आज एका हैद्राबादकडल्या सहकार्याबरोबर गप्पा मारत होतो. विषय होता शिक्षणपद्धती वगैरे वगैरेचा.
त्याने बोलता बोलता असे सांगितले की त्यांच्या शहरात काही शाळांमधून (की क्लासेस मधून ?) इयत्ता सहावीच्या मुलांना आय-आय-टी च्या परीक्षेची तयारी करण्यासाठी वर्ग चालवले जातात.
एकंदर स्पर्धा वाढलेली आहे हे तत्वतः माहिती असूनसुद्धा प्रस्तुत बातमीने थोडा धक्का बसलाच. थोडे कुतुहलही वाटले.
आपल्यापैकी कुणी महाराष्ट्रातल्या कुठल्या गावी/शहरी अशा प्रकारच्या वर्गांसंबंधातले काही ऐकलेले आहे काय ? असल्यास त्याबद्दल ऐकायला जरूर आवडेल.
आय-आय-टीचे वर्ग असतील नसतील. पण इयत्ता सहावीच्या पातळीपर्यंत या स्वरूपाचे लोण पोचल्याचे तुम्ही पालक म्हणून किंवा निव्वळ एक साक्षीदार म्हणून अनुभवले आहे काय ? स्कॉलरशिप्स, टिमवि पासून ते थेट राष्ट्रीय दर्जाच्या गणित/विज्ञान स्पर्धा या संदर्भातल्या गोष्टी मी विद्यार्थी म्हणून पाहिल्यात. पण त्याला काळ लोटला. सहावीची गाडी थेट आयाय्टी पर्यंत पोचली असल्यास "कशी?" असा प्रश्न पडला आहे.
प्रतिक्रिया
3 Aug 2010 - 9:41 am | शिल्पा ब
काळ प्रचंड बदललाय असे दिसते...आम्ही तर फक्त त्या त्या वर्षाची सहामाही आणि वार्षिक याच दोन परीक्षांचा अभ्यास केल्याचे (कसाबसा) स्मरते...क्लासेस मध्ये सुद्धा कधी कधी परीक्षा असायच्या असं अंधुक आठवतंय...बाकी विशेष काही नाही...
हल्लीच्या मुलांना गुड लक ... सगळ्याच स्पर्धांसाठी..
3 Aug 2010 - 10:23 am | चिरोटा
आय आय टी चे माहित नाही पण काही गणित्/विज्ञान स्पर्धांची तयारी ६/७वी पासुन करणारे लोक राज्यात आहेत. (सर्वात बुद्धिमान लोक जिथे राहतात त्या!)मुंबई/पुणे परिसरात हे क्लासेस चालतात असे वाचले होते.आय आय टी ची तयारी सहावीपासुन म्हणजे ते लोक नक्की काय करणार कळत नाही.व्याज्/मुद्दल्/द.सा.द्.शे. बरोबर लिमीट्/डेरिवेटिव वगैरे हळुहळु शिकवणार का?
---
3 Aug 2010 - 10:26 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
आई गं!
3 Aug 2010 - 10:32 am | विनायक पाचलग
ही गाडी सहावीपर्यंत पोहोचायला अनेक कारणे आहेत ... :(
असो...
मला आत्ता हे आठवले ..
जाता जाता -
दुनिया झुकती है , झुकानेवाला चाहिये .. !!
3 Aug 2010 - 10:33 am | शिल्पा ब
एखादा लेख होऊन जाऊदे त्यावर... काय?
3 Aug 2010 - 10:39 am | विनायक पाचलग
वरती लिंक दिली आहे तो याच विषयावर मिपा वर लिहिलेलाच एक लेख आहे ..
3 Aug 2010 - 11:39 am | विनायक प्रभू
विनायका तुला कोणी हत्ती, घोडे, हेलीकॉप्टर पाठवले होते का?
3 Aug 2010 - 5:07 pm | llपुण्याचे पेशवेll
वा वा .. छान .. आपलाच संवाद आपणाशी.
3 Aug 2010 - 11:14 am | अभिमोहित
पालकांची अशा क्लासेसला घालायची तयारी असल्यावर क्लासेस घेणारयांना काय प्रॉब्लेम आहे?
काय शिकवतात हा प्रश्न गौण आहे.
3 Aug 2010 - 2:13 pm | इन्द्र्राज पवार
"पालकांची अशा क्लासेसला घालायची तयारी असल्यावर क्लासेस घेणारयांना काय प्रॉब्लेम आहे?"
+ सहमत.
आणि काय शिकवितात हा मुद्दा खरंतर गौण होत नाही, कारण अशा क्लास संचालकांकडून प्रत्येक महिन्याला पालकांना कॉमन मीटिंगसाठी बोलाविले जाते. तीत निव्वळ विद्यार्थ्यांचा नव्हे तर एकूणच शिकविण्याच्या प्रगतीचा आढावा घेतला जातो. पालक निश्चितच समाधानी आहेत हे मी पाहिले आहे.
3 Aug 2010 - 12:03 pm | अवलिया
हल्लीच एक गुर्जी भेटले होते
विचारत होते गर्भाधान संस्कारात आयायटीच्या अभ्यासाची माहिती मंत्रामधुन दिली तर अभिमन्युप्रमाणे काही होईल का?
3 Aug 2010 - 12:10 pm | शिल्पा ब
=)) =)) ह. ह. पु. वा.
3 Aug 2010 - 12:05 pm | विनायक प्रभू
पुढची स्टेप आय आय टी शुक्राणु.
3 Aug 2010 - 12:19 pm | नितिन थत्ते
अलिकडे सहजरावांनी पाठवलेल्या दुव्यात कुणा एका यशस्वी विद्यार्थ्याच्या मुलाखतीत "आय वॉज प्रोग्रॅम्ड टु सक्सीड" असे वाक्य होते.
काहीतरी ज्योतिषी वगैरेंच्या मदतीने म्हणे त्याच्या वडिलांनी कोणत्या मुहुर्तावर कन्सेप्शन करायचे वगैरे ठरवले होते.
3 Aug 2010 - 6:01 pm | आमोद शिंदे
ज्योतिष्याच्या मदतीने कन्सिव केले? बाप रे!!! मुलगा बापासारखा दिसतो की ज्योतिषासारखा?
3 Aug 2010 - 6:03 pm | आमोद शिंदे
फक्त शुक्ताणुच का? बीजाणूने काय फक्त स्वयपाक करायचा का? :D
3 Aug 2010 - 12:08 pm | कवितानागेश
ही मुले खेळतात कधी?
का त्याचेपण क्लासेस?
अमच्या वेळेस वर्गात नीट लक्ष दिले कि परिक्षेत सगळळे यायचे...
बाकी सगळा वेळ उनाडायला मोकळा
आत हाल करतात बिचार्या पोरांचे
..
3 Aug 2010 - 12:16 pm | नितिन थत्ते
>>ही मुले खेळतात कधी?
>>का त्याचेपण क्लासेस?
आम्ही आमच्या लहानपणी पोहायला नुसतेच शिकलो. आमच्या मित्राचा मुलगा मात्र पोहायच्या 'क्लास'ला जायचा.
3 Aug 2010 - 12:35 pm | इन्द्र्राज पवार
अगदी "आय.आय.टी" नजरेसमोर ठेवून नाही पण सीबीएसई नवी दिल्लीचा पॅटर्न (किंवा तत्सम स्पर्धात्मक परीक्षांचा) लक्षात घेवून शिक्षण खाते इयत्ता पाचवीपासूनच सिलॅबसची आखणी करीत आहे. शाळा-शाळातून (विशेषतः विनाअनुदानित) अशा प्रकारच्या "जादाच्या" शिक्षणदानावर सध्या जाणीवपूर्वक भर दिला जात आहे. मुंबई-पुणे तर राहु दे पण कोल्हापूर-सांगली-सातारा अशा छोट्यामोठ्या जिल्हा पातळीवरदेखील अशा स्वरूपाच्या शिकवणीना संस्थाचालक महत्व देऊ लागले आहेत आणि हे निश्चितच एक अभिनंदनीय पाऊल ठरेल.
शासनाने (५वी, ६वी, ७वी) साठी शाळांना जे परिपत्रक पाठविले आहे त्यात स्पष्ट असे म्हटले आहे की, या वर्गातील विद्यार्थ्यांना
१. Self-awareness ('स्व' ची ओळख)
२. Empathy (समानुभूती)
३. Problem Solving (समस्यांची उकल)
४. Decision Making(निर्णयक्षमता)
५. Effective Communication (परिणामकारक संवाद)
६. Interpersonal Relations (व्यक्ती-व्यक्तींमधील संबंध)
७. Creative Thinking (सर्जनशील, कल्पक विचार)
८. Critical Thinking (चिकित्सक आणि विश्लेषक विचार)
९. Coping with Emotions (भावनांचे समायोजन)
आणि
१०. Coping with Stress (ताणतणावांशी समायोजन)
या आघाड्यावर तयार करा.
शिवाय खास उल्लेख असाही आहे की, ' या वर्गातील मुलांना सहजगत्या आत्मसात होण्यासाठी दैनंदिन अध्ययन-अध्यापनातच ती गुंफली जावी'. या सूचना स्वयंस्पष्ट आणि नेमक्या अशा आहेत की, राज्य शासन 'आयआयटी' आणि तत्सम परीक्षेत राज्याचा टक्का वाढावा या मताचे नक्कीच बनले आहे. ही आता जरी सुरुवात असली तरी इथून पुढे व्यापक पातळीवर या रितीच्या शिक्षणावर शासन धोरण राहील हे नि:संदेह.
(श्री.मुक्तसुनीत यांचे हा अभ्यासू आणि समाजाला खर्या अर्थाने चर्चेची गरज असलेला विषयधागा सुरू केल्याबद्दल मनःपूर्वक आभार. या धाग्याने १००+ आकडा गाठला तर व्यक्तीशः मला खूप आनंद होईल; इतका तो गरजेचा आहे.)
इन्द्रा
3 Aug 2010 - 2:15 pm | नगरीनिरंजन
एवढ्या गोष्टींमध्ये मुलाना तयार करायचं म्हणजे मास्तर लोक आधी यात तयार पहिजेत ना? त्यासाठी शास्नाचं धोरण काय आहे?
आणि या प्रत्येकासाठी एकेक नवीन पुस्तक वाहावं लागणार का पोराना?
मध्यंतरी बी.एड. झालेल्या मास्तरांच्या नोकरीच्या मुलाखतीतल्या गमतीजमतींवर एक लेख वाचल्याचं आठवतंय थोडंसं.
3 Aug 2010 - 5:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सीबीएसई चे अभ्यासक्रम हे स्पर्धात्मक परिक्षेसाठी विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठीचा पाया आहे असे म्हटल्या जाते. मात्र अशा शाळेतून आयआयटी ला उपयुक्त ठरेल असा अभ्यासक्रम नाही हेही तितकेच खरे आहे. कोचिंग क्लासेस मधून अशा प्रकारचे पायाभूत अभ्यासक्रमाची ओळख करुन दिल्या जाते असे मीही ऐकून आहे.
हैदराबादकडील 'नारायणा' कोचिंग क्लासेसच्या शाखा आमच्या औरंगाबादेपर्यंत पोहचल्या आहेत. मात्र त्याचा प्रवेश दहावीनंतरचा आहे. आणि त्याची फीस लाखाच्या पुढेच आहे. महाराष्ट्र राज्यातील एसएससी बोर्डाचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत लंगडे पडतात असा एक समज वाढत चालला आहे. त्यामुळे विद्यार्थी घडवायचा असेल तर तो स्पर्धेत टीकणारा, असावा असे पालकांना वाटायला लागले आहे आणि ज्यांच्याकडे पैसे भरपूर आहेत असे पालक आपल्या पाल्यांना वेगवेगळया कोचिंग क्लासेसमधून स्पर्धेसाठी तयार व्हावा म्हणून पळवत आहेत. आता हे चूक आहे की बरोबर ठरवणे कठीण आहे.
-दिलीप बिरुटे
3 Aug 2010 - 5:45 pm | अवलिया
मराठीच्या प्राध्यापकांकडुन शुद्धलेखनाच्या चूका अपेक्षित नाहीत. लहानपणापासुन सवय लागली असती तर बराच फरक पडला असता का असा विचार करत आहे.
(मारतंय आता बंदुकीच्या गोळीतुन .. ठ्ठो .. !)
3 Aug 2010 - 6:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>मराठीच्या प्राध्यापकांकडुन शुद्धलेखनाच्या चूका अपेक्षित नाहीत. लहानपणापासुन सवय लागली असती तर बराच फरक पडला असता का असा विचार करत आहे.
सल्ला दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार. चर्चा प्रस्तावातील विषयासंबंधी काही माहिती प्रतिसादात आली असती तर वाचक म्हणून ती माहिती वाचायला आनंद वाटला असता. असो, ज्याची त्याची जाण....
आता आपल्या शुद्धलेखनाकडे वळतो. प्राध्यापकाकडुन यातील 'ड'ला दिलेला उकार दीर्घ म्हणजे तो शब्द डू हा असा हवा. तसेच लहानपणापासुन यातील स ला ही दीर्घ म्हणजे तो शब्द ' सू' असा लिहावा. चूका नव्हे चुका असो, एकदा आपले शुद्धलेखन तपासून घ्यावे मग दुस-यांच्या चुका काढाव्यात काय म्हणता. यावरुन एक म्हण आठवली. नाव ठेवू लोकांना आणि......;)
[बाकी खरडवहीत]
-दिलीप बिरुटे
3 Aug 2010 - 6:18 pm | अवलिया
>>>चर्चा प्रस्तावातील विषयासंबंधी काही माहिती प्रतिसादात आली असती तर वाचक म्हणून ती माहिती वाचायला आनंद वाटला असता. असो, ज्याची त्याची जाण....
चर्चा प्रस्ताव लहानपणापासुन काही शिकल्यास फायदा होईल का या सामान्य आणि आय आय टी ची तयारी या विशेष माहिती प्रस्तावाचा आहे येवढे मला समजले, तेवढी माझी जाण आहे, असावी. याच अनुषंगाने प्रतिसादात लिहिलेले लहानपणापासुन शुद्धलेखनाची सवय असली तर पुढे प्राध्यापक बनल्यावर चुका होणार नाहीत या गृहितकावर होते, त्यासंबंधी लिहिणे आपण सोईस्कररीत्या टाळले आहे. आमच्यापेक्षा आपण थोर असल्याने आपली जाण, समज काढण्याची चूक आम्ही करु शकत नाही. ती आमची पद्धत नाही.
