अभ्यंकरशेठना शेवटी कुठला रस्ता मिळाला हे बघायला गेलो आणि आम्ही भलत्याच रस्त्याला लागलो..आज तुम्ही तोंड का हे झाकले?काय म्हणता शेण आहे फासले!ती कधी आली न येथे एकटीसोबतीला तात, बंधू आणले मी कशाला सांग बोंबलतो असा?या बघाया मज कशाने तिंबलेलग्न कर वेळी अवेळी सांगते(काय मजला वेड आहे लागले?)मी तसा होतो सुखी बघ एकटायेव्हढे पण सुख मला ना लाभले!या पसार्याचे करावे काय मी ?कोपरे सारे घराचे संपले काय हा रस्ता तरी तू शोधला'मोर' रस्त्याच्या कडेला भेटलेशेवटी ते "केशवा"गत वागलेशेवटी त्यांनी विडंबन पाडले!सांग तू "केश्या" मला हे एकदातोंड उठल्यावर कुणाचे पाहिले? केशवसुमार
प्रतिक्रिया
29 Apr 2008 - 2:27 pm | विजुभाऊ
काय हा रस्ता तरी तू शोधला
'मोर' रस्त्याच्या कडेला भेटले.
मोर म्हणजे तेच ना सेन्ट्रल रेल्वे च्या कडेने छत्र्या घेउन बसलेले असतात ते. :)
ती लिन्क ओपन होत नाही. पान सापडले नाही असे उत्तर येतेय. बघा ना ओरिजनल कविता पण वाचावीशी वाटली
29 Apr 2008 - 3:05 pm | विसुनाना
विडंबन मस्तच!
(तसे तर मूळ रस्ताही चांगलाच होता.)
वा!वा! केसुभाऊ, हे आपलं बरं आहे.
स्किझोफ्रनिया का काय, तो हाच वाटतं! ;):)
29 Apr 2008 - 3:31 pm | धोंडोपंत
=)) =)) =))
आपला,
(मुद्रांकित) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
29 Apr 2008 - 5:09 pm | चतुरंग
चतुरंग
29 Apr 2008 - 5:25 pm | सहज
पण हे विडंबन पाडता यावे म्हणुन तर मुळ रचना केली गेली नव्हती ना? :-)
चतुरंग यांनी देखील चांगले विडंबन केले आहे मुळ रचनेचे.
29 Apr 2008 - 6:40 pm | मदनबाण
ती कधी आली न येथे एकटी
सोबतीला तात, बंधू आणले
:))
(नाक्यावरचा टपोरी)
मदनबाण
30 Apr 2008 - 9:35 am | विसोबा खेचर
शेवटी ते "केशवा"गत वागले
शेवटी त्यांनी विडंबन पाडले!
सांग तू "केश्या" मला हे एकदा
तोंड उठल्यावर कुणाचे पाहिले?
मस्त! :)