पहिल्या सामन्यात त्यांनी ऑस्ट्रेलियाची ४-० अशी अक्षरशः कत्तल केली, कोपर्यातून काही आवाज आले, "ऑस्ट्रेलिया काही तितकी स्ट्राँग नाही."
बरं ऑस्ट्रेलिया स्ट्राँग नाहीतर नाही, नॉकआऊट फेरीत इंग्लंडचा ४-१ असा फडशा पाडला, तर "इंग्लंड म्हणजे काय नुसती टीम ऑफ चॅम्पियन्स. ब्रिटिश मीडियाने मोठे केलेले खेळाडू ते. ती कसली स्ट्राँग टीम. छ्यॅ.." असे प्रतिवाद झाले!
मग "अर्जेंटीनापुढे कसला निभाव लागतोय जर्मनीचा.. हॅहॅहॅ.. अर्जेंटीना कच्ची खाणार आहे त्यांना.." अशा गर्जना कालपर्यंत होत होत्या!
पण ते आले, अर्जेंटीनाच्या धसमुसळ्या, रांगड्या आक्रमक खेळाला चोख प्रत्त्युत्तर म्हणून अभेद्य जर्मन वॉल उभी केली आणि स्वतः मशीन्सप्रमाणे अत्यंत पद्धतशीर खेळ करत अर्जेंटाईन तथाकथित 'तगडा' बचाव एकदोनदा नव्हे तर तब्बल चारदा भेदला! 'काऊंटरअॅटॅक म्हणजे काय आणि तो यशस्वीपणे कसा पार पाडायचा' हे त्यांनी अख्ख्या जगाला आज पुनरेकवार दाखवून दिलं. टेकनिकल अॅनालिसिस करायचा झाला, तर अर्जेंटीनाकडे बॉल पझेशन जास्त होतं अर्थात! अर्जेंटीना जर्मनीपेक्षा निश्चितच अधिक आक्रमक होते आणि जर्मनीच्या पहिल्या दोन गोल्सच्या दरम्यानची ६५ मिनीटे अर्जेंटिनाचं मॅचवर वर्चस्व होतं ही गोष्ट खुद्द जर्मन खेळाडू देखील मान्य करतील! पण एका मोक्याच्या शोधात असलेल्या जर्मन वाघांनी ती संधी मिळताच तिचं व्यवस्थित सोनं केलं आणि दुसर्या गोलनंतर अर्जेंटाईन खेळाडूंनी खांदे टाकले.
आज आम्हाला कोण का जाणे नेहमीच्या पाईंट्सऐवजी 'बड'च्या बॉटल्स घेण्याची हुक्की आली आणि टाईमर २:४० अशी वेळ दाखवत असताना, आम्ही काउंटरवर पैसे देऊन बॉटल्स हातात घेतोच म्हणेस्तोवर श्वाईन्स्टायगरच्या एका अप्रतिम फ्री-किकवर म्युलरने 'डेफ्ट टच' व्याख्या लिहिली आणि अर्जेंटिनाच्या गोलला खिंडार पाडलं! झालं बॉटल्सचा पहिला राऊंड असाच एकमेकांवर उडवण्यात गेला.. :( जर्मनी १ - ० अर्जेंटिना!
यापुढची ६५ मिनिटं वर वर्णन केल्याप्रमाणे अर्जेंटिनाने अक्षरशः वर्चस्व गाजवलं. डिमारिया, तेवेझ सुंदर फुटबॉल खेळत होते, मात्र त्यांना जर्मन वॉल भेदणं काही शक्य होत नव्हतं. ६८व्या मिनीटाला एका काउंटरअटॅकवर त्यांचे बेस्ट थ्री फॉरवर्ड्स म्युलर, पोडोल्स्की आणि क्लोस्जा यांनी अतिशय थंड डोक्याने 'एक्सिक्युशन' केलं. म्युलरनं तीन डिफेण्डर्सच्या गराड्यात असतानाही, स्वतः खाली पडलेला असतानाही पुढे लेफ्ट कॉर्नरवरून 'डी' मध्ये आलेल्या पोडोल्स्कीला अतिशय सुंदर पास दिला आणि उजवीकडून पुढे आलेल्या मिरोस्लाव क्लोस्जेकडे पोडोल्स्कीने फक्त बॉल सरकवला. त्याच्यासमोर अर्जेंटाईन गोलपोस्ट उघडा नाही चक्क नागडा होता! मग काय 'केलान काम बराबर'! ;) क्लोस्जेने आपल्या १००व्या सामन्यात आपला ५० वा, या विश्वचषकातला तिसरा, एकूण ११वा आणि कदाचित आयुष्यातला सर्वात सोपा गोल केला! आणि अर्जेंटिना इथंच संपली. जर्मनी २ - ० अर्जेंटिना!
यापुढची २२ मिनिटं फक्त बचाव करायचा होता जर्मनीला, जो त्यांनी आत्तापर्यंत चोखपणे केलेला होता! पण पुढल्या सहा मिनीटातच आणखी एक काउंटरअॅटॅक जर्मनांनी केला! यावेळेस त्यांचा फुलबॅक आर्ना फ्रीडरीक मैदानाच्या मधोमध धावत अर्जेंटिनाच्या 'डी' पर्यंत पोहोचला होता. श्वाईनस्टायगरने अक्षरशः एखाद्या वाघाने हरणाला खेळवावे तसे अर्जेंटाईन डिफेण्डर्सना खेळवत गोलच्या डाव्या बाजूने क्रॉस-इन टाकला त्याला फ्रीडरीकने व्यवस्थित दिशा दिली आणि जर्मनीसाठी आपला आयुष्यातला पहिला गोल करून अर्जेंटिनाचा आणखी एक लचका तोडला! जर्मनी ३ - ० अर्जेंटिना!
आता फक्त औपचारिकता उरली होती. अर्जेंटाईन खेळाडूंचे हरलेले चेहरे, पडलेले खांदे सगळी कथा व्यवस्थित कथन करत होते! मॅशेरानो वैतागत होता, तेवेझ चिडत होता काय काय नि काय.. जर्मन वॉल अजूनही अभेद्यच होती. दोन अर्जेंटाईन आक्रमणं झाली पण अयशस्वी! ८८ मिनिटं झाली तोवर आम्ही जर्मन विजय साजरा करत होतो! यावेळी पाईंट्स घेतल्या होत्या. शेवटचा घोट घेऊन गिलास टेबलवर ठेवतोच म्हणेपर्यंत अजून एक काउंटरअॅटॅक झाला! ओझिल, श्वाईनस्टायगर, खेदिरा आणि क्लोस्जे चौघे वारा प्याल्यासारखे धावत होते आणि समोर होते फक्त तीन अर्जेंटाईन डिफेण्डर्स! ओझिलने लेफ्टवरून एक क्रॉस इनचा गुलाबजामुन क्लोस्जेच्या ताटात आणून वाढला! आता कितीही पोट भरलं असलं तरी गुलाबजामुन खायला कोण नाही म्हणेल? आमचा टार्या आणि क्लोस्जे तर नक्कीच सोडणार नाहीत! क्लोस्जेने तो व्यवस्थित गट्टम करून टाकला! आणि इथे आम्ही बॉटल्सचा अजून एकेक राऊंड मागवून शॅम्पेनची तहान बीयरवर भागवून घेतली! जर्मनी ४ - ० अर्जेंटिना!
नाही म्हणायला अर्जेंटिनाच्या खेळात बरेच प्लस पॉईंटस होते पण हा लेख फक्त आणि फक्त जर्मनीची स्तुती याच उद्देशाने लिहिलेला असल्याकारणाने मी ते इथे लिहिणार नाही! सगळ्या विरोधकांच्या नाकावर टिच्चून जर्मनीने अर्जेंटिनाला कच्चा खाल्ला! आणि या विश्वचषकातली 'बेस्ट मॅच' खिषात घालत अंतिम चौघात मानाने प्रवेश केला! इथून पुढे जर्मनी हरली (जे होणे शक्य नाही असे दिसत आहे!) तरी आम्ही अत्यंत समाधानी असू! आमची जर्मनी उपांत्य फेरीत आहे! स्पेन, सावधान! ;)
Ich bin Deutschland, bis ich sterbe!
प्रतिक्रिया
3 Jul 2010 - 10:19 pm | गणपा
अरे आवाजSSSSSSSSSSSSSSSSSSSSS कुणाचा?
ये धत्ताड तत्ताड तत्ताड...... धत्ताड तत्ताड तत्ताड...... धत्ताड तत्ताड तत्ताड...... धत्ताड तत्ताड तत्ताड......धत्ताड तत्ताड तत्ताड......धत्ताड तत्ताड तत्ताड......धत्ताड तत्ताड तत्ताड......
फुल मार्क्स टु मॅन्यूल न्यूर. बेटयान कसले गोल अडवलेत आज. जेव्हा जेव्हा जर्मनीच्या बचावला छिद्र पडल लेकान एक हाती किल्ला शाबुत ठेवला. मेसीच्या आक्रमणातली सगळी हवाच काढुन टाकली.
बॅस्टियन श्वाईन्श्टायगर, थॉमस म्युलर, ल्युकास पोडोल्स्की आणि मिरोस्लाव क्लोस्जे या बीनीच्या खेळाडुंनी त्यांच्या लौकिकाला साजेसा खेळ करत अर्जेंटिनाच्या बचाव फळी (?) ची लक्तर गोलपोस्टवर सुकत टाकली.
बार्सिलोनाचा स्टार... दिएगो मॅरेडोनाचा हुकमाचा एक्का अहो साधी दुर्री निघाली हो तिही हुकमाची नाहीच.
समस्त जर्मन सपोर्टस् चे अभिनंदन...
सगळ्या जर्मन द्वेष्ट्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!!
डॉणराव सावध रहा ;)
3 Jul 2010 - 10:48 pm | सागर
जर्मनीचा वर्ल्डकप नक्की असे आजच्या खेळावरुन तरी वाटते आहे
फायनल हॉलंड व जर्मनी मधे... खात्रीने वाटते आहे. :)
3 Jul 2010 - 10:53 pm | मेघवेडा
कालपर्यंत अर्जेंटिनाच्या नावाच्या आरोळ्या ठोकत होता ना राव? अर्जेंटिना वि. हॉलंड अशा फायनलची म्हणे स्वप्ने पडत होती तुम्हाला? आँ? :?
झालं का दल बदलला का लगेच? ;)
3 Jul 2010 - 11:22 pm | सागर
पण त्याच प्रतिसादात मी हे पण लिहिले होते
देवा उद्या फक्त अर्जेंटीनाला जर्मनीपासून वाचव मग वर्ल्डकप अर्जेंटीनाचाच
लबाड आहेस हं... स्वतःच्या फायद्याचीच वाक्ये बरी लक्षात येतात तुझ्या अं...;)
3 Jul 2010 - 11:30 pm | मेघवेडा
नाही तेही वाचलंच पण सपोर्ट अर्जेंटिनालाच होता ना तुमचा? त्याच वाक्यातही दिसतंय की! ;) आज जर्मनीनं पिसं काढल्यावर जर्मनी जर्मनी म्हणून ओरडताय म्हणून म्हटलं. पर्सनली घेऊ नका पण मला अशा मानसिकतेची फार चीड आहे. ते टार्या, प्रभ्या बघा, आज हे हरले मग ते, रोज नवी टीम असते! ;) च्याम्मायला एक नाव धरून ठेवायचं ते नाही.. असो. तुम्ही जर्मन गोटात आलात आम्हांस आनंद आहे! यावे, स्वागत आहे! ;)
ते नायल्या कुठं उरलंय कोण जाणे.. :P
3 Jul 2010 - 11:37 pm | सागर
आणि आपण दलबदलू नाही बर का.. जर्मनी आवडीची टीम आहेच रे मेघ्या.. पण अर्जेंटीना जास्त आवडीची होती. मी पण एकनिष्ठच आहे माझ्या निवडलेल्या बेस्ट ४ टिमांशी. आणि जर्मनी की अर्जेंटीना असाच चॉईस असल्यावर अर्जेंटीना निवडली एवढीच. नाहीतर वर्ल्डकप चा ड्रॉ पाहिला नव्हता तेव्हाच जर्मनी आणि अर्जेंटीनाची फायनल स्वप्नात पहात होतो... :)
3 Jul 2010 - 11:52 pm | मेघवेडा
नाही अरे.. असंच ते जरा गम्मत म्हणून! स्वागत आहे म्हटलंय नं वर! ;)
स्वागत झाले आता स्वगत : याला गोटात घे रे मेव्या. कुठे वाद घालतोस याच्याशीच. उद्या स्पेनविरूद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी डॉन, ऋष्या, टिंग्या, आणि झालंच तर 'प्रोफेशनल दलबदलू' प्रभ्या, टार्या, नायल्या यांच्याशी होणार्या सामन्यात जर्मन कंपू मजबूत व्हायला नको का? एक तर आधीच ते बिका काय येत नाहीत. ते लांबूनच जर्मन फ्लॅग नाचवतात, कधीमधी पुपे एखादी आरोळी ठोकतात झालं. ते सहजराव तर झाडावरच जाऊन बसलेत, लुत्फ लुटतायत मस्तपैकी. आहेस फक्त तू आणि गणपाभौ, मग? सागर्यामुळे टीम स्ट्राँग होईल!
:D
4 Jul 2010 - 12:12 am | सागर
हम्म... टीम स्ट्राँगच होणार.. मी डीफेंडर म्हणून खेळायचो नव्हं ;)
ऋष्या आपला चांगला मित्र आहे बर का..
4 Jul 2010 - 11:53 am | ऋषिकेश
हॅ हॅ हॅ!
मित्र आहेच.. बाकी कोणी कसंही खेळो कोणीही येवो फक्त स्पेन जिंकणार इतकंच सांगतो :)
ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: अक्षरधूळ, लेखकः चंद्रशेखर
4 Jul 2010 - 1:08 pm | सागर
ऋष्या... अरे काल स्पेनचा खेळ पाहिला ना?
कशी कुंथत खेळत होती...
परग्वेने काय मस्त गोल मारला होता. ती ऑफसाईड होती की नाही हा वादाचा मुद्दा आहे,. पण स्पेन सेमीला येणार याची खात्री होती...
डेव्हिड विला ने परत स्पेनची मदत केली... जर्मनीने मेस्सीला जसे ब्लॉक केले होते तसे विला ला पण ब्लॉक करतील बघ ते.. विला चा मेस्सी होईन आणि स्पेन जिंकण्याची स्वप्ने विरुन जातील..
अरे मी पण अर्जेंटीनाचा भक्त... पण जर्मनीचा खेळ पाहीला आणि तेव्हाच वाटले आता स्पेनचे पण काही खरे नाही. फायनल ला जर्मनी नक्की...
थोडा वास्तववादी हो रे.... माझ्यासारखे दिवास्वप्न पाहू नकोस...
(स्पेन जर्मनीची मॅच झाल्यावर कॉमेंट्स दिल्या तरी चालतील ... तेव्हा बोलायला काहीतरी असेन ;) )
5 Jul 2010 - 1:15 pm | ऋषिकेश
ओक्के तेव्हाच बोलु..
ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: अक्षरधूळ, लेखकः चंद्रशेखर
4 Jul 2010 - 6:30 am | सहज
मेवे, फिफासामने व हे इथले सामने दोन्ही मस्त लुफ्तदायक!!
आता लुफ्त लुटतोयतच टिम लुफ्तांसा आहे समज! ;-)
फुटबॉल फिव्हर! :-)
---------
दर चार वर्षानी फिफा वर्ल्डकप व दोन वर्षानी युएफा कप सोडून फुटबॉलेत फारसा विंट्रेस नाय!
4 Jul 2010 - 2:59 pm | मेघवेडा
है शाब्बास! आता कसं बॉल्लात राव.. :)
3 Jul 2010 - 10:42 pm | श्रावण मोडक
छान रे...
काल आणि आज मला मिळालेलं एक ज्ञान म्हणजे एकूण मॅचच महत्त्वाची असते. मधली पासष्ठ मिनिटे नाहीत की पहिला हाफ किंवा दुसरा नाही. आजच्या त्या पासष्ठ मिनिटांत काय अर्जेंटिनाच्या चढाया झाल्या नाहीत? झाल्या की. पण शेवटी ते फिनिशिंगही लागतंच. शेवटच्या टप्प्यात अर्जेंटिनाच्या दोनेक हिट्स जर्मनीच्या गोलीच्या हाती गेल्या सरळ, बेट्याने निवांत छातीपाशी बॉल धरला. कालच्या ब्राझीलच्या तुलनेत आज तर अर्जेंटिनाकडं कलाही अधिक दिसत होती, तरीही जर्मनीनं थंड डोक्यानं काम केलं. दोघांकडेही पासिंगची, टॅकलिंगची स्ट्रेन्ग्थ आजच्या खेळात सारखीच दिसली, तरीही चेंडूवर अर्जेंटिनाचा ताबा अधिक होता. मग ते कमी पडले कुठे? किंवा जर्मनी सरस ठरली कुठे? तो फिनिशिंगचा भाग येतो तिथं. इथं मी त्याला दैव वगैरे मानत नाही. जर्मनीच्या खेळातून दैव कुठंही दिसत नव्हतं. खेळाडू एका प्लॅननुसार खेळले. त्यालाच आपण एरवी मोक्याच्या वेळी ते हवे तिथे होते, असे म्हणत असतो. अर्जेंटिना हरली नाही, जर्मनी जिंकली. मी त्यालाच महत्त्व देतो. कालही असंच काहीसं झालं ब्राझील-हॉलंड सामन्यात. कदाचित धसमुसळेपणाला ब्राझीलनं थोडी कलेची, त्या फिनिशिंगची जोड दिली असती तर कदाचित तो सेल्फ गोलही टळला असता. हे फिनिशिंग म्हणजे केवळ चेंडू गोलपोस्टपाशी आल्यानंतरचं असत नाही. एखाद्या चालीचा पहिला टप्पा सुरू होतो तिथंही ते लागतंच.
3 Jul 2010 - 10:47 pm | मेघवेडा
>> अर्जेंटिना हरली नाही, जर्मनी जिंकली
सहमत आहे! खरंच. कट्टर अर्जेंटाईन फॅन्सकडून 'नशीब बलवत्तर म्हणून जर्मनी जिंकली' असले युक्तिवाद होणे आहेच! पण खरंच ते 'फिनिशिंग' हाच या दोन संघांना वेगळं करणारा मुद्दा ठरला! जेव्हा असे दोन तुल्यबळ संघ भिडतात तेव्हा सामना एकतर्फी आणि म्हणून रटाळ (अटेन्शन : डान्राव) ;) होण्याची शक्यता असते! पण आजची स्कोअरलाईन जरी एकतर्फी असली तरी सामना एकतर्फी आणि रटाळ नक्कीच नव्हता! मजा आवी गयो!
3 Jul 2010 - 11:41 pm | पुष्करिणी
खरच मजा आवी गयो...
कालचा घाना-पराग्वे सामनाही उच्च होता...
पुष्करिणी
3 Jul 2010 - 11:54 pm | मेघवेडा
अर्र्रं.. अंमळ गल्ली चुकलं काय वो? पराग्वे आज खेळते स्पेनबरोबर! काल जिंकले ते उरुग्वे होते! असो. सामना तोही उच्चच होता, फक्त शेवटची काही मिनिटे! :D
3 Jul 2010 - 11:56 pm | पुष्करिणी
सहमत्...आता टीव्ही बघत बघत लिहितेय म्हणून' स्लिप ऑफ की ' झाली बघा..
पुष्करिणी
4 Jul 2010 - 1:55 pm | संजय अभ्यंकर
श्रामोंची उताम प्रतिक्रिया!
२०१० फिफा विश्वचषकात अजेंटिनाचा दारुण पराभव झाला. आजच्या धुसमुसळ्या खेळाच्या काळात मनमोहक खेळ करणारा संघ गारद झाला.
प्रचंड दु:ख झाले. ह्या विश्वचषकातील पुढच्या सामन्यांत हा संघ दिसणार नाही, ह्याचेही दु:ख आहे.
एखादा संघ अथवा खेळाडू महान ह्या संज्ञेस पात्र होण्यासाठी अत्यंत कठिण प्रसंगी करावयाचा खेळ ते दाखवू शकले नाहीत.
हा सामना EPIC ह्या सदरात कधीच मोडणार नाही व लवकरच विस्मॄतित जाईल.
ह्या सामन्यात जर्मनीने मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने केले. दोन गोल केल्यानंतरही ते न ढिलावता गोल करतच राहीले.
जर्मनीचे कौतुक करावे तेवढे थोडेच. परिस्थीती जितकी प्रतिकुल तितका जर्मनीचा खेळ बहरतो हे अनेकदा दिसुन आले आहे.
अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत विजयश्री खेचून आणणारे खेळाडू वा संघ महान ठरतात व दीर्घकाळ स्मरणात रहातात.
आपण पहात असलेला खेळ आपल्यावर परीणाम करीत असतो. आपले विचार व व्यक्तिमत्व घडवीत असतो असा माझा अनुभव आहे.
म्हणुन विषयांतराचे भय असूनही मला स्म्रणात राहीलेले खेळाडू व संघ मी खाली देत आहे.
१) ग्रेग लुगानीज-अमेरिका: हा डाईव्हर १९८८च्या ऑलिंपीक संघात डॅडी म्हणुन ओळखला जाई तो केवळ वयाने जेष्ठ म्हणुन नव्हे तर दीर्घकाळ करित असलेल्या सर्वोत्तम कामगीरीमुळे.
१९८८च्या ऑलिंपीक मध्ये प्रथम फेरीत स्प्रींगबोर्डवर त्याचे डॉके आपटले व डोक्यास टाके पडले. परंतु त्यामुळे माघार न घेता, अंतिम डाईव्हिंग मध्ये त्याने प्रथम क्रमांक व सुवर्ण पदक मिळवले. अंतिम डाईव्ह मारुन आल्यावर डॅडी आपल्या प्रशिक्षकाच्या खांद्यावर डोके टेकून रडला. संपूर्ण स्पर्धेत तो किती मानसिक ताणावातुन गेला असेल, हे हि घटना सांगुन जाते.
२) मायकल जॉर्डन-Chicago Bulls: १९९१ ते १९९८ पर्यंत ह्याच्या संघाने सहा NBA Titles जिंकल्या. कोच फिल जॅक्सन व साथी खेळाडू स्कॉटि पिप्पेन ह्या त्रिकुटाने अत्यंत कठिण प्रसंगी पराभवाच्या गर्तेतुन शिकागो बुल्सना बाहेर काढले.
एकदा सामना संपायला १.७ सेकंद बाकी असताना ह्या संघाने पॉइंट स्कोर करुन विजय मिळवला.
Utah Jazz व Indiana Pacers सारख्या मातब्बर संघांना कित्येक सामन्यात शेवटच्या काही सेकंदांत मात दिली.
अशाच एका सामन्याला शेवटच्या सेकंदांत कलाटणी दिल्यानंतर समालोचकाची प्रतिक्रिया बरच काही सांगुन जाते "In such(tense) situations, MJ is Cold Blooded Executioner"
३) मायकल शूमाखर्-जर्मनी: सुरवातीचे काही सिझन जॉर्डन व बेनेट्टोन संघात काढल्यानंतर शुमाखर फेरारित दाखल झाला. प्रत्येक ड्रायव्हरचे स्वप्न असते की आयुष्यात एकदातरी फेरारि चालवायला मिळावी. मायकल फेरारिला मिळाला तेव्हा फेरारिची परिस्थीती वाईट होती. त्यांची कार संपूर्ण रेस सहसा पूर्ण करू शकत नसे.
मायकल हा केवळ अलौकिक ड्राईव्हर नाही तर त्याला कार बद्दल तांत्रिक माहीतीही उत्तम आहे. मायकल व फेरारिचा त्या वेळचा संघ प्रमुख रॉस ब्राऊन ह्यांनी मिळून कार मध्ये अनेक सुधारणा केल्या. फेरारिसाठी त्याने लागोपाठ पाच फोर्म्युला वन चँपियनशीप जिंकल्या. (त्या पुर्वी बेनेट्टोन साठी त्याने दोन चँपीयनशिप्स जिंकल्या होत्या).
एकदा त्याने शेवटच्या क्रमांकावरून रेस सुरु करून जिंकली होती. तर एकदा रेस संपायला दोन फेर्या बाकी होत्या आणि मायकलला 10 seconds Pit Stop पेनल्टि मिळाली.
