हाती माझ्या शुन्यच उरले
हाती माझ्या शुन्यच उरले
खिसा फाटकाच, हाती न काही लागले ||धृ||
कोणास माझा म्हणू मी, कोण कोणाचा होतो मी
दैवगतीने सारे मी पण जळले, रक्ताचेही नाते तुटले
हाती माझ्या शुन्यच उरले ||१||
कोठूनी आणावा पैसा आता, कशा बांधू इमले माड्या
काळाबरोबरी काळच आला, जवळचे सारे काही नुरले
हाती माझ्या शुन्यच उरले ||२||
ओळख आता विसरती सारे, मी त्यांना का ओळखावे?
असल्याच प्रसंगातून ओळख पटते, खरे कोण ते मी ओळखले
हाती माझ्या शुन्यच उरले ||३||
कधी सुखात पोहलो, कधी दु:खात अंतरलो
हेच असते शिकणे येथे जीवन जगणे असले
हाती माझ्या शुन्यच उरले ||४||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
३०/०६/२०१०
प्रतिक्रिया
30 Jun 2010 - 10:23 am | शानबा५१२
काय मनात आहे ते बोलत आहेस अस वाटल.ह्याला गावरान ट्च देउन मला पाठव ना,मला माझ्याकडे ठेवायला आवडेल.
![]()
खुप मस्त पाष्या,आवडल पण अजुन एखाद कडव वाढव की!
___________________________________________________
see what Google thinks about me!
इथे
30 Jun 2010 - 10:38 am | पाषाणभेद
डॉन्यवाद.
वळख आता ईसरले समदे, मी बी त्यांला का वळखावं?
आसला परसंग पडला माझ्यावर, खरं कोन ते मी वळखलं
हातात माझ्या कायच नाय उरलं ||
(आमी ग्रामीन भाशा बोल्नारी मान्स. आमाला तुमचं त्ये शुन्य का काय ते काय समजत नाय.)
आता निघतो मी. रात्रपाळी संपली कधीची अन आता झोपाया पाहिजे. उद्याच्याला एक नाही दोन कडवी देतो याची.
अवांतर: (असल्या रडक्या कविता मला जास्त आवडत नाही. (पण असे लिहीले नाही तर मग मी विचारवंत कसा?))
- बी हॅपी आन बा हॅपी!
![The universal symbol for diabetes](http://www.diabetesbluecircle.org/img/UNR.png)
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही