काल जिममधे माझं आटोपल्यावर नवर्याची वाट बघत एक पुस्तक चाळत बसले होते. पुढील उतार्यानी लक्ष वेधलं -
पुरुष हे प्रचंड प्रमाणात व्हिज्युअल असतात. स्त्रियांना आवडो अथवा न आवडो एक गोष्ट अजीबात नाकारता येत नाही ती म्हणजे - पुरुषांकडून बाह्यसौंदर्याला दिलं जाणारं अवास्तव महत्व.
एखाद्या पुरुषाला सुंदर स्त्रीचं छायाचित्र दाखवा अणि त्याची नजर हमखास २ क्षण जास्त रेंगाळेल याउलट आकर्षक पुरुषाच्या छायाचित्राची दखलही एखादी स्त्री घेणार नाही. १०० पुरुषांना विचारा की ते सौंदर्यास अधिक प्राधान्य देतात की स्वभावास आणी ९५ पुरुष सांगतील सौंदर्य बाकीच्या ५ जणांना प्रश्न कळला नसेल.
मला हा मुद्दा पटला, नीट पटला.
या अशा जडणघडणीमागे नक्की काय कारण आहे याविषयी सूज्ञांची मतं जाणून घ्यायला आवडतील.
एक "स्टिरीओटाइप" म्हणून आपण म्हणजे समाज असे साचेबद्ध मुलं , मुली घडवतो का मूळ मानसिकताच भिन्न भिन्न आहेत?
स्टिरीओटाइप म्हणजे मला म्हणायचय - मुलींचे कान टोचणे. मुलांचे न टोचणे, पुढे देखील एखाद्या पुरुषानी रंगीत (गुलाबी वगैरे) कपडे घातले तर त्याची थट्टा करणे.
___
यावरून एक विनोदही आठवतो -
स्त्रिया लग्न करून ही आशा ऊराशी बाळगतात की आपण त्याला बदलू शकू.
पुरुष लग्न करतात या आशेनी की ती लग्नानंतर बदलणार नाही. (= सुटणार नाही, सौंदर्य टिकेल वगैरे वगैरे अशक्य गोष्टी 8| )
प्रतिक्रिया
28 Jun 2010 - 9:08 pm | प्रभो
>>मुलींचे कान टोचणे. मुलांचे न टोचणे
असहमत... आमच्या घरी लहानपणी माझे व माझ्या बहिणीचे दोघांचे कान टोचलेले...माझ्या कानाची छिद्रं बुजली आता ती गोष्ट वेगळी...
28 Jun 2010 - 9:12 pm | शुचि
पण म्हणजे मुलांनी सुंदर सुंदर डूल घालायची पद्धत नाही ना समाजात. हे स्टिरीओटाइप्स कारणीभूत आहेत का सौंदर्यदृष्टी भिन्न भिन्न असण्यास?
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
28 Jun 2010 - 10:21 pm | गणपा
ओ शुचितै हल्ली फॅशन हाय हो कानात डुल/रिंग/खडे घालायची.
( प्रश्न न कळला ) गणा
29 Jun 2010 - 7:55 pm | हुप्प्या
कानात डूल घातलेले, रंगीबेरंगी कपडे घालणारे, अंग गोंदवून घेणारे पुरुष हे अपवाद आहेत. नियम नाहीत. (निदान आज तरी)
भारतात, अमेरिकेत, इंग्लंड वा चीनमधे ह्या प्रकारचे लोक बघा:
उच्चपदस्थ अधिकारी (एक्जिक्युटिव्ह्ज), राजकारणी, मंत्री ह्यांच्या पोषाखाकडे पहा. त्यातल्या बायकांचे आणि पुरुषांचे पोषाख अगदी रंगसंगतीच्या बाबतीत वेगळेच असतात. पुरुषांच्या कपड्यांचे रंग आजिबात उठावदार नसतात. उलट बायकांचे असतात.
30 Jun 2010 - 12:00 pm | llपुण्याचे पेशवेll
आपल्याकडे पुरुषांनी देखील कुंडले घालण्याची पद्धत होती. स्त्री पुरुष सर्वच कुंडलं वापरीत असत एकेकाळी. अगदी गेल्या पिढीपर्यंत मुंजीत भिकबाळी घालायची पद्धत होती.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix
28 Jun 2010 - 9:23 pm | रेवती
मी माझ्या मुलाचे कान टोचवून घेतले होते आणि दोन वेगवेगळ्या प्रकारचे डूलही आणले होते. जेव्हा तो दंगा करायला लागला तेंव्हा मात्र काढून टाकले. तो लहान असताना गुलाबी रंगाचे फ्रॉकही घालून झाले. मुलींसारखे केस बांधणे वगैरे हौस पुरवून घेतली. आता ते फोटो बघून तो कूरकूर करतो ती गोष्ट निराळी! :)
पण बरेचसे पुरुष बाह्य सौन्दर्याला महत्व देतात असे मलाही वाटते.
आजकाल काही स्रियांनाही स्त्रियांचे आकर्षण वाटते या गोष्टीचाही विचार करायला हवा. तसा विचार न केल्यास पुरुषांसाठी ते अन्यायकारक होइल.;)
रेवती
28 Jun 2010 - 10:12 pm | टारझन
हा हा हा , ही गोष्ट खरी आहे. माझा एक मित्र सायकॉलॉजिस्ट आहे. तो सांगतो स्त्रीयांच नटण्याथटण्याचं मुख्या कारण असतं की त्या दुसर्या स्त्रीयांपेक्षा सुंदर दिसाव्यात.
आमचं कसं क्षणिक असतं, कोणी फटाकडी दिसली की शिट्ट्यावगैरे नाही वाजवत , पण "व्वाह !!" एवढं जरुर निघतं पण पुढच्याच क्षणाला मी तिला विसरुनही जातो. ;)
28 Jun 2010 - 10:17 pm | शुचि
ह्म्म अनाठायी स्पर्धा असते.
शिवाय खोलवर कुठेतरी कमी पडत असलेल्या स्त्रिया, असुरक्षीत वाटून , बाह्यसौंदर्यावर भर देतात हे मी स्वतः पाहीलय. "उथळ पाण्याला खळखळाट फार"
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
28 Jun 2010 - 10:19 pm | चतुरंग
पण पुढच्याच क्षणाला मी तिला विसरुनही जातो.
न विसरुन सांगतोस कोणाला? ;)
(विसराळू)चतुरंग
28 Jun 2010 - 9:24 pm | विसोबा खेचर
काही स्त्रिया ह्या त्यांच्या अंतरंगावर प्रेम करावं अश्या असतात आणि बर्याचश्या स्त्रिया या त्यांच्या बाह्यरंगावर जीव ओवाळून टाकावा अश्या असतात..
असो,
हा आपला असाच माझा एक फुटकळ प्रतिसाद.. माझा फार अभ्यास नाही या विषयावर! ;)
28 Jun 2010 - 9:57 pm | राजेश घासकडवी
वागणुकीतल्या काही लैंगिक (जेंडर बेस्ड)फरकांना काही जैविक कारणं असू शकतात. उत्क्रांतीच्या निवड प्रक्रियेत पुरुष व स्त्रिया यांच्यातील जीवशास्त्रीय फरकामुळे वेगवेगळ्या गुणधर्मांना प्राधान्य मिळतं. डॉकिन्सने या फरकाचं सेल्फिश जीन मध्ये चांगलं वर्णन केलं आहे. स्त्री पुरुषांतील भिन्न मानसिकता काही प्रमाणात उत्क्रांती व गेम थिअरी यांनी समजून घेता येते.
28 Jun 2010 - 10:02 pm | शुचि
अरे हो तुम्ही ह्या विषयावर टिप्पणी केली होती. जसं नाजूक, शाळकरी मुलींसारखा आवाज, ब्लाँड केस हे पुरुषांना आवडतात स्त्रियांना डीप, रेझोनेटींग आवाज आवडतो. यात कोणता तरी हार्मोन त्या त्या व्यक्तीत अधिक असल्याचा उल्लेख आला होता.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
28 Jun 2010 - 10:21 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
बरं मग?
अदिती
28 Jun 2010 - 10:27 pm | Nile
हेच विचारतो!
तुमह्या इज्ञानाचा अन मिपावरच्या काथ्याकुटाचा काय समंध?? ;)
-Nile
28 Jun 2010 - 10:35 pm | शुचि
स्त्री जितकी सतेज, उत्फुल्ल, तरुण तितकी ती प्रजोत्पादनास अधिक सक्षम, अधिक काळ मुलं बेअर करु शकेल का काहीसा निष्कर्ष निघतो पुरुषांच्या मानसिकतेत. मला नीट सांगता येत नाही आहे. मी असं काहीसं वाचलं आहे. दुवा सापडला की देते.
http://www.guardian.co.uk/science/2010/jun/04/men-blonde-women-attractive
There are higher numbers of females born blonde than males and retention of blonde hair into adulthood is a sexually selected indicator of fitness in females. Caucasian blondes are usually slightly higher in oestrogen than brunettes and are likely to exhibit other infantile sexually selected traits (indicating low levels of testosterone) that are considered desirable by males, for example finer facial features, smaller nose, smaller jaw, pointed chin, narrow shoulders, smooth skin and less body hair, and infantile behaviour such as higher energy levels and playfulness.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
29 Jun 2010 - 1:10 pm | Nile
असं आहे होय! च्यायला माहितंच नव्हत!
(इथुन पुढे पोरींना प्रपोजींग लाईन म्हणुन वरची ओळ फेकावी म्हणतो! ;) )
-Nile
29 Jun 2010 - 1:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आपण टर्मिनेटर -३ पाहिला नाहीत काय?
असो, 'चपला' खायच्या नसतील तर असं काही मुलींच्या तोंडावर बोलू नकोस!
अदिती
29 Jun 2010 - 1:29 pm | Nile
हॅ हॅ हॅ, उपरोध का काय म्हंतात ते समजुन घ्या! ;)
-Nile
29 Jun 2010 - 11:07 pm | शैलेन्द्र
बरचसा पटलेला प्रतीसाद,
मुळात पुरुषांना जे सुंदर वाटत ते स्रियांच्या सौंदर्यांच्या कल्पनेपेक्षा वेगळ असतं, पण दोघांचेही उद्देश एकच असतात. पुरुष आणि स्रिया दोघेही आपल्या बिजांचे सातत्य असावे असे बघतात. मुळात स्त्रीचे सौंदर्य हे तिच्या उत्तम आरोग्याचे निर्देशक असते. पुरुषांना स्रीच्या सौंदर्याच्या ज्या खाणाखुना आवडतात, त्या बर्याचदा स्त्रीच्या ऊत्तम आरोग्याच्या व चांगल्या जनन्क्षमतेच्या निर्देशक असतात. तसेच बर्याचदा स्त्रीयांना आवडणारे गुण हे पुरुषांच्या संरक्षणक्षमतेचे निदेर्शक असतात. कुठेतरी याची मुळे कळपात राहणार्या समुदायात आहेत. यावर अजुन लिहायला आवडेल पण परत कधीतरी...
30 Jun 2010 - 11:48 am | विजुभाऊ
यातला ओस्ट्रोजेन आणि प्रोस्ट्रोजेन चा मुद्दा पटत नाही.
प्रोस्ट्रोजेन मुळे पुरुषाना टक्कल पडते असे म्हणतात. याचा अर्थ टक्कल हे शारीरीक सौंदर्याचे लक्षण मानायला हवे ......
( लॉजीक म्हणजे कै च्या कैच असते रे .)
30 Jun 2010 - 11:53 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
>> प्रोस्ट्रोजेन मुळे पुरुषाना टक्कल पडते असे म्हणतात. <<
हा कोणता हॉर्मोन? इस्ट्रोजेन, प्रोजेस्टीरॉन का आणखी काही?
का तुम्हाला प्रोजेस्टाजेन म्हणायचं आहे?
>> याचा अर्थ टक्कल हे शारीरीक सौंदर्याचे लक्षण मानायला हवे ...... <<
असं मानणार्या काही व्यक्ती माझ्या ओळखीच्या आहेत. पण त्यांना फक्त बुद्धीमान लोकंच आवडतात.
अदिती
30 Jun 2010 - 1:48 pm | विजुभाऊ
अॅन्ड्रोजेन... अॅन्ड्रोजेन.....म्हणायचय मला
30 Jun 2010 - 12:18 pm | महेश हतोळकर
~X(
30 Jun 2010 - 12:48 pm | टारझन
का बे ? त्यांनी टक्कल म्हणजे सौंदर्यलक्षण म्हणताबरोबर तु उपटायला सुरूवात पण केली का ? =)) =))
- शर्यत तळवलकर
30 Jun 2010 - 2:07 pm | महेश हतोळकर
नाही तर काय करू?
28 Jun 2010 - 10:15 pm | शिल्पा ब
सगळे एकमेकांना आवडोत आणि जगात शांतता नांदो ...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
28 Jun 2010 - 10:19 pm | II विकास II
ह्या सगळ्यापाठीमागे हे कारण असेल का?
-----------------------
समस्त पुरूषांसाठी आज एक खबर आहे. ती जर आपण ऐकली किंवा वाचली तर खुषखबर ठरेल याची मला खात्री आहे. आज सकाळ मध्ये पान क्र सात वर डॉ. मधुरा विप्र यांचा एक लेख आहे. या लेखात त्यानी असे म्हटले आहे की मानव आणी चिपांझी हा उत्क्रांतिमध्ये जो बदल घडला तो वाय या गुणसूत्रातील बदलांमूळे घडला. असे संशोधन केंब्रिजमध्ये एका संस्थेत झाल्याचे नेचर या मासिकात प्रकाशित झालेल्या एका बातमीचा हवाल देऊन म्हतले आहे.
नेचर मधिल बातमीचा दूवा - http://www.nature.com/news/2010/100113/full/463149a.html
आजवर असा समज प्रचलित होता की मानव आणि माकडे यांच्यातील जनुकीय फरक फक्त २% एवढाच आहे. पण हा फरक गुणसूत्र २१ ( एक्स?) पुरताच मर्यादित असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. मानव आणि माकडे यांच्या वाय गुणसूत्रातील फरक खूप मोठा आहे.
या संशोधनातून काही मजेशीर गोष्टी सूचित होतात.
१. एक्स हे गुणसूत्र उत्क्रांतीमध्ये बदलले नाही. स्त्रीयांमध्ये दोन एक्स असतात. म्हणजे मानवी स्त्रिया आणि माकडांच्या स्त्रीया यांच्यातला फरक १% पेक्षा कमी आहे.
२. मानवाचे माकडांपासून वेगळे होण्यात स्त्रीयांचे नाही तर पुरुषांचे कर्तृत्व निर्णायक आहे.
http://www.misalpav.com/node/11789
---------------------------
पुरुष उत्क्रांत असल्याने असा विचार करतात का?
28 Jun 2010 - 10:21 pm | चतुरंग
आपला प्रतिसाद वाचून तरी असे वाटत नाही! :?
चतुरंग
28 Jun 2010 - 10:33 pm | गणपा
रंगाकाका तुम्हीपण असे आहात ना?
(जरी ते कितीही कटु सत्य असल तरी)
अस एकदम कुणाच्या तोंडावर बोलतात का हो..
=)) =)) =)) =)) =))
28 Jun 2010 - 10:42 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
रंगरावांचा फाऊल आहे हा!!
=)) =)) =)) =)) =))
अदिती
28 Jun 2010 - 10:39 pm | टारझन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =)) =))
=)) =)) =))
=)) =)) =))
=)) =)) =))
=)) =)) =))
मला तर वरच्या प्रतिसादावरुन एक्स ऐवजी झेड क्रोमोझोम दिसला =)) =))
28 Jun 2010 - 10:43 pm | II विकास II
छान पैकी कंपुबाज जमा झालेत.
28 Jun 2010 - 11:45 pm | मिसळभोक्ता
वाय झेड क्रोमोसोम !!!
(आद्य कंपूबाज)
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
28 Jun 2010 - 11:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
=)) =))
मिभोकाका फॉर्मात, चला झाडावर!!
अदिती
30 Jun 2010 - 1:28 pm | वेदश्री
>चला झाडावर!!
झाडावर काय आहे? उत्क्रांत न झालेल्यांची सभा? :D
30 Jun 2010 - 2:09 pm | llपुण्याचे पेशवेll
नाही नॉस्टॅल्जिक झालेल्यांची सभा आहे. ;)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix
28 Jun 2010 - 10:34 pm | Pain
दोघही वेगवेगळे आहेत, ज्ञात इतिहासापासून त्यांचे समाजातील स्थान, जबाबदार्या वेगवेगळ्या आहेत. असे असताना दोघांकडून भिन्न अपेक्षा ठेवल्या जाणारच.
अवांतरः
शिक्षणात अयशस्वी ठरलेले लोक शिक्षणपद्धतीला नावे ठेवताना आढळतात. प्रेमभंग झालेले प्रेमाच्या नावाने खडे फोडताना दिसतात. आता हे सौंदर्याला नाके मुरडणारे लोक....
28 Jun 2010 - 10:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
>> आता हे सौंदर्याला नाके मुरडणारे लोक.... <<
कोण म्हणे सौंदर्याला नाकं मुरडतंय?
उगाच काय काहीही!
अदिती
28 Jun 2010 - 11:30 pm | एक
कमीतकमी तुम्हाला माहिती तरी आहे कि पुरुषांना काय आवडू शकतं..त्या माहितीचा हवा असेल तर वापर तरी करून घेता येतो.
आम्हाला ती ही सोय ठेवली नाही म्हणूनच "what women want?" असा सिनेमा निघतो ना? :)
बाकी आम्ही सौंदर्या बरोबरच "स्वभावाला" ही तेव्हढच महत्त्व देतो. ;)
29 Jun 2010 - 8:16 am | सहज
पुरुष , स्त्रिया आणि बाह्यसौंदर्य = हे बघा
प्रत्येक मालाला गिर्हाइक आहे.
अजुन काही प्रश्न असतील तर ह्युमन इंन्स्टींक्ट ही बीबीसी निर्मीत मालीका बघणे.
जाताजाता: कीप इट सुपर सिंपल टेस्ट ऑफ्टन वर्क्स
29 Jun 2010 - 10:57 am | शिल्पा ब
हे बरंए !!! आणि आम्ही आपला एखादं मत मांडलं तर लोक आम्हाला हा विषय तो विषय करून भंडावतात आणि मोठे व्हायला सांगतात...आता या वातावरणात कसं बरं मोठा होणार?
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
29 Jun 2010 - 2:13 pm | टारझन
आगायायायाया =)) =)) =)) =)) ख प लो !@!
बाकी आम्ही छोटे असतांनाच पब्लिक ला झेपेना , मोठा झाल्यावर तर .... =))
कोण त्राहिमाम त्राहिमाम ओरडले रे ?
29 Jun 2010 - 12:38 pm | वेताळ
पुरुषांकडून बाह्यसौंदर्याला दिलं जाणारं अवास्तव महत्व.
त्याच देखिल हेच म्हणणे होते.
संदर्भ सापडल्यानंतर लिंक देईन.तो वर जीम मधुन घरी जा.
वेताळ
1 Jul 2010 - 9:02 am | चित्रा
ललिता पवार आकर्षक नव्हत्या? काही कळले नाही.
नुसते डोळ्यातील दोषावर जाऊ नये.
29 Jun 2010 - 7:00 pm | तिमा
या बाबतीत बरेच पुरुष शबरीचा आदर्श ठेवतात.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
29 Jun 2010 - 7:02 pm | प्रियाली
पुरुषांना शबरीसारखी वृद्ध स्त्री आवडते? ;) जरा स्पष्ट करा ना. गैरसमज होतात.
29 Jun 2010 - 9:32 pm | टारझन
हॅहॅहॅहॅ ... आवडत असेल बॉ त्यांना वृद्ध स्त्री ... तशा ही माणुसघाण्या लोकांचं सगळ्ळं कस्सं वेग्गळंच असतं =))
- टार्जनराव मोजुनखाणे
1 Jul 2010 - 5:11 pm | तिमा
शबरीचा आदर्श म्हणजे प्रत्येक बोर चाखून पहाण्याचा! अरेरे, फोड करुन सांगण्याची वेळ येईल असे वाटले नव्हते.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
2 Jul 2010 - 12:52 pm | अन्या दातार
शबरीचा आदर्श ठेवून नक्की काय चाखून पहावे असे म्हणता? :?
अजून स्पष्टीकरण दिले तरि चालेल.....
29 Jun 2010 - 8:16 pm | अभिषेक९
थोडे विषयांतर आहे, पण खालील article वाचा ...
बाकी वरील विषयावर माझा अनुभव जरा वेगळा आहे, लेखीकीने दिलेले ९५-५ % हे प्रमाण जरा जास्तच वाटत... बाह्यसौंदर्यावर जास्तीत जास्त शिट्या वाजतील, आणि फारतर एखादी कॉफ्फी. पण आयुष्याचा प्रश्न येतो त्यावेळेस, मुल जरा अंतरंगाचा विचार करायचा प्रयत्न करतात. पण जरका प्रेम-प्रकरणात बुबुळ फिरलेली असतील तर सांगता येत नाही बुवा...
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5733437.cms
"आपल्याकडे बायकांचं स्वतंत्र होणं, वेगळा विचार करणं बायकांपुरतंच मर्यादित राहिलं. समानतावादी प्रयोग झाले ते बायकांवर, जणू पुरुषांशी याचं देणं घेणंच नव्हतं. सहजीवन हे दोघांचं असतं आणि याचे संस्कार मुलं आणि मुली या दोघांवरही अगदी लहानपणापासून व्हायला हवेत, मुलांचं ग्रूमिंग त्याच दृष्टीकोनातून व्हायला हवं, हे आपल्या गावीही नाही. घराघरातून मुली बदलल्या. मुलं मात्र तशीच राहिली. पौरुषत्वाच्या कल्पनांना घट्ट चिकटून. त्यामुळे अगदी पुरोगामी म्हणवणाऱ्या कुटुंबातही टीपिकल नवरेपण सुटत नाही. मुलांनी कसं मुलांसारखं वागावंंंं... या संस्काराखाली मुलं बिचारी दबून गेलीयेत. पुरुषी स्वभाव म्हणून की काय पण ज्या गोष्टीचा मुलींनी बारकाव्याने विचार केलाय तसा मुलांनी केलेलाच नाहीये. 'तेव्हाचं तेव्हा बघू' असं त्यांचं मत. मुली जेव्हा अपेक्षा व्यक्त करतात, तेव्हा मुलं हबकून जातात ती यामुळेच."
ह्याला कारण काय मग - "पुरुषी इगो/ अहंकार" का घरात आई कडून मिळणारी शिकवण (मुलांनी कसं मुलांसारखं वागावंंंं..). मुला - मुलीत भेदभाव अगदी घरात आई पासूनच बघायला मिळतो. अजून 'स्वतंत्र्य' झालेल्या मुली पण 'जोडीदार मात्र त्यांच्यापेक्षा अधिक कमावणाराच हवा' अशा मागणी करताना दिसतात... अवघड आहे, complicated
आहे ....
29 Jun 2010 - 8:23 pm | शुचि
मला ४ बायका माहीत आहेत ज्या कमावतात आणि एच-१ वर आहेत आणि नवरे एच-४ वर आहेत जे कमवत नाहीत. ३ भारतीय, १ फिलीपाइन. भारतीय बायका नवर्याला अजीबात टोचत नाहीत. सुखानी नांदताहेत.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
29 Jun 2010 - 9:23 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
चार बायका या समाजाचं प्रतिनिधित्त्व करू शकत नाहीत आणि उच्च शिक्षण घेऊन अमेरिकेत नोकरी करणार्या तर नाहीच नाहीत.
