भारतात काय चांगलं आणि काय वाईट ह्याची चर्चा गेली अनेक वर्षे मी ऐकत आहे.
चला तर मग एक खेळ खेळू
मी वाईट बाबी नमूद करतो (मी वाईट तर वाईट सही), तुम्ही चांगल्या बाबी नमूद करा.
काही अटी,
१) कोणीही, कोणावरही वैयक्तिक चिखल फेक करायची नाही
२) भारत देश हा एक सर्व साधारण माणसाच्या डोळ्याने बघून बाबी नमूद करायच्या.
जसे कि ज्याला एक - दोन मुलं आहेत,
रोज दहा तास काम करून त्याचा महिन्याचा पगार ८-१० हजार रुपये आहे.
तो सध्या एक चाळीत २-३ रूमच्या खोलीत रहात आहे.
३) स्वताच्या आणि इतर मित्रांच्या समस्या देखील मांडू शकता.
तर आहे का कबूल ?
(जेव्हा कधी पुढे भारतात काय चांगले, काय वाईट हा प्रश्न विचारला जाईल,
तेव्हा मी ह्या धाग्याचा दुवा देईन, आपण हि द्यावा.)
प्रेरणा : गेली काही दिवस उपक्रम आणि इतर संकेत स्थळावर चाललेले द्वंद युद्ध.
काहींच्या मते भारतात अजून तरी काही इतके वाईट दिवस आलेले नाहीत.
आणि काहींच्या मते भारताच्या लोकशाहीने सर्व सीमा पार करून देश कसा नसावा ह्याचे अतिउत्तम उदाहरण जगासमोर ठेवले आहे.
(मी नेहमी मला स्वताला विचारात असतो कि, खरंच अजून काहीतरी चांगलं शिल्लक राहिला आहे काय ह्या भारतात,
का फक्त मलाच तसे भासत आहे.
का माझीच दृष्टी इतकी वाईट झाली आहे कि, मला जिकडे तिकडे वाईटच वाईट दिसत आहे.
आता मी जो पेपर सकाळ, मटा, Times of India माझ्या संगणकावर मला इतरांपेक्षा वेगळे दिसतात)
ह्या चर्चेचा आरंभ इथे झालेला आहे. व इथे त्यावरील प्रतिक्रियाही पाहू शकता.
http://www.mr.upakram.org/node/2712
प्रतिक्रिया
8 Aug 2010 - 5:04 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
आपल्याच देशातलंहे वाईट ते वाईट ही चर्चा नुसती दळत बसण्यापेक्षा त्यातल्या कोणत्या गोष्टी वाईट आहेत आणि त्यासाठी आपण काय करु शकतो. अगदी स्वतः पुरते का होइना. यासाठी हे का.कू. व्हावे ही किमान अपेक्षा.
त्यातल्या त्यात आपण सुरुवात करु शकतो. साध्या वाईट गोष्टीपासुन... गलिच्छ्पणा/अस्वच्छ्ता
आपण आपल्यापुरते जरी हे आचरणात आणले तरी लई झालं.
१ ) पानः पान खाउन पचापचा दिसेल तिथे थुंकणं.
२) कोपर्यावर सिगारेटी ओढुन थोटकं जिथल्या तिथे टाकणं.
२) पोरांच्या हातात कुरकुरे,फ्रूटी,लेज अथवा तत्सम चावट खाणं देउन त्यांना त्याचे पिशव्या किंवा कार्टनादी योग्य ठिकाणी टाकायची सवय न लावणं.
३) पर्यावरणाविषयक समस्यांचा जर्राही विचार न करता कचरा वर्गीकरण न करणं.
४) इ.
५) इ.
12 Aug 2010 - 12:13 am | प्रसन्न केसकर
माझ्या देशात तुम्ही असा धागा काढु शकता अन त्याच्यावर दोन-चार प्रतिसाद पण घेऊन शकता.
8 Aug 2010 - 7:50 pm | Dhananjay Borgaonkar
नानाशी सहमत. लोकशाहीच्या उगाच बड्यबड्या गप्पा मारयच्या. आपण हे करायला हवे नी ते.
प्रत्यक्षात स्वतः करायच मात्र काहीच नाही.
गोडसेवादी धनंजय.
