गर्लफ्रेन्ड सोबत एक रोमँटिक दिवस: काही सुचतंय?

सोम्यागोम्या's picture
सोम्यागोम्या in काथ्याकूट
17 Jun 2010 - 4:16 am
गाभा: 

माननीय मिपाकरहो,

या पूर्वी मी काही जणांवर बिनकामी धागे काढले म्हणून टीका केली त्यांची जाहीर माफी मागून मी हा धागा काढत आहे. काय करणार माझ्यासमोर दुसरा पर्यायच नव्हता! मिपाकर नक्की मदतीला धावून येतील अशी आशा मला आहे.

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मी भारतात येणार आहे आणि मला माझ्या गर्लफ्रेन्डला एक सरप्राईजिंग, रोमँटिक डेटवर घेऊन जायचं आहे. नेहमी पेक्षा थोडंसं वेगळं असं काही झालं तर हा दिवस आमच्या दोघांच्याही लक्षात कायम राहील. मला तिला जाम खूष करायचं आहे. :X

इतर गोष्टींची थोडी फार माहिती सांगितली म्हणजे पर्याय सुचवायला मदत होईल असे वाटते. तो दिवस आम्ही मुंबई मध्ये किंवा एका दिवसात जाऊन मुंबईत परत येता येईल अशा ठिकाणी घालवू शकतो. माझ्याकडे मुंबई मध्ये बाईक उपलब्ध आहे. बाईक चालवण्यात मी एक्स्पर्ट आहे. कार उपलब्ध आहे पण मला मुंबईत ड्रायव्हिंग येणार नाही. मी मुंबईचा नाही त्यामुळे कुठुन कसं जायचं व रस्ते मला ठाऊक नाहीत.माझं बजेट आहे १० हजार रुपये. अर्थात तेवढे खर्च केलेच पाहिजेत असं काही नाही पण काही झकास कल्पना असेल तर तयारी आहे. मी पट्टीचा मत्स्याहारी व मांसाहारी असून ती शुद्ध शाकाहारी आहे.

आता पर्यंत माझ्या समोर आलेले पर्याय असे:

१. माथेरानः माथेरानला जाण्यासाठी जुलै ही योग्य वेळ आहे का? नेरळ पासूनची मोनो रेल जुलै मध्ये चालू असते का? मी हे वाचून थोडी फार माहिती काढली आहे पण मी स्वतः कधी तिकडे गेलो नाही. नेरळ पर्यंत जाण्यास लोकल किंवा ट्रेन वापरावी की बाईक? बाईकने जाण्यास मजा येईल की वाट लागेल. पावसाचं काय? पाऊस बेक्कर लागला तर बाईकवर जाणे शक्य आहे का?

२.लोणावळा: लोणावळ्याला बुशी डॅम राजमाची पॉईंट आणखी काही आहे का? मस्त जेवण कुठे मिळेल?

३. गेट वे ऑफ इंडिया: जागा छान आहे पण अख्खा दिवस तिथे जाऊन करायचे काय हा प्रश्न आहे.

४. बोरिवली नॅशनल पार्क: तिथे जाऊन वाघ सिंह काय बघायचेत असं एक मित्र म्हणाला त्यामुळे हा पर्याय कितपत चांगला आहे याची कल्पना नाही.

फक्त ठिकाणच नव्हे तर तिला सरप्राईज देण्यासाठी आणखी काही कल्पना असतील तर उदा. गिफ्ट आयडिया (आठवा तुम्हाला मिळालेले/ तुम्ही दिलेले मोस्ट रोमॅंटिक गिफ्ट) तर ते पण सांगा.

अनुभवी मिपाकरांना या प्रसंगी मदत करण्यासाठी मी कळकळीचे आवाहन करतो. सखोल प्रतिसाद लिहायला वेळ नसेल तर जाताजाता कल्पना सांगितलीत तरी चालेल. टर उडवायची तर उडवा हो पण धाग्याचा विषय बाजुला पडु नये एवढीच अपेक्षा.

आणखी काय लिहु? प्रतिसादांच्या अपेक्षेत !

~
सोम्यागोम्या

प्रतिक्रिया

शुचि's picture

17 Jun 2010 - 4:47 am | शुचि

सिंधुदुर्ग भाग किती लांब आहे? मी कार ने गेले होते खूप पूर्वी आठवत नाही पण खूप निसर्गसौंदर्य आहे विशेषतः पावसाळ्यात. उफ्फ खाणं फारच मस्त.
पण जाऊन आल्यावर हा धागा संपादीत करा बरं का काय पाहीलं त्याबद्दल.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

सोम्यागोम्या's picture

17 Jun 2010 - 4:59 am | सोम्यागोम्या

शुचि,

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. सिंधुदुर्ग दूर आहे. ६ तास तरी (गुगलाय नमः). ती कणकवलीत शिकली आहे त्यामुळे ही खूपच छान कल्पना आहे पण दूर आहे. ६ तास जाणे ६ तास येणे यात बराच वेळ जाईल असे वाटते. शिवाय कार चालक ही घ्यावा लागेल म्हणजे तिसरा माणूस आला. त्यामुळे थोडासा विरस होण्याची शक्यता.....

बाकी जाऊन आल्यावर काय पाहिले व दिवस कसा होता हे नक्की सांगेन !

शुचि's picture

17 Jun 2010 - 5:04 am | शुचि

तीसरा माणूस नको. वेळ सांभाळा. तिला कर्फ्यू असेलच.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

सोम्यागोम्या's picture

17 Jun 2010 - 5:17 am | सोम्यागोम्या

हो कर्फ्यू तर आहेच.फार रात्र व्हायला नकोय. ती माझ्यासोबत असणार हे तिच्या घरी ठाऊक असेल. म्हणून जास्त टेंशन नाही.

टारझन's picture

17 Jun 2010 - 9:33 am | टारझन

मा.श्री. सोम्यागोम्याजी ,
एक श्रीफळ आणि शॉल द्या , बजेट असेल जास्त तर साडीचोळी नेसवा , तेवढीच सासुबाई पण खुष ;) नेक्स्ट टाईम बजेट बरोबर ड्युरेशन सुद्धा वाढेल ;)
बाकी बाईक वर फिरायचं तर स्स्साला लोणावळा ... या झाप झुप बाईक वाकडी तिकडी करत टायगर पॉईंट गाठा ... आणि मग हव्या तेवढ्या "सर्प्राईझ गिफ्ट्स" द्या/घ्या !!

सर्प्राईझ गिफ्ट देणे घेणे.

-(डॉली ला परसा परसाने फिरवणारा) टॉम्यामोत्या

सोम्यागोम्या's picture

18 Jun 2010 - 9:45 pm | सोम्यागोम्या

>>बाईक झाप झुप बाईक वाकडी तिकडी करत
मस्त शब्दरचना.
>>"सर्प्राईझ गिफ्ट्स" द्या/घ्या !!
नक्कीच हो !

मिसळभोक्ता's picture

17 Jun 2010 - 5:02 am | मिसळभोक्ता

आठवा तुम्हाला मिळालेले/ तुम्ही दिलेले मोस्ट रोमॅंटिक गिफ्ट

मस्त चार सॉकेट असलेला मदर बोर्ड, ४ क्वाड-कोअर झिऑन, ४-६ २-टेरा बाईट च्या डिस्क, एनव्हिडिया ची जीपीयू, ६४ जीबी रॅम. वॉटर-कूल्ड बॉक्स.

हाय काय अन नाय काय !

असो.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

Pain's picture

17 Jun 2010 - 7:41 am | Pain

लई भारी..जळजळ झाली :)

शुचि's picture

17 Jun 2010 - 5:10 am | शुचि

मला कोणी दिली नाहीये पण , मला सर्वात रोमँटीक भेट मस्त मऊ शाल वाटते. ती व्यक्ती नसताना तिच्या मीठीत आपण आहोत असं वाटवून देणारी.
माझा चॉइस.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

सोम्यागोम्या's picture

17 Jun 2010 - 5:18 am | सोम्यागोम्या

छान आहे कल्पना.

वेताळ's picture

17 Jun 2010 - 10:52 am | वेताळ

माणुस रिटाएर्ड झाला कि त्याला श्रीफळ व शाल देतात. पण त्यानी कधी त्याचा अनुभव असा आहे असे सांगितल्याचे आठवत नाही.
वेताळ

chipatakhdumdum's picture

17 Jun 2010 - 11:38 pm | chipatakhdumdum

तुम्हाला पाचजणानी भेट म्हणून पाच शाली दिल्या, ( देणारा बिचारा एक साधी भेट म्हणून देणार) की तुम्ही एकदम द्वापारयुगात पोचणार.

पंगा's picture

17 Jun 2010 - 11:58 pm | पंगा

( देणारा बिचारा एक साधी भेट म्हणून देणार)

विषय गर्लफ्रेंडला देण्याच्या रोमँटिक भेटीबद्दल आहे, "साध्या" भेटीबद्दल नव्हे.

पाच व्यक्तींनी "गर्लफ्रेंडला/बॉयफ्रेंडला रोमँटिक भेट" म्हणून एकाच व्यक्तीला पाच शाली दिल्या, आणि घेणारीने/घेणार्‍याने त्या स्वीकारल्या, तर अशा स्वीकाराचा अर्थ, परिणाम वगैरे बाबींचा विचार त्या स्वीकारणार्‍या व्यक्तीने बहुधा केला असावाच, असे मानायला बहुधा हरकत नसावी.

येथे मुळात पाच व्यक्तींनी एकाच व्यक्तीला खरोखरच एकएक शाल "रोमँटिक भेट" म्हणून दिलेली आहे की नाही याबद्दल खात्रीलायक माहिती नाही, त्यानंतर त्या व्यक्तीने पाच व्यक्तींकडून पाच शाली खरोखरच स्वीकारल्या आहेत की नाही याबद्दल विदा नाही, आणि खरोखर स्वीकारल्या असल्यास त्या स्वीकाराचे उत्तरदायित्व पूर्णपणे त्या व्यक्तीकडे आहे, आपल्याकडे किंवा माझ्याकडे नाही. सबब आपल्याला किंवा मला याबद्दल चिंता करण्याचे काहीच कारण दिसत नाही.

धन्यवाद.

- पंडित गागाभट्ट.

रेवती's picture

17 Jun 2010 - 6:20 am | रेवती

सोम्याभाऊ,
आपले विप्र आहेत कि! त्यांना बरोब्बर सांगता येइल.
आपल्या मैत्रिणीचा स्वभाव कसा आहे त्यावरही काही गोष्टी अवलंबून असणार. उदा. पाण्याची भीती वाटत असेल तर समुद्र वगैरे टाळलेला बरा.

रेवती

सोम्यागोम्या's picture

17 Jun 2010 - 7:10 am | सोम्यागोम्या

विचारतो.स्वभावाच्या टिप बद्दल आभार.

II विकास II's picture

17 Jun 2010 - 7:59 am | II विकास II

>>जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मी भारतात येणार आहे आणि मला माझ्या गर्लफ्रेन्डला एक सरप्राईजिंग, रोमँटिक डेटवर घेऊन जायचं आहे.

हा शब्द आहे, हे लक्षात असुद्या

सोम्यागोम्या's picture

17 Jun 2010 - 8:05 am | सोम्यागोम्या

सरप्राईजिंग म्हणजे मी कधी येणार ते सरप्राईज नाही तर कुठे जायचं हे सरप्राईज हो.

शिल्पा ब's picture

17 Jun 2010 - 6:53 am | शिल्पा ब

स्वतःच जरा विचार करा कि राव...का सगळं सार्वजनिकच झालं पाहिजे ?

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

सोम्यागोम्या's picture

17 Jun 2010 - 7:37 am | सोम्यागोम्या

धन्यवाद. मुंबई बद्दल इथे बसून माहिती काढणं अवघड आहे शिवाय मी मुंबईत राहिलेलो नाही. म्हणून विचारले.
प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.
सहज आठवलं की प्रत्येक वेळी स्वतःच डोकं लावणं शक्य नस्तं !

शिल्पा ब's picture

17 Jun 2010 - 7:54 am | शिल्पा ब

स्वताच्या मैत्रिणीला कसं खुश करायचा आणि एखाद्या पिठाच काय करायचं हे माहिती नसणं कसं काय सारख आहे बुवा ? असो.

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

II विकास II's picture

17 Jun 2010 - 7:56 am | II विकास II

>>स्वताच्या मैत्रिणीला कसं खुश करायचा आणि एखाद्या पिठाच काय करायचं हे माहिती नसणं कसं काय सारख आहे बुवा ?

दोन्ही गोष्टी वाया गेल्या तरी दु:ख फार दिवस रहात नाही म्हणुन ;)

सोम्यागोम्या's picture

17 Jun 2010 - 8:08 am | सोम्यागोम्या

असो.

ज्ञानेश...'s picture

17 Jun 2010 - 8:36 am | ज्ञानेश...

या सिनेमातली ट्रीक वापरा.

"कॉफी प्यायला जाऊया" म्हणायचे. बाईक घ्यायची. (गर्ल्फ्रेंड आणि बाईक हे एक डेडली काँबिनेशन आहे. पावसाची फिकिर नको. पाऊस आला तर दुप्पट मजा.)
बाईक कुठल्याही कॉफी हाऊसकडे न घेता सरळ लोणावळा/खंडाळा इथे लायन्स पॉईंट किंवा तत्सम ठिकाणी जायचे. मग हळूच बाईकच्या साईडबॅगमधून थर्मास आणि मग्ज काढायचे आणि मस्त कॉफी प्यायची ! :X

गिफ्टबद्दल- फारसे कल्पक गिफ्ट्स दिलेले नसल्याने सांगू शकत नाही. एक फुकटचा सल्ला असा की अगदीच जगावेगळे गिफ्ट देऊ नये. (सोना बेल्ट वगैरे) आणि अगदी कॉमनही नको. (गणपती, घड्याळ वगैरे.)

धमाल मुलगा's picture

17 Jun 2010 - 4:57 pm | धमाल मुलगा

सहीच!

आवडला हा पर्याय! :)

(स्वगतः अरेरे..हा पर्याय आधी का नव्हता ठाऊक बरं? आता काय उपयोग? :( )

सोम्यागोम्या's picture

18 Jun 2010 - 8:40 pm | सोम्यागोम्या

ज्ञानेश,

पर्याय खूपच छान आहे. असंच काहिसं करावं असं ठरवतोय. थोडासातरी बदल केला पाहिजे कारण तिच मला सांगत होती कार्तिक कॉलिंग कार्तिक पहा म्हणून.
सो तिला ते नक्की माहित आहे.

पांथस्थ's picture

17 Jun 2010 - 8:54 am | पांथस्थ

लोणावळा: लोणावळ्याला बुशी डॅम राजमाची पॉईंट आणखी काही आहे का? मस्त जेवण कुठे मिळेल?

भुशी डॅम ला अजिबात जाउ नका. बेवडी मंडळी मोठ्या कळपात फिरत असतात आणि जाम 'ईरिटेट' करतात.

बाकी थोडा विचार करुन इतर कल्पना टाकतो नंतर!

- पांथस्थ
माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश...
मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर

शानबा५१२'s picture

17 Jun 2010 - 9:12 am | शानबा५१२

नेहमी पेक्षा थोडंसं वेगळं असं काही झालं तर हा दिवस आमच्या दोघांच्याही लक्षात कायम राहील

इंटरनेट वर खुप माहीती देणा-या साईट्स आहेत्,आता जास्त बोलत नाही,तुम्ही वेगळा अर्थ घ्याल.

शानबा५१२'s picture

17 Jun 2010 - 9:14 am | शानबा५१२

आठवा तुम्हाला मिळालेले/ तुम्ही दिलेले मोस्ट रोमॅंटिक गिफ्ट

ते रोमँटीक नसत्,त्याला गिफ्ट बोलु शकतो आपण..............राखी

II विकास II's picture

17 Jun 2010 - 9:45 am | II विकास II

३. गेट वे ऑफ इंडिया: जागा छान आहे पण अख्खा दिवस तिथे जाऊन करायचे काय हा प्रश्न आहे.
>> गेट वे ला जा आणि मस्त तुमच्या आवाजात यमन गाउन दाखवा. खर्च ही वाचेल आणि तो दिवस आमच्या दोघांच्याही लक्षात कायम राहील.

