जयपाल साहेब माफी द्यावी
http://www.misalpav.com/node/13084
पाखरु देखणं,
ऊसात नेणं,
जोश्यांचं बेणं,
अत्रंगी.
पाटलाची लक्षी,
हिरवीन आक्शी,
अंगावर मॅक्शी,
सतरंगी
झाडाच्या मागं,
देवळाच्या पाठी,
वढ्याच्या काठी,
जलरंगी.
उठे वहाण,
फाटे तुमान ,
पाटील पैल्वान,
बजरंगी
कवी म्हणा,
कवडा म्हणा,
अडगळ हाथरे ,
सतरंजी
प्रतिक्रिया
8 Jul 2010 - 1:11 am | टारझन
सुंदर रे अडगळ :)
अवांतर : जैपाल तर्फे माफ केलं तुला ज्जा !!
- पानगळ