सहज सुचल म्हणुन

jaypal's picture
jaypal in जे न देखे रवी...
29 Jun 2010 - 10:29 am

फार वर्षांपुर्वी एका वृध्दाश्रमाला भेट देऊन आल्यावर तिथल्याच एका देवळाच्या पार कट्यावर एकटाच बसलो होतो आणि तेवढ्यात वा-यावर हेलकावे घेत एक पान गळलेल बघताना सुचल.
१.
त्या झाडाला देखिल आता,
माझ असण नकोस वाटल.
कसं वा-याच निमीत्त करुन,
मला एकट टाकल.

याचा श्वास मी होतो.
याचा ध्यास मी होतो.
उन,वारा पाउस झेलत,
याला मी जगवल
बघा तुम्हीच,
आता त्यानी कस वागवल.

त्या झाडाला देखिल आता,
माझ असण नकोस वाटल.
कसं वा-याच निमीत्त करुन,
मला एकट टाकल.

२.
घातले सुखाने,
हे अवघड उखाणे.
सोडवितो जन्मभर,
तुझ्या आठवाने.

तुटली माळ,
विखुरले मोती.
उरला धागा,
केवळ हाती.

करुणकविता

प्रतिक्रिया

आंबोळी's picture

29 Jun 2010 - 10:37 am | आंबोळी

तुमची कविता विषण्ण करून गेली.....सुंदर!

आंबोळी

शिल्पा ब's picture

29 Jun 2010 - 11:00 am | शिल्पा ब

चांगले निरीक्शण मांडले आहे....छान कविता.

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

निरन्जन वहालेकर's picture

29 Jun 2010 - 1:21 pm | निरन्जन वहालेकर

छान कविता ! पण मन खरच विषण्ण करणारी व खुप काही विचार करायला लावणारी !

सहज's picture

29 Jun 2010 - 1:31 pm | सहज

छान.

अर्थात ह्याही पेक्षा वाईट अनाथाश्रमाला भेट दिल्यावर वाटतं. वृद्धाश्रमात एखाद्याचा दोष असुही शकेल पण अनाथाश्रमात बिचार्‍यांचा काय दोष?

दीपक साकुरे's picture

29 Jun 2010 - 1:34 pm | दीपक साकुरे

:( कविता खुपच छान पण मनाला चटका लावनारी..

राजेश घासकडवी's picture

29 Jun 2010 - 1:36 pm | राजेश घासकडवी

कसं वा-याच निमीत्त करुन,
मला एकट टाकल.

या ओळी परिणामकारक आहेत. अजून लिहा.

विसोबा खेचर's picture

29 Jun 2010 - 1:51 pm | विसोबा खेचर

स्वामी, छान लिहिलं आहेस..

संजा's picture

29 Jun 2010 - 3:39 pm | संजा

च्याआयला आता हे पण का? लै भारी रे

>>>>फार वर्षांपुर्वी एका वृध्दाश्रमाला भेट देऊन.....

आत्ता येवड्या उशिरा लिवलस काय ?

संजा

jaypal's picture

29 Jun 2010 - 9:22 pm | jaypal

आज अचानक ते आठवल बस्स येवढच. अजुन खास कारण काही नाही

***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

निखिल देशपांडे's picture

29 Jun 2010 - 9:28 pm | निखिल देशपांडे

हम्म
छान नाही म्हणावेस वाटले...
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

स्पंदना's picture

30 Jun 2010 - 8:04 am | स्पंदना

अगदी परिणाम कारक. जस एखाद छायाचीत्र!! वाचताना मन विषण्ण होत पण ते कवीच यश नव्हे का?

निसर्गात आपल्या पाऊलखुणांशिवाय काहिही ठेऊ नका आणि त्यांच्या सुखद आठवणींशिवाय काहिही नेऊ नका>(योगेश २४ यांच्या परवानगीने)

शानबा५१२'s picture

30 Jun 2010 - 8:56 am | शानबा५१२

याचा श्वास मी होतो.
याचा ध्यास मी होतो.
बघा तुम्हीच,
आता त्यानी कस वागवल.

--मस्तच पण कविता लवकर आवरती घेतलीस म्हणुन कवितेला वेगळ फील भेटल्,अर्थात अस फक्त मलाच वाटत असेल.पण ते २ नंतरच नाही आवडल(मोअर करेक्टली ' नाही समजल')

___________________________________________________
see what Google thinks about me!
इथे

जागु's picture

30 Jun 2010 - 3:11 pm | जागु

वास्तववादी, छान.