मिपाची एक सन्माननीय सदस्या प्राजू, हिचा आम्ही धिक्कार करत आहोत...!
आज कोल्हापुरात प्राजूच्या घरी 'कोल्हापुरी तांबडा रस्सा-पांढरा रस्सा आणि चवदार कोंबडी' असा मोठा न्यारा बेत होता. प्राजूने समस्त नॉनव्हेजखाऊ मिपाकरांना ही मेजवानी झोडण्याकरता स्वत:च्या घरी प्रेमाने, आग्रहाने बोलवणं तर सोडाच, परंतु सदर पाकृचा तेवढा फक्त फोटूच मिपाच्या मुखपृष्ठाकरता पाठवून मिपाकरांची रीतसर आणि कोल्डब्लडेडली बोळवण केली आहे! :)
एवढंच नव्हे, तर आज या संदर्भात तिच्याशी फोनवर माझं प्रत्यक्ष बोलणंही झालं तेव्हादेखील तिने केवळ 'मुखपृष्ठाकरता फोटू पाठवत आहे' एवढंच सांगितलं! एवढंच नव्हे, तर वर जखमेवर मीठ म्हणून समस्त मिपाकरांना तिने टुकटुकही केलं! :)
याबद्दल मी प्राजूचा तीव्र निषेध व धिक्कार करतो व प्रायश्चित्त म्हणून तिने पुन्हा असा न्यारा बेत करून आम्हा मिपाकरांना तिच्या कोल्हापुरच्या घरी (माहेरी) जेवायला बोलवावं, अशी शिक्षा सुनावतो..! :)
मंडळी, कृपया खालील सुरेख फोटू पाहा, आणि हा फोटू दाखवत आपल्याला कुणी 'टुकटुक' केलं की कसं वाटेल हे तुम्हीच सांगा! :)
ठीक आहे प्राजू, बघून घेईन तुला! :)
तात्या.
प्रतिक्रिया
2 May 2008 - 1:48 am | पिवळा डांबिस
प्राजूचा धिक्कार असो...:)
म्हटलं एकदम काय झालं या तात्याला!!!
उसाच्या रसाचं प्रमाण चुकलं का काय, कारण काल बुधवार होता....:)
पण फोटो बघताक्षणी त्याच्या भावना उमजल्या!
तात्या, तू केलेल्या प्राजुच्या धिक्कारात आम्ही पूर्ण अंतःकरणाने (आणि उपाशी पोटाने) सामील!!!
-पिवळा डांबिस
2 May 2008 - 2:04 am | चतुरंग
आणि पहा ते ताट सुधा कसं लावलंय - तांबडा आणि पांढरा असे दोन डोळे वटारुन बघताहेत आणि चपाती तोंड वेडावून दाखवते आहे असेच वाटतंय!
शेजारचं कोंबडीचं सुकं खिजवतंय आणि भरीत भर म्हणून लिंबूही कापून ठेवलंय! :''(
मी अभक्षभक्षण करीत नसूनही माझा बसल्याजागी जळफळाट झाला तर तुम्हा लोकांचे काय झाले असेल मी कल्पना करु शकतो तात्या! =P~
प्राजू, आधी "माझा ताटवा" असा फुलांचा सुंदर लेख पाठवायचा आणि नंतर "माझे ताट, वा!" असा जळवणारा फोटो पाठवायचा ह्याला काय अर्थ आहे?
हे वागनं बरं नव्हं!
ह्याची शिक्षा तुला भोगावीच लागेल! :)
चतुरंग
2 May 2008 - 2:25 am | नंदन
आहे.
आधी "माझा ताटवा" असा फुलांचा सुंदर लेख पाठवायचा आणि नंतर "माझे ताट, वा!" असा जळवणारा फोटो पाठवायचा ह्याला काय अर्थ आहे?
-- हे सहीच :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
2 May 2008 - 8:45 am | प्रभाकर पेठकर
तांबडा रस्सा बघुन माझ्याही बसल्या जागेचा जळफळाट झाला...
2 May 2008 - 9:11 am | विसोबा खेचर
प्राजू, आधी "माझा ताटवा" असा फुलांचा सुंदर लेख पाठवायचा आणि नंतर "माझे ताट, वा!" असा जळवणारा फोटो पाठवायचा ह्याला काय अर्थ आहे?
हा हा हा! ही शाब्दिक कोटी बाकी सहीच रे रंगा! :)
आपला,
(ताटावाटीतला) तात्या.
2 May 2008 - 4:05 am | मीनल
प्राजु ,आता तुझे दिवस आहेत.घे चिडवून.
माझी ही टर्न येइल लवकरच तुला चडवायची. मी पण लवकरच भारतात जाणार आहे.तेव्हा तुला सोडेन की काय अशी?
मीनल.
2 May 2008 - 4:22 am | मीनल
हे काय ?
अमेरिकेत तर ही शुध्द शाकाहारी होती.
