जपान चित्रसफ़र - १ (असाकुसा मंदिर)

डोमकावळा's picture
डोमकावळा in कलादालन
27 Jun 2010 - 6:17 pm

असाकुसा. जपान मधल्या अनेक पर्यटन स्थळांपैकी एक पर्यटन स्थळ. इथल्या अतिप्राचीन मंदिरापैकी एक म्हणून ओळखले जाणारे हे असाकुसा मंदिर.

मंदिराचे प्रवेशद्वार.
सुरुवातीलाच लक्ष वेधून घेतो तो प्रवेशद्वारात असलेला भलामोठा जपानी पद्धतीचा कंदील. या प्रवेशद्वाराची रचना अतिशय आकर्षक आहे. प्रचंड आकाराचे गोल लाकडी खांब आणि त्यावर असलेले लाकडी कौलारू छप्पर.

या प्रवेशद्वारातून आत आल्यावर पूढे तसेच आणखी एक पण दुमजली प्रवेशद्वार आहे.

जसे भारतातल्या मंदिरांसमोर दीपस्तंभ असतात जणू तसेच काहीसे हे जपानी दीपस्तंभ.

मंदिराच्या परिसरात आपल्या पारंपारिक पोशाखातील एक हसतमुख जपानी महिला. या पारंपारिक पोशाखाला किमोनो म्हणतात.

हेच ते मंदिर.

मंदिराच्या दुमजली प्रवेशद्वाराच्या आतील बाजूला अडकवलेली एक मॊठी चप्पल (मंदिरात चप्पल ?).

ड्रॅगनमुखातून पडणारे पाणी. (जसे भारतीय संस्कृतीत गोमुखातून पडणारे पाणी पवित्र मानले जाते तसे बहूतेक यांच्याकडे ड्रॅगन बद्दल असावे. कारण एरवी फ़क्त मिनरल वॉटर पिणारे जपानी इथे ड्रॅगनमुखातून पडणारे पाणी बिनदिक्कत पितात)

मंदिराचा गाभारा

गाभाऱ्यातील छतावर काढलेली चित्रे.

आणि बुद्ध मूर्ती.

क्रमश:

देशांतर

प्रतिक्रिया

अरुंधती's picture

27 Jun 2010 - 6:45 pm | अरुंधती

छायाचित्रे आवडली! विशेष करुन चप्पल.... डिझाईन वेगळेच आहे! :D आणि बुध्दांची मूर्ती मस्त! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

टारझन's picture

27 Jun 2010 - 7:02 pm | टारझन

मस्त रे डोम !! भारी फोटु :) तिकडं जाऊन सुमो झालास म्हणे तु ? सुमो आंद्या म्हणत होता :)

असो

- सुमो टार्‍या

jaypal's picture

27 Jun 2010 - 9:32 pm | jaypal

म्हणतो. सुंदरफोटो आणि छान वर्णन . बुद्धाची मुर्ती पण आवडली (तिकडे मुर्तींच्या डोक्यावर कावळे बसत नाहीत वाटत ;) )
हा एकच भाग आहे की क्रमश: आहे? कृपया क्रमशः लिहा ही विनंती .
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

डोमकावळा's picture

28 Jun 2010 - 8:15 am | डोमकावळा

>> तिकडे मुर्तींच्या डोक्यावर कावळे बसत नाहीत वाटत

हा हा.....
मुर्तीच्या डोक्यावरचा कावळा नसला तरी मूर्तीच्या बाजूला उभा असलेला हा डोमकावळा ... :D

असो... क्रमश: टाकत आहे...

ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.

मस्त कलंदर's picture

27 Jun 2010 - 7:38 pm | मस्त कलंदर

फोटू मस्त!!!
चपलेला अंगठा नाही. सबब ती होडी/तराफा म्हणूनही चालू शकेल.

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

आनंदयात्री's picture

27 Jun 2010 - 7:55 pm | आनंदयात्री

वाह्ह क्या बात है !!
फार सुंदर फोटो आहेत रे डोम्या. एक नंबर !!

>>कारण एरवी फ़क्त मिनरल वॉटर पिणारे जपानी इथे ड्रॅगनमुखातून पडणारे पाणी बिनदिक्कत

अहो श्रद्धा सगळीकडेच. त्यांचा बौद्धधर्म आपल्याच देवभुमीची देण :)

बाकी इशिकावा सान, सुनहरा सान भेटतात का ?
अन इशिकावा बरोबरची ती दणका ? जपुन भेट रे बाबा ..

-
(जपाणी दणक्यांचा फ्याण)

आंद्याकावा सान

डोमकावळा's picture

29 Jun 2010 - 3:20 pm | डोमकावळा

>> अन इशिकावा बरोबरची ती दणका ?
जपानी आणि दणका???
जरा विसंगत वाटतय... ;)

ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.

वेताळ's picture

27 Jun 2010 - 7:55 pm | वेताळ

काय म्हणतात त्याला?
फोटो खुप छान आहेत.
आपल्या देशात गौतम बुध्दाची इतकी सुंदर मंदिरे नाहीत ह्याचे दु:ख वाटते.
सदर ठिकाणी तुम्ही कोणता कॅमेरा वापरला त्याविषयी लिहले नाहीत.युयुत्सुसाहेब नाराज होण्याची शक्यता वाटते.
वेताळ

आनंदयात्री's picture

27 Jun 2010 - 8:00 pm | आनंदयात्री

दुखती रग पे हात रख दिया !!

>>सदर ठिकाणी तुम्ही कोणता कॅमेरा वापरला त्याविषयी लिहले नाहीत.युयुत्सुसाहेब नाराज होण्याची शक्यता वाटते.

माझा होणारा क्यामेरा ना दे डोम्या ? हात साला .. त्या क्यामेराने काढलेले फोटु टाकुन तु माझ्या गरिबीचा अपमानच केलेला आहेस ..

;) कृपया हलकेच घेणे ;)

-
आंद्या गरिब

डोमकावळा's picture

27 Jun 2010 - 8:26 pm | डोमकावळा

नाही रे तो जूना क्यामेरा आहे रे.....

ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.

रामदास's picture

28 Jun 2010 - 9:05 am | रामदास

ताजमहाल बांधून शहाजहाननी गरीबांच्या इष्कची मजाक उडवली आहे ते आठवलं.

सहज's picture

27 Jun 2010 - 8:02 pm | सहज

सेन्सोजी लै भारी!

रात्री तो जपानी पॅगोडा काय सोन्यासारखा पिवळा झळाळतो.

डोमकावळा's picture

27 Jun 2010 - 8:28 pm | डोमकावळा

रात्रीचा हा चमचमणारा फोटू झकासच...
याला पॅगोडा म्हणतात का?

ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.

युयुत्सु's picture

27 Jun 2010 - 9:22 pm | युयुत्सु

क्यामेरा कोणता?

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

डोमकावळा's picture

28 Jun 2010 - 7:14 am | डोमकावळा

ऑलिंपस चा कुठलातरी एक पॉइंट अ‍ॅण्ड शूट क्यामेरा होता.
त्यावेळी आमच्या बरोबर असणार्‍या एका मित्राचा होता.
(मॉडेल नंबर वगैरे आठवत नाही.... हे फोटो दीड -दोन वर्षा पुर्वीचे आहेत)

पूढच्या वेळी मॉडेल नंबर नक्की लक्षात ठेवून लिहीतो..

ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.

रामदास's picture

28 Jun 2010 - 9:10 am | रामदास

अनेक कविता मिपावर सध्या येत आहेत.त्यापैकी ही पण एक .सुंदर फोटो आहेत.
आवडले.

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Jun 2010 - 5:32 pm | बिपिन कार्यकर्ते

एक नंबर !!!

बिपिन कार्यकर्ते

शुचि's picture

28 Jun 2010 - 5:43 pm | शुचि

मला खूप खूप आवडली ही छायाचित्रं आणि लेख.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

अमोल केळकर's picture

29 Jun 2010 - 4:06 pm | अमोल केळकर

खुप छान

अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा