आपण रेफरीच्या बाजूने बाबा.. त्याने फायनल मध्ये रेड न देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण खेळाडुच अतिआक्रमक खेळले त्याला तो तरी काय करणार बिचारा.. पण अलोन्सोवाला नक्कीच रेड होता. असो. आता स्पेन आणि हॉलंड मध्ये रम्मीचा सामना आहे! ;)
हो आणि स्पेनचं मनापासून अभिनंदन! दाव्हिद व्हियाला गोल्डन बूट न मिळाल्याचा आनंद सुद्धा आहे! :D
सगळी म्याच संपल्यावर शेवटची शिटी झाल्यावरही डच खेळाडू रेफरीशी का भांडत होते बुवा?
मला वाटलं हा रेफरी बुवा म्याच सम्पल्यावरही काही कार्डं पाकिटांचं वाटप करणार
सर्व स्पॅनिश खेळाडुंचे, स्पेनच्या जनतेचे व आमच्यासरख्या स्पेनसमर्थकांचे हार्दिक अभिनंदन!!
हॉलंडच्या खेळाडूंचेही द्वीतीय क्रमांकाबद्दल अभिनंदन!!
हे अस्मादिकांचे लागोपाठ दुसरे पाठिंबा-जेतेपद असे सांगून जाताजाता भाव खाऊन जातो ;) (गेल्यावेळी इटलीला सपोर्ट केल्यावरही मित्रमंडळींनी वेड्यात काढले होते)
ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा
पहिल्या हाफमधे णेदरलँड्सवाले नुसती मारामारी करत होते. केवढी ती पिवळी कार्ड. पण स्पेन जिंकलं. सही वाटलं. मजा आली. लक्षात राहील असा सोहळा. संपल्याची चुटपुट सुद्धा वाटते आहे.
तिसर्या स्थानासाठी झालेली जर्मनी - उरुग्वे लढत ही 'फुटबॉल' या खेळाच्या नावाला साजेशी होती.
कालची अंतिम लढत मात्र आपण फुटबॉल ऐवजी किकबॉक्सिंगचा नवा प्रकार पहात आहोत काय? (११ विरुद्ध ११) असे वाटण्याजोगी होती. हॉलंडने धुसमुसळा खेळ करून स्पेनच्या नजाकतदार खेळाचा पुरता बोर्या वाजवला.
त्यामुळे मॅच पहायला मजा आली नाही.
असो.
स्पेन जिंकणारच होते. ते कसेबसे जिंकले. इतकेच!
कसेही करुन स्पेनच्या खेळाडूंना जायबंदी करायचे असाच डाव होता की काय कोण जाणे? कोणतीही नजाकत, ड्रिबलिंग, सफाईदार चढाया वगैरेवर भर न देता फक्त धक्काबुक्की आणि कसेही करुन चेंडू काढून घेणे असे सुरु होते. स्पेनला त्यांचा खेळ करुच दिला नाही. कसाबसा एक गोल करुन मॅच संपवली!
(आशियातल्या नजाकतदार हॉकीची जशी धसमुसळ्या युरोपियन खेळाने वाट लावली त्याची आठवण झाली! :()
आम्ही गाजावाजा करणार नाही !
दणादण ढोल वाजवणार नाही !
आमच्या 'उगाच' विरोधकांना खवचट खरडीही टाकणार नाही !
प्रतिसादात स्पेनचे झेंडेही नाचवणार नाही !
फक्त,
फक्त "थँक्स टु स्पेन" एवढेच म्हणतो.
आम्ही जो विश्वास स्पेनवर टाकला होता तो त्यांच्या जिगरबाज टीमने पानीपतात घालवला नाही.
शान राखली फुटबॉलची ...
इतिहास आणि आकडेवरी ही पुन्हा रचण्यासाठीच असते.
स्पेन नक्कीच ह्याला काबिल आहे.
अभिनंदन आणि धन्यवाद स्पेन !!!
अवांतर :
ही केवळ पोच, ह्यानंतर 'स्पेनच विजय' आणि 'थँक यु फुटबॉल' हा फिफा विभागाचा माझ्याकडुन समारोपाचा असलेला लेख थोड्या विश्रांतीने येईल.
कालच्या भयानक जागरणाने व आजच्या अंमळ बिझी स्केज्युलमुळे आज लिहणे जमणार नाही.
तुला धडाधड उडणारे प्रतिसाद आठवले, मला तर 'धडाधड पडणार्या विकेट्स' आठवल्या. असो, गेले ते दिन गेले! ;-)
असो, आमचा दीड युरो फुकट गेला, भडक भगवी टोपी काल 'कामी आली'.
... अगदी मिपावरचा शंभराहून अधिक प्रतिसाद खेचणारा धागा आठवावा असे!
अगदी.
बॉलवर सावरकर आणि गांधी, बेळगाव सीमाप्रश्न, जेम्स लेन असं काहीसं लिहिलेलं असावं असं वाटलं. एखाद्या 'गोल' कडे चर्चा जाण्याऐवजी अवांतर प्रतिसादासारखाच साईडलाईनच्या बाहेर खूप वेळा बॉल जात होता. एकमेकांना पाय घालून पाडणं, बॉलच्या मिषाने एकमेकांना लाथाळ्या करणं हेही. रेफरी मात्र बरंच काम करत होता. खेळाडूंना समुपदेशन करणं, व त्यांनी ऐकलं नाही तर वेळोवेळी पीतपत्रिका दाखवणं - क्वचितप्रसंगी रक्तपत्रिकाही...
त्यामानाने जर्मनी वि उरुग्वे मॅच उपक्रमावरील चर्चेसारखी झाली. लांबलचक पल्लेदार चढाया, लाथा कमी कोपरखळ्या जास्त वगैरे वगैरे...
स्पेन चे अभिनंदन =D>
पण मज्जा नव्हती कालच्या सामन्यात. स्कोअरलाइन पुन्ह एकदा १-० #:S
त्यापे़क्षा जर्मनी-ऊरूग्वे लढत रंगतदार होती.
आपण तर फोर्लान चे चाहते झालो ह्या वर्ल्ड कप पासून :D
बाकी गोल्डन बूट चे मानकरी फोर्लान, व्हिला आणि स्नायडर चे अभिनंदन!!!
प्रतिक्रिया
12 Jul 2010 - 2:37 am | सुनील
एका सोहळ्याची सांगता झाली! बरेच काळ लक्षात राहील असा सोहळा.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
12 Jul 2010 - 2:40 am | शुचि
हॉलंडनी लढा आक्रमक दिला तरी.
ड्रॉ होईल असं वाटत होतं.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
12 Jul 2010 - 2:41 am | प्रभो
आक्रमक नाही हो...सुपर बचावात्मक... ;)
12 Jul 2010 - 2:40 am | प्रभो
लोल धत्ताड तत्ताड
धत्ताड तत्ताड...धत्ताड तत्ताड..धत्ताड तत्ताड..धत्ताड तत्ताड..धत्ताड तत्ताड..

आजचा मॅन ऑफ द मॅच : अर्जन रॉबेन
12 Jul 2010 - 2:47 am | गणपा
आजचा मॅन ऑफ द मॅच : इंग्लंडचा (रेफ्री) हॉवर्ड वेब
माताय कावीळ्च्या लसी टोचाव्यात तश्या तब्बल १६ पिवळी कार्ड दिलिनं
12 Jul 2010 - 3:02 am | स्वप्निल..
=))
लक्षात राहील तो पिवळ्या कार्डांमुळेच १६ कार्ड :O
12 Jul 2010 - 3:03 am | मेघवेडा
१७ राव.. एक्स्ट्रा टाईमच्या इंज्युरी टाईम मध्ये -१२१ व्या मिनिटाला - झॅवीला दिलं १७ वं! :)
12 Jul 2010 - 2:41 am | Nile
डान्याकडुल लै मोठी पार्टी लागु झाली आहे. अधिक काय लिहणे?
-Nile
12 Jul 2010 - 2:42 am | गणपा
जिंकले एकदाचे स्पेन..
समस्त स्पेन चाहत्यांचे अभिनंदन.. खास करुन आमच्या डॉनरावांचे.
साखळीसामन्यातला पहिला सामना हरुन फायनल जिंकणार्या स्पेन ने आज इतिहास रचला.
अभिनंदन ! अभिनंदन !! अभिनंदन !!!
12 Jul 2010 - 2:44 am | चतुरंग
स्पेनचेही अभिनंदन! ;)
चेष्टा जाऊदे ................स्पेनचे खरंच अभिनंदन!!!! =D> =D> =D> =D> =D>
चतुरंग
12 Jul 2010 - 8:24 am | पांथस्थ
एव्हाना कोणाच्यातरी पोटात असायचे पॉल महाशय!
- पांथस्थ
माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश...
मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर
12 Jul 2010 - 2:44 am | भडकमकर मास्तर
रेफरी अंमळ हौशी वाटला...
जिथे तिथे लब्बाड खिशातून कार्डे पाकिटे काढत होता....
कोच आणि प्रेक्षकांना पीतपत्र दाखवले नाही नशीब... तेवढेच बाकी होते
...
बाकी म्याचला कंटाळा आला नंतर नंतर... स्पेन जिन्कले एकदाचे...
12 Jul 2010 - 2:46 am | चतुरंग
आतापर्यंतची त्याच्या करिअरमधली सग्ळी येलो कार्डे त्याने एकदमच दाखवली!! ;)
चतुरंग
12 Jul 2010 - 2:50 am | मस्त कलंदर
हो ना.. अगदी खिरापतीसारखा वाटत सुटला होता....
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
12 Jul 2010 - 2:50 am | प्रभो
तरी कमी दिले... :(
झाबी अलोंसोच्या छातीत लाथ मारली तरी रेड कार्ड दिले नाही... :(
12 Jul 2010 - 2:57 am | मेघवेडा
आपण रेफरीच्या बाजूने बाबा.. त्याने फायनल मध्ये रेड न देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण खेळाडुच अतिआक्रमक खेळले त्याला तो तरी काय करणार बिचारा.. पण अलोन्सोवाला नक्कीच रेड होता. असो. आता स्पेन आणि हॉलंड मध्ये रम्मीचा सामना आहे! ;)
हो आणि स्पेनचं मनापासून अभिनंदन! दाव्हिद व्हियाला गोल्डन बूट न मिळाल्याचा आनंद सुद्धा आहे! :D
12 Jul 2010 - 2:58 am | प्रभो
तीनपत्ती खेळा राव...आमीबी येऊ..
12 Jul 2010 - 3:00 am | मेघवेडा
नको राव.. मग "थोडी चढ गयी तो तीन पत्तीने उतार दी.." असं गाणं म्हणावं लागेल! ;)
12 Jul 2010 - 2:59 am | मी-सौरभ
तरी बर एकच कार्ड समद्याना दावतात नाहीतर तेचा स्टाक संपला असता :)
-----
सौरभ :)
12 Jul 2010 - 3:04 am | घाटावरचे भट
स्पेनचे अभिनंदन!! हा वर्ल्ड कप पाहायला मजा आली...
12 Jul 2010 - 3:05 am | शिल्पा ब
हि फायनल म्याच होती का...म्हन्जे संपलं का वल्ड कप?
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
12 Jul 2010 - 3:22 am | रेवती
होय शिल्पा!
मॅच संपली.....म्हणजे फायनल संपली!
स्पेन जिंकले!
आता चार वर्षांनी पुन्हा....
रेवती
12 Jul 2010 - 3:34 am | शिल्पा ब
बरं...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
12 Jul 2010 - 3:15 am | भडकमकर मास्तर
सगळी म्याच संपल्यावर शेवटची शिटी झाल्यावरही डच खेळाडू रेफरीशी का भांडत होते बुवा?
मला वाटलं हा रेफरी बुवा म्याच सम्पल्यावरही काही कार्डं पाकिटांचं वाटप करणार
12 Jul 2010 - 5:55 am | सहज
एकदाचे स्पेन जिंकले. रॉबीनने खूप प्रयत्न केला पण डचांना गोल करता आला नाही. दोन्ही गोलकीपर चांगले खेळले.
स्पेनला पहील्यापासुन पाठिंबा देणार्या सदस्यांचे अभिनंदन डॉन्या, ऋषिकेश
रेफ्री दणादणा यलो कार्ड दाखवताना पाहून मात्र नाना, चौपाटी व एक सदगृहस्थ आठवले.
:-)
12 Jul 2010 - 6:31 am | चतुरंग
सदगृहस्थ किंचितसे पाध्यांसारखे दिसत होते का हो सहजराव? ;)
चतुरंग
12 Jul 2010 - 7:34 am | सहज
ही उपाध्यांची Na4 वगैरे खेळी असु शकते म्हणून फक्त हॅ हॅ हॅ ;-)
(पकाकाकांचा पुतण्या) सहज
12 Jul 2010 - 9:38 am | ऋषिकेश
सर्व स्पॅनिश खेळाडुंचे, स्पेनच्या जनतेचे व आमच्यासरख्या स्पेनसमर्थकांचे हार्दिक अभिनंदन!!
हॉलंडच्या खेळाडूंचेही द्वीतीय क्रमांकाबद्दल अभिनंदन!!
हे अस्मादिकांचे लागोपाठ दुसरे पाठिंबा-जेतेपद असे सांगून जाताजाता भाव खाऊन जातो ;) (गेल्यावेळी इटलीला सपोर्ट केल्यावरही मित्रमंडळींनी वेड्यात काढले होते)
ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा
12 Jul 2010 - 10:24 am | अप्पा जोगळेकर
पहिल्या हाफमधे णेदरलँड्सवाले नुसती मारामारी करत होते. केवढी ती पिवळी कार्ड. पण स्पेन जिंकलं. सही वाटलं. मजा आली. लक्षात राहील असा सोहळा. संपल्याची चुटपुट सुद्धा वाटते आहे.
12 Jul 2010 - 10:45 am | विसुनाना
तिसर्या स्थानासाठी झालेली जर्मनी - उरुग्वे लढत ही 'फुटबॉल' या खेळाच्या नावाला साजेशी होती.
कालची अंतिम लढत मात्र आपण फुटबॉल ऐवजी किकबॉक्सिंगचा नवा प्रकार पहात आहोत काय? (११ विरुद्ध ११) असे वाटण्याजोगी होती. हॉलंडने धुसमुसळा खेळ करून स्पेनच्या नजाकतदार खेळाचा पुरता बोर्या वाजवला.
त्यामुळे मॅच पहायला मजा आली नाही.
असो.
स्पेन जिंकणारच होते. ते कसेबसे जिंकले. इतकेच!
12 Jul 2010 - 6:02 pm | धमाल मुलगा
अगदी अगदी!!!
ह्यांना नक्की फुटबॉल खेळायचा होता की स्पेनचे खेळाडू अनफिट करायची सुपारी दिली होती तेच कळेना.
असो! म्याच फुटबॉलची म्हणुन पहायला गेलो आणि गल्लीतला मारामारी खेळ बघायला लागल्यागत वाटलं तेव्हा टिव्ही बंद करुन गप झोपलो. :)
12 Jul 2010 - 6:07 pm | चतुरंग
कसेही करुन स्पेनच्या खेळाडूंना जायबंदी करायचे असाच डाव होता की काय कोण जाणे? कोणतीही नजाकत, ड्रिबलिंग, सफाईदार चढाया वगैरेवर भर न देता फक्त धक्काबुक्की आणि कसेही करुन चेंडू काढून घेणे असे सुरु होते. स्पेनला त्यांचा खेळ करुच दिला नाही. कसाबसा एक गोल करुन मॅच संपवली!
(आशियातल्या नजाकतदार हॉकीची जशी धसमुसळ्या युरोपियन खेळाने वाट लावली त्याची आठवण झाली! :()
चतुरंग
12 Jul 2010 - 11:06 am | छोटा डॉन
आम्ही गाजावाजा करणार नाही !
दणादण ढोल वाजवणार नाही !
आमच्या 'उगाच' विरोधकांना खवचट खरडीही टाकणार नाही !
प्रतिसादात स्पेनचे झेंडेही नाचवणार नाही !
फक्त,
फक्त "थँक्स टु स्पेन" एवढेच म्हणतो.
आम्ही जो विश्वास स्पेनवर टाकला होता तो त्यांच्या जिगरबाज टीमने पानीपतात घालवला नाही.
शान राखली फुटबॉलची ...
इतिहास आणि आकडेवरी ही पुन्हा रचण्यासाठीच असते.
स्पेन नक्कीच ह्याला काबिल आहे.
अभिनंदन आणि धन्यवाद स्पेन !!!
अवांतर :
ही केवळ पोच, ह्यानंतर 'स्पेनच विजय' आणि 'थँक यु फुटबॉल' हा फिफा विभागाचा माझ्याकडुन समारोपाचा असलेला लेख थोड्या विश्रांतीने येईल.
कालच्या भयानक जागरणाने व आजच्या अंमळ बिझी स्केज्युलमुळे आज लिहणे जमणार नाही.
------
(आनंदी)छोटा डॉन
12 Jul 2010 - 11:40 am | Nile
ते तुमचं काय असेल ते असुद्या. आमच्या पार्टीची काय सोय ते कळवा आधी.