भारतात जाऊन ही पटवर्धन ,कोंबडीच सुक खायला शिकली की काय?
मीनल.
2 May 2008 - 8:48 am | प्रभाकर पेठकर
तात्याऽऽऽऽऽऽऽ......!
मला तांबडा रस्सा आणि कोंबडीचे सुके दिसतच नाहीए. कोणाचे लक्ष नाही पाहून कोणी तरी हादडले वाटतं......
2 May 2008 - 9:26 am | प्राजु
जरा चुकलंच...!
खरंतर आईने आमच्या स्वयंपाकिण बाईंकडून हे करवून घेतलं. म्हंटलं आधी त्याना करता येतं का ते पहावं आणि मग चांगलं झालं तर पुन्हा एकदा त्यांना करायला लावून सगळ्या मिपाकरांना आमंत्रण द्यावं.. कसं???
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
2 May 2008 - 9:29 am | प्रभाकर पेठकर
शबरी प्राजू.....
2 May 2008 - 9:51 am | प्राजु
मिपाकरांना नम्र विनंती.. मी शबरी झाले म्हणून आपण स्रवांनी स्वतःला प्रभू रामचंद्र म्हणवून घेऊ नये... :D
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
2 May 2008 - 9:54 am | विसोबा खेचर
मिपाकरांना नम्र विनंती.. मी शबरी झाले म्हणून आपण स्रवांनी स्वतःला प्रभू रामचंद्र म्हणवून घेऊ नये...
हा हा हा! हे बाकी मस्त हो प्राजू! :)
आयला, हा प्रभाकर स्वत:ला काय रामबिम समजतो की काय! :))
(स्वगत!)
आपला,
रावणतात्या.
2 May 2008 - 11:06 am | प्रभाकर पेठकर
मी स्वतः एक पत्नी, एक बाणी (मराठी बाणा) असा आहेच. तसेच अगदी राम नसलो तरी रामचंद्र पुत्र आहे. (प्रभाकर रामचंद्र पेठकर) 'प्रभू राम' नसलो तरी अजून तरी 'हे राम' नक्कीच झालेलो नाही.
2 May 2008 - 11:46 am | प्राजु
हे राम तुम्हाला कोण होऊ देणार आहे इथे?? बरेच काही करायचे आहे तुम्हाला..
तसे पाहिले तर मी रामचंद्र पुत्राची सुपुत्री आहे. आणि रामचंद्र सुपुत्रीची सुद्धा सुपुत्री आहे..
म्हणजे माझ्या दोन्हीकडच्या आजोबांचे नाव रामचंद्र होते. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
2 May 2008 - 9:32 am | जयवी
प्राजु....... हे काही बरं नाही हं...... जरा सांभाळून खाल्लंस ना गं....... नाहीतर पोटात दुखायचं हो ;)
बाकी....
प्राजू, आधी "माझा ताटवा" असा फुलांचा सुंदर लेख पाठवायचा आणि नंतर "माझे ताट, वा!" असा जळवणारा फोटो पाठवायचा ह्याला काय अर्थ आहे?
....... हे म्हणजे सॉलीड :)
आता मात्र तुला "टुकटुकी "म्हणणार.. :)
2 May 2008 - 9:44 am | विजुभाऊ
शबरी प्राजू.....
हाहाहाह जबरी पेठकरकाका
2 May 2008 - 10:21 am | धमाल मुलगा
~X( ~X( ~X( ~X( ~X( ~X( ~X(
धिक्कार धिक्कार धिक्कार...त्रिवार धिक्कार !
निषेध निषेध निषेध...त्रिवार निषेध !!
दुष्टे...किती गं छळशील आम्हाला?
काय तो तांबडा रस्सा...काय तो पांढरा रस्सा...काय ते सुकं...आणि पुन्हा खास फोटूसाठी पेश्शल मांडण्याची पध्दत..
=P~ =P~ =P~ =P~ =P~ =P~ =P~ =P~
बाकी, बेत एकदम झकास झालेला दिसतोय हो! छान छान...
स्वगतः हं....डेंगळ्या...माझं जाकीट घे..जीप काढ...आत्ताच्या आत्ता साईबा ला जायचंय आपल्याला...मस्त कोल्हापुरी थाळी हादडून जीव शांत करुन घ्यायचाय मला....
2 May 2008 - 12:21 pm | स्वाती दिनेश
प्राजू, आधी "माझा ताटवा" असा फुलांचा सुंदर लेख पाठवायचा आणि नंतर "माझे ताट, वा!" असा जळवणारा फोटो पाठवायचा ह्याला काय अर्थ आहे?
असेच म्हणते चतुरंगं सारखे..
प्राजु,फोटू बाकी झकासच...
स्वाती
2 May 2008 - 2:07 pm | ब्रिटिश टिंग्या
आता कधी एकदा परत येउन तांबडा रस्सा खातोय असं झालयं.....
छ्या! आता 'लाळ लाळ लाळ लाळ' म्हटलं तर परत आमचे नांव सार्थ झाले असा प्रतिसाद यायचा =P~ =P~ =P~ =P~ =P~
असो,
"माझे ताट, वा!"
हे म्हणजे लैच भारी चतुरंगशेठ.
2 May 2008 - 2:37 pm | काळा_पहाड
झकासच !!! सारेच झकास.
2 May 2008 - 4:53 pm | आंबोळी
नुसताच फोटू लावल्याबद्दल प्राजुताईंच निषेध....
प्रिय तात्या,
लवकरात लवकर तो फोटु मिपावरून हालवा ही विनंती.
होतय काय की प्रत्तेकवेळी मिपा उघडले की ते ताट समोर येतय आणि पोटात खड्डा पडतोय आणि तोंडाला पाणी सुटतय....आगदी दम धरवेना झालाय.... आमच्यावर दया दाखवा आणि तो फोटु हालवा.
2 May 2008 - 9:39 pm | देवदत्त
लवकरात लवकर तो फोटु मिपावरून हालवा ही विनंती.
होतय काय की प्रत्तेकवेळी मिपा उघडले की ते ताट समोर येतय आणि पोटात खड्डा पडतोय आणि तोंडाला पाणी सुटतय....आगदी दम धरवेना झालाय.... आमच्यावर दया दाखवा आणि तो फोटु हालवा.
सहमत =P~
2 May 2008 - 6:13 pm | धोंडोपंत
प्राजुताई,
आपण (म्हणजे तुम्ही) केलेल्या गुन्ह्याचे प्रायश्चित्त एकच.
सर्वाना जेवायला घालणे. जो पर्यंत तुम्ही हे करीत नाही तो पर्यंत आमचा राग कायम राहिल.
आपला,
(भुकेला) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
2 May 2008 - 9:43 pm | देवदत्त
तांबडा रस्सा/पांढरा रस्सा नेमका काय फरक मला माहीत नाही. पण कोंबडीची सुकी भाजी बघून =P~ =P~ =P~ =P~ =P~ =P~
सोबत लाल टोमॅटो....लिंबू..=P~ =P~ =P~ =P~ =P~
म्हणजेच...आम्ही
[( [( [( [( [( [(
2 May 2008 - 10:29 pm | वरदा
सुगरण नसणार्या कायस्थ मुली देव जन्मालाच घालत नाही!
हो ना? मग काकू करतात ना नेहेमी असं मस्त जेवण...
मग हे कशाला? तात्या, तू केलेल्या प्राजुच्या धिक्कारात आम्ही पूर्ण अंतःकरणाने (आणि उपाशी पोटाने) सामील!!!
काकुंना सांगू का???? :-C
3 May 2008 - 3:50 am | पिवळा डांबिस
ए चप ए!!
तू चीटींग करतेयस!!
क्रॉस-थ्रेड रेफरन्स नाही करायचा!!:)
3 May 2008 - 3:18 am | वरदा
भारतात जाऊन ही पटवर्धन ,कोंबडीच सुक खायला शिकली की काय?
:O
3 May 2008 - 4:38 am | अभिता
ते ताट खुप सुदंर दिसते. पण ........ त्यात कोलंबीचे लोणचे असते तर खुप मझा आला असता. व परीपूर्ण आहार मिळाला असता(डोळ्यांना)
3 May 2008 - 9:56 am | छोटा डॉन
>>आणि पहा ते ताट सुधा कसं लावलंय - तांबडा आणि पांढरा असे दोन डोळे वटारुन बघताहेत आणि चपाती तोंड वेडावून दाखवते आहे असेच वाटतंय! शेजारचं कोंबडीचं सुकं खिजवतंय आणि भरीत भर म्हणून लिंबूही कापून ठेवलंय!
हा ना राव, असली चित्र आणि वर्णनं देउन आमचा असा उघड छळवाद मांडण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही.
एकतर मला चुकवून पुण्यात कट्ट्यावर कट्टे घेताय आणि आता ते कमी म्ह्णून वर अजून हे.
तोंडच पाणी आटलं आता असलीचित्र पाहून नाहीतर इथ आमच्या नशिबी "सकाळी राईस आणि रस्सम, दुपारी रस्सम आणि राईस आणि रात्री जेवणाला राईसमध्ये मिसळून रस्सम" ...
>>तिने पुन्हा असा न्यारा बेत करून आम्हा मिपाकरांना तिच्या कोल्हापुरच्या घरी (माहेरी) जेवायला बोलवावं, अशी शिक्षा सुनावतो...
कुबूल है, कुबूल है, कुबूल है !!!
तात्या तुम्ही आता तिच्यावर कुठल्यातरी ऍक्टान्वये एक नॉन बेलेबर वॉरंट बजवा ....
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....