मी जी दुनिया पाहिली, ज्या दुनियेत राहिलो त्या 'वस्ती'त मला रौशनी नावाची एक घरवाली मावशी भेटली.. त्या वस्तीला, त्या रौशनीला या काही ओळी समर्पित..
वस्ती पाखरांची झळाललेली होती
मस्ती कामांधांची उफाळलेली होती!
मद्याचे प्याले नाचत होते
भूक विश्वामित्राची चाळवलेली होती!
गेलो कराया सांत्वन पाखरांचे
गात्रे तयांची जळालेली होती!
दिले धडे मी शुचिर्भूततेचे
यौवंने पाखरांची पोळलेली होती!
आला थवा हा नवा पाखरांचा
सात्त्विकता तेथे हारलेली होती!
--तात्या अभ्यंकर.
प्रतिक्रिया
30 Jun 2010 - 3:29 am | बिपिन कार्यकर्ते
आवडलेली आहे.
बिपिन कार्यकर्ते
30 Jun 2010 - 4:35 am | नंदू
गेलो कराया सांत्वन पाखरांचे
गात्रे तयांची जळालेली होती!
आवडली.
30 Jun 2010 - 5:28 am | केशवसुमार
प्रयत्न तात्याशेठ,
क्षमस्व, पण तुमच्या व्यतिचित्रां सारखी मजा नाय आली बा..
(स्पष्ट)केशवसुमार
स्वगतः हल्ली गद्य लेखकांमध्ये कविता करायचे फॅड आलेले दिसते :W , आधी संजोपराव ~X( , आता तात्या :T कविता म्हणजे काय खाय्ची गोष्ट वाटते की काय ह्यांना..आयुष्य मध्याचा लोच्या दुसर काय (|:
30 Jun 2010 - 6:56 am | पाषाणभेद
उत्क्रांती होते आहे. :-)
![The universal symbol for diabetes](http://www.diabetesbluecircle.org/img/UNR.png)
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
30 Jun 2010 - 11:42 am | llपुण्याचे पेशवेll
स्वगतातल्या गद्य मधल्या ग ऐवजी चुकून म वाचला.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix
30 Jun 2010 - 8:06 am | स्पंदना
छान गझल.
निसर्गात आपल्या पाऊलखुणांशिवाय काहिही ठेऊ नका आणि त्यांच्या सुखद आठवणींशिवाय काहिही नेऊ नका>(योगेश २४ यांच्या परवानगीने)
30 Jun 2010 - 11:34 am | अवलिया
कविता मस्तच.
काय खाल्लस रे ? फार त्रास होत आहे का?
--अवलिया
30 Jun 2010 - 12:34 pm | सुप्रिया
कविता आवडली.
30 Jun 2010 - 1:04 pm | पक्या
मला 'देखावे' पेक्षा ही कविता आवडली. कारण - समजली आणि संदर्भ ही लागले. खरच छान केली आहे कविता.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
30 Jun 2010 - 2:30 pm | जागु
छान.
1 Jul 2010 - 11:21 am | विसोबा खेचर
प्रतिसादकर्त्या सार्या रसिकवरांचे आभार..