स्पेन वि. पोर्तुगाल ....

छोटा डॉन's picture
छोटा डॉन in विशेष
29 Jun 2010 - 7:02 pm
फिफा२०१०

अजुन ४ तासांचा अवकाश , रणशिंग फुंकले जाणार ...
जर्मनी वि. इंग्लंड ह्या मॅचपेक्षा अधिक रंगतदार मॅच असणार की त्यातली एक टीम डायरेक्ट समोरच्याला भुईसपाट करणार ?

विरुद्ध

स्पेन : फिफाच्या जागतीक क्रमवारीतला 'नंबर २' चा संघ
पोर्तुगाल : फिफाच्या जागतीक क्रमवारीतला 'नंबर ३' चा संघ

स्पेन : डेव्हिड व्हिया, टोरेस, शॅबी, झॅवी, इनियेस्टा, फॅब्रिगास, पुयॉल, सॅकियो रॅमॉस आणि खुद्द इकर कॅसिलास अशी कागदावरची दमदार फळी
पोर्तुगाल : जगातला सगळ्यात महागडा आणि आपल्या किमतीचे पुरेपुर योगदान देणारा 'क्रिस्तियानो रोनाल्डो', टियागो, डेको, राऊल मैरेलेस, पाऊलो फरेरा, रिकार्डो काल्व्हालो असा संतुलीत संघ

स्पेन : ह्यावेळेसचे 'फेव्हरिट्स ( हे माझे एकट्याचे वैयक्तिक मत नव्हे)'. बास !
पोर्तुगाल : जगातल्या १ नंबरच्या आणि ह्या वर्ल्डकपमध्ये भयंकर फॉर्मात असलेल्या 'ब्राझिल'ला रोखण्याचा व आयव्हरी कोस्टाला हरवुन व उ. कोरियाचा ७-० ने फडशा पाडुन दिमाखात दुसरी फेरी गाठणारा संघ, ह्यांच्याकडुन 'चमत्कारा'ची अपेक्षा ठेवणे नक्कीच व्यर्थ नाही.

ताकद :
स्पेन : भयंकर फॉर्मात असलेला डेव्हिड व्हिला आणि त्याच्या बरोबरीने मिडफिल्डमध्ये धुमाकुळ घालणारा इनियेस्टा आणि त्यांना 'बॅक' वरुन रसद पुरवणारा सॅकियो रॅमॉस. शिवाय नेहमीचे ओलेन्सो, झॅवी, फॅब्रिगास असे यशस्वी कलाकार.
पहिल्या मॅचचा अपवाद सोडता स्पेनच्या डिफेंड लाईन आणि कॅसिलासने आत्तापर्यंत प्रतिपक्षाची सर्व आक्रमणे यशस्वीपणे थोपवली आहेत.
आज जर 'टोरेस' खेळला तर ते ट्रंप कार्ड आणि बोनस असेल
पोर्तुगाल : क्रिस्तियानो रोनाल्डो !!!!! खल्लास.
५-६ जणांना चकवुन रोनाल्डोने बॉल अगदी पायात आणुन ठेवल्यास टियागो, राऊल, डॅनी नक्की गोल मारणार.
पाऊलो फरेरा आणि रिकार्डो कार्व्हालो हे अनुभवी आणि बराच काळ एकाच संघातुन खेळलेले डिफेंडर्स. साखळी सामन्यात ह्यांनी केवळ '१ गोल स्विकारला' आहे त्यामुळे बचावाबाबत प्रश्नच नाही.

त्रासदायक ठरु शकणार्‍या बाबी :
स्पेन : नेहमीचाच प्रॉब्लेम, ऐनवेळी कच खाणारे स्ट्रायकर्स, टोरेस सध्या अजिबात कॉन्फिडंसमध्ये नाही. मॅच एक्स्ट्रा टाईममध्ये गेल्यास इनियेस्टा, झॅवी, ओलेन्सो आदींच्या फिटनेसचा प्रश्न येउ शकतो. प्रत्येक मॅचमागे २५-३० शॉट्स ऑन-टार्गेट मारुनपण गोलची संख्या काही वाढत नाही, क्लिनिकल फिनिशचा जोरदार अभाव.
आक्रमणासाठी रॅमॉस नेहमीच पुढे धावत असल्यास बचावफळीची उघडी पडणारी उजवी बाजु ...
पोर्तुगाल : जी ताकद आहे तोच कच्चा दुवा, रोनाल्डोला प्रतिपक्षाने पुर्ण जखडल्यास कमजोर पडणारी मधळी फळी व त्यामुळे हतबल स्ट्रायकर्स. आज डेको खेळल्यास ही समस्या जराशी मोकळी होईल. आजचा सामना 'निकालीच' काढायचा असल्याने त्याचे प्रेशर आघाडी फळीवर, कारण साखळी सामन्यात कोरियाला ७-० ने धुतल्यावर नंतर 'अनिर्णीय झाला तरी हरकत नाही' ह्याच भुमिकेतुन हे खेळले.
भरभक्कम स्पॅनिश मध्यफळी आणि स्ट्रायकर्सना फरेरा आणि कार्व्हाल्लो रोखु शकतात का हा प्रश्न.

मैदानावरचे युद्ध :
१. रोनाल्डो वि. कॅप्डेव्हिला :

X
क्रिस्तियानो रोनाल्डोचे तांडव रोखण्याची मुख्य जबाबदारी 'योआन कॅप्डेव्हिला' हा स्पॅनिश लेफ्ट बॅकवर असेल, पुयॉलच्या मार्किंगप्रमाणे तो आणि कॅप्डेव्हिला जातीने रोनाल्डोकडे लक्ष देतील.
हे संभाळत असतानाच कॅप्डेव्हिलाला रोनाल्डोला चुकवुन बॉल इनियेस्टापर्यंत पोहचवण्याचीही कामगिरी करावी लागेल.

२. ब्रुनो अल्वेस / रिकार्डो कार्व्हालो वि. डेव्हिड व्हिला :
X

डेव्हिड व्हिलाच्या गोलक्षेत्रातील थयथयाटाला पायबंद घालण्यासाठी अल्वेस-कार्व्हालो ही जोडगोळी एव्हाना तयार झाली असेल.
तिकडे इनियेस्टाला आवरायला पावलो फरेराचा आपला सर्व अनुभव पणाला लावायला लागेल हे निश्चित.

आमचा अंदाज :
अर्थातच .... स्पेन जिंकेल !!!
मार्जिन : १-० किंवा २-१ वगैरे.
पेनल्टी शुट-आउट झाल्यास स्पेन १००% जिंकेल.

जे काही असेल ते असेल, जोरदार सामना पहायला मिळणार हे निश्चित !!!

प्रतिक्रिया

स्वप्निल..'s picture

29 Jun 2010 - 8:12 pm | स्वप्निल..

आज आमचे घोडे स्पेनवर :)

स्पेन!! स्पेन!! स्पेन!!

टारझन's picture

29 Jun 2010 - 9:47 pm | टारझन

आमची सगळी घोडे , गाढवं , खेचरं सग्गळं सग्गळं पोर्तुगाल वर .. :)
गो क्रिस्तियानो गो ............... :)

- कुस्तियानो टाराल्डो

धमाल मुलगा's picture

29 Jun 2010 - 8:12 pm | धमाल मुलगा

लै भारी रे डान्या :)

आता फक्त वाट पहायची...आणि मग दंगा करायचा. :D

प्रभो's picture

29 Jun 2010 - 8:13 pm | प्रभो

मे द बेस्ट टीम(ऑन द डे) विन्स!!!!

