पायात पाय घालून
आम्ही पाडायचो.
कधी एकेरी पट काढायचो ,
कधी लांगेत बोटे घालायचो.
लंगोट घालताना,
माती मळताना, थंडाई गिळताना
असंच आयुष्यभर लोळायचं ,
एकमेकांना हलकेच बजावून सांगायचो.
गादी वरच्या नुरा खेळून कधी
त्याच्या दारात बी गाडी आली,
मी मात्र मारत आहे त्याच पेठांत
चकरा , ही तालीम ते ती तालीम
प्रतिक्रिया
25 Jun 2010 - 12:40 am | मस्त कलंदर
कोल्हापुरची आठवण झाली.... चालू द्या!!!
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
25 Jun 2010 - 12:41 am | प्रभो
मस्त रे!!!!
25 Jun 2010 - 12:42 am | बिपिन कार्यकर्ते
हे ही छान... आज खरंच खूळ लागलंय लोकांना. ;)
बिपिन कार्यकर्ते
25 Jun 2010 - 12:47 am | टारझन
कुठं बोटे घालायचे म्हणालात मालक?
25 Jun 2010 - 12:49 am | चतुरंग
नाहीत हो टारुशेठ! ;)
(धोबी पछाड)चतुरंग
25 Jun 2010 - 12:51 am | टारझन
नाय बा .. आपण कधी पैलवाणकी केली नाय ... यामशाळेत च्यार वजनं उचलन्यापल्याड न एखाद्या ष्टेजवर पोजा मारण्यापुडं आमची मजल गेली नाय बा :)
इस्काटुन सांगाल तं बरं पडंल !
-(व्यामशाळेतला) टारझन
25 Jun 2010 - 12:56 am | अडगळ
लांगंत बोटं घालून उचलायचा आनी २ मिन्टात आस्मान दाखवायचं.
25 Jun 2010 - 5:10 pm | अवलिया
छान ! चालु द्या
--अवलिया