च्यायला या नान्याने सगळ्यांनांच झपाटलय....
हातात हात
घेवुन आम्ही झपाटायचो
ती एकाच्या मानगुटीवर बसायची अन्
मी दुस-याच्या अंगात यायचो
झाडावर लटकत
लोंबत असतांना बोलत असतांना
असंच सगळ्यांना झपाटायच
एकमेकांना हलकेच बजावुन सांगायचो
पुनर्जन्माच्या फेर्यातून
कधीतरी तिचा आत्मा मुक्त झाला
मी मात्र मारत आहे त्याच गावातून
झपाटण्यासाठी चकरा.... बॉडी टु बॉडी.
---कंदिलकुमार
सहजरावांच्या सल्ल्या नुसार जळ्ळा तो ळ शिर्षकात आणलेला आहे.
प्रतिक्रिया
25 Jun 2010 - 2:09 pm | सहज
लै भारी. गणपा काय काउंट आता?
25 Jun 2010 - 3:50 pm | गणपा
हा हा हा जबरा.
आम्ही कर टेकले बुवा या मिपाकरांपुढे.
25 Jun 2010 - 2:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
कंदिलकुमार, तुम्ही "खतरनाक" प्रियालीताईंचे मित्र दिसता ...
विडंबन भारीच.
अदिती
25 Jun 2010 - 2:25 pm | कानडाऊ योगेशु
सहजरावांच्या सल्ल्या नुसार जळ्ळा तो ळ शिर्षकात आणलेला आहे.
तोच विचार करत होतो."भूत" शीर्षक हा रडीचा डाव झाला असता.
*त नाव घेवुन कुठकुठली अजुन विडंबने येऊ शकतील ही कल्पना करुनच अंगाला कापरं भरले.
बाकी तुमचे विडंबन वाचुन दातखीळ बसली.
बाकी "हडळ" हे ही शीर्षक चालुन गेले असते..
(घाबरट) योगेशु..
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
25 Jun 2010 - 2:40 pm | विसोबा खेचर
हे आम्हाला सर्वात जास्त आवडलेले विडंबन..
या विडंबनाला आम्ही मुखपृष्ठावर स्थान देणार! :)
तात्या.
25 Jun 2010 - 2:57 pm | सुधीर१३७
हो, पण चित्रासह (सचित्र) द्या म्हणजे झालं......................... :D ;) =))
25 Jun 2010 - 3:04 pm | विसोबा खेचर
चित्रही तयार आहे.. एकदम मस्त आणि साजेसं चित्र सापडलं आहे.. :)
इथे पहा! :)
आपला,
(कल्पक मुखपृष्ठकार) तात्या.
25 Jun 2010 - 3:04 pm | विसोबा खेचर
चित्रही तयार आहे.. एकदम मस्त आणि साजेसं चित्र सापडलं आहे.. :)
इथे पहा! :)
आपला,
(कल्पक मुखपृष्ठकार) तात्या.
25 Jun 2010 - 3:09 pm | केशवसुमार
कंदिलकुमार,
खतरनाक विडंबन १ लंबर..
हा हा हा..
(झपाटलेला)केशवसुमार
अवांतरः
तात्या: अमावसेचा मुहुर्त धरा..
(सुचक)केशवसुमार
25 Jun 2010 - 3:12 pm | विसोबा खेचर
हरकत नाही.. अवसेचा मुहूर्त चांगला आहे..आज पुनव आहे. अजून १५ दिवसांनी मुपृवर टाकेन. आठवणी पुन्हा ताज्या होतील.. :)
25 Jun 2010 - 4:33 pm | चतुरंग
पेटवला बॉ यांनी कंदील! :T
लई भारी विडंबन! ;)
(तांत्रिक)चतुरंग
25 Jun 2010 - 5:18 pm | अवलिया
बाब्बो....
--अवलिया
25 Jun 2010 - 5:19 pm | शुचि
:SS :SS :SS
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
25 Jun 2010 - 6:35 pm | प्रभो
मस्त रे आंबोळ्या!!
25 Jun 2010 - 6:36 pm | प्रियाली
ही कल्पना मला का नाही सुचली? :(
25 Jun 2010 - 6:43 pm | मेघवेडा
हे एक लंबर! :)
25 Jun 2010 - 9:43 pm | अभिज्ञ
लै भारि,
.../\...
अभिज्ञ
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
25 Jun 2010 - 10:38 pm | sur_nair
भारिच आहे
26 Jun 2010 - 1:24 pm | श्रावण मोडक
भारी
26 Jun 2010 - 5:14 pm | भडकमकर मास्तर
वा उत्तम जमलंय...
"ळ" कवितेचा प्याटर्न आणि विषयाची दाहकता यांचे उत्तम मिश्रण
28 Jun 2010 - 9:58 am | आंबोळी
सर्व वाचकांना धन्यवाद!
आंबोळी