पुन्हा एकदा
आज पुन्हा एकदा
चींब पावसात भिजुन घेतल
तेवढच ओझ्या मनाला
हलक करुन टाकल
मनमुराद रडाव वाटत
ज्वालामुखि होऊन फुटाव वाटत
जळेल सारी वस्ती म्हणुन
ठसका काढुन उठाव लागत
मग काय?
आज पुन्हा एकदा
चींब पावसात भिजुन घेतल
तेवढच ओझ्या मनाला
हलक करुन टाकल
प्रतिक्रिया
9 Jul 2010 - 7:51 pm | चतुरंग
वा छान कविता. तू तर छुपा रुस्तुम निघालास!
आम्हाला वाटलं होतं तू फक्त चित्रं टाकून हसवतोस पण तू गंभीरही बनवतोस!
(आणखी एखादं कडवं चाललं असतं रे! चुटपुट लागून संपली कविता..)
चतुरंग
9 Jul 2010 - 9:28 pm | गणपा
उगाच लोकांना हळव करायचं म्हणजे काय.
तुझा तो कॅमेरा उचल आणि जरा बाहेर भटकुन ये पाहु आधी.
9 Jul 2010 - 9:29 pm | प्रभो
दादूस ...उत्तम कविता रे...
9 Jul 2010 - 9:34 pm | विसोबा खेचर
वा!
10 Jul 2010 - 6:21 pm | पाषाणभेद
मस्त कवितांचा पाऊस चालू आहे.
![The universal symbol for diabetes](http://www.diabetesbluecircle.org/img/UNR.png)
अवांतरः फोटोतल्याने/ लीने घातलेल्या स्टॉकिंग्ज नैसर्गीक रंगाच्या वाटत नाही. जरी वाटत असल्या तरी ते खुपच चमकत आहेत. कृपया नैसर्गीक रंग वाटेल अशा स्टॉकिंग्जवालीचा फोटो टाकावा असे वाटते. तुमच्यासारख्या नवनविन फोटो शोधणार्याला हे शक्य आहे.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
12 Jul 2010 - 9:00 am | निरन्जन वहालेकर
सुन्दर कविता ! ! !
12 Jul 2010 - 12:19 pm | नेहमी आनंदी
:)
12 Jul 2010 - 6:50 pm | संजा
जाम भारी रे !!!
संजा
12 Jul 2010 - 7:40 pm | शानबा५१२
माझा आक्षेप आहे.
भिजुन कोणती गोष्ट हलकी होते जे जयपालने मन हलक केल?
वास्तवात असलेल्या गोष्टींची तुलना केली की त्याला 'उपमा'(नाश्त्याला खातो तो पण उपमाच का?) म्हणतात.
ह्याला काय म्हणायच 'जयपाल-तारे'?
_________________________________________________
![]()
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे