सध्या फिफा वल्डकप २०१० अंतीम टप्प्यात पोहोचला आहे. स्पेन आणि नेदरलॅन्ड यांच्यात आता अंतीम सामना रंगेल. या संपुर्ण स्पर्धेत अनेक खेळाडूंबरोबर चर्चेत आला आहे तो भविष्यवेत्ता ऑक्टोपस.पॉल असे त्याचे नाव आहे . जन्माने इंग्लन्डचा असलेला हा पॉल सध्या वास्तव्यास जर्मनीत आहे. या स्पर्धेतील भविष्यवेत्त्या ऑक्टोपसने आत्तापर्यंतची जर्मनी बाबतची भविष्ये बरोबर वर्तवली आहेत. यात पॉल ज्या टॅक मधे असतो तेथे त्याच्या खाद्याचे दोन बॉक्स सोडण्यात येतात . एका बॉक्सवर जर्मनीचा झेंडा तर दुसर्या बॉक्स वर जर्मनी विरुध्द संघाचा झेंडा लावण्यात येतो. ऑक्टपस ज्या बॉक्स मधला खाऊ खाईल तो संघ सामना जिंकेल असे अनुमान काढण्यात आले. आणि त्याचप्रमाणे घडले.
चला आता ऑक्टोपस बाजारात कुठे मिळतो ते पाहतो. माझ्या ब्लॅगचे नाव ' भविष्याच्या अंतरंगात ' बदलून ' ऑक्टोपसच्या अंतरंगात' ठेवतो. ऑक्टोपसचा एक नवा वॉलपेपर घरातील भिंतीवर लावुन ठेवावा लागेल आता. तसेच जहिरातीची ' ऑक्टोपस कन्सल्टन्सी ' या नवीन नावने ५०० पत्रक छापतो. भविष्य पाहून घेणार्या पहिल्या १० जणांना ऑक्टोपसची छोटी मुर्ती किंवा गळ्यातला ताईत सप्रेम भेट मिळेल. :)
* ऑफर वल्ड कप संपेपर्यंत मर्यादित.
प्रतिक्रिया
8 Jul 2010 - 10:18 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
अच्छा, ऑक्टोपस-ऑक्टोपस सुरू आहे ते हेच काय?
अदिती
8 Jul 2010 - 10:42 am | सागर
या ऑक्टोपसने वात आणला आहे.
क्वार्टरफायनल ला मैदानावर जर्मनांचे शौर्य जाणवले
तर तेच वीरपुरुष २० वर्षाच्या मुल्लरच्या अनुपस्थितीत गोल करायला पण तरसले स्पेनविरुद्ध सेसेमीफायनलमधे
अरे हट जर्मनीची...
त्या ऑक्टॉपसवर निकाल अवलंबून असतील तर काही खरे नाही.. तो ऑक्टोपस प्रत्येक वेळी नवीन झेंडा निवडत चालला आहे
क्वार्टरफायनल ला जर्मनी च्या बाजूने कौल
सेमी फायनल ला स्पेन च्या बाजूने कौल
फायनल ला अर्थातच हॉलंडच्या बाजूने कौल
आदीती आत्ताच तुझ्या भगव्या रंगाच्या विजेतेपदाबद्दल शुभेच्छा ... :)
आता माझ्या आवडीची जर्मनी बाहेर झाली ,.. आता पाठिंबा केवळ भगव्या रंगाला
हॉलंडचे रेकॉर्ड आहे गेल्या २३ सामन्यांत ते हरलेले नाहियेत...
8 Jul 2010 - 10:54 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
प्रत्येक सामन्यात जिंकण्याची शक्यता ०.५ असते, साखळी सामन्यांमधे ०.३३! आता ही शक्यता नेदरलंड्सच्या बाबतीत गेल्या २३ सामन्यांमधे १ 'झाली'.... म्हणजे आता ते हरण्याची शक्यता वाढली नाही का?
अदिती
हप हॉलंड हप
8 Jul 2010 - 1:08 pm | सागर
मी नेहमी गुणवत्ता हा निकष मानतो अंदाज बांधताना.
पण या वर्ल्डकपला दिसले की प्रत्येक सामना जो जोमाने खेळतो तोच संघ जिंकतो
हॉलंड सध्या भन्नाट खेळत आहे. आणि बाकीच्या संघांचे जे झाले तसा खेळावर परिणाम न होता सातत्याने ते मस्त खेळत आहेत.
पण नशीबाने याही वर्ल्डकपमधे मोठा हातभार लावला आहे.. खास करुन उरुग्वेच्या बाबतीत
१. क्वार्टरच्या आधी उरुग्वेच्या सुआरेझचा हाताने केलेला गोल... त्यानंतर क्वार्टरफायनलला घानाविरुद्ध याच सुआरेझ ने हाताने बॉल अडवून गोल वाचवला, आणि त्याला रेड कार्ड मिळून बाहेर जावे लागले. पण घाना ला त्या पेनल्टीवर गोल नाही करता आला. सामना पेनल्टी शूट मधे उरुग्वेने जिंकला... परत सेमीफायनलला जखमी असूनही फोरलॅन खेळला... व उरुग्वेने हॉलंडच्या तोंडाला फेस आणला २-३ ने हरले. या महत्त्वाच्या सामन्यात सुआरेज उपलब्ध नसणे उरुग्वेला महागात गेले. पण काहीही असो.. सुआरेझ उरुग्वेला परत गेल्यावर उरुग्वेचा हीरो ठरणार यात शंका नाही...
२. जर्मनीविरुद्ध इंग्लंडचा गोल न देणे... २ शॉट्स गोलपोस्टला लागणे...
इ,...इ..
त्यामुळे अंतिम सामन्यातही जो संघ उत्कृष्ट खेळेन तो विजेता होईन. असे मला वाटते. पण नशीबाचे फासे पलटले तर काही खरे नाही..
हॉलंडने आजपर्यंत एकदाही वर्ल्डकप जिंकला नाहिये तेव्हा यावेळी ती सुवर्णसंधी ते गमावतील असे मला वाटत नाही :)
म्हणून तुझ्या भगव्या टीमला आगाऊ शुभेच्छा :)
8 Jul 2010 - 2:04 pm | धमाल मुलगा
काय सॉकर म्हणजे पोकर आहे काय?
- (तीनपत्ती) धमाल सुब्रमण्यम.
8 Jul 2010 - 2:13 pm | सागर
धमाल्या...
पोकर?? ... ते काय असते बुवा तीनपत्तीस्पेशालीस्ट .... ;)
सुब्रमण्यमस्वामी... फुटबॉल मधे पण नशीब XXX होते कधी कधी...
नाहीतर गुणवत्तेमधे सरस असूनही अर्जेंटीना...जर्मनीची काय वाट लागली ते पाहिले ना? :D
8 Jul 2010 - 2:19 pm | धमाल मुलगा
मी म्हणत होतो ते अदितीनं शक्यतांच्या गणिताबद्दल.
प्रॉबॅबिलिटी आणि रँडमनेसवर अशीच गणितं छापुन पोकर जिंकता येता येतं...पण सॉकर? तिथे जिवंत माणसांचा पर्फॉमन्स आणि तु म्हणतो तसं काहीप्रमाणात नशीबाचे फासे! तिथे कशी काम करणार की प्रॉबॅबिलिटीची गणितं? म्हणुन म्हणालो मी. :)
8 Jul 2010 - 2:34 pm | सागर
म्हटले पोकरमधे घुसलाच आहेस तू तर ....मला अगदी कॅसिनो रॉयाल आठवला
कॅसिनो रॉयाल बघितल्यानंतर पोकर माहिती नाही असे कोणी म्हणायचे धाडस नाही करणार ... :)
कॅसिनो रॉयाल मधला बाँडला हार्ट अॅटॅक येतो आणि हिरोईन वाचवते तो सीन जाम आवडला
8 Jul 2010 - 2:52 pm | टारझन
मला तो सीन ब्रेड आवडला ;)
अवांतर : ते जर्मणी जर्मणी म्हणणारे तुम्हीच काह ओ ? :) बाकी पोकर माहित नाही म्हणायला "धाडस" लागते ? =))
- (धाडसी) सॉकर
8 Jul 2010 - 2:56 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
तू सॉकर नाही रे, तू रॉकर!!
अदिती
8 Jul 2010 - 2:59 pm | टारझन
लिंक क्लिकवलं ... आणि अचानक डोळे पाणावले :) हा रॉक म्हणजे आमचा देव :) रॉक देव =))
(इफ्फ्फ यु स्स्स्स्सम्म्म्म्ममेल्ल्ल्ल्ल ... लालालालाअला ... व्हेन द रॉक इज ... कुकिंग ) टारझन
8 Jul 2010 - 9:34 pm | सागर
अवांतर : ते जर्मणी जर्मणी म्हणणारे तुम्हीच काह ओ ? बाकी पोकर माहित नाही म्हणायला "धाडस" लागते ?
होय रे टार्या मीच तो.. काय टुकार खेळली जर्मनी.. पहिल्या हाफमधे आरामात जिंकू या थाटात खेळत होते. दुसर्या हाफमधे त्या ऑक्टोपसच्या भविष्यवाणीची बातमी त्यांना कोणी दिली होती की काय न कळे, पण जिंकण्याच्या जिद्दीने खेळताना दिसले नाहीत.. :(
असो... स्पेन स्पेन ओरडणार्यांचे मनापासून अभिनंदण
माझा अंदाज साफ चुकला .
होय चूक कबूल करायला पण धाडस लागते असे कोणी महापुरुषाने म्हटल्याचे आठवते आहे अंधुक अंधुक ;)
पोकर मला खरेच माहिती नव्हता. कॅसिनो रॉयालपासून रस निर्माण झालाय. हळू हळू चालू आहे. तरी अजून म्हणावी तशी गती नाही आली :(
कुठे व्यवस्थितपणे शिकता येईल काही कळत नाही. ऑनलाईन गेम्स मधे ट्राय केला तर भलतेच पत्ते निघत होते
8 Jul 2010 - 3:11 pm | धमाल मुलगा
ओह... ;)
असो, उर्वरित चर्चा खवमध्ये करुच.
8 Jul 2010 - 2:19 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
ए जोकर, साखर (माझ्या मते अमेरिकनांनी केलेला soccer चा उच्चार) असो वा पोकर, पुड्या सोडायला काय लागतं?
अदिती
8 Jul 2010 - 11:13 am | बद्दु
या घटनेला आणखी काय म्हणनार ? " आधुनिक ? अत्याधुनिक !! अन्धश्रद्धा ". आमच्या नाडी ग्रन्थानी कोणाचे काय वाईट केले होते? मिपावरील विज्ञान प्रेमी कुठे गेले? शेवटी "आधुनिक भविष्यवेत्ता ऑक्टोपस पॉल " काय आणि आमचे "पुरातन ॠषी मुनी " काय; किंवा "नोस्ट्रेडमस" काय ,आणि २०१२ ला सम्पणारी माया संस्कृती काय ..सगळे " भविष्यकाळा"तच बोलतात !!!
8 Jul 2010 - 12:51 pm | Nile
ते बाकीचं काय माहित नाही, पण ऑक्टोपस काय लागतो यार चवीला! बेश्ट!! खाउन पहा एकदा.
-Nile
8 Jul 2010 - 1:25 pm | मेघवेडा
त्या पॉलला आतापर्यंत खाऊन संपवला असेलच जर्मनांनी! ;)
8 Jul 2010 - 1:25 pm | मेघवेडा
त्या पॉलला आतापर्यंत खाऊन संपवला असेलच जर्मनांनी! ;)
8 Jul 2010 - 2:11 pm | पुष्करिणी
माहिती आहे, तुम्ही खट्टू आहात, २-२ दा का खाताय पॉल ला?
पण बर्याच जणांनी खरच काल ऑक्टोपस सूप खाल्लय काल इकडे...:)
पुष्करिणी
8 Jul 2010 - 2:15 pm | केशवसुमार
सामना सुरु होण्या आधी मी आमच्या प्रोजेक्ट मधल्या एका जर्मन सहकार्याला विचारले की त्याचा ह्या ऑक्टोपस प्रकारावर विश्वास आहे का? तेव्हा त्याने ठाम पणे सांगितले नाही .. हा सगळा फालतू पणा आहे.
जर्मनी सामना हारल्यावर मी त्याला प्रश्न केला..
मी: सो युर्गन वॉट डू यू थिंक अबाऊट ऑक्टोपस नाउ..
युर्गनः वेल..आय विल इट वन टू नाईट !!!
पण हे ऑकटोपस प्रकरण जर्मनी मध्ये सर्व दुरदर्शन वाहिन्यांनी प्रसारीत केले होते आणि त्याचे जर्मन टिम वर जर्मन जनतेवर दडपण आले होते असे ही त्यांने सांगितले..
अवांतर : ह्या शिवाय, जर्मनीचा कोच जेव्हा जेव्हा नीळी जर्सी घालतो तेव्हा जर्मनी चा संघ सामना जिंकतो असा ही एक अंधविश्वास जर्मनी मधे आहे अशी माहिती त्यांनी पुरवली.. पण काल बाकी सर्व अंदाज, अकडेवारी, जर्मन आत्मविश्वास चुकले आणि पॉल जि़ंकला हे खरे..
8 Jul 2010 - 2:20 pm | धमाल मुलगा
हा हा हा!!!
लय भारी उदाहरण! साला त्या पॉलमुळे आता "सेव्ह ऑक्टोपस" चळवळ उभी करावी लागु नये म्हणजे मिळवली. ;)
8 Jul 2010 - 9:47 pm | सागर
हिटलरने ज्यूंचे जसे शिरकाण केले तसे आता जर्मनांनी ऑक्टोपसचे करु नये म्हणजे झाले ;)
8 Jul 2010 - 2:46 pm | श्रावण मोडक
हाहाहाहाहा... म्हणजे तिथंही तसंच तर...
8 Jul 2010 - 4:20 pm | यशोधरा
ईईईईईईई! ऑक्टोपस खायाचा? यssssक्क!
8 Jul 2010 - 4:32 pm | चतुरंग
माझ्या मुलाच्या एका मित्राने - वय वर्षे ८ - एका सीफूड रेस्टराँमध्ये सॅलडवरचा छोटा ऑक्टोपस उचलून अख्खा तोंडात टाकून गट्टम केला होता आणि नंतर येऊन अभिमानाने सांगत होता! ;)
चतुरंग
8 Jul 2010 - 5:31 pm | धमाल मुलगा
ए...
नुसता कच्चा नाही कै...चांगला शिजवुन.
तुला काय वाटलं? झाडावरुन पेरु तोडुन खाल्यासारखा टेबलावरुन उचलुन खायचा? =))
8 Jul 2010 - 7:53 pm | विंजिनेर
धमाल्या, कच्चा पण खातात हो. आणि शिवाय तो जिवंत आहे हे पाहण्यासाठी मिठ शिंपड त्याच्यावर - मग तो वळवळतो. मग आपण तो खायचा. पूर्वेकडे सुशी टाईप आणि अगदी दुसर्या टोकाला असलेल्या टोपीकराच्या देशात सुद्धा. गुगलबाबाचा धावा कर माझ्या म्हणण्याला पुरावा हवा असेल तर.
8 Jul 2010 - 4:43 pm | यशोधरा
बापरे! महान!!
8 Jul 2010 - 6:17 pm | मेघवेडा
हा बघ. हा असा! थोडाच उरलाय पण पुरेल तुला!! ;)
8 Jul 2010 - 6:18 pm | यशोधरा
मस्तच दिसतोय हां! पण इतनेमें मेरा क्या होगा :P जा अजून घेऊन ये जा!
8 Jul 2010 - 6:24 pm | मेघवेडा
घे. पोटभर होऊ दे हां! वरून मस्तपैकी सोलकढी पी! ;)
ब्लॉगस्पॉट बंद असल्याने सोलकढीचा फोटो आता मिळत नाहीये. नंतर देईन! :D
8 Jul 2010 - 6:27 pm | यशोधरा
थोडी काकडी बाजूला ठेवली असतीस तर, काँबिनेशन कसं मस्त दिसलं असतं!
:D जमेतुल! एक काम धड जमत नै मेल्या तुला!
8 Jul 2010 - 6:38 pm | मेघवेडा
सॅलडचे वेगळे चार्जेस पडतात आमच्याकडे आणि त्यासाठी वेगळी ऑर्डर द्यायची पडते. तरी मैत्रीखात्यावर सोलकढी देतोय कॉम्प्लिमेंटरी ते कुठेच गेलं.. सगळंच फुकट हवं काय? पाहिजे तर खाया नायतर दार उघडचं आहे! :P
8 Jul 2010 - 6:45 pm | यशोधरा
कुठे पडते? :P सगळा पडापडीचा मामला दिसतोय!
>>पाहिजे तर खाया नायतर दार उघडचं आहे! >> जर्मनी हरली म्हणून इतकं चिडायचं? अरारा.. :D
या प्रतिसादाखालील काही अवांतर प्रतिसाद काढून टाकले आहेत याची नोंद घ्यावी. - संपादक मंडळ.
8 Jul 2010 - 7:01 pm | गणपा
पॉल साठी नविन रेसिपी शोधतोय.
8 Jul 2010 - 8:32 pm | मी-सौरभ
-----
सौरभ :)
8 Jul 2010 - 8:25 pm | Nile
हे घ्या, कच्चा अन जिवंत ऑक्टोपस. नीट खा नायतर घशात अडकला तर पुरीभाजी खायला पण उरायचा नाय तुम्ही. ;)
-Nile
8 Jul 2010 - 8:53 pm | यशोधरा
कुठेय?
8 Jul 2010 - 9:08 pm | Nile
यु ट्युब ड्कवला आहे की. तुमच्या हाफिसात नाय दिसायचा. :)
-Nile
8 Jul 2010 - 9:12 pm | यशोधरा
पण डकवलेलं पण दिसत नाहीये. असो. घरुन बघीन.
9 Jul 2010 - 10:28 am | अमोल केळकर
ताज्या माहितीनुसार सिंगापुरला एका पोपटाने ( ' मनी ' पोपट असे त्याचे नाव ) स्पेनच्या बाजुने कौल दिला आहे. :)
अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
9 Jul 2010 - 10:31 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
आणि स्पेन हरलं तर म्हणता येईल, "पोपट झाला!"
अदिती