मेघवेडा's picture

17 Jun 2010 - 2:34 pm | मेघवेडा

>> ....खर्च ही वाचेल आणि तो दिवस आमच्या दोघांच्याही लक्षात कायम राहील.
तुम्ही काय करायला जाणार आहात तिथे? :?

jaypal's picture

17 Jun 2010 - 2:42 pm | jaypal

उगाच || **** *** || काड्या घालायची सवय बघ ;-)
ते यमन गाणार मग कुणी तंबोरा धरायला बरोबर नको का? =))
* जयराम फुटणे
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

टारझन's picture

17 Jun 2010 - 7:13 pm | टारझन

ते यमन गाणार मग कुणी तंबोरा धरायला बरोबर नको का?

=)) =)) =)) =)) बरा तंबोरा धरायलाच लावला ... बाकी कापडं धुवायला नाय लावला

कपल यमन गाणार || II**** ***II तंबोरा धरणार ||
नर सैनिक साचार || बोळा तुंबणार निष्चित ||
इति तंबोरातुणतुणम्

-(डबलभुर्जी ची ऑर्डर देण्या पासुन ते कपडे धुण्यापर्यंत ऑलराऊंड कामे करणारा) IIईल्ल्यासII

jaypal's picture

17 Jun 2010 - 7:16 pm | jaypal

>"बाकी कापडं धुवायला नाय लावला "
या अल्ला हसा हसा के जान लोगे क्या? =))
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

विनायक प्रभू's picture

17 Jun 2010 - 10:23 am | विनायक प्रभू

सांगायला तयार आहे.
पण पटायचे नाही.
असो.

तेजोमय's picture

17 Jun 2010 - 1:45 pm | तेजोमय

बहुतेक मुलींना जागेपेक्षा कंपनी म्हत्वाची असते. रोमान्तिक धक्का द्याचा असेल तर तू जिकडे घेऊन जाशील तिकडे ती खुश होईल. तात्पर्य असा कि क्वालिटी वेळ असला पाहिजे. आनंदात दिवस गेला पाहिजे. १०००० ची एक मस्त चैन घे आणि गिफ्ट कर.

नीधप's picture

18 Jun 2010 - 11:25 am | नीधप

चेन द्यायला तो काय तिची आजी आहे का?

- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

सोम्यागोम्या's picture

18 Jun 2010 - 8:43 pm | सोम्यागोम्या

चेन कॅंसल. स्त्रीयांच्या मताला जास्त महत्त्व आहे !

संदीप चित्रे's picture

18 Jun 2010 - 9:29 pm | संदीप चित्रे

>> १०००० ची एक मस्त चैन घे आणि गिफ्ट कर.
आता 'चैन' घे म्हणजे नक्की काय घ्यायचं ब्वॉ? ;)

नितिन थत्ते's picture

18 Jun 2010 - 9:39 pm | नितिन थत्ते

सहमत आहे. कंपनी महत्त्वाची.

माझा पांढर्‍या केसांचा सावध सल्ला
तिच्याशी लग्न करायचा विचार असेल तरी फार महागड्या भेटी नको. शिवाय जास्त महाग भेटीने ती टर्न ऑफ होऊ शकते (विचारी असेल तर).
लग्नाचा विचार नसेल (तुम्ही गर्लफ्रेंड-डेट म्हणून लिहिलंय) तर अजिबातच नको.

आत्ता तुम्ही भेट दिली हे सरप्राइजच तिला खूप 'मूल्य'वान वाटेल. भेटीची किंमत महत्वाची नाही.

लांब जायचीही गरज नाही. एस्सेल वर्ल्ड सुद्धा चालेल. आता गर्दी सुद्धा नसेल.

दीड दोन तासात पोचता येईल असे ठिकाण शोधा. जास्त लांब गेल्यास प्रवासशीण येईल आणि मजा राहणार नाही.

नितिन थत्ते

धमाल मुलगा's picture

18 Jun 2010 - 9:41 pm | धमाल मुलगा

थत्तेसाब,
क्या कहीं! एकदम शंभर नंबरी बात!

सोम्यागोम्या's picture

20 Jun 2010 - 3:26 am | सोम्यागोम्या

बरोबर आहे थत्ते साहेब ! एस्सेल वर्ल्ड पण झकास कल्पना आहे ! फारसं महागडं काही करायची माझी पण इच्छा नाहीए. दिखावा काय कामाचा.
जवळपासचा पर्यात निवडतो. धन्यवाद.

टारझन's picture

20 Jun 2010 - 10:16 am | टारझन

लेका , काय करतोय काय ? :) कधी जाणारेस डेट वर ?
बाकी काल आम्ही लोणावळ्याला जाऊन पण आलो :) मस्त अँबी व्हॅली पर्यंत बाईक रदडली ... झाप झुप झाप झुप :) पावसात भिजायला लोणावळ्याला गेलो खरा , पण पाऊस झालाच नाही ,तरीबी यंजॉय केलं .. पाऊस लागला तो रिटर्ण येताना , पणवेल पासुन पुढे =))

