मि ह्या प्रचि खुप दिवसांनपुर्वी काठलेल्या आहेत, पण मला मा.बो. वर फोटो अपलोड करता येत नव्हते. पण आता काहि अडचन नाहि.
मी एकदा कंपनीच्या कामासाठी नळदुर्ग ला गेलो होतो. त्या वेळेस वेळ होता म्हनुन हा किल्ला पाहन्यात आला.
त्या वेळेस मला पोलिसांनी फार परेशान केल होत. (मी एकटाच होतो, म्हणुन त्यांना अस वाटलं कि मि कील्ला पाडतो कि कायं? ओळखपत्र त्यांनी ठेउन घेतले होते).
हा आहे हत्ती बुरुज........
कर्नाटका कडे...........
हि किल्यात नाहि तर आमच्या घरची गाय आहे..... शेवटचा फोटो आहे... म्हणुन ठेवत आहे..
प्रतिक्रिया
3 Aug 2010 - 3:20 pm | simplyatin
नमस्कार किश्या,
वरील बुरुज हा हत्ती बुरुज नसून उपळी बुरुज आहे. त्या वरील तोफेचे नाव पण उपळी तोफ आहे. लांबी साधारण १६ फूट.. नळ्दुर्ग किल्ल्यास अन्दाजे ६० च्या आसपास बुरुज आहेत. त्यातील उपळी हा त्याच्या किल्ल्या अन्तर्गत बान्धकाम व तोफे मूळे प्रसिद्ध आहे.
आपण जल महाल पाहिला असेलच. पावसाळ्यात अतिशय अप्रतिम द्रुश्य असते..
अवान्तर :
सदर किल्ला निसर्ग गिरिभ्रमण संस्थेच्या हैदराबाद - डोम्बिवली सायकल मोहिमेत आमच्या चमू ने पाहिला होता. डिसेम्बर २००२..
त्या मोहिमेत आम्ही बसवकल्याण, बीदर, हुम्नाबाद, नलदुर्ग आणि सोलापुर येथील भुईकोट आणि किल्ले पुरंदर पाहिले होते.
मोहिमेचा मार्ग हैदराबाद-जहिराबाद(आन्ध्र प्रदेश) - बीदर-हुम्नाबाद-बसवकल्याण(कर्नाटक) - नलदुर्ग- सोलापुर- इन्दापुर-बारामती-सासवड-तलेगाव-पनवेल-डोम्बिवली असा असल्याने वरील किल्ले भेट देते झालो...
यतिन नामजोशी.
3 Aug 2010 - 6:16 pm | सागर
किश्याभाऊ धन्यवाद
सुंदर छायाचित्रे आहेत :)
उस्मानाबादसारख्या ठिकाणी एवढ्या चांगल्या स्थितीत हा भुईकोट किल्ला आहे याचेच नवल आहे
नाहितर हल्ली सगळ्या गडांवपुरात्त्त्त्व खात्याने लक्ष दिले तर आश्चर्य करावे अशी परिस्थिती आहे.
महाराजांच्या महाराष्ट्रात सर्व गडांच्या संरक्षणासाठी पुरातत्त्व खाते काही करते आहे असे मला तरी वाटत नाही.
चार फलक लावले म्हणजे जबाबदारी संपली या थाटात हे खाते असते. आणि खर्च अशाच ठिकाणी करतात जेथून उत्पन्न होते.
पुण्यातल्या शनिवारवाड्याची बघा कशी दैना करुन टाकली आहे :(
असो. नळदुर्गाचे छान फोटो उपलब्ध करुन दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद