माते अंबे भवानी नमितो जिजा-बाई :-
माता महान कितीही झाल्या संसारी |
दिव्य चरित्र परी तुझे त्या तुलना नाही |
माते अंबे भवानी नमितो जिजा बाई |
पुनश्च शिव भारत घडण्या उद्धारा येई ||
भ्रमली रयत हि सारी भुलली अभिमाना |
भ्याले जन-पती सारे पहावया रणा |
स्वार्थी मदांध होऊन भुलले शिव राणा |
माते तुजवाचून आता स्मरावे कोणा ||
जन हे समस्त वानिती शिवबा परतावा |
छाये वाचून तुझिया तो कैसा व्हावा ?
हिंदू अनन्य शरण त्या उद्धार द्यावा |
धर्म-शक्ती-सागर शिवबा पुन्हा निर्मावा ||
-- सागर लहरी ०६-०७-२०१०
प्रतिक्रिया
6 Jul 2010 - 3:50 pm | स्पंदना
जन हे समस्त वानिती शिवबा परतावा |
छाये वाचून तुझिया तो कैसा व्हावा ?
हिंदू अनन्य शरण त्या उद्धार द्यावा |
धर्म-शक्ती-सागर शिवबा पुन्हा निर्मावा ||
__/\__
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते
6 Jul 2010 - 3:51 pm | स्पंदना
जन हे समस्त वानिती शिवबा परतावा |
छाये वाचून तुझिया तो कैसा व्हावा ?
हिंदू अनन्य शरण त्या उद्धार द्यावा |
धर्म-शक्ती-सागर शिवबा पुन्हा निर्मावा ||
__/\__
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते