Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विसोबा खेचर on Fri, 05/02/2008 - 01:26
  • Log in or register to post comments
  • 12427 views

प्रतिक्रिया

Submitted by पिवळा डांबिस on Fri, 05/02/2008 - 01:48

Permalink

आयला दचकलोच!

प्राजूचा धिक्कार असो...:) म्हटलं एकदम काय झालं या तात्याला!!! उसाच्या रसाचं प्रमाण चुकलं का काय, कारण काल बुधवार होता....:) पण फोटो बघताक्षणी त्याच्या भावना उमजल्या! तात्या, तू केलेल्या प्राजुच्या धिक्कारात आम्ही पूर्ण अंतःकरणाने (आणि उपाशी पोटाने) सामील!!! -पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Fri, 05/02/2008 - 02:04

Permalink

मला वाटलंच काही तरी गोची आहे;)

आणि पहा ते ताट सुधा कसं लावलंय - तांबडा आणि पांढरा असे दोन डोळे वटारुन बघताहेत आणि चपाती तोंड वेडावून दाखवते आहे असेच वाटतंय! शेजारचं कोंबडीचं सुकं खिजवतंय आणि भरीत भर म्हणून लिंबूही कापून ठेवलंय! :''( मी अभक्षभक्षण करीत नसूनही माझा बसल्याजागी जळफळाट झाला तर तुम्हा लोकांचे काय झाले असेल मी कल्पना करु शकतो तात्या! =P~ प्राजू, आधी "माझा ताटवा" असा फुलांचा सुंदर लेख पाठवायचा आणि नंतर "माझे ताट, वा!" असा जळवणारा फोटो पाठवायचा ह्याला काय अर्थ आहे? हे वागनं बरं नव्हं! ह्याची शिक्षा तुला भोगावीच लागेल! :) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Fri, 05/02/2008 - 02:25

In reply to मला वाटलंच काही तरी गोची आहे;) by चतुरंग

Permalink

सहमत

आहे. आधी "माझा ताटवा" असा फुलांचा सुंदर लेख पाठवायचा आणि नंतर "माझे ताट, वा!" असा जळवणारा फोटो पाठवायचा ह्याला काय अर्थ आहे? -- हे सहीच :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Fri, 05/02/2008 - 08:45

In reply to मला वाटलंच काही तरी गोची आहे;) by चतुरंग

Permalink

जळफळाट...

तांबडा रस्सा बघुन माझ्याही बसल्या जागेचा जळफळाट झाला...
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 05/02/2008 - 09:11

In reply to मला वाटलंच काही तरी गोची आहे;) by चतुरंग

Permalink

:)

प्राजू, आधी "माझा ताटवा" असा फुलांचा सुंदर लेख पाठवायचा आणि नंतर "माझे ताट, वा!" असा जळवणारा फोटो पाठवायचा ह्याला काय अर्थ आहे? हा हा हा! ही शाब्दिक कोटी बाकी सहीच रे रंगा! :) आपला, (ताटावाटीतला) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by मीनल on Fri, 05/02/2008 - 04:05

Permalink

टर्न

प्राजु ,आता तुझे दिवस आहेत.घे चिडवून. माझी ही टर्न येइल लवकरच तुला चडवायची. मी पण लवकरच भारतात जाणार आहे.तेव्हा तुला सोडेन की काय अशी? मीनल.
  • Log in or register to post comments

Submitted by मीनल on Fri, 05/02/2008 - 04:22

Permalink

कश्या कश्याचा म्हणून धिक्कार करायचा?

हे काय ? अमेरिकेत तर ही शुध्द शाकाहारी होती. भारतात जाऊन ही पटवर्धन ,कोंबडीच सुक खायला शिकली की काय? मीनल.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Fri, 05/02/2008 - 08:48

Permalink

तात्या....

तात्याऽऽऽऽऽऽऽ......! मला तांबडा रस्सा आणि कोंबडीचे सुके दिसतच नाहीए. कोणाचे लक्ष नाही पाहून कोणी तरी हादडले वाटतं......
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Fri, 05/02/2008 - 09:26

Permalink

छ्या...

जरा चुकलंच...! खरंतर आईने आमच्या स्वयंपाकिण बाईंकडून हे करवून घेतलं. म्हंटलं आधी त्याना करता येतं का ते पहावं आणि मग चांगलं झालं तर पुन्हा एकदा त्यांना करायला लावून सगळ्या मिपाकरांना आमंत्रण द्यावं.. कसं??? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Fri, 05/02/2008 - 09:29

In reply to छ्या... by प्राजु

Permalink

शबरी...

शबरी प्राजू.....
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Fri, 05/02/2008 - 09:51

In reply to शबरी... by प्रभाकर पेठकर

Permalink

तमाम

मिपाकरांना नम्र विनंती.. मी शबरी झाले म्हणून आपण स्रवांनी स्वतःला प्रभू रामचंद्र म्हणवून घेऊ नये... :D - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 05/02/2008 - 09:54

In reply to तमाम by प्राजु

Permalink

:)

मिपाकरांना नम्र विनंती.. मी शबरी झाले म्हणून आपण स्रवांनी स्वतःला प्रभू रामचंद्र म्हणवून घेऊ नये... हा हा हा! हे बाकी मस्त हो प्राजू! :) आयला, हा प्रभाकर स्वत:ला काय रामबिम समजतो की काय! :)) (स्वगत!) आपला, रावणतात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Fri, 05/02/2008 - 11:06

In reply to तमाम by प्राजु

Permalink

मी स्वतः..

मी स्वतः एक पत्नी, एक बाणी (मराठी बाणा) असा आहेच. तसेच अगदी राम नसलो तरी रामचंद्र पुत्र आहे. (प्रभाकर रामचंद्र पेठकर) 'प्रभू राम' नसलो तरी अजून तरी 'हे राम' नक्कीच झालेलो नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Fri, 05/02/2008 - 11:46

In reply to मी स्वतः.. by प्रभाकर पेठकर

Permalink

अहो..

हे राम तुम्हाला कोण होऊ देणार आहे इथे?? बरेच काही करायचे आहे तुम्हाला.. तसे पाहिले तर मी रामचंद्र पुत्राची सुपुत्री आहे. आणि रामचंद्र सुपुत्रीची सुद्धा सुपुत्री आहे.. म्हणजे माझ्या दोन्हीकडच्या आजोबांचे नाव रामचंद्र होते. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by जयवी on Fri, 05/02/2008 - 09:32

Permalink

टुकटुकी

प्राजु....... हे काही बरं नाही हं...... जरा सांभाळून खाल्लंस ना गं....... नाहीतर पोटात दुखायचं हो ;) बाकी.... प्राजू, आधी "माझा ताटवा" असा फुलांचा सुंदर लेख पाठवायचा आणि नंतर "माझे ताट, वा!" असा जळवणारा फोटो पाठवायचा ह्याला काय अर्थ आहे? ....... हे म्हणजे सॉलीड :) आता मात्र तुला "टुकटुकी "म्हणणार.. :)
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Fri, 05/02/2008 - 09:44

Permalink

शबरी प्राजू.....

शबरी प्राजू..... हाहाहाह जबरी पेठकरकाका
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Fri, 05/02/2008 - 10:21

Permalink

प्राजुताईईईईई....................

~X( ~X( ~X( ~X( ~X( ~X( ~X( धिक्कार धिक्कार धिक्कार...त्रिवार धिक्कार ! निषेध निषेध निषेध...त्रिवार निषेध !! दुष्टे...किती गं छळशील आम्हाला? काय तो तांबडा रस्सा...काय तो पांढरा रस्सा...काय ते सुकं...आणि पुन्हा खास फोटूसाठी पेश्शल मांडण्याची पध्दत.. =P~ =P~ =P~ =P~ =P~ =P~ =P~ =P~ बाकी, बेत एकदम झकास झालेला दिसतोय हो! छान छान... स्वगतः हं....डेंगळ्या...माझं जाकीट घे..जीप काढ...आत्ताच्या आत्ता साईबा ला जायचंय आपल्याला...मस्त कोल्हापुरी थाळी हादडून जीव शांत करुन घ्यायचाय मला....
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Fri, 05/02/2008 - 12:21

Permalink

असेच..

प्राजू, आधी "माझा ताटवा" असा फुलांचा सुंदर लेख पाठवायचा आणि नंतर "माझे ताट, वा!" असा जळवणारा फोटो पाठवायचा ह्याला काय अर्थ आहे? असेच म्हणते चतुरंगं सारखे.. प्राजु,फोटू बाकी झकासच... स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश टिंग्या on Fri, 05/02/2008 - 14:07

Permalink

धिक्कार धिक्कार धिक्कार!

आता कधी एकदा परत येउन तांबडा रस्सा खातोय असं झालयं..... छ्या! आता 'लाळ लाळ लाळ लाळ' म्हटलं तर परत आमचे नांव सार्थ झाले असा प्रतिसाद यायचा =P~ =P~ =P~ =P~ =P~ असो, "माझे ताट, वा!" हे म्हणजे लैच भारी चतुरंगशेठ.
  • Log in or register to post comments

Submitted by काळा_पहाड on Fri, 05/02/2008 - 14:37

Permalink

झकासच !!!

झकासच !!! सारेच झकास.
  • Log in or register to post comments

Submitted by आंबोळी on Fri, 05/02/2008 - 16:53

Permalink

निषेध!

नुसताच फोटू लावल्याबद्दल प्राजुताईंच निषेध.... प्रिय तात्या, लवकरात लवकर तो फोटु मिपावरून हालवा ही विनंती. होतय काय की प्रत्तेकवेळी मिपा उघडले की ते ताट समोर येतय आणि पोटात खड्डा पडतोय आणि तोंडाला पाणी सुटतय....आगदी दम धरवेना झालाय.... आमच्यावर दया दाखवा आणि तो फोटु हालवा.
  • Log in or register to post comments

Submitted by देवदत्त on Fri, 05/02/2008 - 21:39

In reply to निषेध! by आंबोळी

Permalink

सहमत

लवकरात लवकर तो फोटु मिपावरून हालवा ही विनंती. होतय काय की प्रत्तेकवेळी मिपा उघडले की ते ताट समोर येतय आणि पोटात खड्डा पडतोय आणि तोंडाला पाणी सुटतय....आगदी दम धरवेना झालाय.... आमच्यावर दया दाखवा आणि तो फोटु हालवा. सहमत =P~
  • Log in or register to post comments

Submitted by धोंडोपंत on Fri, 05/02/2008 - 18:13

Permalink

प्राजुताई

प्राजुताई, आपण (म्हणजे तुम्ही) केलेल्या गुन्ह्याचे प्रायश्चित्त एकच. सर्वाना जेवायला घालणे. जो पर्यंत तुम्ही हे करीत नाही तो पर्यंत आमचा राग कायम राहिल. आपला, (भुकेला) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments

Submitted by देवदत्त on Fri, 05/02/2008 - 21:43

Permalink

तांबडा

तांबडा रस्सा/पांढरा रस्सा नेमका काय फरक मला माहीत नाही. पण कोंबडीची सुकी भाजी बघून =P~ =P~ =P~ =P~ =P~ =P~ सोबत लाल टोमॅटो....लिंबू..=P~ =P~ =P~ =P~ =P~ म्हणजेच...आम्ही [( [( [( [( [( [(
  • Log in or register to post comments

Submitted by वरदा on Fri, 05/02/2008 - 22:29

Permalink

अहो डांबिसकाका

सुगरण नसणार्‍या कायस्थ मुली देव जन्मालाच घालत नाही! हो ना? मग काकू करतात ना नेहेमी असं मस्त जेवण... मग हे कशाला? तात्या, तू केलेल्या प्राजुच्या धिक्कारात आम्ही पूर्ण अंतःकरणाने (आणि उपाशी पोटाने) सामील!!! काकुंना सांगू का???? :-C
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Sat, 05/03/2008 - 03:50

In reply to अहो डांबिसकाका by वरदा

Permalink

चीटींग!!!

ए चप ए!! तू चीटींग करतेयस!! क्रॉस-थ्रेड रेफरन्स नाही करायचा!!:)
  • Log in or register to post comments

Submitted by वरदा on Sat, 05/03/2008 - 03:18

Permalink

ए मीनल खरं गं

भारतात जाऊन ही पटवर्धन ,कोंबडीच सुक खायला शिकली की काय? :O
  • Log in or register to post comments

Submitted by अभिता on Sat, 05/03/2008 - 04:38

Permalink

ते ताट खुप

ते ताट खुप सुदंर दिसते. पण ........ त्यात कोलंबीचे लोणचे असते तर खुप मझा आला असता. व परीपूर्ण आहार मिळाला असता(डोळ्यांना)
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Sat, 05/03/2008 - 09:56

Permalink

तात्यांशी सहमत ...

>>आणि पहा ते ताट सुधा कसं लावलंय - तांबडा आणि पांढरा असे दोन डोळे वटारुन बघताहेत आणि चपाती तोंड वेडावून दाखवते आहे असेच वाटतंय! शेजारचं कोंबडीचं सुकं खिजवतंय आणि भरीत भर म्हणून लिंबूही कापून ठेवलंय! हा ना राव, असली चित्र आणि वर्णनं देउन आमचा असा उघड छळवाद मांडण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही. एकतर मला चुकवून पुण्यात कट्ट्यावर कट्टे घेताय आणि आता ते कमी म्ह्णून वर अजून हे. तोंडच पाणी आटलं आता असलीचित्र पाहून नाहीतर इथ आमच्या नशिबी "सकाळी राईस आणि रस्सम, दुपारी रस्सम आणि राईस आणि रात्री जेवणाला राईसमध्ये मिसळून रस्सम" ... >>तिने पुन्हा असा न्यारा बेत करून आम्हा मिपाकरांना तिच्या कोल्हापुरच्या घरी (माहेरी) जेवायला बोलवावं, अशी शिक्षा सुनावतो... कुबूल है, कुबूल है, कुबूल है !!! तात्या तुम्ही आता तिच्यावर कुठल्यातरी ऍक्टान्वये एक नॉन बेलेबर वॉरंट बजवा .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com