कोणत्या शब्दात दम त्याला भरू ?

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
19 Jul 2010 - 9:28 pm

आमची प्रेरणा पुन्हा एकदा चित्त यांची अप्रतिम गझल कोणत्या चिमटीत मी त्याला धरू आणि काही खरडवह्या ;;)

कोणत्या शब्दात दम त्याला भरू ?
माजले जालात जे फुलपाखरू

तू अता बघशील वाताहत खरी
लागले पाध्ये जसे हे अवतरू

पंचही तेव्हाच खाते कापतो
लागले उधळायला जर शिंगरू

पटवती सार्‍या पुरातन ओळखी
बघ पुन्हा आले जुने माथेफिरू !

फुरफुराया लागले धागे किती !
लागले कंपू पुन्हा कल्ला करू

आठवू इतके कसे मी आयडी ?
आठवू कोणास, कोणा विस्मरू ?

---------कलम १ -----------------

खूप नक्षीदार आहे लेख हा
एकमेकांना चला वाव्वा करू

आपल्या दोघांमधे कोणी नको
ये खरड टाकू जरा व्यनी करू

हा मला पाध्ये किती छळातो इथे
सांग मी आता कशा काड्या करू ?

काव्य, चर्चा, कौल, धागे, वा फिफा
(हे करू की ते करू की ते करू)

--------------------------------------------------------------------------------

१. मराठी संकेतस्थळांवर प्रतिसादकाला एखादा धागा भरकटवायचा असेल (एक किंवा त्यापेक्षा जास्त ) तर तेव्हा त्या धाग्यावर किंवा मध्ये किंवा दोन प्रतिसादांच्या मधल्या मोकळ्या जागेत तिथे +१ हे चिन्ह ठेवून खाली निर्धास्तपणे गप्पा चालू कराव्यात, असा प्रतिसादक निर्देश करतो. मराठी विडंबनात ही पद्धत राबवायची असल्यास मला कलम हा शब्द किंवा क हे अक्षर मला प्रस्तुत वाटते. कलम ह्या शब्दाचा एक अर्थ तुकडा करणे किंवा पाडणे. आणि दुसरा अर्थ ग्राफ्टिंग असाही आहे. (ह्याबाबतीत मार्गदर्शन केल्याबद्दल मी उर्दू-फारशीचे माझे जाणकार मित्र चित्त ह्यांचा अत्यंत आभारी आहे. )

विडंबन

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

20 Jul 2010 - 1:23 am | लिखाळ

चला , सुचवल्या प्रमाणे वाव्वा करतो :) नक्षिदार पाकृ !!

मजेदार विडंबन.. फुलपाखरू आणि फुरफुरणारे धागे मस्तच !
-- लिखाळ.
देवाने विचारले अक्कल हवी की टू-व्हिलर? अनेक पुणेकरांनी टू-व्हिलरची निवड केली.

पंगा's picture

20 Jul 2010 - 1:25 am | पंगा

यावरून ब्रेश्टने (तोच तो, भाईकाकांनी अनुवादित केलेल्या "तीन पैशाच्या तमाशा"चा मूळ लेखक) पूर्व जर्मनीतील १७ जून १९५३च्या उठावासंदर्भात केलेल्या कवितेची (पुन्हा एकदा) आठवण आली.

ती कविता पुढीलप्रमाणे:

The Solution

After the uprising of the 17th of June
The Secretary of the Writers Union
Had leaflets distributed in the Stalinallee
Stating that the people
Had forfeited the confidence of the government
And could win it back only
By redoubled efforts. Would it not be easier
In that case for the government
To dissolve the people
And elect another?

बाकी विडंबन नेहमीप्रमणेच.

- पंडित गागाभट्ट.

रेवती's picture

20 Jul 2010 - 1:27 am | रेवती

हम्म!
काहीजण फुरफुरतायत खरे!
मनातलं लिहिलय!

रेवती

प्रियाली's picture

20 Jul 2010 - 1:47 am | प्रियाली

केसुंच्या विडंबनाबद्दल काय बोलावे...अर्रर्र लिहावे ते नेहमीप्रमाणेच उत्तम असते पण आता सर्वांनी खरडवह्या, जाल, जालकंटक, पाध्ये, कंपू यांच्यापासून टाईम प्लीज घेऊ आणि पुढे सरकू. कसें? ;)

आपली,
(साळसूद) प्रियाली

आता असा साळसूदपणा दाखवून विडंबनकाराचे पोट कसे भरायचे असा प्रश्न नका विचारू. उत्तर नाहीये. :(

चतुरंग's picture

20 Jul 2010 - 8:22 am | चतुरंग
सहज's picture

20 Jul 2010 - 8:37 am | सहज

सहजासहजी समजणार्‍या साध्या आणि सरळ विडंबनात कोणी वाकड्यात शिरायचे ठरवले तर त्याला आम्ही काय करणार..

:-)

------------------------------------------------
चला नेमका कुठला पाध्ये किती फुरफुरतोय हे मिपाकरांना कळले की बास! ;-)

केशवसुमार's picture

20 Jul 2010 - 8:46 am | केशवसुमार

पुन्हा रोचक!!
फटके पडले एकीकडे आणि वळ उठले दुसरी कडे.. रोचक!! :D

------------------------------------------------
चला नेमका कुठ कुणाला किती फुरफुरतोय हे मिपाकरांना कळले की बास! ;)

सहज's picture

20 Jul 2010 - 8:49 am | सहज

कुठ कुणाला ??

---------------------------------------
चला पाध्ये फटके मारत सुटला इतकी तरी कबुली देतोय. वळ सच्च्या मिपाकराच्या उठणारच, वळ न उठणारा हलकट नमोगती!

अवलिया's picture

20 Jul 2010 - 11:45 am | अवलिया

>>>कोणत्या शब्दात दम त्याला भरू ?

कै च्या कै च ..
पाध्येंना शब्दाने दम भरण्याची गरज कधीपासुन पडली ? कृतीने काही साध्य होत नाही असे कळाले की काय?

--अवलिया
आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)