माझ्या आई-वडलांना ४० वर्षांपूर्वी जे कानावर आलं ते आज माझ्या आणि माझ्या नवर्याच्याही कानावर येतं ... बायको (नवर्यापेक्षा )जास्त शिकलेली आहे म्हणून तुला काँप्लेक्स येत नाही का, वगैरे वगैरे
अदिती
29 Jun 2010 - 9:25 pm | प्रियाली
एच-१ आणि एच-४ यावरून शैक्षणिक पात्रता कशी ठरते?
एच-४ वर राहणारे एच-१ मिळवण्यास पात्र नसतात असे तर नाही ना वाटत शुचितैंना!
30 Jun 2010 - 11:18 am | वेताळ
एड्सच्या नव्या प्रजाती वाटल्या.
वेताळ
29 Jun 2010 - 9:58 pm | शिल्पा ब
+ १
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
29 Jun 2010 - 9:46 pm | ऋषिकेश
प्रत्येकाने आपल्याला आपला जोडीदार का आवडला व तिला/त्याला आपण का आवडलो याचा (निदान मनातल्या मनात) विचार केला तरी लेखातील निष्कर्षाचा फोलपणा ध्यानात यावा.
ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: अक्षरधूळ, लेखकः चंद्रशेखर
29 Jun 2010 - 9:57 pm | Nile
फारच अवघड सांगतो ब्वॉ हा ऋष्या, अरे लेका नुस्ता विचार केला तर फोलपणा नाही लक्षात येणार? ;)
-Nile
30 Jun 2010 - 2:12 am | ऋषिकेश
अरे तसं होत असतं तर हा काथ्याकुट निघाला असता का?
ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: अक्षरधूळ, लेखकः चंद्रशेखर
30 Jun 2010 - 11:32 am | Nile
हॅ हॅ, काय पण अस्युम करतो हा ऋष्या ;)
-Nile
30 Jun 2010 - 12:36 am | शिल्पा ब
लग्न करायला पुरुषाला चांगली दिसणारी (शक्यतो), खायला - प्यायला करता येणारी आणि घरदार सांभाळणारी बायको हवी असते आणि स्त्रीला चांगला कमावणारा, जरा बरा दिसणारा , हुशार आणि शारीरिक दृष्ट्या सशक्त असा नवरा हवा असतो...बाकी सगळ्या गोष्टी सगळेजण जुळवून घेतात .... पटतंय तोपर्यंत एकमेकांबरोबर राहतात आणि शेवटी नको असलं तरी या वयात कुठे नवीन शोध म्हणून आहे त्यात समाधान मानतात....फारच वाटलं तर आजकाल वेगळे होतात...मी तर घटस्फोट घेऊन काही काळानी परत त्याच जोडप्याने एकमेकांशी लग्न केल्याचे पहिले आहे...चालायचेच....काय उगं काथ्याकुट करायचाय !!!
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
30 Jun 2010 - 12:35 pm | llपुण्याचे पेशवेll
अहो असं कसं महत्वाचा विषय आहे. या विषयावर चर्चा व्हायला पाहीजे.
म्हणजे असे अनेक विचारवंतांचं मत असतं.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix
30 Jun 2010 - 12:49 pm | विंजिनेर
वा! वा!.. अहो असं नाही केलं तर बुद्धीची खाज कशी जिरणार.
घटोऽयं पटोऽयं पाहिजेच. शिवाय पोटातले विचारजंत, आपला(आणि आपल्या मैत्रिणींचा) व्हिसा स्टेटस, शैक्षणिक पातळ्या इ. खुबीने सांगायला फोरम नको का कुठला?
(खवच्चट) विंजिनेर
30 Jun 2010 - 12:59 pm | II विकास II
घटोऽयं पटोऽयं पाहिजेच. शिवाय पोटातले विचारजंत, आपला(आणि आपल्या मैत्रिणींचा) व्हिसा स्टेटस, शैक्षणिक पातळ्या इ. खुबीने सांगायला फोरम नको का कुठला?
>> अगदी अगदी
जणु काही लोकांची मते पाहुन हे आपले विचार बदलणार आहेत.
2 Jul 2010 - 10:58 am | Pain
=))
30 Jun 2010 - 12:51 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
"काय उगं काथ्याकुट करायचाय !!!" लिहीण्याआधी चार ओळी लिहील्यात यातच कारण नाही का कळलं "उगं"चं?
अदिती
1 Jul 2010 - 9:20 am | शिल्पा ब
सर्वसाधारण विचार मांडला...जो लग्न करताना लोक करतात...आता या गोष्टी सगळीकडेच असल्याने काथ्याकूटायचा प्रश्न कशाला?
वाटलं आता तरी पाल्हाळ थांबेल पण ??? बरं अजून येऊ द्यात...
(खवचट) कधीतरी
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
1 Jul 2010 - 9:35 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
तुम्ही चार ओळी लिहायच्या आणि इतरांनी 'क्ष' एवढ्या ओळी लिहील्या तर मात्र 'उगं' ... झेपलं नाही
त्यातून तुम्हाला काथ्या कुटायचा नसेल तर नका कुटू ... मसंसंवर तो पर्याय नेहेमीच उपलब्ध असतो.
अदिती
1 Jul 2010 - 9:48 am | शिल्पा ब
आता आम्ही कुठे आग्रह धरलाय कि तुम्ही नकाच करू म्हणून...
आता आम्ही पण एक " शेंबूड आल्यास काय कराल " याचा धागा काढणार आहोत...(हो कुणी म्हणायला नको झेपत नाही म्हणून..) १) शर्टाच्या बाहीला पुसाल २) रुमालाला पुसाल ३) फुर्कन आहात तिथेच शिन्क्राल ४) इतर काही असे पर्याय ठेवायचा विचार करीत आहोत...तुमचे मत मोलाचे आहे.
(झेपवणारी) कुढीती
* सगळ्याच बाबतीत काय भांडायचं काही कळत नाही?*
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
1 Jul 2010 - 9:53 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
अय्या, एवढं छान छान, स्वीट स्वीट, क्यूट क्यूट लिहायला कसं हो सुचतं तुम्हाला शिल्पाताई!
असो, हे आता फार व्यक्तीगत पातळीवर घसरत आहे, तेव्हा "दुर्बिटणेबै, आवरा"!
अदिती
1 Jul 2010 - 9:56 am | शिल्पा ब
ताई का एकदम...आम्ही एवढे काही मोठे नाही झालो अजून =)) =)) असो.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
2 Jul 2010 - 8:31 pm | शानबा५१२
अगदी हेच सांगायला प्रतिसाद लिहणार होतो पण आपला प्रतिसाद वाचला.१००००००००००००००००००% सहमत.
अगदी योग्य विधान केलत(माझ्या प्रतिसादात लिहलय त्याबद्दल बोलतोय).
आजच 'त्या' मॉडेलच्या आत्महत्या प्रकरणी 'अग्रलेखाच्या बादशहा'ने हेच लिहल होत.
बाकी खालच्या प्रतिसादांना खुप शुभेच्छा! :D
________________________________________________
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
2 Jul 2010 - 8:34 pm | शिल्पा ब
कुठली मॉडेल , कसली आत्महत्या?
आम्ही अतिसामान्य लोकं ... ते बादशहाचे लेख कसे वाचणार? ते फक्त तुमच्यासाठीच.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
2 Jul 2010 - 8:55 pm | शानबा५१२
यु डोन्ट नो अग्रलेखाचा बादशहा?
या या,नॉट फ्रोम महाराष्ट नो?
'विवेका बाबाजी'चे आत्महत्या प्रकरण........काही चगळत बसण्यासारख स्टोरीमधे काही नाही,पण आरोप-प्रत्यारोप चांगले चाललेत.
इथे शेतकरी दीवसाला मरत आहेत्,त्याच्या बातम्या पण आता दुखी करत नाहीत्,ह्या बांडगुळाला मरण भेटल तर कसल दुख!!फक्त चर्चेचा विषय..............
आणि हो आता कामात असतो(तारापुर अणुशक्ती केंद्र) म्हणुन नाही प्रतिसाद टाकत्............रीझल्ट ५ तारखेला आहे. :D
_________________________________________________
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
3 Jul 2010 - 11:55 am | मृगनयनी
शानबाजी, तुम्हाला आणि पर्यायाने 'तारापूर अणुशक्ती केन्द्रा'ला बेस्ट ऑफ लक! ;)
____________
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
आपण "मौन" पाळता.... हे वाचून आनंदमिश्रित आश्चर्य वाटले!...
:)
कीप इट अप....
मौना'मुळे मानसिक शक्तीचा विकास होतो... हे खरे आहे....
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
3 Jul 2010 - 10:00 pm | शानबा५१२
तुम्ही विचार करायचा त्रास नका घेउ,मेंदुला सवय नसलेल्या गोष्टी केल्यावर त्रास होतो,तेव्हा आपण व्यनी वाचा!!
_________________________________________________
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
4 Jul 2010 - 1:13 pm | Pain
"मौन मधे" नाही, मौनामध्ये.
7 Jul 2010 - 9:49 am | मृगनयनी
शानबा'जी आपला व्यनि वाचला....
आपल्याला सुधारणा करण्यासाठी बराच वाव असल्याचे प्रकर्षाने जाणवले!.... ;)
________________
जस्ट टेक इट ईझी....
आणि हो!
'हॅव अ नाईस डे' बरं का ? ;)
________________
तारापूर अणु शक्ती केन्द्राची शुभचिन्तक,
- मृगनयनी परशुराम लिमये.
