सर्वांना सांगताना आनंद होत आहे की मी मराठी.नेट इंद्रधनुष्य नावाचे ई-मासिक चालू करत आहे.
ज्यामध्ये मीमराठी.नेट च्या सदस्यांनी लिहलेले लेख, कविता, प्रवासवर्णन, पाककृती ह्यांचा समावेश केला गेला आहे.
प्रथम अंक असल्यामुळे व अश्या प्रकारचा अंक काढण्याचा अनुभव मागे नसताना देखील आम्ही हा छोटासा प्रयत्न केला आहे. ज्याचा उद्देश मी मराठी वरील लेखन त्या ९५% लोकांच्यापर्यंत देखील पोहचावे ज्यांना ऑर्कुट, फेसबुक अथवा चॅट पलिकडली विश्व माहीतच नाही आहे. आपण मी मराठीवर प्रकाशित केलेले लेख तसे ही लेखकाचे व संकेतस्थळाचे नाव न देता मेल फॉरवर्ड मधून फिरत असतातच. तसाच प्रकारे हा ई-अंक देखील फिरेल व ज्यांना अजून आपले संकेतस्थळ व येथे लेखन माहिती नाही त्यांना आपल्या येथील ३०००+ असलेल्या लेखांची एक झलक मिळेल हा सरळ व साधा उद्देश ह्या अंकाचा आहे.
आपण प्रयत्न करुन प्रत्येक महिन्याच्या प्रथम आठवड्यामध्ये असा अंक नियमित काढू व आपले लेखन त्या ९५% मराठी बांधवाजवळ पोहचवण्याचा प्रयत्न करु. ह्या कार्यासाठी ई-मासिकाच्या जून महिन्याच्या समितीने लाख मोलाची मदत केली, त्या सर्वांचे अनेकानेक आभार. त्यांची नावे खालीप्रमाणे.
१. रमताराम
२. निर्मयी
३. डॉ. अशोक कुलकर्णी
४. सागर
५. विसुनाना
६. माया
७. पुष्करणी
८. सोना
_____
अंकामध्ये खालील लेख विभागवार मांडणी करुन दिलेले आहेत, सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा व आपल्या मित्र मैत्रीणी पर्यंत हा अंक पोहचवा ही विनंती.
- कोकणसय - शैलजा
- अद्वितीय - विशाल कुलकर्णी
- बाबा हरवलाय – अनुराग
- मात्रा – गणपा
- कोहम ! – अवलिया
- शहीद दिवस - पुणेरी ( प्रसन्न कुमार केसकर )
- मृत्यू आणि मी - पुण्याचे पेशवे
- रेजकुत्रे – मधुकर
- दहा वर्ष - ३_१४ अदिती
- सिडनीपुराणम्॥ - मेघवेडा
- सहज सुचल म्हणुन – जयपाल
- जन्मा येण्या कारण तू.. – प्राजु
- हताश औदुंबर - गंगाधर मुटे
- उ. न. क. अर्थात उपेक्षीत नवरे कमिटी - आदिजोशी
- मिल्कः एक चळवळ – ऋषिकेश
- लेमन केक - स्वाती दिनेश
- चिकन साते – गणपा
- स्पर्श – सागर
अंक तुम्ही येथून डाऊनलोड करु शकता.
काही चुका राहिल्या असतील तर त्या दाखवून द्या योग्य ते बदल लगेच केले जातील.
धन्यवाद.
मीमराठी.नेट
प्रतिक्रिया
5 Jul 2010 - 12:03 pm | अवलिया
राजेने एका आगळावेगळया प्रयोगाची यशस्वीपणे सुरवात केलेली आहे.
त्याबद्दल त्याचे आणि मी मराठीच्या चमुचे हार्दिक अभिनंदन.
सदर प्रकल्प अविरत चालु राहुन निरपेक्ष साहित्य सेवा सर्वांच्या हातुन घडावी अशी शुभेच्छा !!
--अवलिया
5 Jul 2010 - 12:06 pm | छोटा डॉन
अवलियाशी सहमत ...
आत्ताच अंक चाळुन पाहिला, खुपच सुंदर वाटत आहे.
सुटसुटीत असल्याने वाचायलाही सुलभ असेल असे वाटते, अंकातल्या लेखकांच्या नावावर नजर टाकली असता हा अंक नक्कीच एक उत्तम मेजवानी ठरेल असा विश्वास आहे.
ह्या नव्या उपक्रमासाठी राजे व मीमराठी चमुचे कौतुक आणि शुभेच्छा ...
सदर प्रकल्प अविरत चालु राहुन निरपेक्ष साहित्य सेवा सर्वांच्या हातुन घडावी अशी शुभेच्छा !!
------
छोटा डॉन
5 Jul 2010 - 12:11 pm | शेखर
+२
खरोखरच सुंदर मासिक आहे.
सर्वांचे अभिनंदन
5 Jul 2010 - 12:40 pm | दशानन
आभारी आहे मित्रांनो.
5 Jul 2010 - 12:15 pm | अमोल केळकर
इंद्रधनुष्य आवडले . सविस्तर लेख सावकाश वाचू :)
अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
5 Jul 2010 - 12:23 pm | टारझन
राजे एकदम कटाकट ... बुंगाट आं !!
5 Jul 2010 - 5:22 pm | परिकथेतील राजकुमार
छान उपक्रम रे राजा.
अंकाला इंद्रगारवा असे नाव जास्ती शोभले असते असे वाटुन गेले.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
5 Jul 2010 - 8:57 pm | दशानन
:)
नाही रे.... !
सात जणांनी लेख निवडले होते व त्याला मुर्तरुप मी दिले म्हणून इंद्रधनुष्य !
5 Jul 2010 - 10:37 pm | शिल्पा ब
छान अंक आहे... आवडला.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/