मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

इयत्ता सहावीमधे आय आय टी परीक्षातयारी

मुक्तसुनीत · · काथ्याकूट
आज एका हैद्राबादकडल्या सहकार्‍याबरोबर गप्पा मारत होतो. विषय होता शिक्षणपद्धती वगैरे वगैरेचा. त्याने बोलता बोलता असे सांगितले की त्यांच्या शहरात काही शाळांमधून (की क्लासेस मधून ?) इयत्ता सहावीच्या मुलांना आय-आय-टी च्या परीक्षेची तयारी करण्यासाठी वर्ग चालवले जातात. एकंदर स्पर्धा वाढलेली आहे हे तत्वतः माहिती असूनसुद्धा प्रस्तुत बातमीने थोडा धक्का बसलाच. थोडे कुतुहलही वाटले. आपल्यापैकी कुणी महाराष्ट्रातल्या कुठल्या गावी/शहरी अशा प्रकारच्या वर्गांसंबंधातले काही ऐकलेले आहे काय ? असल्यास त्याबद्दल ऐकायला जरूर आवडेल. आय-आय-टीचे वर्ग असतील नसतील. पण इयत्ता सहावीच्या पातळीपर्यंत या स्वरूपाचे लोण पोचल्याचे तुम्ही पालक म्हणून किंवा निव्वळ एक साक्षीदार म्हणून अनुभवले आहे काय ? स्कॉलरशिप्स, टिमवि पासून ते थेट राष्ट्रीय दर्जाच्या गणित/विज्ञान स्पर्धा या संदर्भातल्या गोष्टी मी विद्यार्थी म्हणून पाहिल्यात. पण त्याला काळ लोटला. सहावीची गाडी थेट आयाय्टी पर्यंत पोचली असल्यास "कशी?" असा प्रश्न पडला आहे.

वाचन 16905 प्रतिक्रिया 0