✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गर्लफ्रेन्ड सोबत एक रोमँटिक दिवस: काही सुचतंय?

स
सोम्यागोम्या यांनी
गुरुवार, 06/17/2010 - 04:16  ·  लेख
लेख
माननीय मिपाकरहो, या पूर्वी मी काही जणांवर बिनकामी धागे काढले म्हणून टीका केली त्यांची जाहीर माफी मागून मी हा धागा काढत आहे. काय करणार माझ्यासमोर दुसरा पर्यायच नव्हता! मिपाकर नक्की मदतीला धावून येतील अशी आशा मला आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मी भारतात येणार आहे आणि मला माझ्या गर्लफ्रेन्डला एक सरप्राईजिंग, रोमँटिक डेटवर घेऊन जायचं आहे. नेहमी पेक्षा थोडंसं वेगळं असं काही झालं तर हा दिवस आमच्या दोघांच्याही लक्षात कायम राहील. मला तिला जाम खूष करायचं आहे. :X इतर गोष्टींची थोडी फार माहिती सांगितली म्हणजे पर्याय सुचवायला मदत होईल असे वाटते. तो दिवस आम्ही मुंबई मध्ये किंवा एका दिवसात जाऊन मुंबईत परत येता येईल अशा ठिकाणी घालवू शकतो. माझ्याकडे मुंबई मध्ये बाईक उपलब्ध आहे. बाईक चालवण्यात मी एक्स्पर्ट आहे. कार उपलब्ध आहे पण मला मुंबईत ड्रायव्हिंग येणार नाही. मी मुंबईचा नाही त्यामुळे कुठुन कसं जायचं व रस्ते मला ठाऊक नाहीत.माझं बजेट आहे १० हजार रुपये. अर्थात तेवढे खर्च केलेच पाहिजेत असं काही नाही पण काही झकास कल्पना असेल तर तयारी आहे. मी पट्टीचा मत्स्याहारी व मांसाहारी असून ती शुद्ध शाकाहारी आहे. आता पर्यंत माझ्या समोर आलेले पर्याय असे: १. माथेरानः माथेरानला जाण्यासाठी जुलै ही योग्य वेळ आहे का? नेरळ पासूनची मोनो रेल जुलै मध्ये चालू असते का? मी हे वाचून थोडी फार माहिती काढली आहे पण मी स्वतः कधी तिकडे गेलो नाही. नेरळ पर्यंत जाण्यास लोकल किंवा ट्रेन वापरावी की बाईक? बाईकने जाण्यास मजा येईल की वाट लागेल. पावसाचं काय? पाऊस बेक्कर लागला तर बाईकवर जाणे शक्य आहे का? २.लोणावळा: लोणावळ्याला बुशी डॅम राजमाची पॉईंट आणखी काही आहे का? मस्त जेवण कुठे मिळेल? ३. गेट वे ऑफ इंडिया: जागा छान आहे पण अख्खा दिवस तिथे जाऊन करायचे काय हा प्रश्न आहे. ४. बोरिवली नॅशनल पार्क: तिथे जाऊन वाघ सिंह काय बघायचेत असं एक मित्र म्हणाला त्यामुळे हा पर्याय कितपत चांगला आहे याची कल्पना नाही. फक्त ठिकाणच नव्हे तर तिला सरप्राईज देण्यासाठी आणखी काही कल्पना असतील तर उदा. गिफ्ट आयडिया (आठवा तुम्हाला मिळालेले/ तुम्ही दिलेले मोस्ट रोमॅंटिक गिफ्ट) तर ते पण सांगा. अनुभवी मिपाकरांना या प्रसंगी मदत करण्यासाठी मी कळकळीचे आवाहन करतो. सखोल प्रतिसाद लिहायला वेळ नसेल तर जाताजाता कल्पना सांगितलीत तरी चालेल. टर उडवायची तर उडवा हो पण धाग्याचा विषय बाजुला पडु नये एवढीच अपेक्षा. आणखी काय लिहु? प्रतिसादांच्या अपेक्षेत ! ~ सोम्यागोम्या
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
23319 वाचन

💬 प्रतिसाद (82)

प्रतिक्रिया

सिंधुदुर्

शुचि
गुरुवार, 06/17/2010 - 04:47 नवीन
सिंधुदुर्ग भाग किती लांब आहे? मी कार ने गेले होते खूप पूर्वी आठवत नाही पण खूप निसर्गसौंदर्य आहे विशेषतः पावसाळ्यात. उफ्फ खाणं फारच मस्त. पण जाऊन आल्यावर हा धागा संपादीत करा बरं का काय पाहीलं त्याबद्दल. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments

दूर आहे

सोम्यागोम्या
गुरुवार, 06/17/2010 - 04:59 नवीन
शुचि, प्रतिसादाबद्दल धन्यवाद. सिंधुदुर्ग दूर आहे. ६ तास तरी (गुगलाय नमः). ती कणकवलीत शिकली आहे त्यामुळे ही खूपच छान कल्पना आहे पण दूर आहे. ६ तास जाणे ६ तास येणे यात बराच वेळ जाईल असे वाटते. शिवाय कार चालक ही घ्यावा लागेल म्हणजे तिसरा माणूस आला. त्यामुळे थोडासा विरस होण्याची शक्यता..... बाकी जाऊन आल्यावर काय पाहिले व दिवस कसा होता हे नक्की सांगेन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

तीसरा

शुचि
गुरुवार, 06/17/2010 - 05:04 नवीन
तीसरा माणूस नको. वेळ सांभाळा. तिला कर्फ्यू असेलच. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोम्यागोम्या

हो कर्फ्यू

सोम्यागोम्या
गुरुवार, 06/17/2010 - 05:17 नवीन
हो कर्फ्यू तर आहेच.फार रात्र व्हायला नकोय. ती माझ्यासोबत असणार हे तिच्या घरी ठाऊक असेल. म्हणून जास्त टेंशन नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

मा.श्री.

टारझन
गुरुवार, 06/17/2010 - 09:33 नवीन
मा.श्री. सोम्यागोम्याजी , एक श्रीफळ आणि शॉल द्या , बजेट असेल जास्त तर साडीचोळी नेसवा , तेवढीच सासुबाई पण खुष ;) नेक्स्ट टाईम बजेट बरोबर ड्युरेशन सुद्धा वाढेल ;) बाकी बाईक वर फिरायचं तर स्स्साला लोणावळा ... या झाप झुप बाईक वाकडी तिकडी करत टायगर पॉईंट गाठा ... आणि मग हव्या तेवढ्या "सर्प्राईझ गिफ्ट्स" द्या/घ्या !! सर्प्राईझ गिफ्ट देणे घेणे. -(डॉली ला परसा परसाने फिरवणारा) टॉम्यामोत्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोम्यागोम्या

>>बाईक झाप

सोम्यागोम्या
Fri, 06/18/2010 - 21:45 नवीन
>>बाईक झाप झुप बाईक वाकडी तिकडी करत मस्त शब्दरचना. >>"सर्प्राईझ गिफ्ट्स" द्या/घ्या !! नक्कीच हो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

रोमँटिक गिप्फ्ट

मिसळभोक्ता
गुरुवार, 06/17/2010 - 05:02 नवीन
आठवा तुम्हाला मिळालेले/ तुम्ही दिलेले मोस्ट रोमॅंटिक गिफ्ट मस्त चार सॉकेट असलेला मदर बोर्ड, ४ क्वाड-कोअर झिऑन, ४-६ २-टेरा बाईट च्या डिस्क, एनव्हिडिया ची जीपीयू, ६४ जीबी रॅम. वॉटर-कूल्ड बॉक्स. हाय काय अन नाय काय ! असो. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments

मिसळभोक्ता

Pain
गुरुवार, 06/17/2010 - 07:41 नवीन
लई भारी..जळजळ झाली :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

मला कोणी

शुचि
गुरुवार, 06/17/2010 - 05:10 नवीन
मला कोणी दिली नाहीये पण , मला सर्वात रोमँटीक भेट मस्त मऊ शाल वाटते. ती व्यक्ती नसताना तिच्या मीठीत आपण आहोत असं वाटवून देणारी. माझा चॉइस. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments

छान आहे

सोम्यागोम्या
गुरुवार, 06/17/2010 - 05:18 नवीन
छान आहे कल्पना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

आमच्या भागात एकादा

वेताळ
गुरुवार, 06/17/2010 - 10:52 नवीन
माणुस रिटाएर्ड झाला कि त्याला श्रीफळ व शाल देतात. पण त्यानी कधी त्याचा अनुभव असा आहे असे सांगितल्याचे आठवत नाही. वेताळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

कालयंत्र

chipatakhdumdum
गुरुवार, 06/17/2010 - 23:38 नवीन
तुम्हाला पाचजणानी भेट म्हणून पाच शाली दिल्या, ( देणारा बिचारा एक साधी भेट म्हणून देणार) की तुम्ही एकदम द्वापारयुगात पोचणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

विषय

पंगा
गुरुवार, 06/17/2010 - 23:58 नवीन
( देणारा बिचारा एक साधी भेट म्हणून देणार)
विषय गर्लफ्रेंडला देण्याच्या रोमँटिक भेटीबद्दल आहे, "साध्या" भेटीबद्दल नव्हे. पाच व्यक्तींनी "गर्लफ्रेंडला/बॉयफ्रेंडला रोमँटिक भेट" म्हणून एकाच व्यक्तीला पाच शाली दिल्या, आणि घेणारीने/घेणार्‍याने त्या स्वीकारल्या, तर अशा स्वीकाराचा अर्थ, परिणाम वगैरे बाबींचा विचार त्या स्वीकारणार्‍या व्यक्तीने बहुधा केला असावाच, असे मानायला बहुधा हरकत नसावी. येथे मुळात पाच व्यक्तींनी एकाच व्यक्तीला खरोखरच एकएक शाल "रोमँटिक भेट" म्हणून दिलेली आहे की नाही याबद्दल खात्रीलायक माहिती नाही, त्यानंतर त्या व्यक्तीने पाच व्यक्तींकडून पाच शाली खरोखरच स्वीकारल्या आहेत की नाही याबद्दल विदा नाही, आणि खरोखर स्वीकारल्या असल्यास त्या स्वीकाराचे उत्तरदायित्व पूर्णपणे त्या व्यक्तीकडे आहे, आपल्याकडे किंवा माझ्याकडे नाही. सबब आपल्याला किंवा मला याबद्दल चिंता करण्याचे काहीच कारण दिसत नाही. धन्यवाद. - पंडित गागाभट्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: chipatakhdumdum

सोम्याभाऊ,

रेवती
गुरुवार, 06/17/2010 - 06:20 नवीन
सोम्याभाऊ, आपले विप्र आहेत कि! त्यांना बरोब्बर सांगता येइल. आपल्या मैत्रिणीचा स्वभाव कसा आहे त्यावरही काही गोष्टी अवलंबून असणार. उदा. पाण्याची भीती वाटत असेल तर समुद्र वगैरे टाळलेला बरा. रेवती
  • Log in or register to post comments

विचारतो

सोम्यागोम्या
गुरुवार, 06/17/2010 - 07:10 नवीन
विचारतो.स्वभावाच्या टिप बद्दल आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

>>जुलै

II विकास II
गुरुवार, 06/17/2010 - 07:59 नवीन
>>जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मी भारतात येणार आहे आणि मला माझ्या गर्लफ्रेन्डला एक सरप्राईजिंग, रोमँटिक डेटवर घेऊन जायचं आहे. हा शब्द आहे, हे लक्षात असुद्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोम्यागोम्या

