एके काळी शुद्धलेखन फाट्यावर मारले जायचे. आता काळ बदलला असल्यामुळे, अनुस्वारांच्या उपयोगा विषयी माहिती देत आहे. ज्यांना शुद्धलेखनात स्वारस्य आहे आणि अनुस्वाराच्या वापरासाठी प्रश्न पडत असेल, अशांसाठीच हा लेख आहे.
अनुस्वाराचा उच्चार न आणि म युक्त होत असतो.
अनुस्वाराच्या पुढचे व्यंजन त्या त्या गोत्रातले असेल, तेव्हाच अनुस्वार न देता, त्या पुढच्या सगोत्र व्यंजनाशी अनुस्वाराचे मिलन होऊ शकते. अन्यथा असा विजोड गोत्र विवाह मराठीत मान्य नाही. परंतू माझ्या माहितीनुसार, न आणि म ने सगोत्र विवाह केलाच पाहिजे असे बंधन नाही! जाणकारांनी वरील माहिती तपासून, काही दुरुस्ती असेल तर कृपया सुचवावी.
न ची सगोत्र व्यंजने- त थ द ध न
म ची सगोत्र व्यंजने- प फ ब भ म
म्हणून,
अनन्त, सन्थ, बन्द, बन्ध आणि नन्ना हे बरोबर.
परंतू अनंत, संथ, बंद, बंध, नंना असे पण चालेल.
कम्प, इम्फाळ, बम्ब, कुम्भ, धम्म हे बरोबर.
परंतू कंप, इंफाळ, बंब, बंध, मंम असे पण चालेल.
आणि, व्यन्जन, सम्विधान असे चालणार नाही.
टीम्ब ............ कुठेही चालेल, wink wink.......
प्रतिक्रिया
5 Aug 2010 - 11:22 am | शेखर
छान माहिती
5 Aug 2010 - 12:29 pm | सहज
माहीतीपूर्ण लेख.
प्रशासनाने कृपया वाचनखूण साठवायची सुविधा लवकर उपलब्ध करुन द्यावी.
5 Aug 2010 - 12:32 pm | महेश हतोळकर
http://www.manogat.com/node/6673
5 Aug 2010 - 1:17 pm | अवलिया
लेख अजुन वाचला नाही.. पण अरुणजी आमच्या बाब्यांत असल्याने प्रतिसाद देत आहे.
5 Aug 2010 - 1:53 pm | विश्वनाथ मेहेंदळे
स्तुत्य प्रयत्न. माझे २ पैसे खालीलप्रमाणे
म आणि न ने सगोत्र विवाहच केला पाहिजे असे मला वाटते. मराठीत (आणि बहुतांश भारतीय भाषांमध्ये) २ नव्हेत तर ५ अनुनासिके आहेत. आपण जेव्हा हेच शब्द इंग्लिश मध्ये लिहितो तेव्हा तिथे केवळ या दोनच अक्षरांना "counterpart" असल्यामुळे आपण सरसकट तेच वापरतो. हतोळकरांनी दिलेला धागा पाहिला. तो जास्त बरोबर वाटला. त्यांनी बरेचसे कव्हर होते आहे. तरीही माझी लेखनकंड शमवायला शाळेत शिकलेले जितके मला आठवते आहे ते लिहिण्याच्या प्रयत्न करतो.
व्यंजनांचे खालील प्रमाणे गट आहेत.
क ख ग घ ङ कंठ्य :- यांचा उच्चार कंठातून होतो.
च छ ज झ ञ मूर्धन्य :- मुर्धा म्हणजे टाळू आणि दातामधील भाग. हे उच्चार करताना जीभ जिथे लागते तो भाग
ट ठ ड ढ ण तालव्य :- यांचा उच्चार करताना जीभ टाळ्याला लागते
त थ द ध न दन्त्य :- यांचा उच्चार करताना जीभ दातांना लागते
प फ ब भ म ओष्ठ्य :- यांचा उच्चार करताना ओठांचा वापर होतो (तो इतरही काही सुंदर कामात होतो म्हणा :-) (हे आपले अवांतर) )
य र ल व स श ष ह ळ
पहिल्या पाच गटांना स्वतःचे अनुनासिक आहे. गटातील शेवटचे अक्षर हे अनुनासिक. शब्दात जेव्हा अनुस्वार येतो तेव्हा अनुस्वार ज्या अक्षरावर आहे, त्यातील पुढचे अक्षर ज्या गटाचे आहे त्या गटाच्या अनुनासिकाचा उच्चार होतो. उदा अंगठी मध्ये अनुस्वार अ वर आहे पण पुढे ग असल्याने ङ चा उच्चार होतो. तसेच अंजीर मध्ये ञ चा, अंडी मध्ये ण चा, अंत न चा आणि अंबर मध्ये म चा होतो. हेच शब्द अनुस्वार न वापरता लिहायचे असल्यास खालील प्रमाणे लिहावे लागतात. अङगठी, अञजीर (इथे ङआणि ञ चे पाय मोडावेत, खूप प्रयत्न करूनही लिहिता नाही आले तसे), अण्डी, अन्त, अम्बर. याला बहुधा परसवर्ण म्हणतात.
शेवटच्या गटाला स्वतःचे अनुनासिक नाही यातील काही अक्षरांच्या (व स श ष ह) आधी अनुस्वार आला असता उच्चारात व चा उद्भव होतो. उदा संविधान, सिंह, हंस, अंश वगैरे. यांना परसवर्ण नाही. य र ल ळ च्या बाबतीत काय होते माहित नाही. पटकन उदाहरण नाही सापडत आहे.
२ पैसे संपले :-)
काही चुकले असेल तर चू भू द्या घ्या. भाषेतील जाणकारांनी अजून प्रकाश टाकावा.
5 Aug 2010 - 1:57 pm | विश्वनाथ मेहेंदळे
आयला, मनोगतावरील प्रतिसाद पहिलेच नाहीत. च्यामारी उगाच इतके लिहिले. तिथे बरीच चर्चा झाली आहे. संपूर्ण धागा आरामात वाचला पाहिजे. हतोळकर साहेबांचे आभार.
5 Aug 2010 - 2:35 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
तिथले प्रतिसाद उघडण्याचे आमचे कष्ट तुम्ही वाचवलेत. धन्यवाद.