“मरण “ मरणापेक्षाही महाग तीन दिवसापूर्वी “सकाळ “ला लेख वाचला. मरणोत्तर
अफाट खर्चा संबंधी………………..
आस “ नाविन्याची “
भोगिले आकंठ जीवना,
नाविन्य काहीच आता ना राहिले,
उपभोगण्या मृत्यो तुला,
इतुकेच होते राहिले.
विषाद हा घेउनी उरी,
तव आस मी जोपासली,
शोधले सर्वत्र तुजला,
भेट परी ना जाहली.
वाटले विकत घेऊ तुज,
काय त्याचे येवढे,
पहिले मोल वृद्ध जीवनाचे कस्पटासम,
अन मृत्यो तुझे आभाळा येवढे.
किंमत तुझी गगनचुंबी अशी,
मज आवाक्या ना राहिली,
नाविन्याची हौस ही,
आजवर तैसेची राहिली.
निरंजन वहाळेकर
प्रतिक्रिया
28 Jun 2010 - 5:36 pm | विजुभाऊ
नाविण्य हा शब्द वाचून टार्या ने काही लिवल असेलसे वाटले.
बंधो णिरंजण नाविण्य हा शब्द नाविन्य असा ल्ह्या.... नायतर त्ये उगाच टारु छाप इडंबन वाटतं
पण ल्हीणं चालू ठेवत जा....