आज जर्मनी विरुद्ध इंग्लंड. आज फिफा २०१० मधून बाहेर पडणार्या युरोपियन जायंट्सच्या यादीत आणखी एकाची भर पडेल. उपांत्यपूर्व फेरीतील जागा निश्चित करण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नांची शर्थ निश्चित करणार. आज पहायला मिळेल फुटबॉलच्या मैदानावरील एक फेमस खुन्नस. जर्मनांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी जरी नेदरलॅण्ड्स असले तरी इंग्लिश संधाविरुद्धची त्यांची खुन्नस सर्वज्ञातच आहे. म्हणजे क्रिकेटच्या मैदानावर जसे भारत-पाक पारंपरिक प्रतिस्पर्धी असले तरी भारत-श्रीलंका सामन्यांत जी खुन्नस असते तीच जर्मनी-इंग्लंड सामन्यात बघायला मिळते.
जर्मनीने इथपर्यंत येताना जरी आपला सर्वोत्तम खेळ केला नसला तरी दोन विजयांमुळे त्यांचा आत्मविश्वास नक्कीच उंचावलेला असेल. जरी त्यांनी सॉकरूजचा ४-० असा फडशा पाडला असला तरी घानावर १-० विजय मिळवताना त्यांना घाम गाळावा लागलाच होता. जर्मनांसाठी जमेची बाजू ही की त्यांचा बेस्ट स्ट्रायकर मिरोस्लाव क्लोस्जे संघात परततोय. त्याचा शेवटचा सामना रेड कार्डमुळे हुकला होता. त्यात मेसुत ओझिलचा तीनही सामन्यांत खेळ उत्तम झाला होता आणि बलाकची उणीव तशी त्याने जाणवू दिलेली नाही. ओझिल आणि क्लोस्जेची जोडी जमल्यास इंग्लंडला निश्चितच एका मोठ्या पराभवाकडे हताशपणे पाहावे लागेल. चिंतेची बाब असेल ती म्हणजे बॅस्टियन श्वाईनश्टायगरची दुखापत. त्याची उणीव जर्मनांना नक्कीच जाणवेल.
इंग्लंड म्हटलं की वेन रूनी हे नाव आलंच. बट लेट्स बी ऑनेस्ट. तीन सामन्यांत एकही गोल रूनीने मारलेला नाही. तो नक्कीच भुकेलेला असेल. इंग्लंडचा संघ स्लोवेनियाविरुद्धचा सामना वगळता कॉण्फिडण्ट वाटलाच नाही. पहिल्या दोन सामन्यांत युएसए आणि अल्जेरियाविरुद्ध अनुक्रमे १-१ आणि ०-० बरोबरीवर समाधान मानल्यावर तिसर्या सामन्यात 'करा किंवा मरा'ची वेळ आल्यावर मात्र इंग्लिश संघ पेटून उठल्यासारखा खेळला. स्लोवेनियाविरुद्ध इंग्लिश संघाच्या खेळात विलक्षण गती होती. उत्तम को-ऑर्डिनेशन होतं आणि हीच त्यांची जमेची बाजू. तीच गती आणि तेच को-ऑर्डिनेशन त्यांनी या सामन्यातही कायम राखल्यास जर्मनांवर कठीण परिस्थिती उद्भवू शकते.
'की मॅच-अप्स' - मेसुत ओझिल विरुद्ध जेम्स मिल्नर. दोघांनी आपापल्या संघासाठी शेवटच्या साखळी सामन्यात प्लेमेकर्सची भूमिका उत्तमपणे केली होती. याखेपेसही ज्याचा खेळ जास्त प्रभावी ठरेल त्याचा संघ विजयाच्या दिशेने पाऊल टाकेल.
The German perspective
"Both teams go into the game with a certain amount of respect," said Low. "This will also be the case in England, because they know that we are quite capable of beating them. There will be no fear, not from us and not from the English." — Coach Joachim Loew
The English perspective
"I thought the Germans looked good in their first match - but they are beatable and I am confident." — Forward Wayne Rooney
अवांतर : येथे विश्वचषक सुरू व्हायच्या आधीपासून जागोजागी, घरादारांवर, रस्तोरस्ती, गाड्यागाड्यांवर इंग्लिश फ्लॅग्स झळकताहेत. मात्र आता लोकांमध्ये फारसा उत्साह दिसत नाही. आपल्या संघाने साखळीत पहिला क्रमांक मिळवला असता तर घानासोबत उपउपांत्यपूर्व सामना खेळायला मिळाला असता आणि आम्ही निश्चितच उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला असता मात्र आता जर्मनीसोबत लढत असल्याने उपांत्यपूर्व फेरीचा स्पॉट एखाद्या चमत्कारानेच मिळेल असं लोक म्हणतात. परवा एक जण मला म्हणाला, "हे झेंडे झळकावणं, हे इंग्लंडचे टीशर्ट्स घालून फिरणं हे सगळं फक्त रविवारपर्यंतच. मग झेंडे आणि हे टीशर्ट्स उतरवायचेच आहेत." एकूण काय तर, खुद्द इंग्लिश लोकच या सामन्यात इंग्लंडच्या विजयाबाबत आशावादी नाहीत. बट यु नेव्हर नो, आफ्टरऑल इट्स अ गेम! :)
तर मग कोण जाईल पुढे
.......की.......
प्रतिक्रिया
27 Jun 2010 - 7:27 pm | छोटा डॉन
आत्तापर्यंतचे रेकॉर्ड सांगते आहे .... इंग्लंड !
सध्या जर्मन फॉर्म सांगतो आहे ... जर्मनी !
इंग्लिश संघात ठासुन भरलेले 'कागदावरचे आणि लीगा गाजवणारे' टॅलेंट म्हणते आहे ... इंग्लंड !
गरजेच्यावेळी आणि देशासाठी खेळ उंचावणारे डॉयशिश म्हणत आहेत ... जर्मनी !
अनुभवी आणि जास्तच आत्मविश्वास असलेले इटालियन 'कपॅलो' म्हणत आहेत ...इंग्लंड !
आपल्या संघाची नस ओळखणारे 'लोऊ' म्हणत आहेत ... जर्मनी !
जाणकार पंडित म्हणत आहेत ... जर्मनी !
पब्लिक म्हणत आहे .... जर्मनी !
पाहु काय होतेय ?
लढत मात्र कडक होईल असे वाटतेय, बहुतेक 'सडनडेथ' पर्यंत जाऊ शकेल.
लँपार्ड-जेरार्ड-रुनी चमकतील का ?
देवाला माहित.
श्वाईनस्तायगर-ओझिल-म्युलर-पोडोल्स्की-क्लोज्से ?
नक्की खेळणार, तसा लैकिकच आहे त्यांचा.
की-प्लेयर ?
इंग्लंडसाठी - जेरार्ड, टेरी, बेरी आणि मिल्नर व सर्वात महत्वाचा त्यांचा गोली जेम्स.
जर्मनीसाठी - सगळेच, तरी त्यातल्या त्यात ओझिल, लाम, पोडोल्सी आणि अर्थातच क्लोस्जे !
तयार आहात का मग ?
------
छोटा डॉन
27 Jun 2010 - 7:33 pm | निखिल देशपांडे
उत्तम प्रतिसाद
कळत नाही कोणाला सपोर्ट करायचे
सध्या तटस्थ आहोत..
क्लोसे???? का रुनी???
बघुयात कोण गोल मारतो..
आज मात्र या मॅचचा आनंद नक्की घेउयात
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
27 Jun 2010 - 10:16 pm | छोटा डॉन
जबरा झाली ना मॅच ?
अगदी बाजार उठला इंग्लंडचा ....
हे घ्या आमचे फोटोपरिक्षण !
------
छोटा डॉन
27 Jun 2010 - 10:20 pm | मेघवेडा
मस्त रे डान्या! :)
28 Jun 2010 - 6:56 pm | गणपा
धन्यवाद डॉण्राव :)
आवांतर : बेकहम च्या हातावर देवनागरीत गोंदवलेले दिसतय
27 Jun 2010 - 7:27 pm | सहज
मेवे चला लुफ्त लुटूया मॅचचा!
चीयर्स!
27 Jun 2010 - 7:33 pm | मेघवेडा
आम्ही तयारीत आहोत म्हटलंच होतं की तुम्हाला ;)
बादवे, तो प्रभ्या कुठे गायबलाय म्हणे? ;)
27 Jun 2010 - 7:38 pm | वेताळ
त्यामुळे मॅच बघणार नाही. (|: 8|
दोन्ही पण आपले आवडते संघ.......
वेताळ
27 Jun 2010 - 7:48 pm | टारझन
इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :) इंग्लंड :)
27 Jun 2010 - 7:51 pm | मेघवेडा
ये
धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड
धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड
धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड
धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड
धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड
धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड
धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड
मारला रे मारला! पन्नासावा मारला! क्लोस्जे क्लोस्जे.. क्लोस्जे क्लोस्जे!
28 Jun 2010 - 3:28 am | बिपिन कार्यकर्ते
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
हा प्रतिसाद टार्या / प्रभो आणि समस्त जर्मनद्वेष्ट्यांना समर्पित....
प्रवासात असल्यामुळे म्याच बघता नाही आली... विमानात स्क्रीनवर न्यूज येत होत्या... जर्मनी ४ - १ इंग्लंड बघितल्यावर पहिली आठवण आली डान्रावांची... ;)
बिपिन कार्यकर्ते
28 Jun 2010 - 9:43 am | टारझन
जर्मणीच्या पोरी भारी होत्या :) मॉर्कर ली पोरगी नताशा रुडॉस्की ला पटवली होती मी मागे ... पण तीच्याबद्दल सवडीने कधीतरी :)
बाकी जर्मणी जिडुन जिंकली हो .. आता आर्जेंटिणा आहे समोर :) नाय तिच्यायला सताठ गोल च्या फरकाने हारवलं तर आयडी बदलुन ठेविन
28 Jun 2010 - 10:15 am | आंबोळी
नाय तिच्यायला सताठ गोल च्या फरकाने हारवलं तर आयडी बदलुन ठेविन
कधी मॅच आहे रे? टार्या... प्रतिज्ञा लक्षात ठेव....
आंबोळी
27 Jun 2010 - 7:50 pm | सहज
जर्मनी पुढे.
क्लोज १ गोल
27 Jun 2010 - 8:01 pm | ब्रिटिश टिंग्या
क्लोसाने एक चांगली संधी वाया घालवली! (३०वे मिनीट)
27 Jun 2010 - 8:03 pm | मेघवेडा
प्रभोची गच्छंती निश्चित!
पोडोल्स्कि!! लव्हली! <:P
27 Jun 2010 - 7:58 pm | ब्रिटिश टिंग्या
आज प्रभोची गच्छंती अटळ! :)
- 'ब्रिटिश' टिंग्या
27 Jun 2010 - 8:04 pm | छोटा डॉन
२-०.
बोला, कुणाचे काय म्हणणे आहे ?
क्लोस्जे खेळना म्हणजे खेळणार, बोला, कुणाचे काय म्हणणे आहे ?
------
छोटा डॉन
27 Jun 2010 - 8:02 pm | ब्रिटिश टिंग्या
गोल!
२-०
27 Jun 2010 - 8:07 pm | टारझन
च्यायचा घो जर्मणीच्या ... चिडीचा खेळ करत आहेत जर्मन ...
आम्हाला नाय खेळायचं ज्जा !!
म्याच परत पैल्यापासनं सुरु करा !!
27 Jun 2010 - 8:09 pm | मेघवेडा
अनलकी इंग्लंड.. गोल होता तिच्यायला... इट्स ऑल हॅपनिंग!!
27 Jun 2010 - 8:10 pm | छोटा डॉन
लँपार्डचा आत्ताचा नक्की गोल होता.
अनलकी साले !
------
छोटा डॉन
27 Jun 2010 - 8:10 pm | निखिल देशपांडे
क्लिअर गोल होता लॅम्पार्ड चा..
मॅच चा फुल टाईम स्कॉअर ३-३
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
27 Jun 2010 - 8:16 pm | मेघवेडा
४-२ जर्मनी.
27 Jun 2010 - 8:09 pm | सहज
इंग्लंड पहीला गोल
27 Jun 2010 - 8:10 pm | मेघवेडा
अहो पहिला काय.. दुसरा पण होता.. टेक्नॉलॉजी गेली कुठे तिच्यायला?
27 Jun 2010 - 8:12 pm | निखिल देशपांडे
२०१४ चा वर्ल्ड कप ला अजुन दोन असिस्टंट रेफ्रि अॅड होणार म्हणे..
पण व्हिडिओ टेक्नॉलॉजि नाही..
गरज आहे...
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
27 Jun 2010 - 8:12 pm | निखिल देशपांडे
२०१४ चा वर्ल्ड कप ला अजुन दोन असिस्टंट रेफ्रि अॅड होणार म्हणे..
पण व्हिडिओ टेक्नॉलॉजि नाही..
गरज आहे...
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
27 Jun 2010 - 8:10 pm | टारझन
अंपायर्सच्या आयचा घो !!! ऐसे जर्मनी जिता तो क्या जीता ?
भाड मे जाओ जर्मनी !!!!!!!!!!!!!!
27 Jun 2010 - 8:13 pm | ब्रिटिश टिंग्या
पहिल्यांदाच इंग्लंड असल्यासारखी खेळतेय!
27 Jun 2010 - 8:14 pm | निखिल देशपांडे
च्यायला सुरवातिला डिफेंडर झोपले आहेत का काय असे वाटत होते???
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
27 Jun 2010 - 8:23 pm | मेघवेडा
हो ना रे च्यायला. 'जान फुंकली' का काय ते म्हणतात ना, त्याचं मूर्तिमंत उदाहरण. दोन गोल घेतल्यापासून तुफान खेळताहेत. पण साला डिफेन्स उघडा पडलाच्चै. तो अप्सन का इतका कोलला चिकटतोय च्यायला? क्लोस्जेसाठी मैदान उघडं करून ठेवतात मध्ये.. मग गोल नाय मारणार तर काय पूजा करणार जेम्स आणि अप्सनची? =)) =))
पण मजा आली साला फर्स्ट हाफला. ग्रेट गेम इंडीड.
27 Jun 2010 - 8:17 pm | प्रभो
साला १४ प्लेयर घेऊन खेळल्यावर काय होणारे????
27 Jun 2010 - 8:19 pm | निखिल देशपांडे
डॉन्ट वरी..
मी स्कोअर लाईन ३-३ सांगितली आहे...
त्या नंतर पेनॉल्टी चे काही सांगत नाही..
मॅच पेनॉल्टी पर्यंत गेली तर मजा येणार
अवांतरः- प्रभो तुझी खव का बंद आहे???
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
27 Jun 2010 - 8:22 pm | प्रभो
मॅच सडन डेथ मधे जावी ही माझीही इच्छा आहे...मजा येईल....
* परवा जरा मूड नव्हता म्हणून खव बंद ठेवली होती...आज करेन चालू...
27 Jun 2010 - 8:40 pm | ब्रिटिश टिंग्या
पराभवको घाबरके खरडवही बंद कियेलीये!
27 Jun 2010 - 8:50 pm | प्रभो
वयक्तीक प्रश्न....पास...काय समजायचेय ते समज....
27 Jun 2010 - 8:19 pm | निखिल देशपांडे
डॉन्ट वरी..
मी स्कोअर लाईन ३-३ सांगितली आहे...
त्या नंतर पेनॉल्टी चे काही सांगत नाही..
मॅच पेनॉल्टी पर्यंत गेली तर मजा येणार
अवांतरः- प्रभो तुझी खव का बंद आहे???
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
27 Jun 2010 - 8:53 pm | ब्रिटिश टिंग्या
३-१
27 Jun 2010 - 8:54 pm | मेघवेडा
काय म्हणणं आहे कुणाचं? आता तर २ चा मार्जिन आहे.. कीप दोज एक्स्क्युजेस टू युवरसेल्फ नाऊ! म्युल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लर! ऑस्सम!!
<:P <:P <:P
27 Jun 2010 - 8:56 pm | ब्रिटिश टिंग्या
४-१
27 Jun 2010 - 8:56 pm | मेघवेडा
४-१!!
=)) =)) =)) =))
27 Jun 2010 - 9:04 pm | ब्रिटिश टिंग्या
ते प्रभ्या कुठाय?
27 Jun 2010 - 9:07 pm | टारझन
आपण आपला आयडी बदलुन जर्मन टिंग्या करा आता =))
27 Jun 2010 - 9:10 pm | ब्रिटिश टिंग्या
त्यापेक्षा स्पॅनिश टिंग्या करतो........काय डौनराव?
27 Jun 2010 - 9:16 pm | टारझन
इंडियन टिंग्या कर ... वडापाव चारतो .. =))
27 Jun 2010 - 9:32 pm | दशानन
+ १
ह ल क ट आ हे तो.
27 Jun 2010 - 9:34 pm | Nile
इंग्लंड चारीमुंड्या चीत होणार असे आम्ही भाकित केले होतेच.वर्स्ट लॉस फोर इंग्लंड इन द वर्ल्डकप हिस्टरी! पण ह्या कपमध्ये आजच इंग्लंड खेळले काहीतरी. ;)
इस बात पे एक इनोद हो जाए: What’s the difference between the England football team and a tea bag?
उत्तरःA tea bag stays longer in the cup!
-निळ्या फुटबॉल ज्योतिषी
-Nile
27 Jun 2010 - 9:41 pm | प्रभो
जर्मनीचे अभिनंदन!!!
27 Jun 2010 - 9:44 pm | ब्रिटिश टिंग्या
प्रभोचे सांत्वन!
27 Jun 2010 - 9:46 pm | प्रभो
धन्यवाद....
कुठे बसायचं संध्याकाळी???
27 Jun 2010 - 9:48 pm | टारझन
काही अभिणंदण वगैरे काही नाही ... आर्जेंटिणा कडुन माती खाओत लेकाचे =))
बाकी तिकडे इंग्लंड वाष्ष्ट्रेलियाला हारवतंय बघ क्रिकेटात ... ;) चल दुधाची तहान ताकावर ;)
27 Jun 2010 - 9:56 pm | मेघवेडा
>> इंग्लंड वाष्ष्ट्रेलियाला हारवतंय बघ क्रिकेटात
हो तेज्यायला. साले व्हाईटवॉश करतात की काय असं वाटतंय.. चल प्रभ्या, "तुका म्हणे त्यातल्या त्यात!" ;)
बाकी टार्या, शनिवारी बघूयाच काय ते पहिल्या वाक्याबद्दल तुझ्या. आधी आज मेक्सिकोने नाही हरवलं म्हणजे मिळवली.. ;)
28 Jun 2010 - 1:22 am | टारझन
(विकट हास्य) आर्जेंटिणा ३-० .... बोला मेवे ... ;)
जर्मणी ने रिटन टिकीट फाडायला हरकत नाय ... नंतर टिकीटं नाय मिळली तर वांधे व्हत्याल
(/विकट हास्य)
27 Jun 2010 - 9:43 pm | स्वप्निल..
मॅच बघायला मजा आली :)
27 Jun 2010 - 9:52 pm | मेघवेडा
"इंग्लंड लॉस्ट बाय ४-१ अॅण्ड देअर बेस्ट प्लेयर वॉज देअर गोलकीपर जेम्स!" =))
रूनी नेहमीप्रमाणे पचपचीत ... किमान तीन चान्सेस त्याने अक्षरशः वाया घालवले.
सो कॉल्ड 'बेस्ट डिफेन्स' जर्मनीने उघडा पाडला. तो अप्सन सारखा त्या कोलला चिकटून. परस्परांशी काही ताळमेळ नाही. काहीवेळ सुंदर अॅटॅकिंग खेळलं इंग्लंड. अक्षरशः जर्मनांची हवा टाईट केली होती. पण हाफटाईम नंतर तीन मिनिटांत दोनदा या डिफेन्सने इंग्लंडचा घात केला. मॅच तिथेच संपली. डेव्हिड जेम्सने आज खरंच सुंदर खेळ केला. जर्मनीने चार पैकी तीन गोल मध्ये जेम्स हेल्पलेस होता त्यामुळे त्याला दोष देऊन चालणार नाही. बट ऑल क्रेडिट टू फ्रँक लॅम्पार्ड. तो 'न दिलेला' गोल आणि त्या दोन अप्रतिम फ्री किक्स.. ही वॉज द मॅन फॉर इंग्लंड! माझ्या मते इंग्लंडचा आजचा बेस्ट प्लेयर लॅम्पार्ड किंवा जेम्स!
जर्मनांबद्दल तर काय बोलावं. क्लोस्जा, पोडोल्स्की, श्वाईन्श्टायगर, ओझिल, म्युलर, खेदिरा, गोमेझ सगळ्यांनी किमान एक एक गोल अटेम्प्ट केला! फ्रीडरीक आणि खेदिरा यांनी मिळून एक हमखास होणारा गोल वाचवला (जर्मेन डेफो) पण माझ्यामते आजचा 'मॅन ऑफ द मॅच' ठरावा गोलकीपर मॅन्युअल नॉयर. जर्मनीचा पहिला गोल - सर्वस्वी क्रेडिट त्यालाच जातं. पुन्हा म्युलरच्या झंझावाताआधी त्याने जेरार्डचा एक गोल वाचवला होताच.
असो. नेक्स्ट विक्टिम ऑन द लिस्ट - अर्जेंटिना? की मेक्सिको?
28 Jun 2010 - 12:31 am | नि३
धतड ततड धतड ततड धतड ततड धतड ततड धतड ततड धतड ततड धतड ततड धतड ततड धतड ततड धतड ततड धतड ततड धतड ततड धतड ततड धतड ततड धतड ततड धतड ततड
अर्जेंटीना १ -० ने पुढे
--नि३.
28 Jun 2010 - 12:33 am | नि३
अरे
धतड ततडधतड ततडधतड ततडधतड ततडधतड ततडधतड ततडधतड ततडधतड ततडधतड ततडधतड ततडधतड ततड
२-०
धतड ततडधतड ततडधतड ततडधतड ततडधतड ततड
---नि३.
28 Jun 2010 - 2:29 am | नि३
जिंकलो बुवा एकदाचे... आता पुढचा सामना जर्मनी बरोबर्....पाहुन घेऊ..;)
---नि३.