बाकी असे धागे आणि प्रतिक्रिया टाइप करत बसशील तर ... हॅहॅहॅ

"सोम्यागोम्या" हे नाव बदला.
अलिबाग ,रेवदंडा, नागाव किंवा चौल वेळेच्या आवाक्यात आहे का बघा. मुंबईवरुन बोटीने अलिबाग सफर आनंददायी आहे.
नेरळची मिनी ट्रेन (मोनो नाही) चालु आहे के नाही? हे त्या दिवशी रेव्लेच्या हेल्प लाईन १३९ वर विचारा.
कुठेही गेलात तरी घाई गडबड करू नका वातावरण आणि सहवासाचा लुत्फ घ्या.
पावसात शक्यतो रेनकोट घालुन जा.
एखादे गाणे म्हटले तरी चालेल पण कृपया (आनंदातिरेकाने) नाचण्याचा प्रयत्न करु नका.चिखलात पाय घसरण्याची आणि अपघात होण्याची या दिवसात दाट शक्यता असते.
थंड पदार्थ टाळुन शक्यतो गरम पदार्थावर ताव मारा.
दुचाकी वाहनावरुन जाणार असल्यास दोघांनाही शिरस्त्राण आवश्यकच आहे. गाडीचे सर्व पेपर्स, गाडीची डागडुजी ई. आधीच तयार ठेवा.
आधिक माहीती साठी ईथे क्लिक करा

डेट (दिनांक) निट विचार करुन ठरवा. डेट साठी माझ्या खुप शुभेच्छा .
अवांतर :- फोटो रुपात आठवणी जपायच्या असतील तर मला पण बोलवा =)) =)) =))
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

मेघवेडा's picture

17 Jun 2010 - 3:13 pm | मेघवेडा

>> फोटो रुपात आठवणी जपायच्या असतील तर मला पण बोलवा
हो म्हणजे मग 'माझे फोटोग्राफिक किडे' चा पुढचा पार्ट लौकरच येणार तर!! ;)

महेश हतोळकर's picture

17 Jun 2010 - 4:05 pm | महेश हतोळकर

पावसात शक्यतो रेनकोट घालुन जा.एखादे गाणे म्हटले तरी चालेल पण कृपया (आनंदातिरेकाने) नाचण्याचा प्रयत्न करु नका.चिखलात पाय घसरण्याची आणि अपघात होण्याची या दिवसात दाट शक्यता असते.थंड पदार्थ टाळुन शक्यतो गरम पदार्थावर ताव मारा.काय हे! शीव! शीव!! श!!! अब्रह्मण्यम्! बालमनावर किती परीणाम होतील!

परिकथेतील राजकुमार's picture

17 Jun 2010 - 4:07 pm | परिकथेतील राजकुमार

च्यायला जयपाला धन्य आहेस बाबा !

हे म्हणजे इयत्ता दुसरी तुकडी ब, 'सहली आधीच्या सूचना' असे वाटतय.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

सोम्यागोम्या's picture

18 Jun 2010 - 8:51 pm | सोम्यागोम्या

जयपाल, विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

>>अलिबाग ,रेवदंडा, नागाव किंवा चौल
या सर्व पर्यायांचा विचार करतो. व माहिती जमवतो.
>>मुंबईवरुन बोटीने अलिबाग सफर
मॉनसून मध्ये बंद असते असे वाचले.
>>रेव्लेच्या हेल्प लाईन १३९ क्रमांक
क्रमांकाबद्दल आभारी आहे.
>> अधिक माहिती
डेटिंग टिप्स बद्दल धन्यु. छान आहेत टिप्स. अमेरिकेत जास्त उपयोगी.

शुभेच्छांबद्दल आभारी आहे. फोटु स्वत:चे स्वत:च काढावेत म्हणतो !
(स्मायली नेहमी प्रमाणे भारी)

गणपा's picture

17 Jun 2010 - 2:28 pm | गणपा

बा सोम्यागोम्या
विमुक्ताचा हा अल्बम घे. पहा कुठल ठिकाण आवडत.
असेल एखाद जवळपास तर जाउन ये.

सोम्यागोम्या's picture

18 Jun 2010 - 8:55 pm | सोम्यागोम्या

गणपा,
मस्त आहे अल्बम. विमुक्त खरंच भारी माणूस दिसतोय. मस्त आहेत ठिकाणं. पण आधी गेलो असल्याशिवाय त्या ठिकाणी जाता येणार नाही. जागा सापडली नाही तर पोपट व्हायच्चा.

Nile's picture

17 Jun 2010 - 2:32 pm | Nile

हम-तुम(असं तुम्ही म्हणायचं, नायतर मला बोलवाल ;) ) एक कमरें मे बंद हो, और चाबी खो जाए... ;)

असो, शुभेच्छा! :)

-Nile

मितभाषी's picture

17 Jun 2010 - 2:39 pm | मितभाषी

एक कमरें मे बंद हो, और चाबी खो जाए

>>>>>

अहो निळे कि नाइल,
असं जरी झालं तरी सोम्यागोम्या चावी कशी शोधावी? असा धागा काढील किंवा

चावी सापडत नाही म्ह्टल्यावर आता पुढे काय करु असा ठणाणा करीत बसेल. :D

Nile's picture

17 Jun 2010 - 2:42 pm | Nile

तेव्हाचं तेव्हा पाहुन घेउ. फारच अडचण असेल तर तुम्हाला वैयक्तीक रित्या समस्या सोडवण्यास धाडु.

-Nile

मितभाषी's picture

17 Jun 2010 - 2:46 pm | मितभाषी

नक्को नक्को कशाला उगीच. ;)

भावश्या.

विसोबा खेचर's picture

17 Jun 2010 - 3:17 pm | विसोबा खेचर

नागाव, किहिम वगैरे अलिबागच्या आसपास पाहा.. किंवा दिवेआगार वगैरे.

छान निसर्ग... निवांतपणा..

नुकत्याच शाळा-पाऊस सुरू झाल्यामुळे सध्या शिजनपण नाही, त्यामुळे गर्दी कमी..आणि माफक खर्चात राहणे-खाणे-पिणे..

समुद्रकिना-यावर निवांत भटका... हॉटेलवजा भाड्याच्या खोल्या भेटतात. मस्त मजा मस्ती करा..गेम वाजवा..

हॅप्पी मान्सून.. :)

तात्या.

नील_गंधार's picture

17 Jun 2010 - 4:12 pm | नील_गंधार

बरेच अनुभवी दिसताय!
;)

समुद्रकिना-यावर निवांत भटका... हॉटेलवजा भाड्याच्या खोल्या भेटतात. मस्त मजा मस्ती करा..गेम वाजवा..

हे बाकी खासच.

नील.

सोम्यागोम्या's picture

18 Jun 2010 - 8:59 pm | सोम्यागोम्या

तात्या,
ठिकाणांच्या माहिती बद्दल आभारी आहे. प्रतिसाद छान होता शेवटचे अनाहूत सल्ल्याचे वाक्य रुचले नाही.
असो. प्रतिसादाबद्दल आभार.

~

विसोबा खेचर's picture

18 Jun 2010 - 9:07 pm | विसोबा खेचर

प्रतिसाद छान होता शेवटचे अनाहूत सल्ल्याचे वाक्य रुचले नाही.

मला वाटले होते की आपण हलके घ्याल, म्हणून बेधडकपणे लिहिले होते..

परंतु ते वाक्य आपणास रुचले नाही त्यावरून ते लिहायला नको होते असे आता वाटते..

तरीही मनापासून क्षमस्व..

तात्या.

सोम्यागोम्या's picture

18 Jun 2010 - 9:12 pm | सोम्यागोम्या

तात्या,
चालायचेच हो. आता हलकेच घेतले आहे.

जागु's picture

17 Jun 2010 - 3:26 pm | जागु

लोणावळा चांगला आहे पण १ ते २ दिवसांकरीता ठिक आहे. महाबळेश्वरही चांगल आहे. रत्नागिरीत आंबोली घाट आहे.

जागु's picture

17 Jun 2010 - 3:30 pm | जागु

अलीबागला गेलात तर मुरूडचा समुद्र किनाराही चांगला आहे. समुद्र किनार्‍याला लागुनच लॉजींग आहेत. सकाळी तेथे ताजी ताडीही मिळते. तसेच तिथल्या पाटील खानावळीत चांगल्या मच्छीचे प्रकार मिळतात.

सोम्यागोम्या's picture

18 Jun 2010 - 9:02 pm | सोम्यागोम्या

जागु,
धन्यवाद. पाटील खानावळीसकट माहिती दिल्याबद्दल धन्स ! ताडी प्यालो तर ती मला ताडील !

माउली's picture

17 Jun 2010 - 4:47 pm | माउली

पवना...
लोनावळा पासुन १० किमी आहे.

फारच एकांत आहे.

सोम्यागोम्या's picture

18 Jun 2010 - 9:00 pm | सोम्यागोम्या

माऊली आभारी आहे.

धमाल मुलगा's picture

17 Jun 2010 - 4:55 pm | धमाल मुलगा

:)

प्रत्येक गर्लफ्रेंडचा स्वभाव+आवडीनिवडी ह्याप्रमाणे जाण्याची ठिकाणॅ आणि भेटवस्तु बदलतात... ;)
जोक्स अपार्ट,
मला एक सांगा, तुम्हाला एखादं विविक्षित ठिकाणच हवं आहे असं आहे का? तसं नसेल तर खालील रेसिपी कशी वाटते सांगा. ;)

तयारी:
१ बाईक, टाकीभर पेट्रोल, क्लच,ब्रेक्स मेंटेनन्स पुर्ण :) बॅकपॅकमध्ये तिच्या आवडीचे चॉकलेट्स, प्रवासात काहीच मिळालं नाही तर गोंधळ नको म्हणुन बॅकअप प्लॅनसाठी सँडविचेस.

गिफ्ट: मैत्रिणीचा स्वभाव कसा आहे?
---ती 'च्चो च्विट' वगैरे म्हणणार्‍यांमधली असेल तर आधी एखादं छोटं टेडी वगैरे आणि नंतर पेन्डन्ट्/इयर रिंग्ज/ (दोघांचीही हरकत नसल्यास) अंगठी :) {तनिष्कचं ऑनलाईन स्टोअर चेक करा, लै भारी कलेक्षन आहे. :D बजेट वाढवणार असाल तर अस्मि किंवा दिदमासचा पर्यायही लै लै बेष्टातला आहे.}
आणि जास्तच रोम्यांटिकपणे गिफ्ट द्यायचं असेल तर, एक रेड रिबन सोबत ठेवा...डोळे मिटायला लाऊन स्वतःभोवती गिफ्टरॅप करतात तशी बांधून समोर उभे रहाण्याकरता :)

-- नॉन-'च्चो च्विट' कॅटेगरी असेल तर : ते टेडी क्यान्सल करा. :D बाकी सर्व वरच्याप्रमाणेच.

--Adventurous क्याटेगरी असेल तर :: मामला थोडा मुश्किल है भाई.. एखादं नॉटी गिफ्ट चालुन जाऊ शकेल.

आता भटकंती::
अहो, आधी गाडीला किक मारुन मुंबईबाहेर पडा...जिकडे मन मानेल (किंवा ती म्हणेल :) ) त्या दिशेने निघा. मुंबई पाठीमागे टाकली की मोकळे रस्ते, छान पाऊस, आजुबाजुला असलेला हिरवाईचा चमत्कार पहात एखादा स्पॉट आवडेपर्यंत मनमुराद भटका. दोघांनाही जिथे थांबावसं वाटेल तिथे गाडी थांबवा... कोसळणारा पाऊस पहा..मस्त भिजा...व्हॉटएव्हर यु वॉन्ट! आणि अशा स्पॉटवर गिफ्ट द्या :D

-->पर्याय दुसरा: Adventurous क्याटेगरी असेल तर सरळ एखादा फंटाश्टिक ट्रेक करुन टाका एक दिवसाचा!

रात्री परत येताना एखाद्या 'कोझी लाँज'मध्ये डिनर आणि पार्सल घरी ड्रॉप! :)

बॉस...आय मे साउंड टू इंन्स्ट्रक्टिव्ह...चेक इट आउट मॅन! दिज आर द बेस्ट लेड प्लॅन्स विथ अ‍ॅश्शुअर्ड सक्सेस! ;) (आता माझ्या सक्सेस श्टोर्‍या नका विचारु... माझं लग्न टिकवायचंय मला. )

मस्त कलंदर's picture

17 Jun 2010 - 9:47 pm | मस्त कलंदर

सकाळपासून तुझ्याच प्रतिक्रियेची वाट पाहात होते.. ;)

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

धमाल मुलगा's picture

18 Jun 2010 - 3:18 pm | धमाल मुलगा

=)) =))

अच्रत बव्ल्त!
मी काय 'How to...' छापाची पुस्तकं लिहिणारा वाटलो काय? :P

II विकास II's picture

18 Jun 2010 - 3:25 pm | II विकास II

मी काय 'How to...' छापाची पुस्तकं लिहिणारा वाटलो काय?
=)) =))

लिही रे.
म्हणजे काही दिवसांनी जास्त प्रश्न विचारले कि 'पुस्तक विकत घ्या' असे
सांगशील.
कल्पना करुनच जाम हसु आले.

सोम्यागोम्या's picture

18 Jun 2010 - 9:36 pm | सोम्यागोम्या

धम्या,

एवढा वेळ काढून अनुभवाचे ज्ञानामृत मज नवशिक्यास पाजल्याबद्दल आभारी आहे !
>>मला एक सांगा, तुम्हाला एखादं विविक्षित ठिकाणच हवं आहे असं आहे का?
मस्त वाटावं इतकंच. हेच ठिकाण पाहिजे असं काही नाही.
>>गिफ्ट: मैत्रिणीचा स्वभाव कसा आहे?
चो च्वीट आणि चो क्यूट असाच आहे !
अस्मिची साईट छान आहे तनिष्क सगळ्यात बेस्ट वाटतेय ! पण तिला घेऊन गेलेलेच बरे. अंगठी नाही आवडली तर चा प्रश्न आहे.
>>अहो, आधी गाडीला किक मारुन मुंबईबाहेर पडा...
नक्कीच हा खूपच सही प्लान आहे ! असेच काहीसं करेन म्हणतो.

>>दिज आर द बेस्ट लेड प्लॅन्स विथ अ‍ॅश्शुअर्ड सक्सेस
नक्कीच एवढ्या मस्त कल्पना आहेत या. मस्तच. धमी एकदम लकी आहे !

पुन्हा एकदा धन्यवाद. ! :)

धमाल मुलगा's picture

18 Jun 2010 - 9:49 pm | धमाल मुलगा

>>एवढा वेळ काढून अनुभवाचे ज्ञानामृत मज नवशिक्यास पाजल्याबद्दल आभारी आहे !
_/\_ मारा मारा!

>>पण तिला घेऊन गेलेलेच बरे. अंगठी नाही आवडली तर चा प्रश्न आहे.
फिकीर नॉट! तुला काय वाटलं? शोरुम्समध्ये त्या सेल्सगर्ल्स काय शोपीस म्हणुन रिक्रुट करतात? एकदा चक्कर मारुन पहा..दे आर द ग्रेटेस्ट हेल्प इन सच केस! :)
जनरल आवडीनिवडी विचारतात त्या आणि पर्फेक्ट आवडेल अशीच वस्तु काढून समोर ठेवतात.

>>नक्कीच हा खूपच सही प्लान आहे ! असेच काहीसं करेन म्हणतो.
:)

>>नक्कीच एवढ्या मस्त कल्पना आहेत या. मस्तच. धमी एकदम लकी आहे !
:\ हा हा हा! लाजलो मी लाजलो ;)

सोम्यागोम्या's picture

18 Jun 2010 - 9:59 pm | सोम्यागोम्या

>>शोरुम्समध्ये त्या सेल्सगर्ल्स...दे आर द ग्रेटेस्ट हेल्प इन सच केस!
हां डोक्यात नाही आलं हे !
पण अडचण अशी आहे की मी येणार रात्री उशीरा अणि हिला सकाळी सकाळी भेटायचे आहे. तनिष्कात जायला वेळ नाही होणार. आणि ऑनलाईन खरेदी मध्ये सेल्स गर्ल्स ची मदत होणार नाही.
जसे जमेल तसे आणि दिवस शक्य तितका चांगला बनवण्यासाठी प्रयत्न करेन.

संदीप चित्रे's picture

17 Jun 2010 - 8:37 pm | संदीप चित्रे

पावसाळयातला लोणावळा - खंडाळा, ते ही बाईकवरून आणि सोबतीला प्रेयसी ! ऊप्फ ... रोमान्स रोमान्स काय म्हणतात तो आपसूकच रोमारोमातून सळसळायला लागेल :)

एक सावधगिरीची सूचना -- एकांतवगैरे मिळावा म्हणून उगाच कायच्याकायच आडबाजूला वगैरे जाऊ नका. हाकेच्या आणि नजरेच्या टप्प्यात लोक असणं कधीही चांगलं अन्यथा पावसाळ्यात लोणावळ्याला आधीच बेवडे चेकाळलेले असतात त्यात कुणाला आयती संधी द्यायला नको :(

---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

धमाल मुलगा's picture

17 Jun 2010 - 8:46 pm | धमाल मुलगा

अग्गदी हेच !

आपल्या अंगात रग असेल तर फुकट हाफमर्डरची केस आणि नसेल तर भलताच व्याप!

अगदी निर्जन ठिकाणंही टाळलेलीच बरी!

टारझन's picture

17 Jun 2010 - 8:50 pm | टारझन

बरोबर बोलतोय धम्या आणि चित्रेसाब !!!

म्हणुनंच कोणीतरी बरोबर कुत्रा न्यावा , हा पर्याय सुचवला असेल काय ? =))
कुत्रा तसा बरा पडेल , कोणाचा वास आला की भुंकेल तरी ... =)) बाकी दुसर्‍या कुत्र्यामागे गुपचुप निघुन नाही गेला म्हणजे मिळवली !!

सोम्यागोम्या's picture

18 Jun 2010 - 9:05 pm | सोम्यागोम्या

लोणावळा खंडाळा ऑप्शन छान आहे.

नावातकायआहे's picture

17 Jun 2010 - 10:43 pm | नावातकायआहे

>>अलीबागला गेलात तर मुरूडचा समुद्र किनाराही चांगला आहे. समुद्र किनार्‍याला लागुनच लॉजींग आहेत. सकाळी तेथे ताजी ताडीही मिळते.
=)) =)) =))

बाकी काग्दांबरुबर 'परमिट' बी ठेवा बरोबर...

शुचि's picture

18 Jun 2010 - 12:07 am | शुचि

मला काय वाटतं - बी युअरसेल्फ. नाहीतर तिच्या अपेक्षा (रोमँटीकपणाच्या) वाढून बसायच्या आणि तुम्ही नंतर पुरे पडणार नाही आणि तिचा विरस होईल.
तेव्हा तुम्हाला जे रुचेल, मनाला येईल ते करा.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

सोम्यागोम्या's picture

18 Jun 2010 - 9:09 pm | सोम्यागोम्या

शुचि,

खरंच तुमचं एका अर्थी पण एकदा तरी भन्नाट काही तरी करायला मस्त वाटेल मला.
अपेक्षा वाढतील पण ठीकय ! लेट्स सी.

कवितानागेश's picture

18 Jun 2010 - 11:05 am | कवितानागेश

प्रवसत वेळ 'वाया' घालवायचा नसेल तर नेरळपर्यन्त ठिक आहे.
खाली चौकशी करा.

http://www.sagunabaug.com/about_us.htm

Saguna Baug,
Village Malegaon,
P.O. Neral,
Dist. Raigad
Pin:410101

Phone No. : 02148-238438 / 238338 / 650349

Email: contact@sagunabaug.com

Please Note: Booking procedure is to inquire and confirm on phone ============
माउ

सोम्यागोम्या's picture

18 Jun 2010 - 9:42 pm | सोम्यागोम्या

माउ,
अशा प्रतिसादांसाठीच हा धागा काढला होता. मस्त पर्याय आहे हा !
पॉंड हाऊस खूपच झकास आहे. टु गुड.
ह्या धाग्यातले सगळे पर्यात ट्राय करण्यासारखे आहेत ! हे सगळं केलं तर आयुक्षात रोमान्स भरभरून वाहील !

प्रतिक्रियेबद्दल आभार !

नम्रता राणे's picture

18 Jun 2010 - 11:54 am | नम्रता राणे

एवढ्या प्रतिक्रिया वाचुन निर्णय घेईपर्यंत ती गर्लफ्रेन्ड दुसराच कोणतरी 'सोम्यागोंम्या 'पकडेल... तेव्हा .... सावध.

म्हणतात ना ‍ 'ऐकावे जनाचे पण करावे मनाचे'.

लवकर निर्णय घे.. पावसाळाही सुरु झाला आहे..सुहाना मौसम है...

सोम्यागोम्या's picture

18 Jun 2010 - 9:21 pm | सोम्यागोम्या

सुहाना मौसम आहे म्हणूनच मजा आहे ! मी जुलै मधेच येणार आहे भारतात तेव्हा निर्णय घ्यायला अवकाश आहे !
>>दुसराच कोणतरी 'सोम्यागोंम्या '
हा हा ! तिला झेलणारा हा एकमेव सोम्यागोम्या या भूतलावर अस्तित्वात आहे !

टारझन's picture

18 Jun 2010 - 10:05 pm | टारझन

हा हा ! तिला झेलणारा हा एकमेव सोम्यागोम्या या भूतलावर अस्तित्वात आहे !

नाही नाही .. पुढचं वाक्य मी बिल्कुल बोलणार नाहीये .. "असे तुला वाटते"