किर्र किर्र रातकिड्यांचा आवाज चालु होता. गेल्या दोन दिवसांपासुन पावसाचा जोर कमी झाला म्हणुन पर्णकुटीच्या बाहेरच गवताची शय्या केली होती. तिच्यावर पडल्या पडल्या आभाळात नजर टाकता टाकता कधी डोळा लागला ते कळलंच नाही. गार हवेने आता जाग आली. मधुनच दोन चार चुकार ढग हळुच चालले आहेत. पुर्वेकडे चंद्रकोर दिसत आहे म्हणजे पहाट व्हायला आली असावी. कृष्ण पक्ष चालु आहे. बोलता बोलता चार महीने झाले ह्या पर्णकुटीत राहुन. येवढा पावसाळा संपला की आपण कामाला लागु हे आश्वासन मिळाले अन त्या आश्वासनावर मनातले दुःख कसं बसं सावरुन धरलं आहे.
पण असं तर नाही ना की माझे काम तो विसरुन गेला असेल? अनेक दिवसांच्या रानावनातल्या खडतर आयुष्यानंतर मिळालेले विलासी सुख त्याला कर्तव्याचा विसर तर देत नसेल? राजकारणातला एक मोहरा म्हणुन मला पुढे करुन कार्यभाग साधुन मला दुर्लक्षाने अपमानित तर करत नसेल? काळ सर्व दुःखांवर औषध आहे, हे जाणुन मुद्दाम कालक्रमणा होउ देउन माझ्याचकडुन जाउ दे आता असे तर त्याला ऐकायचे नसेल?
खरोखर अनोळखी प्रदेशात अनाहुतासारखा असलेला मी एकटा काही करु शकत नाही. पण त्याला मदत तर मी एकट्यानेच केली. कोण होते मदतीला ? मीच मदत केली. मग हे काम मी एकटा का नाही करु शकत. फक्त कोणत्या दिशेला जायचे ते समजले पाहिजे. एकदा ती दिशा समजली की मी नक्की एकटाच सर्व काम करेल? पण सर्व पृथ्वी तर मी एकटा शोधुन काढु शकत नाही.
विचारांच्या आवर्तात सापडलं की वेळ कसा निघुन जातो ते समजतच नाही. आज काही करुन निर्णय घेवुन टाकु. तो मदत करत असेल तर ठिक नाहीतर आपण पुढे चालायला लागायचं.
असा विचार करुन रामाने पलिकडे शांत झोपलेल्या लक्ष्मणाकडे एक नजर टाकली. हलकेच उठुन धनुष्य उचलले. पुन्हा एकदा प्रत्यंचा ढिली करुन ताणली. सरळ रेषेत धनुष्य धरुन दोरी खांद्यापर्यंत ओढुन एक बाण दरीच्या दिशेने सोडला. सपकन झालेल्या आवाजाने लक्ष्मण जागा होवुन पाहु लागला. जवळ जाउन रामाने बाण सोडलेल्या दिशेने पहायला लागला.
रामाचा चेहरा संतापाने फुलला होता. कपाळावरची शीर ताड ताड उडत होती. दरीमधे असलेल्या सुग्रीवाच्या निवासस्थानाकडे पाहुन राम म्हणाला..लक्ष्मणा ! जा !! त्या सुग्रीवाला विचार... तुला कर्तव्याचा विसर तर पडला नाही? सुंदर ललनांच्या बाहुपाशामधे गर्क होवुन मित्रांना विसरुन तर गेला नाही? कि राज्यपद मिळाल्यावर मित्रद्रोहाचे पातक कसेही धुवुन काढता येईल असे तर तुला वाटत नाही? विसरु नकोस ज्याच्या भयाने तु रानावनात फिरत होतास तो वाली या रामाच्या एका बाणाने मेला ! जा लक्ष्मणा सांग...सांग त्या सुग्रीवाला... वाली ज्या मार्गाने गेला तो मार्ग अजुनही बंद झालेला नाही... ! आणि पुन्हा एकदा रामाने धनुष्याचा टणत्कार केला.
खुलासा - पावसाळा संपल्यावर सीताशोध घेउ असे सुग्रीवाने वालीला मारल्यावर रामाला आश्वासन दिले होते. पावसाळा संपला पण अजुन सुग्रीवाकडुन काही हालचाल नाही हे पाहुन राम बेचैन होउन लक्ष्मणाला सुग्रीवाकडे पाठवतो असा प्रसंग आहे. तेवढेच फक्त कथेत घेतले आहे. मुद्दाम मागचा पुढचा संदर्भ दिला नाही, म्हटले बघु.. कसे जमते आहे ते. काही जणांनी आंतरजालाशी संदर्भ लावला. काही जणांनी अजुन कशाशी लावला, ते व्यनीतुन कळवले. असो. धन्यवाद.
प्रतिक्रिया
19 Jul 2010 - 2:05 pm | भाऊ पाटील
टणत्कार छानच!
पण बाण (जिकडे लागायचा होता तिकडे )लागला की नाही ?