स्पर्धेच्या नियमानुसार पेनल्टि मिळाल्या पासुन तीन फेर्या व्हायच्या आत पेनल्टि पूर्ण करणे आवश्यक होते. मायकल आघाडीवर होता. त्याने प्रथम रेस पूर्ण केली (जिंकली) नंतर विजयी फेरी मारून तो पीट मध्ये आला व पेनल्टी पूर्ण केली. नियमही मोडला नाही आणि रेसही जिंकली. ३०० की. मी. वेगाने कार चालवताना त्याने प्रसंगावधान दाखवले.
त्याला Raining Champion असेही म्हटले जाते. हवामान बदलाचा अचुक अंदाज घेण्याची व त्यानुसार कारचे Aerodynamics सेट करणे व टायर निवडणे ह्यात त्याची ख्याती आहे. त्याने अनेक रेसेस भर पावसात जिंकल्या आहेत. एकदा पावसात मिका हाकिनेन (फिनलेंड) ला शेवटच्या फेरीत त्याने मागे टाकले व रेस जिंकली.
अत्यंत कठीण प्रसंगी जे खेळाडू अथवा संघ आपल्यातले सर्वोत्कृष्ट: कौशल्य, शारिरिक क्षमता, संयम व क्षणार्धात निर्णय हे गुण प्रकट करतात ते आपल्याला स्फुर्ती देऊन जातात व दीर्घकाळ स्मरणात रहातात.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
4 Jul 2010 - 1:58 pm | टारझन
भारी प्रतिसाद आहे संजयराव ;)
3 Jul 2010 - 11:09 pm | टारझन
आता , आमचा पैसा हॉलंडवर :)
कोण जर्मणी ? धन्यवाद :)
3 Jul 2010 - 11:18 pm | अभिषेक९
दिएगो ची लाज काढली...
3 Jul 2010 - 11:38 pm | मेघवेडा
असहमत आहे. वरचा श्रामोंचा प्रतिसाद वाचा. अर्जेंटीना अजिबात वाईट खेळली नाही. असो.
4 Jul 2010 - 2:04 am | गणपा
>>दिएगो ची लाज काढली...
अहो अभिषेकराव लाज काढली नव्हे लाज राखली म्हणा...
नागडा फिरणार होता ना तो ;)
3 Jul 2010 - 11:37 pm | पुष्करिणी
Eins, zwei, drei and fear अर्जेंटिना fear ....
पुष्करिणी
3 Jul 2010 - 11:44 pm | निखिल देशपांडे
अरे मला आभार द्या रे!!! :-)
मी आज पर्यंत ज्यांना ज्यांना सपोर्ट केला ते ते हरले आहेत.. हे नक्कीच खरे आहे... आजवरचा विदा तरी हेच दाखवतो... आज अर्जेंटिनाला सपोर्ट केला :(
जोक्स अपार्ट, जर्मनी सॉलिड खेळला. वर जे श्रा मो म्हणतात तसे फिनिशिंग जबरा होते.
असो आता मुख्य प्रश्न रात्री स्पेन ला सपोर्ट करावा का पराग्वे ला!!!
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
3 Jul 2010 - 11:58 pm | मेघवेडा
हा हा हा! तुमचं सपोर्ट करणं आणि त्या टीमचा पराभव जर को-इन्सिडन्स नसेल तर आज स्पेनला सपोर्ट करू नका मालक! आम्हाला उपांत्य सामन्यात स्पेन हवीये! ;)
4 Jul 2010 - 12:54 am | निखिल देशपांडे
आम्ही पराग्वेलाच सपोर्ट करत आहोत..
फस्ट हाफ झालाय.. अजुन तरी स्पेनला रोखलय..
बघु काय होते ते
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
4 Jul 2010 - 1:54 am | निखिल देशपांडे
पराग्वे हरले :(
आजचा स्पेनचा खेळ पाहुन मी जाम प्रभावित झालोय..
पुढच्या मॅचला आता नक्की स्पेन ला सपोर्ट करणार ;)
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
4 Jul 2010 - 1:57 am | मेघवेडा
शाब्बास! तुमचं सपोर्ट करणं आणि तो संघ हरणं हा को-इन्सिडन्स नाहीतर! करा करा स्पेनलाच सपोर्ट करा! तुम्ही स्पेनला सपोर्ट करावा यासाठी आमचा तुम्हाला सपोर्ट! ;)
4 Jul 2010 - 2:00 am | निखिल देशपांडे
ओ जास्त ओरडु नका...
आजचा स्पेन चा खेळ पाहिला ना...
आपल्याला तर आवडला.. मनापासुन सपोर्ट हारणार नाही यावेळेला स्पेन
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
4 Jul 2010 - 2:07 am | मेघवेडा
खेळ आवडला? बोथट आक्रमणं आवडतात काय वो तुम्हाला?
4 Jul 2010 - 2:09 am | छोटा डॉन
अहो प्रतिस्पर्ध्याला एवढे कच्चे समजु नये.
साधा नियम आहे हो हा स्पर्धेचा आणि युद्धाचा ;)
------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
4 Jul 2010 - 2:13 am | गणपा
आम्ही आम्चे बरेच पत्ते ओपन करुन खेळलो आहोत.. (काउंटर अॅटक.. जसे इंग्लंडाला पाणि पाजल तसच आज अर्जेंटिनालाही)
काही बोध घ्याय्चा असेल तर घ्या;)
4 Jul 2010 - 2:15 am | मेघवेडा
अर्थात बाडीस!
स्वगतः त्या मकेच्या पहिल्या दुसरीतल्या पोरांसारख्या दाव्यांना उत्तर देण्यापेक्षा गणपाच्या प्रतिसादास बाडिस होणे केव्हाही चांगले, कसें? ;)
4 Jul 2010 - 2:19 am | छोटा डॉन
पुढच्या मॅचला त्या ४-० च्या नशेतच येणार काय ?
त्याच काय आहे की नवा सामना सुरु झाली की स्कोर ०-० असा करतात.
हे आपलं उगाच तुमच्या माहितीसाठी. ;)
काय तर म्हणे ४ गोल केले.
काय झालं मग, सेमीजलाच गेलात ना ?
अहो आमचे स्पेन मात्र १ गोल करुन गेले, आहात कुठे ?
------
छोटा डॉन
4 Jul 2010 - 2:11 am | मस्त कलंदर
कसले रे बोथट आक्रमण? तसा पॅराग्वेचा डिफेंड नि मुख्य म्हणजे त्यांचा गोलकीपर चांगला होता.
एक मात्र खरे.... की स्पेनने मॅचभर बॉलचा ताबाच मुळी सोडला नाही...
आणि त्या रडव्या रेफरीने उगाच काहीतरी नियमांचा आधार घेत पेनल्टीचा गोल दिला नाही.. छे:!!!
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
4 Jul 2010 - 2:12 am | मेघवेडा
हॅहॅहॅ! हॉप्पी बड्डे वो तुमाला! ;)
4 Jul 2010 - 2:19 am | मस्त कलंदर
ए पळ्ळे.. स्वतःकडे पटवून देण्यासारखे मुद्दे नसले की असे होते हो....
तुलापण वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!! :P
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
4 Jul 2010 - 2:25 am | मेघवेडा
>> स्वतःकडे पटवून देण्यासारखे मुद्दे नसले की असे होते हो....
हे डान्याला सांग.. त्याचं झालंय तसं :P
4 Jul 2010 - 1:58 am | छोटा डॉन
आम्ही आज जिंकलो आणि सेमीज ला आलो.
विषय संपला.
मॅच जिंकणे आवश्यक होते, टास्क अकंप्लिश्ड !
------
(स्पॅनिश)छोटा डॉन
4 Jul 2010 - 1:59 am | मेघवेडा
बर्बरं.. तुका म्हणे त्यातल्या त्यात! :P
4 Jul 2010 - 2:01 am | गणपा
=))
हाबिणंदन हो डॉनराव साला एकदाची गाठ भेट होणार...
सगळे गैरसमज दुर होणार तुमचे ;)
4 Jul 2010 - 2:04 am | छोटा डॉन
>>सगळे गैरसमज दुर होणार तुमचे
+१, असेच म्हणतो.
या एकदा आमच्या गरिबाच्या सेमीजमध्ये.
------
छोटा डॉन
4 Jul 2010 - 2:05 am | निखिल देशपांडे
या एकदा आमच्या गरिबाच्या सेमीजमध्ये.
+२
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
4 Jul 2010 - 2:05 am | मेघवेडा
हॅहॅहॅ.. पहिल्यांदा सेमीजपर्यंत पोहोचलात म्हणून गरीब काय? ;)
4 Jul 2010 - 2:02 am | छोटा डॉन
मॅच १-० ने जिंकु काय आणि ४-० ने, दोन्ही टीम आहेत ना सेमीजला.
अर्थात जर्मन भारी खेळले हे मान्य.
पण १-० काय कमी नाय आणि ४-० ने जिंकुन तुम्ही काय डायरेक्ट फायनलला गेला नाहीत ना ?
विषय संपल मग !
------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
4 Jul 2010 - 2:05 am | मेघवेडा
छ्याट पण पॅराग्वेने पण रडवला तेज्यायला.. आणि काय तो गोल राव.. दोन वेळा ऑफ द पोस्ट! छ्या.. नेहमीची धार जाणवली नाही स्पॅनिश आक्रमणात.
4 Jul 2010 - 2:08 am | छोटा डॉन
>>छ्याट पण पॅराग्वेने पण रडवला तेज्यायला..
टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही म्हणतात.
असो.
>>आणि काय तो गोल राव.. दोन वेळा ऑफ द पोस्ट!
गोल हा गोल असतो, असो, कळेलच फुडच्या मॅचला.
>>छ्या.. नेहमीची धार जाणवली नाही स्पॅनिश आक्रमणात.
खरे आहे, आज जरा आम्ही राखुनच खेळलो हो.
बघु की पुढे, अहो आजपत्तुर आमचा एकटा व्हिलाच खेळला आहे, सगळेच खेळले तर काय राहिल का समोरह्च्याचे ?
------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
4 Jul 2010 - 2:10 am | मेघवेडा
बाकी काही असेना का, आपल्याला तुमचा फुकाचा आत्मविश्वास लैच आवडतो डान्राव! ;)
4 Jul 2010 - 2:21 am | छोटा डॉन
असो असो.
चला, आम्ही झोपतो आहे.
शुभरात्री !!!
------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
4 Jul 2010 - 2:24 am | मस्त कलंदर
माझा पण अर्धविराम.... बरे झाले कालच्या सारखे पेनल्टी शूट मध्ये गेला नाही सामना..
सगळ्यांना शुभरात्री!!!!
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
4 Jul 2010 - 2:28 am | गणपा
>>बरे झाले कालच्या सारखे पेनल्टी शूट मध्ये गेला नाही सामना..
=)) यातच आल सगळं =))
4 Jul 2010 - 2:30 am | मेघवेडा
=)) =))
हा हा! पुन्हा बाडीस!
4 Jul 2010 - 10:02 am | मस्त कलंदर
मान्य आहे रे पेनल्टी शूट आउट मध्ये गेला असता तर आणखी मजा आली असती.. पण पहाटे साडेतीन वाजता झोप येते ... अशा वेळेला झोपावं पण वाटत नाही.. नि नंतर त्या एक्साईटमेंट मुळे झोपही लागत नाही...
आता कळ्ळं??? उगाच स्वत:ला अतिशहाणे समजू नये माणसाने... :P (हे फक्त मेव्यासाठी हं)
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
4 Jul 2010 - 2:51 pm | मेघवेडा
गणपाशी बाडिस होणं म्हणजे स्वतःला अतिशहाणे समजण्यासारखं आहे होय.. तरीपण मी गणपाशी बाडिस!
4 Jul 2010 - 2:09 am | गणपा
>>पॅराग्वेने पण रडवला तेज्यायला..
मेव्याशी बाडिस
साला स्पेन सारख्या टिम कडुन ४:० नाही पण २:० चि अपेक्षा ठेवली होती राव.
4 Jul 2010 - 2:14 am | छोटा डॉन
एक जोक सांगतो मेघ्याशेठ.
अशीच उगाच २ अंडी टीपी करत बसली असतात गच्चीवर ..
त्यातला एकाला काय हुक्की येत काय माहित पण ते वरुन धाडकन उडी मारते खाली पण तरीसुद्धा फुटत नाही.
का ?
कॉन्फिडन्स !
दुसरे अंडे येडे असते, ते पण उगाच फॉर्मफॉर्ममध्ये उडी मारते वरुन आणि कपाळमोक्ष करुन घेते.
का ?
ओव्हर कॉन्फिडन्स !
बघा, तुमचे दुसरे अंडे होऊ देऊ नका म्हणजे झाले !
------
छोटा डॉन
4 Jul 2010 - 2:19 am | मेघवेडा
हॅत्तिच्या आम्ही अजून जर्मनी-स्पेन बद्दल काही बोल्लोच आहोत कुठे? बाकी खरी गोष्ट सांगायची तर तुमचं स्पेन जरा ओव्हरकॉण्फिडण्टच वाटत होतं आज. जरा जास्तच लाईटली घेतलं त्यांनी पॅराग्वेला. :)
4 Jul 2010 - 2:15 am | निखिल देशपांडे
छ्याट पण पॅराग्वेने पण रडवला तेज्यायला..
आमच्या पराग्वेला का कमी लेखता???
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
4 Jul 2010 - 2:16 am | छोटा डॉन
आदमी अक्सर जोश मे होश खो बैठता है !
बाकी असो.
------
छोटा डॉन
3 Jul 2010 - 11:59 pm | टारझन
२०१४ च्या वर्ल्डकप ला "पराग्वे" आणि "टाराग्वे" चं फायनल ला जाणार बरं का ? =)) च्यायला यंदा आमची टिम क्वालिफाय होता होता राहिली :) खेळाडूच नव्हते ... कोण कुठे धसं खंदायला गेलेला .. असो गोळा करु पुढच्या वेळी ;)
बाकी "एकणिष्ठ" सपोर्टर्स पाहिलं की वाटतं च्यायला हे तर फुड्बॉलमधले सखारम गटणे (पुलंवाले गटणे, मसंवाले नाही !! )
4 Jul 2010 - 8:27 am | सुधीर काळे
जकार्तात आम्हाला जिथून पुनःप्रक्षेपण दाखवितात तेच इतरत्र दाखवितात कीं नाहीं हे मला माहीत नाहीं, पण काल मॅच संपत आल्यावर माराडोनाच्या ज्या छब्या एकापाठोपाठ एक अशा दाखविल्या गेल्या, त्याही चार-पाच वेळा, त्या पाहून त्याच्या यातना सगळ्यापर्यंत पोचल्या. पहिल्या चित्रात मोठ्ठा 'आ' करून ओरडणारा, मग कपाळाला हात लावलेला, मग तिसर्या चित्रात डोळ्यांवर पंजा धरलेला व शेवटी कांहींही न करता 'हे कसे काय झाले' अशी भावमुद्रा चेहेर्यावर ठेवून धीरगंभीर उभा असलेला अशा माराडोनाच्या प्रतिमा पाहून फार वाईट वाटले.
एका प्रतिसादात लिहिलेले पटले. जर्मनीच्या 'गोली'नेच जर्मनांना मॅच जिंकून दिली! त्याचे anticipation, agility सगळेच पहाण्यासारखे होते. किती सुंदरतेने गोल अडविले त्याने!
उद्या जर जर्मनीने उपांत्य व अंत्य फेरीत बाजी मारली तर नॉयर (Neuer) या गोलीलाच Man of the tournament चा किताब द्यायला हवा असे मला वाटते!
जाता-जाता: भारतात क्रिकेटचे जसे वेड आहे तसे इथे फुटबॉल व बॉक्सिंगचे वेड आहे. माझे इंडोनेशियातील मित्र मला रोज म्हणायचे की अंत्य सामना ब्राझिल व अर्जेंटीनातच होणार. पण ते त्या धक्क्यातून अद्याप बाहेर आलेले नाहींत. ४-० हा स्कोअर तर त्यांना गिळवतच नाहींय्!
जय हो.
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: http://tinyurl.com/234ku9g (प्रकरण नववे)
4 Jul 2010 - 10:52 am | वेताळ
कालचा ४-० हा आमचा विजय इतका मोठा आहे कि त्यासमोर स्पेनचा टुकार १-० काय कामाचा.जर्मनी काल अगदी आखिव रेखिव पध्दतीने खेळला.ज्यावेळी बॉल जर्मन खेळाडुंकडे येत होता त्यावेळी अगदी सुरेख छोटे छोटे पासेस देत त्यानी अर्जेटिनावर ४ गोल केले.याउलट अर्जेटिना खेळाडु ,बॉल पायात आला कि एकएकटे जर्मन गोलपोस्ट कडे धावायला सुरुवात करायचे व शेवटी थकुन तसाच बॉल गोलकिपर कडे टोलवायचे.इथेच सामन्याचे चित्र स्पष्ट झाले.
पोड्स्कीला २ गोल च्या संधी होत्या पण त्याने आपला तोल सावरत ते पास गोलपोस्टकडे ठकलले त्यावर जर्मन खेळाडुनी सुरेख गोल केले.
फुटबॉल टीमवर्क चा गेम आहे. एकादा दुसरा स्र्टायकर आपल्या टीम ला विजय मिळवुन देण्यास समर्थ नसतो हे पुन्हा मेस्सीने सिध्द केले.
जर्मनीचा विजय होणार हे पेले व जॉन ने मॅच आधीच सांगितले होते.
ह्यातला पेले सर्वाना माहित आहेच ,आता हा जॉन म्हणजे जर्मनी मधला एक ऑक्टोप्स आहे. तो जो देश जिंकणार आहे त्या देशाच्या ध्वजाला वेटोळे घालतो.ज्यावेळी जर्मन व अर्जेटिना ध्वज त्याच्या जवळ ठेवले होते त्यावेळी त्याने जर्मन ध्वजावर चक्क उडी घेतली होती.
आता पुढच्या फेरीत जर्मनीशी लडायला कोणतीही चांगली टीम शिल्लकच राहिली नाही त्यामुळे कप हा जर्मनीचाच.
सगळे विजय ४ गोल मारुनच केले आहेत १ गोल फक्त प्रतिस्पर्धी टीमवर करुन नाही हे स्पेनवाल्यानी लक्षात ठेवावे.
वेताळ
4 Jul 2010 - 11:35 am | स्वाती दिनेश
कालची म्याच लय धम्माल झाली.. पहिली म्याच बर्र का अर्जेंटिना वि जर्मनी..
त्यात आमच्याबरोबर आमचे जर्मन मित्र चिकनचिली, मटरपनीर इ. इ. बरोबर गोल्डस बेक चा समाचार घेत म्याच बघत होते आणि इकडे डॉइशं मानशाफ्ट माराडोनाच्या अर्जेंटिनाचा समाचार घेत होते.. टोअर म्हणजे गोल झाला की टाळ्या, शिट्ट्या... वूवूझेला !!!! धम्माल नुसती, घराचे अगदी स्टेडियम जरी नाही तरी गेला बाजार स्पोर्ट्सबार नक्की झाला होता.
आजूबाजूच्या घरातला आरडाओरडाही ऐकू येत होताच आणि मॅच जिंकल्यावर तर सगळे रस्त्यावरुन वेगाने गाड्या हाकत हॉर्न वाजवत झेंडे फडकवत चाल्ले होते.लय धमाल आली!!
नंतरची स्पेन वि पराग्वे मात्र बोअरिंग झाली, अगदीच पिचपिचित! शेवटी एकदाचे स्पेन गेले पुढे...वाटत होते यांनाही १५+ १५ मिनिटे जास्तीची मिळून परत पोझिशन जैसे थे! करत पेनल्टी किका मारण्यापर्यंत बघायला लावणार की काय? पण एकदाचा गोल केला बाबा त्या व्हिलाने आणि वाचवले बाबा स्पेनला!
आता बुधवारी गाठ जर्मनीशी आहे! बघू या आगे आगे होता है क्या?
स्वाती
4 Jul 2010 - 12:00 pm | ऋषिकेश
जर्मनीत राहून जर्मनीने अर्जेंटिनाला हरवल्यानंतरचा जल्लोष बघण म्हंजे धमालच आहे.
स्वगतः बरं झालं तै ने तो जल्लोष बघून घेतला ते.. आता स्पेनच्या म्याचनंतर नाहि करता आला जल्लोष तर वाईट नको वाटायला ;)
ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: अक्षरधूळ, लेखकः चंद्रशेखर
4 Jul 2010 - 1:04 pm | स्वाती दिनेश
स्वगतः बरं झालं तै ने तो जल्लोष बघून घेतला ते.. आता स्पेनच्या म्याचनंतर नाहि करता आला जल्लोष तर वाईट नको वाटायला
बुधवारी बघू या हं ऋ...
time will tell............... :)
स्वाती
4 Jul 2010 - 12:12 pm | वेताळ
दिवसा स्वप्न बघण चांगल नसत......... ;)
स्वगतः बरं झालं तै ने तो जल्लोष बघून घेतला ते.. आता स्पेनच्या म्याचनंतर नाहि करता आला जल्लोष तर वाईट नको वाटायला
कल कि मॅच तो एक ट्रेलर था
पुरी पिक्चर अभी बाकी है.
चार वर भागल तर ठिक आहे :D >:)
नाहीतर लालच आहे.....
वेताळ
4 Jul 2010 - 1:10 pm | तिमा
सर्व भिडु लोकांना नमस्कार. फुटबॉल हा आमचा प्रांत नाही. मॅचेस बघायला अतिशय आवडतात. पण अधिकारवाणीने लिहिणे जमणार नाही. पण काल जी जर्मनीची करामत बघितली त्याचे वर्णन वरील लेखात वाचताना पुनरप्रत्ययाचा आनंद मिळाला.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
4 Jul 2010 - 7:22 pm | अनिल हटेला
अगदी मनातलं बोललात माणुसघाणे साहेब !!
आम्ही सुद्धा आवर्जुन दोनच मॅचेस पाह्यल्या
१) जर्मनी वि. इंग्लंड -- जर्मनी विजयी..........:)
२) जर्मनी वि. अर्जेंटीणा -- जर्मनी विजयी .....:D
आमचे घोडे अर्थात जर्मन्सवर ......
:)
बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
АНИЛ ХАТЕЛА :D
5 Jul 2010 - 1:09 pm | जे.पी.मॉर्गन
वर म्हटल्याप्रमाणे जर्मनी निर्विवाद सर्वोत्कृष्ट संघ आहे ह्या वर्ल्डकपचा. "फिनिशिंग" इतकंच त्यांचा भक्कम बचाव आणि मिडफील्डशी आक्रमक आणि बचापटू - दोन्हींचा अफलातून समन्वय हे त्यांच्या खेळाचे हायलाइट्स म्हणावे लागतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे "टीम" म्हणून खेळणारी येवढीच लोकं आहेत... तो पोडोल्स्की स्वतःला गोल मारण्याची ६०% संधी असताना बिनधास्त १००% संधी असणार्या क्लोसासाठी गोल "सेट-अप" करतोय... आपल्या गोलपोस्टपाशी खत्तरनाक "ब्लॉक" करणारा लाम साधारण १३ सेकंदांनी खाटकानी मटण चिरावं तसा समोरचा बचाव चिरत समोरच्या गोलपोस्टवर घिरट्या घालत असतो.... श्वाइनस्टायगर, मोलर आणि ओझिल लांङग्यांनी चावून चावून हैराण करावं तसे आपल्या "रन्स" नं प्रतिस्पर्धी बचावाच्या नाकी नऊ आणतायत.... खेदीरा, बोटेन्ग, फ्रीडरिच.. कोणीही कुठेही आणि कसेही घुसताहेत! आणि हे सगळं करतांना बचाव मात्र कुठेही कमी पडत नाहिये... अगदीच काही झालं तर "लास्ट मॅन स्टँडिंग" आहेच!!!
गेल्या दोन सामन्यात जर्मनीनी जो खेळ केलाय त्याला तोड नाही. आमचं ब्राझील हारल्यावर आम्ही आता तटस्थपणे खेळाचा लुत्फ लुटतोय आणि जर्मनीचा खेळ बघून आपले पैसे (बीअर आणि स्नॅक्सचे ;)) एरवीच वसून झालेले आहेत! शेवटी एकट्यानी आपलं कौशल्य दाखवणार्या मेसी, रॉबीन्हो, ककापेक्षा "एकत्र" खेळणारे जर्मन्स कधीही सरस!!! जर्मनी अशी खेळत असताना स्पेनला (किंवा फायनलला हॉलंडलासुद्धा) त्यांच्यापेक्षा भारी खेळावं लागेल आणि तसं झालं तर फुटबॉल शौकीन म्हणून आपला फायदाच आहे! ;)
जे पी