स्वागत आहे...
आपला,
(मिपाकर) तात्या.
5 May 2008 - 5:14 pm | भोचक
मिपाचे सदस्य झाल्याबरोबर येणारी एक आपुलकीची भावना आणि सदस्यांशी जोडला जाणारा अकृत्रिम स्नेह असं बरंच काही यावर आहे. हा माझा अनुभव आहे.
5 May 2008 - 5:24 pm | यशोधरा
मला मिपाची साईट आवडली. :)
5 May 2008 - 5:25 pm | प्रभाकर पेठकर
मिसळ-पावात काय काय असतं?
झणझणीत तिखट, स्वल्प आंबट, किंचित गोड, मसालेदार, चिवड्यासारखं कुरकुरीत, पावासारखं खमंग, पोटभर, उत्साहवर्धक, लक्षात राहण्याजोगं, पुन्हा-पुन्हा यावसं वाटणारं, आठवणीनेच तृप्तीची भावना निर्माण करणारं, आपल्या सारख्याच अनेक तृप्तांना भेटण्याचे एक ठिकाण..... म्हणजेच मिपा....
पण सांभाळून.... सावकाश... समरस व्हा.....घाई कराल तर असा काही झणझणीत ठसका लागेल की पंचप्राण कंठाशी येऊ शकतात.
6 May 2008 - 9:44 am | ऋचा
कळाल बरका पेठकर काका......
म्हणून जरा जपून खावं माणसाने...(माणूस म्हणू ना??? :)) )
6 May 2008 - 4:41 pm | प्रभाकर पेठकर
...(माणूस म्हणू ना??? )
अशी शंका मनात उद्भवण्याचे कारण?
6 Jun 2008 - 2:02 pm | नाखु
पुण्या मुंबई सह महाराश्ट्रातील यादि (खूणे) सह द्याच
मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"
6 Jun 2008 - 2:03 pm | प्रभाकर पेठकर
आत्ता 'मिसळपाववर काय आहे?' ह्या विषयाखाली विषय आहे, 'शिवरायांचे स्मारक'