निखिल देशपांडे's picture

29 Jun 2010 - 8:15 pm | निखिल देशपांडे

स्पेन जिंकणार असे वाटतयं... पण पोर्तुगाल स्पेन ला हरवु शकतोच

निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

स्पेनचे काही खरे नाही.
वेताळ

अभिषेक९'s picture

29 Jun 2010 - 8:19 pm | अभिषेक९

हे तर रोनाल्डोच ठरवेन....

मेघवेडा's picture

29 Jun 2010 - 8:27 pm | मेघवेडा

मे द बेस्ट टीम विन!

आमचा अंदाज फुलटाईमला २-२. पुढचं सांगता येत नाही. :)

गणपा's picture

29 Jun 2010 - 8:30 pm | गणपा

ह्म्म्म स्पेन जिकली तर पुढे भांड्यायला मजा ईल ना ;)
तवा या म्यॅच पुर्ता डॉण्याला सपोरर्ट :D

मेघवेडा's picture

29 Jun 2010 - 8:32 pm | मेघवेडा

अर्थात सहमत आहे!

ऋषिकेश's picture

29 Jun 2010 - 8:32 pm | ऋषिकेश

मस्त सामाना-पूर्व-परिक्षण :)
अंदान: स्पेन ३-२ ने जिंकेल

ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: अक्षरधूळ, लेखकः चंद्रशेखर

सहमत!

मुख्य सामन्याचे काही सांगता येत नाही.

पोर्तुगाल लै भारी टिम आहे.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

Nile's picture

29 Jun 2010 - 10:22 pm | Nile

लै अवघड आहे सांगणं! डोस्क्याचा पार भुस्काट झाला विचार करुन. स्पेन ०.०००१% ने जास्त संधी आहे पोर्तुगालपेक्षा. (कॅल्क्युलेशन मिश्टेक शोधत आहे)

-Nile

निखिल देशपांडे's picture

30 Jun 2010 - 1:22 am | निखिल देशपांडे

स्पेन १-० ने पुढे...
डेव्हिड विला परत एकदा

निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

रामपुरी's picture

30 Jun 2010 - 1:34 am | रामपुरी

स्पेन जिंकणार वाटतं... १५ मिनीटे बाकी आहेत अजून

गणपा's picture

30 Jun 2010 - 1:36 am | गणपा

बहुतेक हाच निर्णायक गोल असेलस वाटतय.

द्दे दणका!

गणपा's picture

30 Jun 2010 - 1:56 am | गणपा

बा धमाला,
कोणता झेंडा घेउ हाती .........ह्ये कोडं सुटना म्हनुनशान एका टायमाला दोन दोन झेंडे झ्येतो काय रे.

फाउल...

धमाल मुलगा's picture

30 Jun 2010 - 2:01 am | धमाल मुलगा

चल बे!
ह्या म्याचसाठीचा झेंडा हाय तो! (आणि अर्जेंटिनानं शनिवारी शेण खाल्लंच तर कंटुनि करायला ब्याकप ठेवलाय ;) )

इठ्ठला...दे रे कातडीबचावू झेंडाऽऽऽ...........

टारझन's picture

30 Jun 2010 - 1:49 am | टारझन

माझं सांत्वण करायला कोणीतरी या रे !!! माझे शंभर लेख तोंडावर आपटल्यासारखं झालंय (ए कोण म्हंटला रे माझा गुर्जी झाला म्हणुन .. हाणा त्याला )

डाण्या माझा आयडी ब्लॉक करण्याची धमकी देत होता म्हणुन स्पेन ला एक गोल करुन देण्यात आला आहे. :)

धमाल मुलगा's picture

30 Jun 2010 - 1:51 am | धमाल मुलगा

टार्‍या चोच्या...
कितीला झोपला बे तु? =))

काल ब्राझिल चे १०० रुपै मिळालेले ... आज तेच गेले तिच्यामायला ... कोणत्या रेमट्याचा लेख वाचला आज उठल्या उठल्या काय माहित ... साला
असो .. आमच्या ब्राझिल-आर्जेंटिणा अजुनही मैदाणात आहेत ...

