वर्ल्ड कप २००६ च्या उपविजेत्या फ्रान्स चा पाठोपाठ आत्ताच गतविजेता इटली वर्ल्डकपच्या बाहेर गेलेला आहे.
आत्ताच संपलेल्या सामन्यात स्लोवाकिया ने इटली ला ३-२ अश्या गोलफरकाने हरवले. शेवटच्या काही मिनिटांचा खेळ पाहण्यालायक होता याच बरोबर स्लोवाकिया पुढच्या राउंड मधे पण पोहचला आहे.
आता पुढचा बाहेर जाणार मोठा संघ कोणता असेल???
प्रतिक्रिया
24 Jun 2010 - 9:46 pm | मेघवेडा
ये धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड
निख्या.. तूच असं म्हणावंस.. तूच? इटलीचा उदो उदो करत होतास ना रे? का तू ही झालायंस जर्मन सपोर्टर शेवटी?
24 Jun 2010 - 9:48 pm | निखिल देशपांडे
एवढी भंगार इटलीची टिम पाहिली नव्हती..
हारले बरे झाले... आजचा मॅच तर स्लॉवाकिया भारी खेळले
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
24 Jun 2010 - 9:50 pm | मेघवेडा
बरं.. पुढे काय? इटली गेली आता कोणाला सपोर्ट ते सांग. म्हणजे त्यानुसार तोफा तैय्यार करायला बर्या ना! ;)
24 Jun 2010 - 9:54 pm | निखिल देशपांडे
चांगला प्रश्न विचारला... ;)
ब्राझील अर्जेंटीना वैगेरे पर्याय आहेत अजुन ठरवले नाही
स्लोवाकिया ला करावे का???
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
24 Jun 2010 - 9:46 pm | प्रभो
उद्या स्पेन ची मॅच आहे...स्पेन म्हणावे वाटत आहे.....पण डॉण्रावांशी झालेल्ता तहाप्रमाणे 'दुश्मन का दुश्मन अपना दोस्त' याप्रमाणे माझे मत------जर्मनी..... :D
24 Jun 2010 - 9:50 pm | गणपा
मालक मारा उड्या दोन दिवस. परवा रडायचच आहे ;)
24 Jun 2010 - 9:52 pm | मेघवेडा
अब्जो वेळा सहमत!
प्रभ्याने नाहीतरी मान्य केलंच आहे.. आम्ही रविवारपर्यंतच एकमेकांचे खंदे विरोधक आहोत! ;) मग तो पण जर्मनीला सपोर्ट करणार आहे त्यापुढे :D
24 Jun 2010 - 9:56 pm | प्रभो
काय वेळ आलीय या जर्मन सपोर्टरांवर.........हिटलर प्रमाणे मारून मुटकून समर्थक बनवतायत.... =))
इंग्लंड गेली तर स्पेन ला सपोर्ट...स्पेन गेली तर अर्जेंटीनाला सपोर्ट...अर्जेंटीना गेली तर ब्राझीलला सपोर्ट....ब्राझील गेली पोर्तुगालला सपोर्ट....पोर्तुगाल गेली तर कोरीयाला सपोर्ट....तीपण गेली तर घानाला सपोर्ट...
24 Jun 2010 - 10:00 pm | निखिल देशपांडे
काय पण लिस्ट काढलीए..
याच नंबराने सगळे बाहेर जाणार बहुतेक
घाना रनर अप ;)
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
24 Jun 2010 - 10:26 pm | मेघवेडा
>> काय पण लिस्ट काढलीए..
आता ठरवलंच्चै नाईच जर्मनीला सपोर्ट करायचा तर चारकोप युनायटेड पण सरस ठरते ;)
24 Jun 2010 - 10:26 pm | मेघवेडा
>> काय पण लिस्ट काढलीए..
आता ठरवलंच्चै नाईच जर्मनीला सपोर्ट करायचा तर चारकोप युनायटेड पण सरस ठरते ;)
24 Jun 2010 - 10:30 pm | प्रभो
कोण चारकोप युनायटेड???
धन्यवाद.
24 Jun 2010 - 10:37 pm | मेघवेडा
अरे इंग्लंडला प्रॅक्टिस मॅच मध्ये ८-० धुतला ना त्यांनी मागच्या महिन्यात? विसरलास इतक्यात? ;)
24 Jun 2010 - 10:42 pm | प्रभो
अरेरे...स्वप्नातही इंग्लंडच दिसते....किती धसका हा???.....असो...घ्यायलाच हवा, नीहीतर जाल बाहेर (बाराच्या भावात असं लिहायचं होतं..पण जाउदे...) :D
जरा व्यवस्थीत स्वप्न बघत जारे बाबा...
