गे कविते

सागरलहरी's picture
सागरलहरी in जे न देखे रवी...
5 Jul 2010 - 11:23 am

गे कविते आज थोडा, दर्द ओला सजवून ये ,

मैफिलीचा रंग गहिरा, गर्द डोळां भिजवून ये .. १

बोलणे चाले सदाचे, आपुलाले मनी ओठी ,

चार गोष्टी अंतरीच्या, या जगा सुचवून ये.. २

कोण कैसे मज हसावे ? गे कविते पायी तुझ्या,

वेड घेऊन सर्व जगती, सत्य हे दावून ये .. ३

-- सागर लहरी २२.२.२०१०

कविता

प्रतिक्रिया

टारझन's picture

5 Jul 2010 - 11:27 am | टारझन

शिर्षक वाचुन वेगळ्याच लहरी उठल्या होत्या =))

- भप्पी लहरी ५.७.२०१०

llपुण्याचे पेशवेll's picture

5 Jul 2010 - 11:40 am | llपुण्याचे पेशवेll

=)) =))
वेगळ्या लहरी उठल्याचे वाचून Give Some sunshine या गाण्याची आठवण झाली.
-झप्पी राहीली
हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.

योगी९००'s picture

5 Jul 2010 - 11:46 am | योगी९००

मलाही पहिल्यांदा तसेच वाटले..

कविता वाचायला उधडली आणि बोलणे चाले सदाचे, आपुलाले मनी ओठी , यावर नजर पडली, त्यामुळे खरोखर "वेगळी" कविता असावी असे वाटले.

खादाडमाऊ

पहाटवारा's picture

5 Jul 2010 - 4:55 pm | पहाटवारा

>>>कविता वाचायला उधडली
वाचायला तुम्हाला कविता 'उधडावी' का लागते ब्वा? चला पटकन शिवुन टाका बरे!
परा-टारा सारखे लोक नाहितर बघायला धावतील लगेच किषोर कि बॉबी ते.

Nile's picture

5 Jul 2010 - 4:57 pm | Nile

परा-टारा सारखे लोक नाहितर बघायला धावतील लगेच किषोर कि बॉबी ते.

=)) =)) =))

-Nile

परिकथेतील राजकुमार's picture

5 Jul 2010 - 2:33 pm | परिकथेतील राजकुमार

शिर्षक वाचुन 'आदमी हु आदमीसे प्यार करता हु' अशा टायपातली कविता असेल असे वाटले होते.
त्याच बरोबरीने कवितेला 'लेस' च्या ऐवजी 'गे' असे का संबोधले असावे हा प्रश्न पडला आहेच.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

टारझन's picture

5 Jul 2010 - 2:43 pm | टारझन

हा हा हा .. मला तर कविता सुचत होती "पप्पी पहिली"
बे पर्‍या, पुर्वी तो किषोर असुन हल्ली कविता म्हणुन वावरण्याची शक्यता णाकारता येत नाही :)

=)) =)) =))

परिकथेतील राजकुमार's picture

5 Jul 2010 - 2:47 pm | परिकथेतील राजकुमार

=)) =))

बॉबी डार्लिंग =)) =))

©º°¨¨°º© भंगारवडी ©º°¨¨°º©
आमचे राज्य

रामदास's picture

5 Jul 2010 - 2:21 pm | रामदास

आणि देव काकांनी वाचली तर नक्कीच कविता स्वरबध्द करतील.

विजुभाऊ's picture

5 Jul 2010 - 2:30 pm | विजुभाऊ

गे कविते हे शीर्षक वाचून घाबरतघाबरतच धागा उघडला.
मिपा जरा बोल्ड झाले की काय असे काहीसे वाटून गेले.

आशिष सुर्वे's picture

5 Jul 2010 - 5:59 pm | आशिष सुर्वे

कविता खरंच छान आहे..

कोण कैसे मज हसावे ? गे कविते पायी तुझ्या,

वेड घेऊन सर्व जगती, सत्य हे दावून ये .. ३

वा!!

======================
कोकणी फणस

जब हम जवां हों गे
जाने कहां हों गे

कवीतेच्या शिर्षकावर इतक्या उड्या का पडल्या हे (सालस.. निरागस.. सज्जन.. असल्यामुळे ) मला आधी कळेचिना ! आणी नंतर एकदम ट्युब पेटली !
(मी "त्या" तला नाही हो !)
आणी आता विडंबनाचा दंडुका कधी बसणार असे वाटले. >:)
असो.
रामदास जी , आशिष जी कौतुका बद्दल धन्यवाद

आपला नम्र
सागरलहरी