चिंधी

स्पंदना's picture
स्पंदना in जे न देखे रवी...
5 Aug 2010 - 9:53 am

चिंधी

तू एक चिंधी, मी एक चिंधी,
आपण सारे चिंधोट्या .
असेच राहू धुळी मध्ये
अन, उगाच मारू रेघोट्या |

काळ मोकळा;

काळ मोकळा, वेळ मोकळा
जग ही भासे रिते रिते,
अश्याच वेळी; स्वत: स्वत:ला
उगाच अपुले मनही भिते |

खरे खोटे अन चूक बरोबर,
अशी मनाला खंत नको,
आणिक व्यथित आठवणींचा
उगाच ह्रदया डंख नको |

म्हणुनी गड्या;

म्हणुनी गड्या होऊनी चिंधी
आपण होऊ निराकार ,
निर्जीव; निष्पाप गोष्टींचाही
जगी या वापर अपरंपार |

अपर्णा

कविता

प्रतिक्रिया

अरुण मनोहर's picture

5 Aug 2010 - 10:05 am | अरुण मनोहर

पटले नाही.
>>>म्हणुनी गड्या होऊनी चिंधी
आपण होऊ निराकार ,
निर्जीव; निष्पाप गोष्टींचाही
जगी या वापर अपरंपार |<<<

निराकार, निर्जीव, निष्पाप - ही तिकडी एकत्र आणण्यातला उद्देश?
आणि हेच व्हायचे, तर चिंधीच कशाला? इतरही कित्येक चांगल्या निनिनि वस्तु आहेत की.
आणि जगाने आपला फक्त वापर करून फेकून द्यावे असे प्रतित होत आहे.

स्पंदना's picture

5 Aug 2010 - 10:12 am | स्पंदना

निर्जीव; निष्पाप गोष्टींचाही , जगी या वापर अपरंपार |'

कसा?

अहो या चिंधीनच तर नात रक्तान नाही भावनेन ठरत हे सत्य सुभद्रेला जाणवून दिल !
भळंभळंत बोट घेऊन आलेल्या त्या मिश्कील हरीच्या बोटाला बांधायला एक चिंधी तिला सापडेना ! अन अंगावरच भरजरी वस्त्र क्षणात चिंधी सम मानून भावनेला अर्पण करणाऱ्या द्रौपदीच भगिनी प्रेम या चिंधीनच तर दाखवलं

नाना बेरके's picture

5 Aug 2010 - 12:56 pm | नाना बेरके

काळ मोकळा, वेळ मोकळा
जग ही भासे रिते रिते,
अश्याच वेळी; स्वत: स्वत:ला
उगाच अपुले मनही भिते |

.. ह्या कडव्यातला अर्थ आवडला, पण शब्दांची बांधणी नीटशी जमली नाही असे वाटते.

काळ मोकळा, वेळ मोकळा
जग ही भासे रिते रिते,
अश्याच वेळी; स्वत: स्वत:ला
उगाच अपुले मनही भिते |

खरं आहे .

खरे खोटे अन चूक बरोबर,
अशी मनाला खंत नको,
आणिक व्यथित आठवणींचा
उगाच ह्रदया डंख नको |

असं झालं तर ....?

छान आहे कविता !

गंगाधर मुटे's picture

6 Aug 2010 - 8:56 pm | गंगाधर मुटे

सुरेख आहे.