आमची प्रेरणा हळूहळू त्या व्यापत गेल्या सगळे मन...
हळूहळू हा व्यापच झाले संपादन
अवांतर प्रतिसाद जणू, व्हायरस ट्रोजन.
येतो कंपू 'तो' जसा जसा हा जाली
वेगाने प्रतिसादांचे होते वर्धन.
जीव घेतला त्यांनी सगळ्या धाग्यांचा
करती केवळ नियमांचे ते उलंघन!
हेडफोन लावुन कानी, मी शांतपणे-
अवांतराचे रोज अता करतो कर्तन.
उगाच नाही ओठ निळे झाले नार्या
चौपाटी पाध्यांचे का घ्यावे चुंबन?
अजून नाही प्रसिद्ध का झाले धोरण ..
अजून चालु ड्रूपल सहाचे संशोधन...
कधी अरे तू सुधाणार "केश्या" मेल्या
कधी बंद करणार सांग कविता मुंडन
- केशवसुमार
प्रतिक्रिया
7 Jul 2010 - 6:02 am | प्रियाली
कुणावर कात्री चालवायची असेल, तलवार फिरवायची असेल, कुणाचे मुंडन करवून घ्यायचे असेल, केश्याने अर्रर्र! केसाने गळे कापायचे असतील तर कळवा.
तलवार, कात्रींना धार काढली आहे. ;) गांधीकट, मोहाव्क वगैरे वगैरे कुठले कर्तन करायचे फक्त सांगा.
बाकी विडंबन ए-१. :)
आपली,
प्रियाली सिजरहँड्स
7 Jul 2010 - 6:09 am | शिल्पा ब
लै भारी
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
7 Jul 2010 - 6:44 am | रेवती
विडंबन भारी झाले आहे.
संपादकांचे म्हणणे या शब्दात मांडून आपण समस्त संपादक जमातीचा दुवा घेतला आहे.
रेवती
7 Jul 2010 - 7:27 am | चतुरंग
(वस्तराधारी)चतुरंग
7 Jul 2010 - 8:56 am | टारझन
लोल =)) हे पाध्ये णक्की कोण ह्याचा कोणीतरी उलगडा करा रे =))
-(संपादकपिडीत) टारझन
कात्री संगे केसु || आणि रेवतीरंगा ||
टारु म्हणे आता || विसर धांगडधिंगा ||
7 Jul 2010 - 6:18 pm | केशवसुमार
चांगला प्रश्न आहे.. श्री.रा.रा. योग्य माणसाला विचारा...
(सुचक)केशवसुमार..
कात्री संगे केसु || आणि रेवतीरंगा ||
केसु म्हणे तरी||सुरू धांगडधिंगा ||
7 Jul 2010 - 7:13 pm | विसोबा खेचर
अरे केश्या, अजून तू संपादक आहेस वाटतं?! :)
बाकी तुला मी आडनाव बंधू म्हणून उगाचंच संपादक केला होता म्हणा! ;)
पण तुला काही झडझडून संपादकीय काम करताना मी कधीच पाहिलं नाही! :)
त्या रेवतीभाभीकडून शिक काहितरी.. तिची मिपावरची, मिपावर काय लिहिलं जावं/जावू नये या संबंधीची तळमळ मला वेळोवेळी जाणवली होती..
असो,
विडंबन बाकी मस्तच रे! :)
नीलकांता, या केश्याला संपादकपदावरून हटव रे! :)
7 Jul 2010 - 8:23 pm | llपुण्याचे पेशवेll
केसुशेठ घ्या. लावा आतातरी शिकवणी.
(प्रशिक्षित सभासद)
पुण्याचे पेशवे
हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.
7 Jul 2010 - 9:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
>> पण तुला काही झडझडून संपादकीय काम करताना मी कधीच पाहिलं नाही! <<
देवाच्या काठीला आवाज नसतो असं काहीसं ऐकलं आहे मी!!
असो. हे कंपू प्रकरण काय असतं?
अदिती
8 Jul 2010 - 12:53 am | केशवसुमार
आडनाव बंधू,
मंडळ आपले आभारी आहे..
(आजी संपादक)केशवसुमार
8 Jul 2010 - 2:28 pm | केशवसुमार
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार.
(आभारी)केशवसुमार