:)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
4 Oct 2011 - 1:46 am | आशु जोग
१०० % खरय
7 Jul 2010 - 12:09 pm | प्रभाकर पेठकर
स्त्री-पुरुषाच्या आयुष्यात एक्मेकांचे महत्व, महात्म्य, आकर्षण वयपरत्वे बदलत जातं. काहीच शाश्वत नसतं.
लहानपणी भेटलेल्या स्त्रीयांच्या स्वभावानुसार त्या बाल-पुरुषांना आवडतात किंवा नावडतात तर वयात येताच शारीरिक आकर्षण वाढू लागते (निसर्ग धर्म) स्त्रीयांनाही पुरुषांच्या बाबतीत असेच आकर्षण वाटते. 'तुमच्याशी लग्न केलं हे चुकलच माझं.''तरी ताईने-आईने वेळीच सावध केले होते.' वगैरे वाक्ये ४-५ वर्षांनंतर सुरु होतात. ह्या वयानंतर दोघांचेही शारीरिक आकर्षण (परस्त्री/परपुरुषाबद्दल) कमी होत जाऊन अंतरीक गुणाचे (परस्त्री/परपुरुषांच्या) आकर्षण वाढीस लागते. 'जीवनसाथीच्या निवडप्रकियेत आपण जरा घाई केली' हे स्वतःलाच पटायला लागते. कसा बसा संसार रेटला जातो. म्हातारपणाच्या आजारपणात, दुबळ्या बनत जाणार्या शरीरासोबत मनही अशक्त बनत जाते. एकमेकांचे गुण दिसू /जाणवू लागतात. 'नाही हो, माझ्या आजारपणात खूप कष्ट केले ह्यांनी.' किंवा 'तोंडाने भांडखोर असली तरी मनाने प्रेमळ आहे' अशी वाक्ये कानावर येतात. पुन्हा एकमेकांचे नाते घट्ट होऊ लागते. (वरवर भांडणे झाली तरी अंतरात ओलावा निर्माण झालेला असतो.)
एकूण काय? तर वयपरत्वे, परिस्थितीनुरुप गरजा, आकर्षण बदलत जाते.
ह्यावरून एक विनोद आठवला:
एक सत्तरीतला म्हातारा आपल्या पत्नीला विचारतो,' काय ग! मी तरूण मुलींच्या मागे धावतो ते पाहून तुला राग नाही येत?'
म्हातारी म्हणते,' अजिबात नाही. अहो, कारच्या मागेही कुत्रे धावतात पण म्हणून काय त्यांना कार चालवता येते?'
------------------------------------------------------
विवाहित पुरुषाने कितीही नोकर्या बदलल्या तरी त्याचा बॉस एकच असतो.
7 Jul 2010 - 2:35 pm | कवितानागेश
या विषयावर एक वेगळा फोरम चालू करावा लागेल की काय?
कित्ती ही चर्चा?
...पुरुष वस्तुस्थिती मान्य का करत नाहीत??!
जाउ दे...
============
माउ
3 Oct 2011 - 5:51 pm | चेतन सुभाष गुगळे
<< या अशा जडणघडणीमागे नक्की काय कारण आहे याविषयी सूज्ञांची मतं जाणून घ्यायला आवडतील. >>
तुमच्या या प्रश्नाचं खुलासेवार उत्तर तुम्हाला या पुस्तकात नक्कीच मिळेल.
द फेमिनाईन पॉवर - मोअर डिमांड लेस सप्लाय
लेखक - एस. के. वाधवा
प्रकाशक - जयको बुक्स, मुंबई
4 Oct 2011 - 1:47 am | आशु जोग
जॉन अब्राहमला पाहून चित्कारणार्या तरुणींना काय म्हणावे !
4 Oct 2011 - 3:02 am | प्रियाली
त्या तरुणींना आशु जोग म्हणावे. :)
5 Oct 2011 - 11:31 pm | आशु जोग
कमाल झाली बुवा तुमची
4 Oct 2011 - 12:36 pm | अविनाशकुलकर्णी
स्त्रीयांच्या बाह्य सौंदर्यास नक्किच महत्व आहे..
मुलगा जेंव्हा मुलगी पाहुन आलो असे मित्रांना सांगतो त्या वेळी मित्रांचा पहिला प्रष्ण असतो
"कशी आहे दिसायला?"
"तर मुली विचारता तो काय करतो?"
स्त्रीयां चे सौंदर्य हेच त्यांचे साम्रर्थ्य आहे तर पुरुषाचे सामर्थ्य हेच त्यांचे सौंदर्य असे आचार्य अत्रे यांनी म्हटले आहे
5 Oct 2011 - 11:29 pm | आशु जोग
जॉन अब्राहमच्या उल्लेखाने हळव्या झालात ना मुलींनो
असो