24 Jun 2010 - 10:45 pm | मेघवेडा
>> स्वप्नातही इंग्लंडच दिसते....किती धसका हा
प्रभ्या मेल्या विनोदी लेख नक्कीच मस्त जमतील तुला लिहायला. प्रयत्न तर कर! ;)
24 Jun 2010 - 10:00 pm | गणपा
आपला आमच्या टीम वरचा विश्वास लै आवडला.
सगळे गेले पण जर्मणी पाय रोवुन आहे हे आडवळणाने का होईना पण कबुल केलचं.
24 Jun 2010 - 10:04 pm | प्रभो
गिरे तो भी टांग.... करायची सवय आवडली बॉ.....शेवटी तुम्ही आमचेच मित्र... =))
याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की आम्ही घानाला सपोर्ट करू पण जर्मनीला नाही... :D
25 Jun 2010 - 9:25 am | छोटा डॉन
काय लावलयं जर्मनी जर्मनी जर्मनी.
काय आहे त्या टीममध्ये ?
अरे ती काय टीम आहे ? उगाच अवघड अवघड नावाचे प्लेयर घेतले की काय टीम होते काय ?
उगाच ते क्लोस्जे म्हणुन बोंबा मारत आहात, काय केले त्याने ? पहिल्या मॅचमध्ये एक गोल केला हे मान्य, दुसर्या मॅचला गेला ना रेड कार्ड घेऊन बाहेर आणि तिसर्याला तर चक्क त्याला 'बसवला'च ...
आणि काय तो पोडोल्स्की, च्यायला मला तर वाटली पोडोल्स्की म्हणजे जर्मन टीमच्या गाडीच्या पोलिश ड्रायव्हर वगैरे आहे की काय, दिसतोही तसाच म्हणा, आता तर काय म्हणे अॅटॅकिंग मिडफिल्डर म्हणुन खेळतो आहे, धन्य आहे तुमचे लेकांनो !
काय तो 'ओझिल', आयला प्लेयर आहे काम चित्रपटातला कॉमेडी कॅराक्टर ?
बघतो कुठे, बॉल मारतो कुठे, कशाकशाचा ताळमेळ नाही. मी तर म्हणतो की त्याने केलेला एकमेव गोल नक्कीच घोळात झाला असावा, १००% खात्री आहे मला ...
ही अशी कंडिशन आणि हे लागले नाचायला.
जाऊ दे, अरे जर्मनी काय टीम आहे ?
त्यापेक्षा च्यायला आमची 'बेंगलोर एफसी' बरी हो !
------
छोटा डॉन
25 Jun 2010 - 2:03 pm | निखिल देशपांडे
उगाच ते क्लोस्जे म्हणुन बोंबा मारत आहात, काय केले त्याने ? पहिल्या मॅचमध्ये एक गोल केला हे मान्य, दुसर्या मॅचला गेला ना रेड कार्ड घेऊन बाहेर आणि तिसर्याला तर चक्क त्याला 'बसवला'च ...
श्री. छोटा डॉन वरील विधान आपण अर्धवट माहीतीच्या आधारावर केले आहे असे आम्हास म्हणावेस वाटते, किंवा जर्मनी बद्दल आपली असलेली जळजळ या विधानातुन दिसुन येते :-)
तिसर्या सामान्यात रेड कार्ड मुळे क्लोसे वर बंदी होती. रेड कार्ड दिलेला खेळाडु पुढल्या सामन्यात खेळु शकत नाही हे माहीत असुनही केवळ वैयक्तिक आकसापोटी आपण जर्मन खेळाडुंबद्दल असे लिहित आहात हे पाहुन माझ्यातला स्पेन समर्थक दुखावला गेलाय
असो रेड कार्ड चा नियम "If a player is sent off as a result of a direct or indirect red card, he will automatically be suspended from his team’s next match. In addition, further sanctions (i.e. additional suspension, fine, etc) may be imposed for a direct red card."
दुवा:- http://www.fifa.com/worldcup/news/newsid=1250070/
(फुटबॉल समर्थक)निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
25 Jun 2010 - 3:47 pm | मस्त कलंदर
व्वा! अगदी 'पुराव्याने शाबित' का???
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
24 Jun 2010 - 9:48 pm | Nile
पुढचा संघ अर्थातच इंग्लड असेल.
बाकी, शेवटच्या काही मिनिटांतच ईटलीच्या खेळाडूंना अचानक आपण वर्ल्डकप खेळतोय, आपण गोल केले पाहिजेत असा अचानक साक्षात्कार या मालिकेत प्रथमच झाला असे वाटले. असो गेली ते बरं झालं. ईटलीच्या बैलाला... ;)
-Nile
24 Jun 2010 - 9:51 pm | निखिल देशपांडे
फार लवकर कळलं.. ;)
जाउ दे एकुणच गेले ते बरे झाले..
