परवा सहज एक जुना मित्र भेटला ..
गर्क स्वत:शी...
पहात हसत राहिला
जुने जुने.. सुने काही.. धुळी मधे गिरवत राहीला ..
बरेच बोललो बसून दोघे ..
बोललो दोघे स्वत:शी ...
वाट पुढे धावणारी
पुन्हा जुन्या वळणाशी ..
हळवे शांत डोळे त्याचे ..
वेडेपणाची झाक जराशी ...
धुळी मधले नाव पाहून... मीही हसलो स्वत:शी...
मीही हसलो स्वत:शी...
प्रतिक्रिया
5 Jul 2010 - 2:19 pm | रामदास
पण मी मला भेटलो असा काही आशय वाटला.
6 Jul 2010 - 2:16 am | धनंजय
असाच काही आशय जाणवला, म्हणून कल्पना आणि शब्दयोजना आवडली.
5 Jul 2010 - 8:26 pm | sur_nair
सुरवातीला जरा अपेक्षा वाढली पण ती अपुरीच राहिली. अजून काहीतरी हवे होते ते missing आहे असे वाटते.
11 Jul 2010 - 1:05 pm | सागरलहरी
आशय असेल पण तो शब्दात नीट उतरला नाही असे मला देखील जाणवते आहे. पण त्या वर पुन्हा मेस्त्री काम करता येत नाही.
प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद.
सागरलहरी.
11 Jul 2010 - 1:20 pm | राजेश घासकडवी
मतकरींचं भुताची गोष्ट नावाचं नाटक होतं. त्यात अशाच काही कारणाने एकाला स्वतःचा भूतकाळ डोळ्यासमोर येतो, डोळ्यातल्या वेडाच्या झाकेसकट. त्याची आठवण झाली. त्या नाटकात आजचा मी व कालचा मी, त्यांच्या चर्चा, बायकोने घातलेली समजूत वगैरेमुळे ते फारच लिटरल व कंटाळवाणं झालेलं आहे. या कवितेत ते गूढ ठेवलेलं आहे, हे आवडलं.
11 Jul 2010 - 1:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कविता आवडली.
'मी मला भेटलो' पेक्षा 'ती'ची त्यांना आठवण झाली असे वाटले.
-दिलीप बिरुटे
11 Jul 2010 - 1:59 pm | सागरलहरी
माझ्या मनात लिहिताना असेच काहीसे होते.
धन्यवाद.