>>प्राध्यापकाकडुन यातील 'ड'ला दिलेला उकार दीर्घ म्हणजे तो शब्द डू हा असा हवा. तसेच लहानपणापासुन यातील स ला ही दीर्घ म्हणजे तो शब्द ' सू' असा लिहावा. एकदा आपले शुद्धलेखन तपासून घ्यावे मग दुस-यांच्या चुका काढाव्यात काय म्हणता. यावरुन एक म्हण आठवली. नाव ठेवू लोकांना आणि......
अगदी बरोबर. पण मी मराठीचा प्राध्यापक नाही, होण्याची शक्यता नाही त्यामुळे मी लिहिलेले शुद्ध लेखन असेलच असे नाही. माझ्याकडून असली भलती अपेक्षा कुणीही करणार नाही. तुम्ही सुद्धा करु नका. सबब तुमचा मुद्दा गैरलागु, तरीही तुम्ही दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचा कसोशीने प्रयत्न करेन, करेनच असे नाही.
>>>[बाकी खरडवहीत]
नक्कीच
(आता जीमेल बंद करुन बसतो )
3 Aug 2010 - 7:07 pm | इन्द्र्राज पवार
"आता हे चूक आहे की बरोबर ठरवणे कठीण आहे."
मान्य. पण सर, पालक खरोखरीच हैराण झाले आहेत (किंवा असे म्हणू या की, एक्स्ट्रा-कॉशस झाले आहेत). तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ज्यांच्याकडे लाख रुपये फी पोटी देण्याची ऐपत आहे, ती दिली म्हणजे ते सुखाची निद्रा घेतील, तर तसेही होत नाही. ज्या पालकांना मुलासाठी अशी डीलक्स पद्धतीची फी देता येत नाही ते व देणारे हे, यांच्यात फरक असेल तर इतकाच की फी दिलेला कुठेतरी मनोमनी म्हणत असेल, "चला, आपणाला जितके करता येते तितके केले."
कोचिंग क्लासेसचे पीक इतक्या जोमाने येण्याचे कारण हेच आहे की, पालकांचा महाविद्यालयीन शिक्षणावरचा दिवसेदिवस उडत जाणारा विश्वास. निव्वळ विद्यापीठाचा फॉर्म भरण्याची 'ईलिजिबिलीटी" कॉलेजमधूनच मिळते म्हणून विद्यार्थी एनरोल होतो असे चित्र आहे. कॉमर्सच्या ताज्या पदवीधरास "मायकर" चेक म्हणजे काय हे जर कॉमर्स कॉलेजमध्येच शिकविले जात नसेल तर ती त्याची चूक म्हणता येत नाही. तर अर्थशास्त्राच्या स्नातकास "युरो" हे चलन आहे याचा पत्तादेखील नसतो. यात या मुलांचा काही दोष नाही, पण यांना या स्पर्धात्मक युगास सामोरे तर जावे लागेल मग भले त्यासाठी कोचिंग क्लास त्यांना दिशा दाखविणार असेल तर त्या बदलाचे स्वागतच करावे लागेल.
3 Aug 2010 - 9:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>कोचिंग क्लासेसचे पीक इतक्या जोमाने येण्याचे कारण हेच आहे की, पालकांचा महाविद्यालयीन शिक्षणावरचा दिवसेदिवस उडत जाणारा विश्वास. निव्वळ विद्यापीठाचा फॉर्म भरण्याची 'ईलिजिबिलीटी" कॉलेजमधूनच मिळते म्हणून विद्यार्थी एनरोल होतो असे चित्र आहे.
कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखेची महाविद्यालयातील परिस्थिती दुर्दैवाने फार चांगली नाही हे मान्य आहे. [अपवाद असतातच] बेकारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आपल्या पाल्यांना शाळेतच पाचवीपासून ते दहावीपर्यंत धाव-धाव धावायला पालक लावतात. काय शिकेल तो शाळेत शिकेल. सरकारी शाळांबद्दल चांगले बोलण्यासारखे नाही. प्रचंड फी भरुन आपल्या मुलाला, मुलीला खाजगी शाळा आणि त्यांच्या कोचिंग क्लासेसमधून जसे होईल तसे आणि त्याचा बौद्धिक विकास झाला पाहिजे यासाठी पालक हट्टाला पेटतात. इंग्रजी,गणित, विज्ञान यात पैकीच्या पैकी गुण कसे मिळवील आणि स्पर्धेत सर्वांच्या पुढे कसा राहील त्यासाठी पालक मरमर करतांना दिसतात. आणि पालकांचेही काय चुकते. आपल्याकडे पैसे आहेत ना मग कोणासाठी हे पैसे सांभाळून ठेवायचे ? पोरांसाठीच ना. मग हा क्लास लाव. तो क्लास लाव. यासाठी पालक धावाधाव करतो. आयआयटीतून बाहेर पडणा-या विद्यार्थ्याला जगभर मागणी आहे. प्रचंड पैसा आहे. असे स्वप्न पाहात पालक त्याला त्या अभ्यासक्रमाचे धडे कुठे देता येईल याचा शोध घेतो. त्याच्या बालपणाचा, बालमनाचा विचार न करता त्याला स्पर्धेच्या गर्तेत ढकलतो. पण तोही त्याच्या भवितव्याचीच चिंता करुन त्याला घडविण्याचा प्रयत्न करतो म्हणून मला तो चूक करतो की बरोबर करतो हे कळत नाही असे म्हणावे लागले.
-दिलीप बिरुटे
3 Aug 2010 - 2:55 pm | ऋषिकेश
बहुदा आई-बाप दोघांनाही स्वैपाक-पाणी तसेच नव्या प्रोजेक्टवर काम करायचे असल्याने कार्टाल्या कुठे ठेवणार.. संध्याकाळच्या वेळी पाळणाघरवाले सांभाळायला ना म्हणतात तेव्हा पोरांना क्लासवाले सांभाळत असावेत ;)
3 Aug 2010 - 5:05 pm | रेवती
होय मुसु,
माझ्या माहितीप्रमाणे ६ वी नाही पण ८वी पासून माझ्या एका नातेवाईक मुलाचे असे क्लासेस सुरु झाले. त्यासाठी त्याने कोणत्यातरी स्पेशल शाळेची प्रवेशपरिक्षा दिली. तिथे निवड झाल्यावर ज्ञानप्रबोधीनी शाळेतून तो त्या स्पेशल शाळेत गेला. तिथे गेल्यावर त्यांचा रोजचा अभ्यासच आपण म्हणता त्या पुढील परिक्षांवर बेतलेला असा होता. शाळा कोणती ते माहित नाही पण हा मुलगा सगळ्या घरगुती कार्यक्रमातून दिसेनासा झाला.;) यंदा त्याची बारावीची परिक्षा झाली व चांगला स्कोर आल्याने 'आनंदी आनंद गडे' असे झाले सगळ्यांना!;) या स्कोरला हसत हसत आय आय टीला प्रवेश मिळतो म्हणे! मग आईवडील पार्टी देतात आणि आपल्याला आमंत्रण मिळते......तसे माझ्या आईवडीलांना मिळाले व ते तिकडे जाउन आले म्हणून ही माहिती समजली.;)
3 Aug 2010 - 5:20 pm | आनंद
शाळा कोणती ते विचारुन सांगाल का?
माहीती असावी म्हणुन ..
3 Aug 2010 - 8:17 pm | रेवती
हो विचारून सांगते.
तसं पहायला गेलं तर हा मुलगा आणि त्याचे आईवडील गेल्या चार पाच वर्षात फारसे कुणाला दिसलेच नाहीत.
संधी मिळाली कि विचारून सांगते.
3 Aug 2010 - 5:17 pm | चित्रा
आय आय टीच्या क्लासेसचे पेव अलिकडे फुटले आहे. पण पूर्वी काही पालक आपापल्या राज्याच्या अभ्यासक्रमाच्या शाळेत जाणार्या मुलांकडून कठीण अभ्यासक्रम करवून घेत असावे, असा माझा अंदाज आहे. याचा अर्थ आय आय टीला जाणार्या मुलांकडून सगळे घटवून घेतलेले असायचे, असा नसावा , पण जरा वरच्या पातळीवरील (चॅलेंजिंग) अभ्यासक्रम त्यांच्याकडून करवून घेतला जात असावा, असे एक दोन उदाहरणांवरून वाटते आहे. राज्यशासनाच्या अभ्यासक्रमाच्या उपयुक्ततेबद्दल शंका असणारे पालक मुलांच्या बुद्धीला अधिक चालना द्यावी, म्हणून अधिक कठीण अभ्यासक्रम लहानपणापासून करवून घेत असावेत अशी मला एक शंका आहे. (अनुभव नाही, पण नातेवाईकांच्या मुलांचे पाहिलेले आहे). आता हे क्लासेस सर्वच मुलांना उपलब्ध आहेत (हे बरोबर का चूक: माहिती नाही).
माझ्या मते कदाचित बरोबर असावे - फक्त किती क्लासना मुलांना घालायचे, याचे तारतम्य ठेवावे एवढेच.
आयआयटीशी संबंध नसेल, पण त्यावरून काही कळू शकेल याचे कॉलेजमधले एक उदाहरण अजूनही आठवते - मी मराठी माध्यमाच्या शाळेतून डायरेक्ट इंग्रजी माध्यमाच्या कॉलेजात अकरावीला अॅडमिशन घेतली. तेव्हा मला प्रॅक्टिकलच्या पहिल्याच तासाला लॉग टेबल्स वापरायची कशी हे आमच्या इंग्रजीत फाडफाड बोलणार्या फिजिक्स प्रोफेसरने पंधरा मिनिटांत शिकवले. माझ्या बरोबरची बाल-मोहनची सगळी पोरे भराभर लॉगटेबल वापरू लागली आणि मला काही ते जमेना, म्हणून भयंकर खट्टू झाले. बरे, प्रश्न विचारायचा, तर तो इंग्रजीत कसा विचारावा हे कुठे माहिती होते?! नंतर माहिती काढली, तेव्हा कळले की ती सगळी मुले बालमोहनने दहावीतून अकरावीत जाण्याच्या मधल्या काळात मुलांसाठी एक कॅम्प (कॉलेज रेडीनेस स्वरूपाचा) केला होता त्या कॅम्पमध्ये गेल्याने या बाबतीत तयार होती. मला पहिल्यापासून प्रश्न - की लॉग टेबल असेच का वापरायचे. असो. तेव्हा पोटात पडलेला खड्डा आठवतो. आमच्या शाळेने हे काही केले नव्हते. मी आख्खी उन्हाळ्याची सुट्टी पुस्तके वाचत आणि आंबे खात घालवलेली होती.
3 Aug 2010 - 5:29 pm | चतुरंग
ते ही भलतेच वाटले होते आता हे तर 'काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही' असे झाले! :(
पालकांना उल्लू बनवणे खूप सोपे असते. मुलांच्या भविष्याची अतिरिक्त भीती घातली की काय वाट्टेल ते करायला तयार होतात.
निसर्गात कोणतीही गोष्ट अशी अचानक अति लवकर वगैरे होत नाही. सहावीपासूनचे असले क्लासेस म्हणजे गुलाबाच्या कळ्या जबरदस्तीने पाकळ्या उचकटून हाताने उमलवण्यासारखा प्रकार आहे! हाती शेकडो उध्वस्त फुले येण्यापेक्षा वेगळे काही चित्र दिसणार नाही.
मुलांना खेळणे, भरपूर झोप, चांगले खाणेपिणे, स्वतः विचार करायला मोकळा वेळ असे सगळे आवश्यक असते. भाराभर कार्यक्रम दिवसभरात ठासून भरले म्हणजे ती एकदम हुश्शार वगैरे होऊन आयुष्यात सगळ्यात पुढे जाणार अशी खुळी कल्पना घेऊन पालक वावरत असतात आणि अपेक्षित परिणाम दिसले नाहीत की निराश होतात, चिडतात. एवढे करुन मुलांना येणार्या नैराश्याशी कोणालाच काही देणेघेणे नसते. मग आहेतच आत्महत्त्या आणि त्यावरचे उपाय शोधण्याच्या कसरती.
जागरुक पालकांनी आणि स्वयंसेवी संस्थांनी असे अतिरेकी कार्यक्रम त्या संस्थाचालकांशी बोलून, समजावून सांगून, ऐकले नाहीतर शासनाकडून दबाव आणून बंद केले पाहीजेत.
एका चांगल्या विषयाला तोंड फोडल्याबद्दल धन्यवाद मुसु!
चतुरंग
3 Aug 2010 - 5:40 pm | नंदन
सहावीपासून आयआयटीचे क्लासेस सुरु करायचे, हा अतिरेक झाला. अलीकडे याचं प्रमाण वाढलेलं असलं, तरी याला सुरुवात बरीच आधी झाली आहे. साधारण पंधरा-एक वर्षांपूर्वीही रुपारेल कॉलेजमध्ये जिथे एम टी एसचे वर्ग भरत, (बहुतेक) त्याच संस्थेतर्फे/मंडळातर्फे प्रवेश परीक्षा घेऊन आयआयटीच्या पूर्वतयारीचे वर्ग नववीपासून सुरु झाले होते. तेव्हा फारसा प्रतिसाद मिळाला नसला, तरी ती पहिली पायरी होती असं दिसतं आहे.
दुसरा एक मुद्दा म्हणजे अकरा-बारा वर्षांच्या मुलाची आवड/कल (आणि कदाचित क्षमताही) न पाहता त्याच्यावर अभियांत्रिकी शाखा निवडण्याची सक्ती करण्याचा. त्याबद्दल लिहावं तितकं थोडंच.
3 Aug 2010 - 6:00 pm | चित्रा
दुसरा एक मुद्दा म्हणजे अकरा-बारा वर्षांच्या मुलाची आवड/कल (आणि कदाचित क्षमताही) न पाहता त्याच्यावर अभियांत्रिकी शाखा निवडण्याची सक्ती करण्याचा. त्याबद्दल लिहावं तितकं थोडंच.
+१. तो वेगळाच विषय आहे! मुळात नंतर ४ वर्षांच्या डिग्रीच्या पहिल्या एक दोन वर्षांपर्यंत मुलांना आपली आवड नीट कळत असते का, हा एक प्रश्न आहे.
पण जे पालक आयआयटीच्या क्लासला मुलाला घालतात, ते हल्ली असा विचार करतात की
१. कॉलेजमध्ये काहीच शिकवले जात नाही. कॉलेजमध्ये अटेंडन्सही महत्त्वाचा नसतो. प्रॅक्टिकलसाठी कॉलेजला गेले की पुरेसे आहे.
२. या क्लासला गेले की आपोआप चॅलेंजिंग अभ्यासक्रम होईल आणि आय आय टीला अॅडमिशन मिळाली नाही तरी फिजिक्स, मॅथमॅटिक्स (विशेषतः दुसरे) हे विषय पक्के होतील - जे कुठच्याही विज्ञानशाखेला जाण्यास उपयुक्त ठरू शकतात. (क्लासमध्येही कसे आणि किती शिकवतात, हा एक वेगळा प्रश्न आहे, पण नातेवाईकांकडून ऐकले आहे ते असे होते).
आपण किती वेगळा मार्ग सुचवला तरी समजूनही पालक दुर्लक्ष करतात. मी म्हणते की प्रत्येकाला आपली सिचुएशन तशी माहिती असते, त्यामुळे त्यांना मला मुलांचे हित न समजणारे म्हणवत नाही. ते आपल्या चाकोरीबाहेर विचार मात्र करू शकत नाहीत हे खरे. कदाचित चाकोरीबाहेर वागून सफल झाल्याची उदाहरणे कमी दिसत असतील, कदाचित पुढे ऑप्शन्स कमी असतील.
3 Aug 2010 - 6:12 pm | चतुरंग
>>>>आपण किती वेगळा मार्ग सुचवला तरी समजूनही पालक दुर्लक्ष करतात. मी म्हणते की प्रत्येकाला आपली सिचुएशन तशी माहिती असते, त्यामुळे त्यांना मला मुलांचे हित न समजणारे म्हणवत नाही. ते आपल्या चाकोरीबाहेर विचार मात्र करू शकत नाहीत हे खरे. कदाचित चाकोरीबाहेर वागून सफल झाल्याची उदाहरणे कमी दिसत असतील, कदाचित पुढे ऑप्शन्स कमी असतील.
पालक मुलांचे हित बघायचीच धडपड करत असतात. परंतु ते नेमके कशात आहे हे माहीत नसते/असणे शक्यही नाही. पण निदान एक मूल म्हणून त्याच्या/तिच्याकडे बघणे इतके कठिण का जावे. चाकोरी तरी का? ती काही लोकांनी तशी आखली म्हणून?
त्याबाहेरच्या उदाहरणांकडे आपण 'लोक काय म्हणतील'? ह्या एका गोष्टीकडे पाहून दुर्लक्ष करत असतो असे वाटते.
जगात एकूण इंजिनिअर्सची संख्या लोकसंख्येच्या प्रमाणात किती? मला वाटते अतिप्रगत देशात (जर्मनी, जपान, अमेरिका इ.) सुद्धा ३ ते ५% अशी काही आकडेवारी आहे (हे वाचून सुद्धा आता ४-५ वर्षे होऊन गेलीत -ह्यावर एक विशेषांक निघाला होता - मला दुवा सापडला तर देईनच).
आता उरलेले लोक लाय करतात? ते उत्तम जगू शकत नाहीत का? त्यांना उच्चपदस्थ करिअर्स नसतात का? केवळ उच्चपदस्थ करिअर्स म्हणजेच सगळे असते का? प्रश्न प्रश्न प्रश्न!
असो एका वेगळ्या लेखाचा विषय होईल!
3 Aug 2010 - 6:25 pm | चित्रा
आत्ता पोरीला आणि तिच्या मैत्रिणीला घेऊन जरा पार्क/म्युझियममध्ये घेऊन जाते आहे, (पुढचे सगळे हलके घेणे : हे इथे मुद्दाम सांगितले म्हणजे सुट्टीत आम्ही तिच्याकडून घरी अभ्यास करून घेत नाही हे सिद्ध होईल ;) एवढाच काय तो अंतस्थ हेतू!)
गांभिर्याने - महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत, उत्तरे देईन, पण खरेच पार्कमध्ये चालले आहे. प्रतिसादासाठी जागा राखून ठेवते.
------------आता प्रतिसाद देते----------------
प्रतिसाद तुमच्या रोखाने नव्हता हे स्पष्ट करतो. पालकांची सर्वसाधारणपणे मानसिकता कशी बनत असावी ह्याबाबतचा विचार होता.
असो. तुमच्या उत्तराच्या प्रतीक्षेत!
तसा घेतलाही नाही, मला प्रश्न विचारले आणि उत्तरे दिली नाहीत असे होऊ नये म्हणून लिहीले :)
-------------
पालक मुलांचे हित बघायचीच धडपड करत असतात. परंतु ते नेमके कशात आहे हे माहीत नसते/असणे शक्यही नाही. पण निदान एक मूल म्हणून त्याच्या/तिच्याकडे बघणे इतके कठिण का जावे. चाकोरी तरी का? ती काही लोकांनी तशी आखली म्हणून?
त्याबाहेरच्या उदाहरणांकडे आपण 'लोक काय म्हणतील'? ह्या एका गोष्टीकडे पाहून दुर्लक्ष करत असतो असे वाटते.
दुर्लक्ष होत असते, पण लोक काय म्हणतील म्हणून नसावे.
मूल म्हणून देण्याचे मर्यादित स्वातंत्र्य आपल्याला पालक म्हणून मान्य असते. पैशाच्या, स्पर्धेत मूल मागे पडू नये, त्याचे जन्माचे नुकसान होऊ नये या खर्याखोट्या काळजीमुळे असावे.
आपल्याकडच्या अवस्थेबद्दल बिरूटेसरांनी वर लिहीलेच आहे काय होते आहे ते. कला, वाणिज्य आणि सायन्स यापैकी कला आणि वाणिज्य या शाखांमध्ये भाऊगर्दी आहे/चांगले जॉब नाहीत अशी पालकांमध्ये भिती आहे. मध्यंतरी मला एका कलाशाखेशी संबंधित विषयात पीएचडी करीत असलेल्या सध्या युरोपमध्ये राहणार्या एका बुद्धिमान मुलीने सांगितले की पुण्यात परत जाऊन माझ्या विषयातले काम करायला अतिशय त्रास होईल, कारण स्पर्धा खूप आहे, बंगळुरूला जावे लागेल. ते करण्याची विशेष इच्छा प्रत्येकालाच असेल असे नाही. मुळात स्पर्धा करावी लागणारच आहे, तर आपण त्यात मागे का पडावे? असा हेतू असतो..
जगात एकूण इंजिनिअर्सची संख्या लोकसंख्येच्या प्रमाणात किती? मला वाटते अतिप्रगत देशात (जर्मनी, जपान, अमेरिका इ.) सुद्धा ३ ते ५% अशी काही आकडेवारी आहे (हे वाचून सुद्धा आता ४-५ वर्षे होऊन गेलीत -ह्यावर एक विशेषांक निघाला होता - मला दुवा सापडला तर देईनच).
आता उरलेले लोक लाय करतात? ते उत्तम जगू शकत नाहीत का? त्यांना उच्चपदस्थ करिअर्स नसतात का? केवळ उच्चपदस्थ करिअर्स म्हणजेच सगळे असते का? प्रश्न प्रश्न प्रश्न!
असो एका वेगळ्या लेखाचा विषय होईल!
नसावे. पण जेव्हा घर, नोकरी, स्थैर्य, शांती असे सगळ्याचे ताळमेळ घालण्याची वेळ येते तेव्हा उच्च पैसा देणार्या करियर करण्याकडेच लोकांचा कल वळतो असे दिसते. आपण सर्व इंजिनीअरिंग आणि मेडिसीन अशा विषयांकडे का वळलो? त्यात स्थैर्य आहे, पुरेशी वाढ आहे असे दिसल्यामुळे वळलो. आईवडिलांनी माझ्यावर तरी कसलाही दबाव आणला नव्हता, पण डोळ्यासमोर दुसर्या क्षेत्रांत यशस्वी झालेली उदाहरणे नव्हती. आणि फार विचार केला, लोकांकडे जाऊन ते रोज काय काम करतात हे पाहिले, आपल्याला काय आवडेल, याचा फार विचार केला असे झाले नाही. ही चाकोरीच झाली. आजचे आईवडिल फार वेगळे नाहीत - तेही मुलांचे चांगलेच पाहत असतात असे त्यांना वाटते. खरेतर मुलांना नकळत्या वयात त्यांना आयुष्याचे निर्णय घ्यायला लावणारी व्यवस्था चुकीची आहे.
अवांतर होईल, पण हल्ली तरूण मुलांमध्ये गायक/वादक/नर्तक होण्याची आवड खूप वाढली आहे असे दिसते. कारण एकच असावे, या क्षेत्रात समाजाच्या सगळ्या स्तरांवरून आलेले लोक यशस्वी होताना, प्रसिद्धी मिळवताना दिसतात. म्हणून त्या दिशेबद्दलचे लोकांच्या मनातले पूर्वग्रह कमी झाले आहेत. नाहीतर आपण ज्यावेळी कॉलेजमध्ये होतो तेव्हा (अरे देवा!) वेळी आपल्यासारखी मुले म्हणाली असती, की मी गायनाला इतका वेळ देते/देतो, सारेगमप मध्ये जाऊन वर्षभर स्पर्धा करते/करतो, तर आईवडिलांनी ते करू दिले असते का?
आय आय टी बद्दल लोकांचे समज असे असतात की तेथे गेले की स्पर्धेत महायशस्वी झालो. त्यामुळे तिथे वळतात. दुसरी कारणे सांगितली आहेत की लोक कसा विचार करतात. मला स्वतःला कॉलेजमध्ये आल्यानंतर अॅडजस्टमेंटसाठी/ शिकण्यासाठी वेळ दिला गेला नव्हता, बाकीची मुले प्रयोगाकडे लक्ष देत होती, तेव्हा मला लॉगटेबल कसे वापरता येईल या शंकेने ग्रासलेले होते. त्यामुळे सहावीमध्येच अभ्यासाचा पाया बळकट करण्यासाठी चांगली, लवकर सुरूवात होईल, असा विचार आईवडिल करीत असले तर आश्चर्य वाटायला नको.
3 Aug 2010 - 6:32 pm | चतुरंग
प्रतिसाद तुमच्या रोखाने नव्हता हे स्पष्ट करतो. पालकांची सर्वसाधारणपणे मानसिकता कशी बनत असावी ह्याबाबतचा विचार होता.
असो. तुमच्या उत्तराच्या प्रतीक्षेत! :)
3 Aug 2010 - 6:38 pm | आमोद शिंदे
आज विकडे ला कसे काय पार्कमधे चालला आहात? शाळा अजून सुरू झाल्या नाहीत वाटतं. अमेरिकेत शाळा कधी सुरु होतात?
3 Aug 2010 - 8:57 pm | विकास
अमेरिकेत सध्या समर चालू आहे. इथे शाळांना जूनच्या साधारणपणे तिसर्या/चौथ्या आठवड्यात सुट्टी लागते आणि सप्टेंबरच्या पहील्या आठवड्यात त्या उघडतात.
बाकी मूळ मुद्दा:
भारतात क्लासेसचा अतिरेक चालू आहे, या व्यतिरीक्त काहीच लिहवत नाही. समाजाच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास, भारत हा जसा जास्त लोकसंख्येचा देश आहे तसाच सध्याच्या घडीस तरूण असलेला आणि तसाच मला वाटते २०३० वगैरे पर्यंत सगळ्यात तरूण देश रहाणार आहे. अर्थात त्यामुळे पैसे मिळवणे या एका उद्देशाने स्पर्धा भरपूर असणार आहे. त्याला वळण लावायचे असेल तर पर्याय सुचवायला हवेत. ते नुसतेच सुचवून चालणार नाहीत तर खर्या अर्थाने तशी "रोल मॉडेल्स" दिसणे महत्वाचे आहे.
3 Aug 2010 - 7:42 pm | sagarparadkar
मी बहुतेक Times Of India मधे वाचलेले आठवतंय की २००९ चे रसायनशास्त्राचे नोबेल मिळवणारे डॉ. वेंकटरमण हे IIT-JEE क्रॅक करू शकले नव्हते? ही माहिती कितपत खरी आहे माहिती नाही. खोटी असल्यास डॉ. वेंकट्रमण आणि Times Of India सकट सर्वांची आधीच माफी मागत आहे.
3 Aug 2010 - 7:58 pm | sagarparadkar
सर्वांची माफी मागत आहे, its not IIT-JEE but IITS; don't know the difference.
खालील ब्लॉग पहावा:
http://blogs.timesofindia.indiatimes.com/Outraged/entry/iim-ahmedabad-s-...
shobha says:
March 08,2010 at 04:19 PM IST
I agree with the professor.If a person has done exceptionally well in CAT,it is unfair to deny an interview call.Some children are late bloomers.If IIMS want to follow this policy then they can notify that cat applications will be given only to those scoring above 70%IIMS is introducing this policy just when Mr Sibal wants to make board exams less stressful.If one looks around one would notice that those who reach the top of the corporate ladder are not only those who had 90% in school board exams.Come to think of it the recent Indian American Nobel prize winner Mr Venkatraman Ramakrishnan did not not make it to the IITS but went on to win a Nobel prize.
3 Aug 2010 - 8:39 pm | चिरोटा
एकच ते. IITs असे ते आहे. अमेरिकेतल्या लोकांवर अधुन मधुन प्रभाव पाडण्यासाठी आय आय टीज चे branding अधुन मधुन सरकारी आशीर्वादाने मिडियामधुन चालु असते.
अवांतर- अगदी सुरुवातीच्या काळात्-५०च्या दशकात आय आय टींसाठी प्रवेश परिक्षा नव्हती.
------
3 Aug 2010 - 9:03 pm | विकास
आय आय टीज चे branding अधुन मधुन सरकारी आशीर्वादाने मिडियामधुन चालु असते.