10 Aug 2010 - 7:10 am | गांधीवादी
हा प्रतिसाद कोल्हापुरी-जाई ताई आणि धनंजय साहेब यांना,
माझ्या स्वता बद्दला सागितले तर मी पूर्ण पणे निर्व्यसनी आहे आणि काही प्रमाणात (म्हणजे काम आणि घर सांभाळून ) व्यसनी लोकांना निर्व्यसनी होण्याचा संदेश देत असतो.
मी सवः कुठेही गेलो कि सर्व मुलांनी आणि जमेल तसे इतरांनी कचरा योग्य जागी टाकण्याबाबत दक्ष राहतो.
माझ्या घरात आणि सोसायटी मध्ये ओला कचरा आणि सुका कचरा वेगळे करण्यास नियम केले आहेत, (मी स्वतः ते पाळतो हे सांगणे न लगे)
मला माझ्या घराची जेवढी काळजी वाटते तेवढीच पर्यावरणाची काळजी देखील वाटते म्हणूनच,
मी प्रत्येक वेळीस माझ्या दुचाकीची योग्य देखभाल करतो जेणेकरून कमीत कमी प्रदूषण होईल
(फक्त PUC काढले म्हणजे झाले असे मी तरी मानत नाही)
आणि जमल्यास जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतुकीच पर्याय वापरतो. धनंजय भाऊ मी स्वतः प्रामाणिक पणे वागण्याचा खूप प्रयत्न करीत असतो , कित्येक वेळा त्यामुळे अडचणीत सापडतो, पण सुदैवानी मित्र समुदाय मोठा आहे, कोण ना कोणतरी मदतीला येतोच.
मुलीचे जन्म प्रमाणपत्र लाच न देता काढले आहे मी. (४-५ हेलपाटे आणि १०-१५ दिवस घालवून. त्याऐवजी मागितलेली १०० रुपये लाच कधीही स्वस्त पडले असती)
हे केवळ एक उदाहरण,
पण प्रामाणिकपणे नमूद करतो,
बर्याच ठिकाणी लाच देण्याशिवाय पर्यायाच नसतो. लाच दिली नाही तर काम होणारच नाही असे जेव्हा ठाम पण वाटते तेव्हा (ह्या व्यवस्थेपुढे) थोडे झुकावे लागते कधी कधी.
10 Aug 2010 - 10:27 am | ऋषिकेश
हे जे तुम्ही करत आहात ते कौतुकास्पद आहे. शुभेच्छा
बाकी मुळ चर्चेत काही बोलण्याचा मुड अजूनही नाही
10 Aug 2010 - 1:10 pm | इन्द्र्राज पवार
"बर्याच ठिकाणी लाच देण्याशिवाय पर्यायाच नसतो. लाच दिली नाही तर काम होणारच नाही असे जेव्हा ठाम पण वाटते तेव्हा (ह्या व्यवस्थेपुढे) थोडे झुकावे लागते कधी कधी."
श्री.गांधीवादी यांच्या प्रकटनातील (ते स्वतः कटाक्षाने पाळत असलेल्या सार्वजनिक) बाबीबद्दल नक्कीच त्यांचे अभिनंदन केले पाहिजे, विशेषतः मुलीच्या जन्मनोंदणी प्रमाणपत्राबाबत त्यांनी दाखविलेली चिकाटी.
अर्थात त्यांचा दुसरा मुद्दा "लाच दिली नाही तर काम होणारच नाही..." याचा मी वारंवार अनुभव घेतला आहे. अगदी अलिकडचा म्हणजे माझी एक मावशी अल्पशा आजाराने मृत्युमुखी पडली. रितीनुसार सर्व सोपस्कार झाल्यानंतर, नियमित दिनक्रम सुरू झाले. एके दिवशी ती ज्या महिला मंडळाची सदस्या होती तिचे काही पदाधिकारी आले आणि आमच्याकडे मावशीच्या "मृत्यु" दाखल्याची प्रत देण्याविषयी विनंती करू लागले, कारण मावशी त्या क्लबची उपाध्यक्ष होती व क्लबचा आर्थिक व्यवहार अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या जोडसहीने चाले. आता ही कैलासवासी झाल्याने साहजिकच नव्या उपाध्यक्षेच्या सहीस मान्यता मिळण्यासाठी बँकेने जी कागदपत्रे मागितली तीत अगोदरच्या उपाध्यक्षा दिवंगत झाल्याचा महानगरपालिकेचा दाखला मागितला. अर्थात तो आम्ही देणे क्रमप्राप्त होते. नंतर मी संबंधित कार्यालयात (योग्य त्या कागदपत्रांसह) गेलो आणि ज्या ठिकाणी "येथील सेवा मोफत असून कुणालाही पैसे देऊ नयेत अशी नागरिकांना विनंती आहे" असा बोर्ड लावला आहे त्या ठिकाणीच आत काऊंटरच्या आत बसलेल्या बाबुचा एजंट उभा होता. "मयताचा दाखल्यासाठी चार दिवसानंतर या" हा आतील फटका ऐकून बाहेर आलो. आणि माझी अस्वस्थता पाहुन एजंटाने "वीस रुपये द्या. दहा आतल्या त्या दाढीवाल्याला, पाच नोंदणी शिपायाला, पाच मला." ~~ दिले. दहा मिनिटात दाखला हातात.
काय करू? दाखला तर लागलीच पाहिजे होता. श्री.गांधीवादी म्हणतात त्याप्रमाणे काही वेळा (आपल्याच कारणासाठी) असल्या बजबजपुरीपुढे झुकावे लागतेच कारण मी जर "बाणेदारपणा" दाखवून पैसे न देता दाखल्याशिवाय तिथुन परतलो असतो तर तातडीची गरज म्हणून त्या क्लबच्या दुसर्या सदस्याने तसे वीस रुपये देऊन दाखला हा आणलाच असता.
11 Aug 2010 - 6:47 pm | वेताळ
मी देखिल असेच राहण्याचा प्रयत्न करेन.
तुम्ही शेळीचे दुध पिता हो?
12 Aug 2010 - 8:52 am | गांधीवादी
>>तुम्ही शेळीचे दुध पिता हो?
आईशप्पथ खरं आहे हे.
आमच्या घरी आजीकडे माझ्या लहानपणी एक शेळी होती. तिचे नाव होते हर्रू.
मी माझ्या वयाच्या १०-१२ वर्षापर्यंत तिचेच दुध पीत असे. खूप गट्टी होती त्या शेळीची आणि माझी.
पुढे आजीला तिला सांभाळता येणे जड जाऊ लागले म्हणून तिने तिला हडपसर येथे एका ओळखीच्या माणसाकडे सांभाळायला दिले. खूप मोठा गोठा होता त्या माणसाचा. मी एकदा गेलो होतो शेळीला भेटायला. आजी घेऊन गेली होती मला तिथे. तेव्हा हडपसर खूप खूप लांब वाटले होते. (आता कुठे आहे ते आठवत नाही.)
गमंत सांगू. तिच्या आईचे नवा सुद्धा हर्रुच होते. आणि तिला सुद्धा तिथेच दिले आजीने.
माझ्या आजीला घरात शेळी पाळण्याची खूप हौस होती. पण आता तिचे वय झाल्याने जमत नाही.
आम्ही अधून मधून तिची आठवण काढीत असतो.
आज पुन्हा एकदा आठवण झाली.
माझ्याकडे एक लहानपणीचा फोटो आहे तिच्याबरोबर, जमल्यास नक्की टाकीन.
पण तुम्हाला कसं काय समजले हि बुवा ?
8 Aug 2010 - 9:15 pm | ईन्टरफेल
आज आमी गटारीत हाय! (आज गटार आमुशा हाय) तवा आमी बाहेर निघल्यावर नाहक आप्ल्यावर काहि घान उडायचि! त्यापेक्षा आमि गटारीतच बर हाय? नव्ह का?
9 Aug 2010 - 8:08 am | शहराजाद
>(मी नेहमी मला स्वताला विचारात असतो कि, खरंच अजून काहीतरी चांगलं शिल्लक राहिला आहे काय ह्या भारतात,
>का फक्त मलाच तसे भासत आहे.
बर्याच वाईट गोष्टी बदलायला हव्यात, सुधारणंना अजून खूप वाव आहे हे कबूल. परन्तु ते जगातल्या सर्वच ठिकाणांना कमी-जास्त प्रमाणात लागू आहे. मला तर भारतात खूप काही चांगलं दिसून येतं (शिल्लक राहिलेल आणि नवंदेखील).
>का माझीच दृष्टी इतकी वाईट झाली आहे कि, मला जिकडे तिकडे वाईटच वाईट दिसत आहे.
आता मी जो पेपर सकाळ, मटा, Times of India माझ्या संगणकावर मला इतरांपेक्षा वेगळे दिसतात)
शक्य आहे. माझ्या माहितीतल्या एका बाईंना डोळ्यांनी विचित्र दिसू लागले. तिसर्या का दुसर्या ऑप्टिक नर्व्हचा प्रॉब्लेम असं डॉक्टरांनी निदान केलं. तुम्ही सुद्धा तपासून घ्या.
9 Aug 2010 - 1:16 pm | भारतीय
भारत माझा देश आहे, माझ्या देशावर माझे प्रेम (गुणदोषांसकट) प्रेम आहे!
10 Aug 2010 - 7:30 am | गांधीवादी
भारत माझा सुद्धा देश आहे, माझ्या देशावर माझे सुद्धा मनापासून(गुणदोषांसकट) प्रेम आहे!
आणि त्याहून पुढे , मी माझा देश प्रेमाने / अभिमानाने स्वीकारला* आहे.
मी गुणदोष ह्यांची यादी करायचा प्रयत्न करीत आहे बस्स. खूप जिकरीच काम आहे ते.
कारण अनेक वर्षाच्या जालावरील वावरानंतर, नक्की गुण दोष ते कोणते हे नक्की करू शकत नाही.
आणि ज्प्पार्यंत हे समजणार नाही तोपर्यंत कसे काय दूर करणार.
रोग्याला कोणता रोग झाला आहे हेच जर डॉक्टर ला कळले नाही तर तो काय डोम्बल्याचा इलाज करणार) म्हणून तर हा प्रपंच.
*अनेक वेळ परदेशी नागरिकत्वाच्या संधी येऊन देखील माझ्या पारपत्रावर माझे नागरिकत्व भारतीय आहे. आणि ते राहणारच.
9 Aug 2010 - 2:09 pm | विजुभाऊ
रोज दहा तास काम करून त्याचा महिन्याचा पगार ८-१० हजार रुपये आहे.
तो सध्या एक चाळीत २-३ रूमच्या खोलीत रहात आहे.
हे असे असेल तर इथे असलेल्या पैकी कोणीच काहीही लिहु शकणार नाही.
9 Aug 2010 - 2:46 pm | पांथस्थ
हे म्हणजे ...घरचं झालं थोडं आणि व्याह्यानी धाडलं घोडं...
च्यामारी लय बिल झालं! :p
9 Aug 2010 - 4:26 pm | विकाल
रोज दहा तास काम करून त्याचा महिन्याचा पगार ८-१० हजार रुपये आहे.
तो सध्या एक चाळीत २-३ रूमच्या खोलीत रहात आहे.
कसे काय?
२-३ रुम च्या खोली असणारी चाळ?
9 Aug 2010 - 6:58 pm | अरुण मनोहर
>>>कसे काय? २-३ रुम च्या खोली असणारी चाळ?<<<
पवित्र रिश्ता सीरीयल मधे आहे. मानव रहातो. आणि एकेक खोली सभागृहा येवढी मोठी आहे.
9 Aug 2010 - 7:06 pm | शानबा५१२
भारतात फक्त एक गोष्ट चांगली नाही.......................
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
.
.
..
.
.
.
.
..
.
..
हे असल काहीतरी
9 Aug 2010 - 7:17 pm | धमाल मुलगा
>>स्वीकारता का आव्हान ?
उंऽऽऽ....आमी नै ज्जा....... =)) =))
आयला! काय राव, तुम्ही अशी आव्हानं वगैरे देऊन हिंसक विचार नका बुवा करु. आमच्या आत्म्यास क्लेष होतात.
जे भारतात आहे ते आहे,. जे नाही ते नाही! जे इथे आहे ते बाहेर नाही, जे बाहेर मुबलक असेल ते इथे नसेल...च्यायला...म्हणुनच तर वेगळी ठिकाणं वेगळी भासतात ना?
असो! तिकडंचं तिकडं सोडुन सोडा वो! या बसा..जरा चंची काडा, वाईच गप्पा मारु :)
-(चिकन-हांडीवादी) ध.
