आपल्याला निरनिराळ्या विषयांवर लेख व चर्चा करायला मिळते . तसेच अस्सल मराठी माणसाप्रमाणे वादविवाद करायलाही मिळते. मिपा. हे एक खुले व्यासपीठ आहे.
आपला
कॉ.विकि
मिपावर हे, हे आणि हे आहे! शिवाय तुम्हाला स्वत:लाही काही लिहावंसं वाटलं तर ते तुम्ही येथे अवश्य लिहू शकता.
'या टोपीखाली दडलंय काय?' या चालीवर 'या मिपाखाली दडलंय काय?' :) असं तुम्हाला म्हणावंसं वाटणं हे साहजिकच आहे कारण नवख्या व्यक्तिला मिपा हा नक्की काय प्रकार आहे हे माहीत असेलच असं नाही...
इथे चार दिवस राहा, इथे प्रसिद्ध झालेलं जुन-नवं लेखन आणि त्याला आलेले प्रतिसाद वाचा, जमल्यास स्वत: काही लिहा, इथलं वातावरण कसं वाटतंय, काय वाटतंय ते बघा म्हणजे तुम्हाला मिपावर नक्की काय काय आहे आणि काय काय नाही हे कळेल!
मिपा आवडलं तर इथेच र्हावा, नाय आवडलं तर चार दिस आमचा पाहूणचार घिऊनशान चालू पडा!
कसं? :)
असो, मिपावर मनापासून स्वागत आहे...
आपला,
(मिपाकर) तात्या.
मिसळ-पावात काय काय असतं?
झणझणीत तिखट, स्वल्प आंबट, किंचित गोड, मसालेदार, चिवड्यासारखं कुरकुरीत, पावासारखं खमंग, पोटभर, उत्साहवर्धक, लक्षात राहण्याजोगं, पुन्हा-पुन्हा यावसं वाटणारं, आठवणीनेच तृप्तीची भावना निर्माण करणारं, आपल्या सारख्याच अनेक तृप्तांना भेटण्याचे एक ठिकाण..... म्हणजेच मिपा....
पण सांभाळून.... सावकाश... समरस व्हा.....घाई कराल तर असा काही झणझणीत ठसका लागेल की पंचप्राण कंठाशी येऊ शकतात.
प्रतिक्रिया
आपलं स्वागत आहे!
मिपा वर
:)
मिसळपाव डॉट कॉम.
आपुलकीची भावना
आवडली
मिपा...
हं......
का?
मिसळ तीर्र्थश्केत्रांचि यादी
योगायोग...