किमान बॉस्टनमधे ऐकलेला पीजे - भारतातील प्रथितयश बाप मुलाबद्दल अथवा मुलगा स्वतःबद्दल म्हणतो की, "मला आय आय टीत जाता आले नाही म्हणून मी इथे एम आय टीत आलो." इथे आय आय टी ला कमी करण्याचा उद्देश नाही, पण तरी देखील हसावे का रडावे ते समजत नाही. एकदा इथल्या भारतीयांच्या कार्यक्रमात भरपूर आय आय टीयन्स दिसल्यावर एक गव्हर्नरच्या निवडणूकीतील उमेदवाराने हा विनोद सांगून टाळ्या मिळवल्या. (मते किती मिळाली ते समजेलच लवकर ;) )
3 Aug 2010 - 5:45 pm | लिखाळ
काय हे..
अशा पालकांची भजी करावीत का? :)
3 Aug 2010 - 6:06 pm | आमोद शिंदे
सहावी पासून आयआयटीचा अभ्यास करुन नंतर यश मिळवलेले हे उद्याचे वीर त्यांच्या कष्टांवर 'हनी बंचेस ऑफ ओट्स' सारखे लेख लिहितील तेव्हा आपण त्यांची तारीफ करू.
आयआयटी आणि अमेरिका ह्या दोन गोष्टींच्या वेडापायी आपण जगणे विसरत चाललो आहोत की काय असे वाटू लागले आहे.
3 Aug 2010 - 6:30 pm | अविनाशकुलकर्णी
कदाचित त्यंना आय.टी.आय..म्हणायचे असेल व आपण चुकुन आय.आय..टी असे एकले असेल असे तर झाले नसेल्?[चु.बु/दे.घे.]
3 Aug 2010 - 7:12 pm | भारी समर्थ
हैदराबादमधे शाळांच्या जाहिरातीतूनच 'आआयटी-जेईई' आणि 'फिजीक्स ऑलम्पियाड' च्या 'स्पेशल बॅचेसची' माहिती दिली जाते. शिवाय, असल्या स्पर्धांमधल्या किंवा स्पर्धात्मक परिक्षांमधल्या रॅंक होल्डर्सना पेपरमधून प्रसिद्धी मिळते.
भारी समर्थ
3 Aug 2010 - 10:49 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
'आआयटी-जेईई' आणि 'फिजीक्स ऑलम्पियाड' या दोन परीक्षांचा आपसांत काहीही संबंध नाही. भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र, गणित, रसायन इ. मूलभूत विज्ञान विषयांमधे ऑलिंपियाड परीक्षा घेऊन मुलांना मेडल्स दिली जातात. साधारण ८वी ते ११वी या यत्तांमधली मुलं ज्युनियर आणि ११वी ते १३ वी या यत्तांमधली मुलं सिनीयर गटात असतात. शाळेतल्या यत्तेपेक्षा मुलांचं वयांवरून गट ठरवला जातो. पण नक्की वयोगट आता आठवत नाहीत.
4 Aug 2010 - 10:57 pm | मिहिर
साधारण ८वी-९वी तील ज्युनिअर तर १०वी ते १२वी ची मुले सिनिअर गटात येतात. कारण मला आठवतय की दहावीत मी ज्युनिअरच्या गटात बसू शकत नव्हतो. भौतिक, रसायन, गणित व जीव यांचे असे गट नसतात. सर्वांना एकच पेपर असतो. खगोल आणि ज्युनिअर सायन्स ऑलिम्पिआडला लहान गट असतो.
5 Aug 2010 - 4:28 pm | भारी समर्थ
गल्लत वगैरे नाही. पण जाहिरातीतलं वाक्य सांगितलं. 'स्पेशल बॅचेस फॉर आयआयटी-जेईई, फिजीक्स ऑलंपियाड' अशी काहीतरी शब्दमांडणी होती. एकत्रच शिकवणी असेल की नाही याबद्दल माहिती नाही.
फक्त आयआयटी-जेईईच नाही तर इतर अवांतर गोष्टींचही इकडे असं चालतं हे दर्शवण्यासाठी अवांतर मुद्दा टाकला होता.
बाकी, आमचा या दोन्ही गोष्टींना दुरूनच 'राम-राम'!
भारी समर्थ
3 Aug 2010 - 8:03 pm | अडगळ
प्रतिसादागणिक आमच्या पालकांबद्दलचा आमचा आदर वाढत वाढत गेला.
अति अवांतर :
व्रजेश सोळंकींचा व्हॅक्युम क्लीनर आठवला.
3 Aug 2010 - 8:30 pm | रेवती
मुसु, (माझी स्मरणशक्ती ठीक असेल तर) तुम्ही व तुमच्या सौ. ही आय आय टी वाले आहात.
तुमच्यावेळी तुम्ही प्रवेशाची तयारी कशी केलीत?
3 Aug 2010 - 8:46 pm | मुक्तसुनीत
व्यनि करतो :-)
3 Aug 2010 - 11:05 pm | आमोद शिंदे
अहो व्यनितून कशाला इथेच लिहा ना. सगळ्यांनाच मार्गदर्शन होइल.
4 Aug 2010 - 1:14 am | मुक्तसुनीत
तुमची मागणी नोंदवण्यात आलेली आहे. धन्यवाद.
3 Aug 2010 - 9:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>मुसु, (माझी स्मरणशक्ती ठीक असेल तर) तुम्ही व तुमच्या सौ. ही आय आय टी वाले आहात.
हा हा हा स्वयंपाकाचे विचारायचे आहे काय ?
-दिलीप बिरुटे
3 Aug 2010 - 9:19 pm | रेवती
बिरुटेसरांचा प्रतिसाद बोलका आहे.
पालकांची मरमर तर होतेच आहे. हाती काही लागले तर ठिक नाहीतर (पाल्य आणि पालकांना)नैराश्य येण्याची शक्यता दाट!
माझ्या पिढीतील आम्हा सर्व आते मामे चुलत भावंडांवरही असा दबाव होताच.
सगळेजण (मी सोडून....माझी बातच वेगळी) ;) नामांकित इंस्टीट्युटांमधून शिकले आणि सुदैवाने चांगल्या पदांवर आहेत.
सांगायची गम्मत अशी कि आय आयटी असू दे किंवा आणखी कोणत्याही ठिकाणी शिकलेल्यांनी त्यांच्या नोकर्या किंवा व्यवसाय हे अगदी भिन्न क्षेत्रातले निवडले आहेत. 'मला मनापासून एखादे क्षेत्र आवडते म्हणून मी ते शिकले/ शिकलो आणि त्यात काम करत आहे' असे माझ्या माहेरी अपवादानेच झाले आहे. आई वडीलांना हवे म्हणून त्यांनी करण्यास भाग पाडले. सुदैवाने (मी सोडून) सगळ्यांचा स्कोअरही चांगला होता. जे घडले तो योगायोग म्हणून सोडून देता येणार नाही कारण माझ्या आते, चुलत, मामे भावंडांची संख्या (सुदैवाने) भरपूर आहे.
4 Aug 2010 - 1:00 am | पुष्करिणी
आय.आय. टी. च्या तयारीच माहित नाही पण १० वी च्या परिक्षेसाठी मुलीला ६ वी पासून विविध क्लास लावणार्या एकांना मी व्यक्तिशः ओळखते. हे गृहस्थ १० वी आणि १२ वी मधे 'बोर्डात' आल्यामुळे त्यांच्या मुलीकडून त्यांची फक्त 'इतकीच, वाजवी' अपेक्षा आहे.
मुलीवर बरेच प्रतिबंध होते. तिच बॅड्मिंट्न ( जे ती अंगणात खेळायची अर्धा तास ), घरातल्यांचा टीव्ही, पाहुणे इ. वेळ्खाउ गोष्टी बंद.
मुलगी सध्या ९ वीत असून तिनं ६ महिन्यांपूर्वी बंड पुकारलय, जास्त त्रास दिलात तर पळून जाइन, शिक्षण सोडून आय्मॅक्स सिनेमा हॉल मधे डोअर कीपर होइन अशी धमकी दिलीय. वडिल हवालदील आहेत..पण कोणालाही अजिबात सहानुभूती वाटत नाही.
4 Aug 2010 - 2:38 am | चतुरंग
हे भारीच आहे. डोअरकीपर व्हायची धमकी म्हणजे वडिलांचे डोळेच पांढरे झाले असतील! :(
4 Aug 2010 - 2:41 am | मुक्तसुनीत
"डोअरकीपर होईन" या धमकीमधे नाही म्हण्टले तरी थोडा मिष्किलपणा आहे. "जीव देईन" अशी धमकी देणार्या आणि अशी धमकी प्रत्यक्षात आणण्याचा यशस्वी/अयशस्वी प्रयत्न करणार्या जीवांना ज्यातून जावे लागले असेल त्याची कल्पना करणे कठीण बाब आहे.
4 Aug 2010 - 2:44 am | पुष्करिणी
ही धमकी मिष्किलच आहे पण बोर्डात आलेल्या वडिलांना अत्यंत जीवघेणी आहे ... मुलगी सोडून त्यांच्यावर मानसोपचार करण्याची वेळ आलीय.
4 Aug 2010 - 3:01 am | चतुरंग
बोर्डात यायचा काय धोशा लावताय?
मुलगी तल्लख असणार हे नक्की.
-----------------------
माझ्या एका चुलत आजोबांचा किस्सा - ते लहान असताना (म्हणजे ही गोष्ट सुमारे ८० वर्षांपूर्वीची) एकदा वडिलांजवळ अभ्यास करत बसलेले. आता मुलांचे लक्ष जितपत असते अभ्यासात तसेच चालले होते त्यांचेही. जवळपासची मुले अंगणात खेळत होती सहाजिकच ह्यांनाही जायचे होते पण धाक.
पुस्तकात एक वाक्य आले "अशा अशा कारणाने त्या गोष्टींचा परिपाक होऊन..." असे काहीतरी शब्द होते.
त्यातले "परिपाक होऊन" हे शब्द वडिलांनी उच्चारताच हे एकदम म्हणाले "वड्या पडतात!"
वडिलांनी पुस्तक मिटले आणि म्हणाले "टाम्या, तुला धडा समजलाय! खेळायला जा!!" :)
4 Aug 2010 - 9:16 am | कवितानागेश
खूपच मस्त धमकी आहे.
माझ्या भाचीला 'टिप' देते!
4 Aug 2010 - 11:23 pm | मिहिर
सहावीला आय आय टी म्हणून नक्की शिकवतात तरी काय? मला वाटते कदाचित त्या त्या इयत्तांमधील स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यास करून घेत असतील व नाव आय आय टी चे देत असतील.
आम्हाला आमच्या सरांनी ९वी मध्ये थोडेफार सुरू केले होते. म्हणजे आठवड्यातून दीड तास. मी त्यावेळी ते फक्त ऐकून घेत असे. परत वहीला हात लावत नसे. सुरवातीचा थोडा पार्ट समजायचा. पण डेरिवेटिव सुरु झाले तेव्हा मला त्याचा आलेला राग अकरावीत पण नीट गेला नव्हता. मात्र या थोड्या केलेल्या गणित व भौतिकच्या जादा अभ्यासाचा दहावी एनटीएस ला मात्र छान फायदा झालेला.
5 Aug 2010 - 12:11 am | मुक्तसुनीत
धाग्याला उत्तर देणार्यांचे आभार. काही मुद्दे.
- राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा, निरनिराळ्या स्कॉलरशिप्स, ऑलिंपियाड्स , क्विझेस, परीक्षा या गोष्टी त्याज्य तर नव्हेत. या सर्वांच्या मागे पाचवीसहावीपासून मुलांना धावताना आपण पाहातोच. मुलांच्या बुद्धिमत्तेचा कस लावणार्या या परीक्षा नकोत असे तर कुणी म्हणत नाही. तर मग "आय आय टी चा अभ्यास सहावीपासून" या प्रकारातच इतके धक्कादायक - आणि गर्हणीय काय असावे ?
- मुलांना त्यांच्या वयाच्या आधी , समज यायच्या आधीच काहीतरी शिकवण्याकरता ढकलणे हे चुकीचे. पण , ज्यांना या प्रकारची क्षमता आहे त्या क्षमतेला लहान वयापासून वाव मिळणे हेही महत्त्वाचेच.
- माझ्यामते मुद्दा रॅटरेसचा आहे. लहान मुलांना शिकवताना , त्यांना नव्या गोष्टी समजाव्यात, त्यांचे ज्ञानाचे नि विचारांचे वर्तुळ विस्तृत व्हावे या उद्दिष्टांनाच या "काँपिटीशन सक्सेस रिव्ह्यू" आणि गाइडे-घोकंपट्टी-रट्टा मारणे- परीक्षा "क्रॅक" करणे या गोष्टींनी हायजॅक केलेले आहे. सतत असुरक्षिततेने पछाडलेले असणे , स्पर्धेच्या नि परीक्षांच्याच नव्हे तर एकंदर आयुष्यातल्या सगळ्याच बाजूंच्या संदर्भात स्पर्धात्मक प्रवृत्ती असणे या दुर्दैवी गोष्टींनी पालकांपैकी कुणी ग्रस्त असेल तर त्याचा परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होणार - एकतर ती अत्यंत घाबरलेल्या मनःस्थितीमधे असतील किंवा ती नको तितकी अॅग्रेसिव्ह बनत असतील.
मुलांनी यश कमवावे आणि "चमकणे" , त्यांच्या ज्ञानात नि विचारात प्रगल्भता येणे आणि " नेहमी टॉपर असणे" यातली सीमारेषा सूक्ष्म आहे. मुलांची हेळसांड, दुर्लक्ष आणि त्यांना सतत धावडवणे या दरम्यान कुठे तरी ती आहे.
5 Aug 2010 - 2:39 am | पिवळा डांबिस
हैदराबादेच्या मित्राबरोबर "शिक्षणपद्धती"बद्दल गप्पा मारायच्या हीच एक चूक आहे!!! (का लोणची, बिर्याणी वगैरे विषय संपले?)
:)
त्या लोकांमध्ये शिक्षणाचा डायरेक्ट संबंध पुढे मुलाला लग्नात मिळणार्या हुंड्याशी असतो.....
आपल्याकडे आहे का तसं?
काय मुसु हे!!!
उद्या बंगाली माणसाशी शाकाहाराबद्दल, गुजराती माणसाशी साहित्याबद्दल, (आणि मराठी माणसाशी सौजन्याबद्दल!!!) चर्चा कराल!!!!!
:)