प्रतिदात संपादित केला आहे. संपादक मंडळ
-Nile
12 Jul 2010 - 11:50 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
कालच्या मॅचमधली पीतकार्ड पहाता 'आकडेवारी आणि सांख्यिकी' असं कालच्या मॅचच्या धाग्याचं नाव ठेवावं लागेल.
डच लोकं फार धसमुसळे खेळले, विशेषतः पहिल्या अर्ध्या भागात ... अगदी मिपावरचा शंभराहून अधिक प्रतिसाद खेचणारा धागा आठवावा असे! ;-)
अदिती
12 Jul 2010 - 11:54 am | Nile
बरोबर आहे, तुमच्या सारख्या माजी संपादकाला, अश्याच गोष्टी आठवणार. तरी बरं कोण ते पाध्ये सद्ध्या धडाधड प्रतिसाद उडवत आहेत.
-Nile
12 Jul 2010 - 1:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
तुला धडाधड उडणारे प्रतिसाद आठवले, मला तर 'धडाधड पडणार्या विकेट्स' आठवल्या. असो, गेले ते दिन गेले! ;-)
असो, आमचा दीड युरो फुकट गेला, भडक भगवी टोपी काल 'कामी आली'.
अदिती
12 Jul 2010 - 12:32 pm | राजेश घासकडवी
अगदी.
बॉलवर सावरकर आणि गांधी, बेळगाव सीमाप्रश्न, जेम्स लेन असं काहीसं लिहिलेलं असावं असं वाटलं. एखाद्या 'गोल' कडे चर्चा जाण्याऐवजी अवांतर प्रतिसादासारखाच साईडलाईनच्या बाहेर खूप वेळा बॉल जात होता. एकमेकांना पाय घालून पाडणं, बॉलच्या मिषाने एकमेकांना लाथाळ्या करणं हेही. रेफरी मात्र बरंच काम करत होता. खेळाडूंना समुपदेशन करणं, व त्यांनी ऐकलं नाही तर वेळोवेळी पीतपत्रिका दाखवणं - क्वचितप्रसंगी रक्तपत्रिकाही...
त्यामानाने जर्मनी वि उरुग्वे मॅच उपक्रमावरील चर्चेसारखी झाली. लांबलचक पल्लेदार चढाया, लाथा कमी कोपरखळ्या जास्त वगैरे वगैरे...
12 Jul 2010 - 4:51 pm | श्रावण मोडक
गुर्जी असा एखादा लेख येऊ द्या. सामन्याचे सविस्तर विश्लेषण (विच्छेदन म्हणणार होतो) करणारा. ;)
12 Jul 2010 - 1:31 pm | भाऊ पाटील
स्पेन चे अभिनंदन =D>
पण मज्जा नव्हती कालच्या सामन्यात. स्कोअरलाइन पुन्ह एकदा १-० #:S
त्यापे़क्षा जर्मनी-ऊरूग्वे लढत रंगतदार होती.
आपण तर फोर्लान चे चाहते झालो ह्या वर्ल्ड कप पासून :D
बाकी गोल्डन बूट चे मानकरी फोर्लान, व्हिला आणि स्नायडर चे अभिनंदन!!!
12 Jul 2010 - 5:00 pm | गणपा
12 Jul 2010 - 5:04 pm | चतुरंग
मटकाकिंग पॉलबाबा की जय! ;)
(गोऽऽऽऽल)चतुरंग
12 Jul 2010 - 7:40 pm | तिमा
त्ये त्येवढं २०१२ चं पन पॉलबाबालाच इचारा की. काय त्यो सोक्षमोक्ष लागेल.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
12 Jul 2010 - 7:22 pm | बिपिन कार्यकर्ते
स्पेनचे अभिनंदन. पण शेवटी गोल्डन बूट आमच्या म्युलरलाच मिळाला हो!!! असो.
बिपिन कार्यकर्ते
12 Jul 2010 - 7:28 pm | चतुरंग
करंडकाची तहान बुटावर! ;)
चतुरंग बुटाला
12 Jul 2010 - 7:36 pm | गणपा
हा हा हा
गीरे तो भी टांग उप्पर..
लढ बाप्पा आपला अजुन सपोर्ट आहेच ;)
13 Jul 2010 - 1:00 am | स्वप्निल..
माझापण ;)
* आम्ही पण जर्मनी सपोर्टरच