गाभा:
नमस्कार,
नव्या बांधणीत मिसळपाववर अनेक जागी इंग्रजी शब्द किंवा वाक्ये दिसत आहेत. ते ताबडतोब मराठी करण्यासाठी ज्यांची इच्छा असेल त्यांनी येथे त्या त्या इंग्रजी शब्द किंवा वाक्यांसाठी प्रतिशब्द किंवा वाक्य सूचवावे.
असे करते वेळी मूळ शब्द किंवा वाक्य येथे देऊन त्यासमोर मराठी शब्द किंवा वाक्य द्यावे.
यामुळे एखाद्या शब्दास प्रतिशब्द कुठला असावा या विषयावर चर्चा होऊ शकते मात्र मूळ काम सोडून अवांतर चर्चा टाळाव्यात.
मुक्तस्त्रोत विश्वात अश्या प्रकारे अनेक भाषांतर प्रकल्प चालत असतात. याप्रयत्नामुळे आपल्याला त्याची ओळख होईल. याशिवाय काही कल्पना असतील तर स्वागतच आहे.
चला तर मग मिसळपावच्या मराठीकरणात सहभागी होऊया.
- सरपंच
प्रतिक्रिया
27 Jul 2010 - 9:04 am | जृंभणश्वान
स्वगृह » माझे खाते >>संपादन
या विभागात चुकुन Account टॅब राहिला आहे, तिथे खाते हवे.
मंगळ, 27/07/2010 - 08:48
सध्या 17 सदस्य आणि 44 पाहुणे आलेले आहेत.
सगळे आकडे देवनागरी लिपीतले करत येतील का?
27 Jul 2010 - 9:20 am | मी_ओंकार
सर्च इंग्रजीमध्ये दिसत आहे. .
27 Jul 2010 - 10:42 am | चिरोटा
सर्च साटी एक शब्द लिहिला आणि सर्च बटन दाबले.खालील मेसेज दिसला.
तुमच्या शोधातून काहीच निष्पन्न झाले नाही.
काहीच निष्पन्न झाले नाही पेक्षा काही सापडले नाही योग्य वाटते.वरील इंग्रजी मेसेज पण मराठीत द्यावा.
27 Jul 2010 - 11:03 am | विसोबा खेचर
मिपाचं नवीन स्वरूप छान आहे रे नीलकांता..
तुझ्या सा-या टीमचं अभिनंदन.. छान सांभाळलं आहे मिपा तुम्ही लोकांनी..
तात्या.
27 Jul 2010 - 11:48 am | वाहीदा
जो पर्यंत मिसळपाव चा लोगो 'मिसळ अन पाव' च दिसत नाही तोवर हे मराठमोळे मिसळपाव वाटत नाही. कुठे तरी ते लोगो दिसायला हवे .
कृपया मिसळ पावचा फोटो टाकावा
~ वाहीदा
27 Jul 2010 - 12:07 pm | वाहीदा
या आधी प्रत्येक लेखा खाली वाचनखुण साठवण्यासाठी एक लिंक असायची आता ती तशी दिसत नाही फक्त मुद्रणसुलभ आवृत्ती चा पर्याय दिसतो आहे. प्रत्येक लेखाखाली आधी सारखा वाचनखुण साठवण्यासाठीचा पर्याय हि द्यावा.
~ वाहीदा
27 Jul 2010 - 12:27 pm | स्वतन्त्र
तसा असंही चालेल पण विषय काढलाच आहे तर ...मिसळ पाववर आकडे मराठीत होतील का ?
27 Jul 2010 - 12:40 pm | शानबा५१२
हे काही बदल सुचवतो.
you have a new message.
नवीन व्ययक्तीक निरोप आहे.
Save
प्रकाशित करा.
Submitted by
लेखक
Submitted by शानबा५१२ on मंगळ, 27/07/2010 - 11:03.
लेखक शानबा५१२ दी. मंगळ,२७/०७/२०१० - ११:०३
0 Comments
० प्रतिक्रीया
आणि प्लीझ कमीत कमी पहील्याचे रंग तरी परत आणा!!
27 Jul 2010 - 2:11 pm | Dhananjay Borgaonkar
हजर सभासद मधे सर्व सभासद नाही दिसत. फक्त पहिल्या पानावर जेवढे आहेत तेवढेच दिसतात.
आधि हजर सभासद या शब्दावरच दुवा होता. आता नाहीये.
27 Jul 2010 - 3:07 pm | इनोबा म्हणे
डिझाईनसंदर्भातील सर्व प्रतिसाद कृपया नवनिर्माण सूचना या धाग्यात द्याव्यात अशी विनंती.
27 Jul 2010 - 4:51 pm | Dhananjay Borgaonkar
ओके इनोबा.
27 Jul 2010 - 5:18 pm | बहुगुणी
"Submitted by 'अबक' on वार, ......"
याच्या ऐवजी:
अबक यांनी ---वारी----वाजता खालील प्रतिसाद दिला:
असे करता येईल. आकडे साहजिकच मराठीत असावेत.
27 Jul 2010 - 5:29 pm | बहुगुणी
"© 2010 Misalpav.com, All rights reserved. Disclaimer | Privacy policy"
याचं रूपांतर असं करता येऊ शकेल -
"कॉपीराईट २०१० मिसळपाव डॉट कॉम.
सर्व हक्क अबाधित.
*मर्यादित आधिकार आणि जबाबदारी.
माहितीची गुप्तता"
*"Disclaimer = Any statement intended to specify or delimit the scope of rights and obligations" अशा अर्थाने
27 Jul 2010 - 6:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
"The requested page could not be found. "
याचं भाषांतरः
"आपल्याला हवे असलेले पान सापडले नाही"
असं करता येईल.
"Input format" चं मराठी भाषांतर जमेल का?
27 Jul 2010 - 6:09 pm | क्रेमर
कौल या सदराचे वर्णन सध्या इंग्रजीत आहे. ते मराठीत करता येईल.
A poll is a question with a set of possible responses. A poll, once created, automatically provides a simple running count of the number of votes received for each response.
देवासमोर कौल लाऊन निर्णय घेण्याची परंपरा महाराष्ट्रात असल्याचे मराठी चित्रपट पाहतांना लक्षात येते. आजकालच्या समाजात मात्र लोकांचा कल पाहण्यासाठी जनताजनार्दनासमोर कौल लावला जातो. संकेतस्थळ हे तात्कालीन समाजाचे प्रतिबिंबच असल्याने सदस्य येथे कौल लाऊ शकतात. कौलात शक्य उत्तरांचे पर्याय दिलेले असतात. कौल लावल्यानंतर प्रत्येक पर्यायाला पडलेली मते आपोआपच मोजली जातात व पाहता येतात.
27 Jul 2010 - 11:14 pm | Nile
कौलात डिस्क्लेमर म्हणुन, "वायफळ कौल सुरु केल्यास देवाचा कोप होउ शकतो" असे टाकता येईल काय हो मास्तर? ;)
27 Jul 2010 - 11:20 pm | प्रभो
देव पावला रे बाबा.....नायल्याचं चक्क चक्क देवावर विश्वास ठेवणारं वाक्य पाहून ... ;)
27 Jul 2010 - 11:23 pm | Nile
गल्लत होते आहे काय?? सविस्तर प्रतिसाद (डान्या आल्या)नंतर(त्याच्या कडून टायपुन घेउन) देईन.
28 Jul 2010 - 1:04 am | मेघवेडा
मान्य करू नका तुम्ही टाळकं फुटलं तरी! ;)
28 Jul 2010 - 1:12 am | Nile
जाउद्या हो, उगाच कशाला तुमचं टाळकं फोडुन फोडताय? बाकी तो डान्या आला नाहीतर उगाच्या उगाच आम्हाला प्रतिसाद टंकावा लागायचा. तुम्हाला मात्र नीट समजुन घ्यायचं असेल तर श्रामोगुर्जींना खरडा. ;-)
28 Jul 2010 - 3:17 am | केशवसुमार
सदस्य कालावधी
2 years 44 आठवडे
२ वर्षे ४४ आठवडे
Send this user a message
ह्या सदस्याला संदेश / पत्र/ निरोप/ व्यक्तीगत निरोप/ व्यनि पाठवा
28 Jul 2010 - 6:02 pm | वाहीदा
मिपाच्या नविन साईटवर मला आलेले पण मी न वाचलेले ३व्यनी संदेश दिसत नाही :-(
बाई ग , वाचायचे पण राहीले अन प्रतिसाद ही दिला नाही :-( ... कृपया तो माझ्या संदेश (जुने पोस्टहापीसात) वहीत टाकाल का ?
आता मी काय करु ??
28 Jul 2010 - 7:18 pm | पाषाणभेद
जुन्या लिंक जसे http://www.misalpav.com/tracker/2692 अन बुकमार्क का दिसत नाही. या गोष्टी तर उपयोगाच्या होत्या की मालक.
29 Jul 2010 - 5:28 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
व्यावसायिक माहिती मराठीत लिहीता येत नाहीये ...
(हा प्रतिसाद इथे द्यायचा का दुसर्या धाग्यावर?)