'मोगरा'

दिलीपकुमार's picture
दिलीपकुमार in जे न देखे रवी...
2 Aug 2010 - 5:38 pm

आज भल्या पहाटे ,
कुठुन हा मोगरा दरवळला.
झोपेमध्येच डोळ्यासमोर ,
तुझा मुखडा सुर्यासारखा अवतरला.
मग त्या सोनेरी किरणात ,
मी सर्वांगी न्हाऊन निघालो.
तुझ्या मदहोश हसण्यामध्ये ,
नकळत स्वत:ला हरवुन गेलो.
जेंव्हा पुर्ण जाग आली ,
तुझ्या गालावर खुलली होती लाली.
खरं सांग प्रिये ,
ही करामत आपोआप झाली ,
की सकासकाळी माझ्या ओठांनी ,
कांही गोड आगळीक केली .

कविता

प्रतिक्रिया

शुचि's picture

2 Aug 2010 - 7:50 pm | शुचि

खूप गोड!

ही माझ्या कवितेला मिळालेली पहिली प्रतिक्रिया. ध्नन्यवाद

कविता आवडली युसुफ साहेब :)

पॅपिलॉन's picture

8 Aug 2010 - 6:11 pm | पॅपिलॉन

आताशाच कुठल्याश्या कवितेत वाचले, तिचा चेहरा त्याला म्हणे पावसासारखा वाटला, आता तुम्हाला सूर्यासारखा वाटतोय? अरे काय चाल्लय काय?

असो, दादा कोंडक्यांच्या एकटा जीव सदाशिव ह्या चित्रपटातील गाण्याची आठवण झाली!
डोल्यानं त्यानं केली मस्करी, खुना उमटल्या गालावरी....

दत्ता काळे's picture

8 Aug 2010 - 6:23 pm | दत्ता काळे

कविता आवडली.

मस्त कलंदर's picture

8 Aug 2010 - 8:30 pm | मस्त कलंदर

बाकी, हा आमचा मोगरा, याच्यावर आमचा फार जीव.

फुले वेचिता बहरू कळियासी आला.........