हजार कात्र्या आम्हा परजु दे, कर्तनयोगे त्या, आम्हाला कुरतडू दे सारे,
विवस्त्र कवटी आज होवू दे, टक्कल पार्याचे, गळू दे व्यर्थ भार सारे.
तैलसुरा प्राशुन माजले , तण डोईवरचे ,
जणु की कवड्यांच्या कविता,
आणि ग्रासिले मुख दाढीने , ओठ मिश्याखाली ,
लोपला नभाआड सविता.
क्षौरवीरा तव सुसाट कर्तन असेच चालू दे,
खुलो नक्षी डोक्यावरती,
मान गळ्यातून निघो कालवे भगव्या पाण्याचे,
नापिता, कळ आली भलती.
ही कानाची पाळी ठेवा , नीट खिश्यामध्ये
शिवुन घ्या जा नाक्यावरती,
नापित आम्ही शस्त्र फिरवतो प्राणकराराने,
जराशी माफ करा गलती.
चला झाडू द्या शुभ्र कापडे, केसांनी मळली ,
आण बे, चुना नि गायपुडी.
वीस टाळकी बारा दाढ्या , म्हसबी भादरली,
करू दे आमाला बी दाढी.
प्रतिक्रिया
10 Aug 2010 - 1:03 am | सुनील
मस्त विडंबन. पण कवितेतील एका महत्त्वाच्या कडव्याचे विडंबन वाचायला मजा आली असती -
सहकार्यांनो का ही खंती, जन्म खलाश्यांचा
झुंजण्या अखंड संग्राम
नक्षत्रांपरि अखंड नीलांमध्ये संचरावे
दिशांचे आम्हाला धाम
कोट्यवधी जगतात जीवाणू, जगती अन मरती
जशी ती गवताची पाती
नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली
नीर्मितो नवक्षितिजे पुढती
(कडवी आठवणीतून लिहिली आहेत. चुभुद्याघ्या)
10 Aug 2010 - 1:06 am | असुर
आगायायायायाया! वैच्च भारी की वो!!!! कचकचून कापला की राव!
श्रावण संपल्यावर असंच व्हायचं आहे म्हणा! दाढीचं झुंबर कापून घ्यायला हीच अशीच 'प्राण करी घेऊन' करावयाची आहे कसरत!
आता कोणीतरी 'नापिता रे, केस काप रे.. डौलाने उडू पाहती, बटा माझ्या रे' वगैरे एखादं खास न्हावीगीत करा भौ!!
--असुर
10 Aug 2010 - 1:26 am | सुनील
हे कात्र्या आणि भादरण्याचे (उडवण्याचे) रुपक अन्यत्र कुठे चपखल बसेल का, याचा विचार करीत आहे!
10 Aug 2010 - 9:32 am | राजेश घासकडवी
मस्त. अजून विडंबनं येऊ द्यात.
10 Aug 2010 - 9:35 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
हा हा हा झक्कास विडंबन! डॉनरावांनी मुद्दामच इथे प्रतिक्रिया देणं टाळलेलं दिसतंय! ;-)
10 Aug 2010 - 9:42 am | राजेश घासकडवी
डॉनरावांच्या बाबतीत विचार करताना
आपही न्हाई, आपही झुलपे, आपही बैठ काटता
असं काहीसं सुचून गेलं...कबीराला जर दोनराव माहीत असते तर त्याने या ओळी नक्की लिहिल्या असत्या.
कदाचित इतकं गहन नसेलही. ते उसात दंगा करायला गेले असतील.
11 Aug 2010 - 4:39 pm | चतुरंग
डान्रावांच्या बाबतीत प्रश्न आणखीनच अवघड असावा, पुढची बाजू कोणती आणि मागची कोणती, डोक्याची म्हणतोय मी, ते समजण्यापासूनच सुरुवात असावी न्हावीबुवांची! ;)
11 Aug 2010 - 7:23 pm | छोटा डॉन
अडगळरावांचे फंटाश्टिक विडंबन सोडुन बाकी सर्वांना 'अनुल्लेखाने' मारले आहे.
कळावे, लोभ असावा !!!
- छोटा डॉन
10 Aug 2010 - 10:41 am | ज्ञानेश...
उच्च विडंबन !
आवडले.
11 Aug 2010 - 3:45 pm | स्पंदना
हा हा हा!!
या अश्या विडम्बना ला प्रतिसाद द्यायला टारझण पाहिजे.
कुणी विचार करेल का आपण काय गमावल याचा?
11 Aug 2010 - 4:37 pm | चतुरंग
एकदम झकास कातरली आहेस आयडिया! ;)
(मॅगेलन्)चतुरंग
11 Aug 2010 - 6:05 pm | लिखाळ
वा वा ..
सुसाट .. विडंबन एकदम आवडले
कान आणि म्हस लै भारी :)
11 Aug 2010 - 6:14 pm | केशवसुमार
अडगळशेठ,
मस्त विडंबन..
पण सर्व कडव्यांचे विडंबन करायला हवे होते असे वाटले..
बाकी चालू दे..
(काव्य कर्तनालयाचे मालक)केशवसुमार
11 Aug 2010 - 7:16 pm | अडगळ
मला पण सगळी कडवी करायची होती , पण इतकी करता करता दम लागला :-)
8 Sep 2010 - 3:28 pm | प्रीत-मोहर
छान.........