बाकी डाण्याच्या मैत्रीला जागुन आम्ही हा गेम स्पेन ला दिलाय :) नाही तर... तसाही देणारंच होतो हो... =))

- स्पेनेश बेटहारवी

निखिल देशपांडे's picture

30 Jun 2010 - 1:52 am | निखिल देशपांडे

मॅच तितका काही ग्रेट झाला नाही..
पोर्तुगाल चा गोलकिपर चांगला होता...
पण १-० ही स्कोअरलाईन आवडली नाही..
असो डॉनराव सविस्तर लिहितिलच
स्पेन पुढे आले बरे झाले...
आता स्पेन ला पॅराग्वे काही अवघड नाहिए

निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

शरदिनी's picture

30 Jun 2010 - 1:52 am | शरदिनी

पांढर्‍या जर्सी
घालून सारे
नुसतीच झगमग
सुमारसद्दी

बरा वाटला
जाळ्यापुढती
रक्षणकर्ता
चेंडू अडवी

बाकी साररी
पोर्तुगालची
ओवररेटेड
सुमार टोणगी ....

निखिल देशपांडे's picture

30 Jun 2010 - 1:54 am | निखिल देशपांडे

=)) =)) =))
काय भारी लिहिलयं

निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

धमाल मुलगा's picture

30 Jun 2010 - 1:56 am | धमाल मुलगा

खी: खी: खी:!!!!

येलकम ब्याक हो शरदिनीताई! :D

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Jun 2010 - 10:06 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

शरदिनीताई, वेलकम ब्याक!

अदिती

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Jun 2010 - 10:06 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

शरदिनीताई, वेलकम ब्याक!

अदिती

बाकी साररी
पोर्तुगालची
ओवररेटेड
सुमार टोणगी ....
आमच्या पोर्तुगिज खेळाडु फक्त टोणगी नाहीत तर एकदम हुशार आहेत. काल पंचाच्या चुकीमुळे स्पेन जिंकले.

वेताळ

धमाल मुलगा's picture

30 Jun 2010 - 1:55 am | धमाल मुलगा

छोटा डॉन's picture

30 Jun 2010 - 1:57 am | छोटा डॉन

कुठे आहेत रे तो मला पिंग करुन खिजवणारा टार्‍या ?
कुठे आहे रे तो पुढच्या फेरीच्या चार्टमध्ये मुद्दाम 'खिजवण्यासाठी' जागा रिकामा ठेवणारा प्रभ्या ?
कुठे आहे त्यावर दुष्टपणे कमेंट करणारा 'मेघ्या' ?
कुठे आहेत मला 'काँग्रॅट्स' म्हणुन खिजवणारे बिका ?

कुठे गेले ?
पळाले काय सुमडीत ...

हे पहा लेकांनो ...

धत्तड तत्ताड धत्ताड तत्तड ऽऽऽऽ
धत्तड तत्ताड धत्ताड तत्तड ऽऽऽऽ
धत्तड तत्ताड धत्ताड तत्तड ऽऽऽऽ
धत्तड तत्ताड धत्ताड तत्तड ऽऽऽऽ
धत्तड तत्ताड धत्ताड तत्तड ऽऽऽऽ
धत्तड तत्ताड धत्ताड तत्तड ऽऽऽऽ

------
छोटा डॉन

गणपा's picture

30 Jun 2010 - 2:05 am | गणपा

अभिनंदन डॉणेश्वर..
जिंकली एकदाची स्पेन. जाम घाम गाळावा लागला.
पर पोर्तुगाल ही उत्तम खेळली. बरेच जोरदर हल्ले झाले दोन्ही बाजुने.
आजचा खेळ पाहाता स्पेनचा बचावे सहज भेदला जाउ शकतो हे दिसुन आलं.
बाकी आपल विश्लेषण वाचायला उत्सुक आहे.