10 Aug 2010 - 7:49 am | सहज
बेनेफीट ऑफ डाउट देउन तुम्ही काय म्हणताय तो मुद्दा मान्य करतो.
माझ्या लहानपणी देखील महान देश, महान संस्कृती, अनेक बोधकथा, नीतीकथा शिकवल्याने व तसे सुरक्षीत बालपण लाभल्याने आपला देश सुंदर संपन्न महान असे चित्र मनात होते. अर्थात वडिलधार्यांच्या कृपेने आयुष्यात फार संघर्ष करावा लागला नाही. बर्याच ओळखी पाळखी नातेवाईक, मित्रमंडळी असल्याने सगळी कामे (सरकारी ) चोख होत गेली, कुठे नाडले गेलो ही भावना कधीच नव्हती. पण जसे जसे आयुष्याची सुत्रे आपली आपण हातात घ्यायला लागल्यावर भारतीय समाजात सर्वच काही जसे शिकवले गेले तसे आलबेल नाही. उदाहरण म्हणजे तुम्ही म्हणलात तसे वर्तमानपत्रातल्या बातम्यातुन जे चित्र येते तसा एखादा अनुभव आजुबाजुला दिसणे, किंवा तुमचा तो जन्मदाखल्याचा अनुभव. बाय द वे पुणे महानगरपालीकेत जन्म, मृत्युदाखल्याचा अनुभव चांगला आहे कुठेही लाच द्यावी लागली नाहीत की कुणी मागीतले नाहीत. भारतात शक्यतो ज्यांचे कॉन्टॅक्ट्स आहेत त्यांची कामे कधी सहसा अडत नाहीत. पण जे खरच 'जनसामान्य' आहेत त्यांचे केवळ नशीबच म्हणायचे. असो तरी मला नाही असे वाटत की कुठलेही काम होण्याकरता नेहमीच लाच द्यावी लागते. नेहमीच्या आयुष्यात इतका संघर्ष आहे की इच्छा नसताना तो न वाढवता चिरिमिरी देउन काम पटकन करुन घेण्याकडे मनुष्य स्वभाव कलतो.
असो दोषही अनेक असले तरी एकंदर प्रगती आहे असेच चित्र दिसते. भारतीय प्रशासन मात्र ज्या जोमाने काम करत देशाला प्रगतीच्या मार्गावर घेउन जायला हवे असे वाटते तसे न दिसल्याने तुम्हाला वाटते तसे निराशाजनक चित्र दिसते.
आपले आयुष्य आपल्या गरजा वेळीच नियोजन करुन कंट्रोल मधे ठेवले व तब्येत चांगली ठेवली तर आत्मविश्वास वाढून ही निराशा आशेमधे पलटू शकते. शेवटी १००% शुद्ध उत्तम असे इतर जगातल्या इतर समाजातही नसते. त्यामुळे परत ढोबळमानाने भारतात जे आहे ते अगदीच काही वाईट नाही हो. तसेही आपणच आपले आयुष्य, विश्व उभे करायचे असते.
शिवाय आपण मनुष्य या अतिशय धोकादायक प्राण्याबद्दल बोलत आहोत. वागला तर ठीक नाहीतर कसा हे कोणी नव्याने कशाला सांगायला हवे.
10 Aug 2010 - 4:26 pm | अवलिया
या धाग्यावरचा माझा प्रतिसाद आणि त्याला सहमत असणारे प्रतिसाद उडवले गेले. (त्यातला एक संपादकांचा होता हे विशेष)
स्पष्ट आणि रोखठोक असल्यामुळे कदाचित कुणालातरी मिरच्या झोंबल्या असतील असे वाटते. त्यांनी आत्म परिक्षण करुन आपले वागणे सुधारावे असा फुकटचा सल्ला देत आहोत. मानावाच असे नाही.
माझ्या मते मी संपादक मंडळातील काही सदस्यांच्या इच्छेनुसार/विनंतीनुसार इतके दिवस शांत राहिलो, त्याचा काहीच उपयोग होत नाही असे दिसत आहे कारण अकारण मुद्दाम प्रतिसाद उडवणे अजुनही चालुच आहे. असल्या खोडसाळ प्रवृत्तीचा मी जाहिर निषेध करतो.
11 Aug 2010 - 7:06 am | स्मृती
छान धागा आहे...
एवढा मोठा खंडप्राय आपला देश.. त्याच्याबद्दल सरसकट कसं लिहायचं... मी जेवढा भारत पाहिला त्यावरून असं जाणवलं की शहरी आणि ग्रामीण भारत यांत बराच फरक आहे.
मी शहरांपुरतं लिहीते... आधी वाईट..
सगळ्या बायका रोज अपटुडेट बनून ऑफीसला जायला निघतात.. जाताना ट्रेनमध्ये फळं खातात आणि साली - बिया तिथेच बाकड्याखाली टाकून मोकळ्या!.. फारच वाईट वाटतं त्यांच्या कोत्या मनोवृत्तीचं.. आपलं तेवढं छान, स्वच्छ, चकाचक ठेवायचं.. मग आपलं शहर आपलं नसतं का?
कुठल्याही पोस्ट ऑफीसात जा.. सगळे कर्मचारी अगदी जिवावर आल्यासारखी तोंडं करून काम करत असतात.. आणि सात जन्माचे उपकार केल्यासारखे गिर्-हाईकांशी बोलत असतात..इतर कुठल्याही सरकारी ऑफीसांपे़क्षा का कोण जाणे, मला हे पोस्टातच जास्त जाणवलंय.. अर्थात, इतर ऑफीसेसमध्येही थोड्याफार फरकाने तेच... कस्टमर सर्व्हीस कशाशी खातात हे आपल्याकडे कोणाच्या गावीही नाही.... ना सरकारी ना प्रायव्हेट कंपन्यांमध्ये!
माणसं एकुणच खुप पुर्वग्रहदुषितपणे वागतात... म्हणजे एखाद्या कामाच्या ठिकाणी आधी चार वेळा गेलो तेव्हा फारसा उत्साहवर्धक अनुभव अलेला नसेल तर पाचव्यांदा जाताना आपणच चेहरा आणि खांदे पाडून जाण्याची काय गरज? आपल्या टवटवीत हसर्-या मूडची लागण लागूदेना आजुबाजूला... तशी लागते ती... बघा एकदा ट्राय करून...
सगळ्यात बकवास वाटतात ती आपल्याकडची कर्मकांडं बुवा... आणि मुर्खासारखी रस्त्यांवर उभी केलेली देवळं.. देव चराचरात आहे असं एकीकडे बोंबलायचं आणि भर गर्दीच्या रस्त्यांवरची देवळं पाडायला निघाली म्युनिसिपालिटी की यांच्या भावना दुखावतात!.... काय बोलायचं!!
चांगलं...
पंच्याण्णव टक्के माणसं रिसेप्टीव्ह आहेत... योग्य प्रकारे सांगितलेल्या गोष्टी /बदल ती बर्-यापैकी स्वीकारतात...
वरून फटकळ/ढिम्म वाटली तरी माणुसकी शाबुत आहे अजुन शहरी माणसांमध्ये...
सगळ्यात प्रॉमिसींग वाटते तरूणाई... त्यांना ठाम अशी मतं आहेत.. त्यांच्या मतांशी ती पोरं प्रामाणिक आहेत....
अर्थात हे सगळं इथे सिंगापुरमध्ये बसून लिहिणं फारच वांझोटं वाटतंय... पण चालायचंच..
11 Aug 2010 - 10:46 am | गांधीवादी
स्मृती ताई प्रतिसादाबद्दल धन्यवाद,
मुद्दे नमूद करून घेतले आहेत.
>>एवढा मोठा खंडप्राय आपला देश.. त्याच्याबद्दल सरसकट कसं लिहायचं...
एकदम सहमत. म्हणूनच तर ह्या मोकळ्या वातावरणात जिथे लहान, मोठे, थोर, पंडित, विद्वान चर्चा करीत असतात तिथे हा मुद्दा उपस्थित केलेला आहे. जेणेकरून निदान हे तरी समजून यावे कि ह्या देशात नक्की काय चांगला आहे आणि काय वाईट (म्हणजे तिथे निदान सुधारणा तरी करण्याचा विचार करता येईल भविष्यात. वर्ष संपल्यावर आपला साहेब नाही का आपले गुण आणि दोष आपल्या पुढे मांडतो. व त्यावरून पुढे ठरवितो कि काय करायचे . तसेच काही आहे हे )