काही राहीलेले

पंचम's picture
पंचम in जे न देखे रवी...
12 Jul 2010 - 7:50 pm

काही राहीलेले....span>

ते सर्व राहीले मागे
जे काट्यात उमलले होते...
फक्त पाकळ्या हातात
गंध श्वासात राहीले होते...

मी शोधल्यात ज्या मातीत
काही ओळखीच्या पाऊलखुणा
त्या मातीत जणू आता
आभास राहीले होते.....

मी सावरू न शकलो
तू निघून गेल्यावर...
त्या सावलीच्या मागे
काही आघात राहीले होते......

बरेच काही सांगायचे होते
तुला निघुन जाण्याआधी
कविता पुर्ण झाली.
तरी शब्द राहिले होते

;">-पंचम

कविता

प्रतिक्रिया

शानबा५१२'s picture

12 Jul 2010 - 7:54 pm | शानबा५१२

मी शोधल्यात ज्या मातीत
काही ओळखीच्या पाऊलखुणा
त्या मातीत जणू आता
आभास राहीले होते.....

अव्वल!! O:)

_________________________________________________
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे

सागर's picture

12 Jul 2010 - 8:09 pm | सागर

सुंदर कविता

मी सावरू न शकलो
तू निघून गेल्यावर...
त्या सावलीच्या मागे
काही आघात राहीले होते......

जिंकलस... तोडलंस... अजून काय बोलू?
याला म्हणतात कविता
सरळ काळजावर वार... :)
अप्रतिम...
चाहता झालो तुमचा मी आज या ओळींमुळे

(अर्धवट कवी) सागर

स्पंदना's picture

12 Jul 2010 - 8:16 pm | स्पंदना

आज काय मुहुर्त आहे जरा कोणी बघेल का?

कित्ती सुन्दर सुन्दर रचना अन एकाच दिवशी...

'सागर' यांचा प्रतिसाद तर अप्रतिम.

अन असा प्रतिसाद घेणारी कविता तर त्या हुन अप्रतिम!!

जियो भाई! जियो!!

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते

निरन्जन वहालेकर's picture

13 Jul 2010 - 9:07 am | निरन्जन वहालेकर

खल्लास ! ! ! Ultimate ! ! !
खरच. सरळ काळजावर वार ! ! !

मनीषा's picture

13 Jul 2010 - 9:03 pm | मनीषा

मी शोधल्यात ज्या मातीत
काही ओळखीच्या पाऊलखुणा
त्या मातीत जणू आता
आभास राहीले होते....

सुंदर ...

कविता आवडली .