19 Jul 2010 - 2:05 pm | सहज
वा! अनवट व अभ्यासपूर्ण लेख
वाली गेल्यानंतर किती दिवसांनी सुग्रीवाच्या सैन्यासह राम लंकेच्या दिशेने निघाला?
19 Jul 2010 - 2:13 pm | llपुण्याचे पेशवेll
राम, लक्ष्मण, सुग्रीव, हनुमान चौकडी झाली.
पुण्याचे पेशवे
हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.
19 Jul 2010 - 3:04 pm | विनायक प्रभू
=))
19 Jul 2010 - 3:06 pm | शेखर
छान कथा .. पण कलीयुगात सुग्रीवाने रामाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या असत्या...
19 Jul 2010 - 3:24 pm | आंबोळी
वाटाण्याच्या अक्षता लावल्या असत्या
"फाट्यावर मारले असते " असे म्हणायचय का तुम्हाला?
असो.
बाकी उडण्यालायक विचार न उडण्यालायकरित्या मांडणार्या नान्याचा विजय असो.
आंबोळी
19 Jul 2010 - 11:53 pm | भडकमकर मास्तर
बाकी उडण्यालायक विचार न उडण्यालायकरित्या मांडणार्या नान्याचा विजय असो.
सहमत
19 Jul 2010 - 3:24 pm | गणपा
आवडेश.
व्यर्थ इथेले तिथेले संदर्भ शोधायच्या भानगडीत पडलो नाही.
.
19 Jul 2010 - 4:00 pm | बिपिन कार्यकर्ते
शैली छान.
बाकी, नाना, आपल्या बोलण्याप्रमाणे तुमच्या प्रकल्पाला शुभेच्छा. या मालेतील पुढचे लेखन येऊ दे लवकरात लवकर.
बिपिन कार्यकर्ते
19 Jul 2010 - 8:45 pm | प्रभो
नानास्टाईल लेखन.. आवडलं..
19 Jul 2010 - 8:53 pm | ब्रिटिश
नाना लै भारी रं
मिथुन काशिनाथ भोईर
अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ
19 Jul 2010 - 10:37 pm | Pain
तो वाली या रामाच्या एका बाणाने मेला
दूरवर झाडीत लपून, दुसर्याशी लढत असणार्याच्या पाठीवर बाण मारला तर कोणीही मर्त्य माणूस मरेल. हे शूरवीरासारखे नसून भाडोत्री मारेकर्यासारखे आहे. स्वतः अमर असतानाही देवाने असा नामर्दपणा का करावा ?
19 Jul 2010 - 11:03 pm | श्रावण मोडक
ओह्ह... असं आहे होय. राम असा होता तर...!!!
20 Jul 2010 - 4:34 am | अर्धवटराव
पण प्रश्न तर जश्याचा तसाच आहे... श्रीरामाने असे का केले ??
(श्रीरामभक्ति इच्छुक) अर्धवटराव
-रेडि टु थिंक
20 Jul 2010 - 7:42 am | Manoj Katwe
माझा ज्ञान ह्या बाबतीत थोड कमी असेल, पण
बालीला एक वरदान होते कि युद्धात प्रतीस्पर्द्याचे अर्धे बळ बालीत येईल.
तेव्हा समोरासमोर बालीला मारणे हे रामाला अशक्यच असेल कारण,
राम कितीहि बलवान असला तरी त्याचे अर्धे बळ हे जर का बालीला मिळाले तर बालीच श्रेष्ट ठरणार
म्हणून रामाला लपून-छ्पुन त्याला मारावे लागले (असेल).
20 Jul 2010 - 7:51 am | शिल्पा ब
वर, शाप हे psychological factors अथवा पुराणातली वानगी प्रकार असावेत...कारण कोणी काही म्हंटल्याप्रमाणे होत नसते...आणि दुसर्याचे शारीरिक बळ असे कसे कोणाला मिळणार?
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
20 Jul 2010 - 8:37 am | अर्धवटराव
मी पण असेच ऐकुन्/वाचुन आहे. आणि हेच कारण असेल तर श्रीरामाला अन्य पर्याय नव्ह्ता. हे शक्ती ट्रांसफर प्रकरण मला अशक्य नाहि वाटत
(अंधश्रद्धाळू) अर्धवटराव
-रेडि टु थिंक
20 Jul 2010 - 9:58 am | विजुभाऊ
बालीला एक वरदान होते कि युद्धात प्रतीस्पर्द्याचे अर्धे बळ बालीत येईल.
बाली नाही हो वाली.... हिन्दी लोक्काना व म्हणता येत नाही म्हणून ते व चा ब करतात. ( वाई या गावाचे नाव बाई असे उच्चारतात)
रामाचे वालीशी काहीच वैर नव्हते. वालीने काहीच अपराध केला नव्हता. तरिही रामाने त्याने लपून छपून वालीला मारले.
अंथरूण पाहून ३.१४१५९२६५३५८९७९३२३८४६२६४३३८३२७९५०२८८४१९७१६९३९९३७५१० पसरण्यापेक्षा अंथरूण घेतानाच नीट पाहून घ्यावे

20 Jul 2010 - 12:02 pm | परिकथेतील राजकुमार
वालीला वरदान वगैरे काही न्हवते.
वालीचा परम मित्र होता देवराज इंद्र. ह्या इंद्राचा वालीवर फार जीव, त्यामुळे त्याने वालीला एक कंठा भेट दिला होता. जो कोणी हा कंठा धारण करुन युद्धात उतरेल त्याच्या शत्रुचे बळ ह्या कंठ्यासमोर येताच निम्मे होत असे. (ते वालीला मिळत नसे) ह्याच प्रकारे कंठ्याच्या आशिर्वादाने वालीने रावणाला देखील पराभूत केले होते.
बाकी वाली हत्येविषयी मी मिपावर इथे लिहिलेले होतेच.
नाना लेखन अप्रतिम. तुझ्या सुंदर आणि कसदार लेखानाची मेजवानी पुन्हा चालु झालेली बघुन आनंद झाला.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
20 Jul 2010 - 3:01 am | हर्षद आनंदी
....
दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||
20 Jul 2010 - 12:50 am | शिल्पा ब
छान लिहिलंय...बाकि पेनाशी सहमत.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
20 Jul 2010 - 7:44 am | Manoj Katwe
रविवार सकाळची ९-९:३० ची वेळ, आमच्या दोघांना बाहेर फिरायला जायचे होते.
माझे आवरून तयार होते, पण सौ. चे काय आवरायचे संपेना.
जणू काही संपुर्ण दिवस आरश्यासमोरच घालवायचा आहे जणू ,
अर्धा तासानंतर माझा धीर संपला, मी त्या आरश्याकडे बघून म्हणालो कि
ह्या आरश्याचा शोध कोणी आणि का लावला काय माहित, नसता लावला तर बरे झाले असते.
सौ : आरशाचा शोध लागण्या अगोदर सुद्धा बायका पाण्यात पाहून मेकअप करायच्या (माझ्या अ/ज्ञानात थोडी भर)
मी : नाहीतरी बायका सदानकदा सर्वांनाच पाण्यात पाहत असतात.त्यात काय नवल.
(झालं......... टणत्कार सुरु)
सौ : £$%£*((£*&%&$££$£"!£^%*&^*(&()(%^$^&$
लाज नाही वाटत
"%$£%$£%$£^%$&%^(&)(&*)*&)&]
मीच मूर्ख, तुमच्याशी लग्न केलं.
"^^$&^*(%*^£%^"%$"%£$&*%*)^*(%^*£%^"^£*%
तुमचे नातेवाईक तेवढे साजूक, मीच वाईट
£$^"^£^*%*)&^&*(%*$&£$^"^£*^%(*)(&)^&)*%^($^*$*^$
तुम्हाला कधीतरी काय चांगला बोलता येत का ?
^&$^(*^)&()&()&(&(*)^&%^*$%&£$"%$!"%£"$^"$"
£"£$"$£"$"$"$£"$£%$£&$*$%&(^)()^(%*£%&"%!%"&$(^
%"$"£*^%^)^(&%$*£$"%&£*%)^()
(रविवारी सकाळ-सकाळी ) त्यानंतर मला जे ऐकू येत होते ते हे खरे टणत्कार
---------------------------------------------------------
प्रतिसाद अवांतर वाटल्यास उडवला तरी चालेल
20 Jul 2010 - 1:32 pm | llपुण्याचे पेशवेll
=)) =)) =)) =))
हा हा हा. टणत्कार..
पुण्याचे पेशवे
हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.
20 Jul 2010 - 2:09 pm | अवलिया
भारी टणत्कार !!!
:)
--अवलिया
आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)
20 Jul 2010 - 7:24 am | छोटा डॉन
छ्या, हा नान्या लै ताकदवान लिहतो बॉ.
एक नंबर लेखन, एखाद्या गाजलेल्या नाटकाची संहिता वाटावी इतके ताकदवान आणि लयीत असलेले.
असेच अजुन येऊदेत ...
------
( सुग्रीव ;) )छोटा डॉन
20 Jul 2010 - 10:04 am | वेताळ
डायरे़क्ट रामायण च लिव्हायला घेतले.
वेताळ
20 Jul 2010 - 12:04 pm | ऋषिकेश
अथ श्री नानारामायण कथा! ;)
अजूनयेऊ दे
ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा
20 Jul 2010 - 3:45 pm | विनायक प्रभू
नान्याला असे खुलासे द्यायला लागावेत अं?
20 Jul 2010 - 4:13 pm | विजुभाऊ
नान्याला असे खुलासे द्यायला लागावेत अं?
"अं " चा उच्चार पुलंच्या अपूर्वाई नन्तर बरेच वर्षानन्तर वाचण्यात आला.
अंथरूण पाहून ३.१४१५९२६५३५८९७९३२३८४६२६४३३८३२७९५०२८८४१९७१६९३९९३७५१० पसरण्यापेक्षा अंथरूण घेतानाच नीट पाहून घ्यावे

21 Jul 2010 - 8:10 pm | राजेश घासकडवी
व छोटेखानी, टणत्काराप्रमाणेच. विस्तृत रामायण कथा येऊ द्यात.