आता उद्या स्पेन चा मॅच आहे म्हणे ;)
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
24 Jun 2010 - 9:52 pm | Nile
साला चिली जर उद्या जिंकली ना (अन तिकडे स्वीस लोक पण जिंकले पाहिजेत) लै लै मजा येनार!
-Nile
24 Jun 2010 - 10:03 pm | मेघवेडा
चिली-स्पेन ड्रॉ होणार। होंडुरास धूळ खाणार॥
चिली, स्विस पुढे जाणार। डान्राव रडणार निश्चित॥
**॥इति डॉईश्चसपोर्टर महावाक्यम्॥**
** सौजन्य : 'डचेस' अदिती ;)
24 Jun 2010 - 10:04 pm | प्रभो
नायल्या, ...उद्या हे वर सगळं लिहिलय तसं झालं तर स्पेन बाहेर जाणार...तुझा वरचा प्रतिसाद(इंग्लंड बाहेर जाण्याचा) त्या assumption मधे बसत नाही.... जा नीट अभ्यास करून ये रे बाबा... :)
24 Jun 2010 - 10:07 pm | Nile
!!!!!!!!!! कुणाचा अभ्यास कमी पडतोय?? जर्मनी इंग्लडशी खेळतेय हे ठरलंय लेका!
-Nile
24 Jun 2010 - 10:09 pm | मेघवेडा
अरे पण आधी कोण बाहेर पडणार? वरचं 'डॉईश्चसपोर्टर महावाक्यम्' जर खरं झालं तर स्पेनचं 'हरे हरे' आधी नाही का होणार इंग्लंडच्या? मंग? :D
24 Jun 2010 - 10:09 pm | मेघवेडा
अरे पण आधी कोण बाहेर पडणार? वरचं 'डॉईश्चसपोर्टर महावाक्यम्' जर खरं झालं तर स्पेनचं 'हरे हरे' आधी नाही का होणार इंग्लंडच्या? मंग? :D
24 Jun 2010 - 10:15 pm | Nile
च्यायला असं होय! अरे लेका मी लिहलंय स्पेन बाहेर पडलं तर लै मजा येईल (कुठे गेला तो डान्या) पण तसं होइल असं वाटत नाही. :)
-Nile
24 Jun 2010 - 10:28 pm | मेघवेडा
तसं बघायला गेलं तर आज जपान आणि डेन्मार्क यांचा निकाल आहे. तशा काही भारी टीम नाहीत दोन्ही पण तरी यु नेव्हर नो..
24 Jun 2010 - 9:48 pm | गणपा
आरा रा रा रा...
आफ्रिकेच्या भुमीत भले भले संध गाडले जातायत.
24 Jun 2010 - 9:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
ते डच आहेत का अजून? माझ्याकडे भडक्क-ऑरेंज टोपी आहे म्हणून विचारलं!
अदिती
24 Jun 2010 - 9:55 pm | Nile
ओ रेड हेड गप बसा. तुमाला अजुन लै अवकाश आहे.
-Nile
24 Jun 2010 - 9:56 pm | निखिल देशपांडे
आज रात्री कळेल... त्यांची मॅच आहेच
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
24 Jun 2010 - 10:34 pm | मेघवेडा
आज रात्री काय कळायचंय. डच आहेत अजून जिवंत. आजचा सामना प्रॅक्टिस मॅच आहे त्यांच्यासाठी. ते थ्रू झालेतच, कॅमेरूनही नक्की बाहेर आहेत. त्यामुळे आजचा सामना महत्त्वाचा नाहीच. :)
24 Jun 2010 - 10:25 pm | चतुरंग
~X( आत होतं कधी ह्या वेळी?
२००६ चे विजेते होते हे खोटं वाटावं इतके घाण खेळले. ~X(
आत्ताच्या सामन्यात तर स्लोवाकिया मनाला येईल तेव्हा गोल करीत होती!
चतुरंग
24 Jun 2010 - 11:35 pm | छोटा डॉन
चांगला धागा रे निख्या.
प्रतिसाद वाचायला मज्जा येत आहे.
चालु द्यात, पण कुणाची ( पक्षी : स्पेनची ) वैयक्तिक खोडी काढु नका. ;)
स्पेनच्या विरोधात येणारे सर्व प्रतिसाद अप्रकाशित केले जातील ;)
( त्या सदस्याला आम्ही खरडवहीत किलोकिलो खरडा टाकुन झोडपु ते वेगळेच ) :)
------
छोटा डॉन
24 Jun 2010 - 11:38 pm | प्रभो
>>स्पेनच्या विरोधात येणारे सर्व प्रतिसाद अप्रकाशित केले जातील
डॉन्रावांच्या बाजूने असलो तरी वैयक्तीक स्वार्थासाठी संपादकपदाचा गैरवापर करण्याची धमकी देणार्या 'वायदेआझमांचा' निषेध!!!!!!!!!
24 Jun 2010 - 11:42 pm | छोटा डॉन
असो.
सदस्यांच्या एकगठ्ठा स्पेनला विरोध करण्याच्या हिडिस कृत्याचा निषेध करतो आणि झोपायला जातो.
बाकी उगाच आम्हाला उद्या कवितेंची रास घालायला भाग पाडु नका असा मित्रत्वाचा सल्ला देतो ;)
( चेष्टेत घ्या रे, तसे काही करणार नाही )
------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
24 Jun 2010 - 11:45 pm | चतुरंग
हे ही फक्त वायदेच आहेत! ;)
चतुरंग
24 Jun 2010 - 11:43 pm | निखिल देशपांडे
( त्या सदस्याला आम्ही खरडवहीत किलोकिलो खरडा टाकुन झोडपु ते वेगळेच )
वाट पाहतोय हो ;)
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
24 Jun 2010 - 11:48 pm | यशोधरा
जी टीम फायनलला जिंकेल त्यांना माझा सपोर्ट होताच असणार आहे! :D
25 Jun 2010 - 12:40 am | Nile
हे पहा काय म्हणताहेत! अहो जी नावाची कुठलीच टीम खेळत नाहीए यावेळी तरी. ;)
-Nile
25 Jun 2010 - 9:11 am | यशोधरा
पीजे करु नका हो! :P
25 Jun 2010 - 12:17 am | ब्रिटिश टिंग्या
१. इंग्लंड
२. जर्मनी
३. नेदरलँड
४. स्पेन/पोर्तुगल
सेमीफायनल :
ब्राझील वि. उरुग्वे
अर्जेंटीना वि. स्पेन/पोर्तुगल
25 Jun 2010 - 12:27 am | मेघवेडा
हायला टिंग्या फिरला..
ये धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड
25 Jun 2010 - 12:31 am | ब्रिटिश टिंग्या
020-26695253
या क्रमांकावर फोन कर! कालांतराने बरा होशील!
25 Jun 2010 - 12:36 am | मेघवेडा
अरे पुण्यातला नंबर दिलायस तो. अॅड्रेस पण दे की बरोबर! पाठवतो अॅम्ब्युलन्स घरी तुझ्या! ;)
25 Jun 2010 - 12:38 am | बिपिन कार्यकर्ते
कोण इटली?
धन्यवाद.
(हा प्रतिसाद नानाला समर्पित.)
बाकी आहेच आपलं....
डॉइशलांड ! डॉइशलांड !! डॉइशलांड !!!
डॉइशलांड ! डॉइशलांड !! डॉइशलांड !!!
डॉइशलांड ! डॉइशलांड !! डॉइशलांड !!!
डॉइशलांड ! डॉइशलांड !! डॉइशलांड !!!
डॉइशलांड ! डॉइशलांड !! डॉइशलांड !!!
बिपिन कार्यकर्ते
25 Jun 2010 - 10:26 am | पुरणपोळी
अरे फार वाईट झाल........:(
मला इटालीचा अन्ड्रेआ पिर्लो खुप आवडतो..छान दिसतो आणि छान खेळतो..
अतिशय कूल आणि सभ्य, आणि त्याची महास्टायलीश हेअरस्टाईल.....:)
मागचा कप त्याच्यामुळेच जिंकलि इटाली..प्लेयर ओफ द मच होता तो तेव्हा
ह्या वेळेला एन्जुरीमुळे नाहि खेळु शकला जास्त..
वेल मी अन्ड्रेआ पिर्लो बघायला मिळणार नाहि म्हणुन दु:खी आहे....
25 Jun 2010 - 10:43 am | दिपक
इटली x स्लोवाकिया जबरदस्त मॅच झाली. पहिल्यापासुन स्लोवाकियाचीच सरशी होती मॅच मध्ये. हाफटाईम नंतर इटलीने थोडा जोर पकडला. शेवटची १० मिनिटे धम्माल होती. स्लोवाकिया कडुन तिसरा गोल झाला आणि तिथेच निकाल कळाला. खरच स्लोवाकिया मस्तच खेळली..
25 Jun 2010 - 7:28 pm | मी-सौरभ
आमचा संपूर्ण पाठींबा त्यांनाच...
-----
सौरभ :)