पुन्ह्यांदा अभिनंदन

छोटा डॉन's picture

30 Jun 2010 - 2:11 am | छोटा डॉन

गणपाशी सहमत.
बाकी डिटेल विश्लेषण आणि आमचे खास फोटोपरिक्षण उद्या नक्की.
आता खुप उशीर झाला :)

ये धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड !!!
चला, आमची कल्टी आता. :)

------
छोटा डॉन

ऋषिकेश's picture

30 Jun 2010 - 2:04 am | ऋषिकेश

धत्तड तत्ताड धत्ताड तत्तड ऽऽऽऽ
धत्तड तत्ताड धत्ताड तत्तड ऽऽऽऽ
धत्तड तत्ताड धत्ताड तत्तड ऽऽऽऽ
धत्तड तत्ताड धत्ताड तत्तड ऽऽऽऽ
धत्तड तत्ताड धत्ताड तत्तड ऽऽऽऽ
धत्तड तत्ताड धत्ताड तत्तड ऽऽऽऽ

पळाले बघा सगळे स्पेनद्वेष्टे !!

ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: अक्षरधूळ, लेखकः चंद्रशेखर

Nile's picture

30 Jun 2010 - 2:13 am | Nile

१३व्या मॅचमध्ये फक्त दुसर गोल स्विकारणार्‍या पोर्तुगालचे आक्रमण फारच वाईट होते. पासिंग मध्ये किती चुका! ट्रंप कार्ड रोनाल्डोला पासेसच नाहीत! अश्या मॅचमध्ये काउंटर अ‍ॅटॅक फार महत्त्वाचा असतो जो आज पोर्तुगालकडून दिसला नाही, जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी बॉलचा ताबा धसमुसळेपणाने घालवला.

आक्रमणाबद्दल खालील आकडे बोलतीलच
स्पेन --------------- पोर्तुगाल
19 -Shots -------9
10 -Shots on goal-- 3
13 -Fouls Committed-- 18
6 -Corner kicks---- 3
1 -Yellow cards---- 1
0 -Red Cards ---- 1
61% -Possession (%)---- 39%

खरंतर एक्च गोल झाला हे त्यांचे नशिब आणि गोलकीपरचा सुंदर बचाव. आज पोर्तुगाल कुठेच जिंकेल असे वाटले नाही.

-Nile

स्वप्निल..'s picture

30 Jun 2010 - 2:14 am | स्वप्निल..

स्पेनचं या वल्ड कप चं पहिलं यलो कार्ड

प्रभो's picture

30 Jun 2010 - 2:18 am | प्रभो

आणी पोर्तुगालने या कपात खाल्लेला पहिला गोल पण....

गणपा's picture

30 Jun 2010 - 2:25 am | गणपा

आरारारारारारारा
काय पण गोल खायची वेळ साधली पाहा.
सालं यकदम औटच झालं..

घाटावरचे भट's picture

30 Jun 2010 - 2:15 am | घाटावरचे भट

पोर्तुगालचा गोलकीपर भारीच खेळला. एडुअर्डो की एडवर्डो?

डोमकावळा's picture

30 Jun 2010 - 10:59 am | डोमकावळा

खरं तर या दोन्ही टीमचे काही मोजके खेळाडू सोडले तर यांच्या ताकदी/कमजोरी बद्दल जास्त काही माहिती नाही...

पण माझे वैयक्तिक मत स्पेन ला....

(कधी कधी ब्लाईंड गेम पण खेळून पाहवी :? )

ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.

llपुण्याचे पेशवेll's picture

30 Jun 2010 - 11:32 am | llपुण्याचे पेशवेll

नशिबाने स्पेन जिंकले आहे. पुढे बघू काय होते ते. :P

पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix

ब्रिटिश टिंग्या's picture

30 Jun 2010 - 2:26 pm | ब्रिटिश टिंग्या

स्पेन जिंकलं.......जिंकणारच होतं म्हणा! :)