सरप्राईजिंग

सोम्यागोम्या
गुरुवार, 06/17/2010 - 08:05 नवीन
सरप्राईजिंग म्हणजे मी कधी येणार ते सरप्राईज नाही तर कुठे जायचं हे सरप्राईज हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: II विकास II

स्वतःच जरा

शिल्पा ब
गुरुवार, 06/17/2010 - 06:53 नवीन
स्वतःच जरा विचार करा कि राव...का सगळं सार्वजनिकच झालं पाहिजे ? *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

सोम्यागोम्या
गुरुवार, 06/17/2010 - 07:37 नवीन
धन्यवाद. मुंबई बद्दल इथे बसून माहिती काढणं अवघड आहे शिवाय मी मुंबईत राहिलेलो नाही. म्हणून विचारले. प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. सहज आठवलं की प्रत्येक वेळी स्वतःच डोकं लावणं शक्य नस्तं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

स्वताच्या

शिल्पा ब
गुरुवार, 06/17/2010 - 07:54 नवीन
स्वताच्या मैत्रिणीला कसं खुश करायचा आणि एखाद्या पिठाच काय करायचं हे माहिती नसणं कसं काय सारख आहे बुवा ? असो. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोम्यागोम्या

>>स्वताच्या

II विकास II
गुरुवार, 06/17/2010 - 07:56 नवीन
>>स्वताच्या मैत्रिणीला कसं खुश करायचा आणि एखाद्या पिठाच काय करायचं हे माहिती नसणं कसं काय सारख आहे बुवा ? दोन्ही गोष्टी वाया गेल्या तरी दु:ख फार दिवस रहात नाही म्हणुन ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

असो.

सोम्यागोम्या
गुरुवार, 06/17/2010 - 08:08 नवीन
असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

कार्तिक कॉलिंग कार्तिक

ज्ञानेश...
गुरुवार, 06/17/2010 - 08:36 नवीन
या सिनेमातली ट्रीक वापरा. "कॉफी प्यायला जाऊया" म्हणायचे. बाईक घ्यायचीच. (गर्ल्फ्रेंड आणि बाईक हे एक डेडली काँबिनेशन आहे. पावसाची फिकिर नको. पाऊस आला तर दुप्पट मजा.) बाईक कुठल्याही कॉफी हाऊसकडे न घेता सरळ लोणावळा/खंडाळा इथे लायन्स पॉईंट किंवा तत्सम ठिकाणी जायचे. मग हळूच बाईकच्या साईडबॅगमधून थर्मास आणि मग्ज काढायचे आणि मस्त कॉफी प्यायची ! :X गिफ्टबद्दल- फारसे कल्पक गिफ्ट्स दिलेले नसल्याने सांगू शकत नाही. एक फुकटचा सल्ला असा की अगदीच जगावेगळे गिफ्ट देऊ नये. (सोना बेल्ट वगैरे) आणि अगदी कॉमनही नको. (गणपती, घड्याळ वगैरे.)
  • Log in or register to post comments

खल्लास!

धमाल मुलगा
गुरुवार, 06/17/2010 - 16:57 नवीन
सहीच! आवडला हा पर्याय! :) (स्वगतः अरेरे..हा पर्याय आधी का नव्हता ठाऊक बरं? आता काय उपयोग? :( )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानेश...

ज्ञानेश, पर

सोम्यागोम्या
Fri, 06/18/2010 - 20:40 नवीन
ज्ञानेश, पर्याय खूपच छान आहे. असंच काहिसं करावं असं ठरवतोय. थोडासातरी बदल केला पाहिजे कारण तिच मला सांगत होती कार्तिक कॉलिंग कार्तिक पहा म्हणून. सो तिला ते नक्की माहित आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानेश...

लोणावळा:

पांथस्थ
गुरुवार, 06/17/2010 - 08:54 नवीन
लोणावळा: लोणावळ्याला बुशी डॅम राजमाची पॉईंट आणखी काही आहे का? मस्त जेवण कुठे मिळेल?
भुशी डॅम ला अजिबात जाउ नका. बेवडी मंडळी मोठ्या कळपात फिरत असतात आणि जाम 'ईरिटेट' करतात. बाकी थोडा विचार करुन इतर कल्पना टाकतो नंतर! - पांथस्थ माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश... मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर
  • Log in or register to post comments

नेहमी

शानबा५१२
गुरुवार, 06/17/2010 - 09:12 नवीन
नेहमी पेक्षा थोडंसं वेगळं असं काही झालं तर हा दिवस आमच्या दोघांच्याही लक्षात कायम राहील
इंटरनेट वर खुप माहीती देणा-या साईट्स आहेत्,आता जास्त बोलत नाही,तुम्ही वेगळा अर्थ घ्याल.
  • Log in or register to post comments

आठवा

शानबा५१२
गुरुवार, 06/17/2010 - 09:14 नवीन
आठवा तुम्हाला मिळालेले/ तुम्ही दिलेले मोस्ट रोमॅंटिक गिफ्ट ते रोमँटीक नसत्,त्याला गिफ्ट बोलु शकतो आपण..............राखी
  • Log in or register to post comments

३. गेट वे ऑफ

II विकास II
गुरुवार, 06/17/2010 - 09:45 नवीन
३. गेट वे ऑफ इंडिया: जागा छान आहे पण अख्खा दिवस तिथे जाऊन करायचे काय हा प्रश्न आहे. >> गेट वे ला जा आणि मस्त तुमच्या आवाजात यमन गाउन दाखवा. खर्च ही वाचेल आणि तो दिवस आमच्या दोघांच्याही लक्षात कायम राहील.
  • Log in or register to post comments

>> ....खर्च ही

मेघवेडा
गुरुवार, 06/17/2010 - 14:34 नवीन
>> ....खर्च ही वाचेल आणि तो दिवस आमच्या दोघांच्याही लक्षात कायम राहील. तुम्ही काय करायला जाणार आहात तिथे? :?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: II विकास II

मेवे तुला पण ना

jaypal
गुरुवार, 06/17/2010 - 14:42 नवीन
उगाच || **** *** || काड्या घालायची सवय बघ ;-) ते यमन गाणार मग कुणी तंबोरा धरायला बरोबर नको का? =)) * जयराम फुटणे *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

ते यमन

टारझन
गुरुवार, 06/17/2010 - 19:13 नवीन
ते यमन गाणार मग कुणी तंबोरा धरायला बरोबर नको का?
=)) =)) =)) =)) बरा तंबोरा धरायलाच लावला ... बाकी कापडं धुवायला नाय लावला कपल यमन गाणार || II**** ***II तंबोरा धरणार || नर सैनिक साचार || बोळा तुंबणार निष्चित || इति तंबोरातुणतुणम् -(डबलभुर्जी ची ऑर्डर देण्या पासुन ते कपडे धुण्यापर्यंत ऑलराऊंड कामे करणारा) IIईल्ल्यासII
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

या अल्ल्ला

jaypal
गुरुवार, 06/17/2010 - 19:16 नवीन
>"बाकी कापडं धुवायला नाय लावला " या अल्ला हसा हसा के जान लोगे क्या? =)) *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

मी

विनायक प्रभू
गुरुवार, 06/17/2010 - 10:23 नवीन
सांगायला तयार आहे. पण पटायचे नाही. असो.
  • Log in or register to post comments

बहुतेक

तेजोमय
गुरुवार, 06/17/2010 - 13:45 नवीन
बहुतेक मुलींना जागेपेक्षा कंपनी म्हत्वाची असते. रोमान्तिक धक्का द्याचा असेल तर तू जिकडे घेऊन जाशील तिकडे ती खुश होईल. तात्पर्य असा कि क्वालिटी वेळ असला पाहिजे. आनंदात दिवस गेला पाहिजे. १०००० ची एक मस्त चैन घे आणि गिफ्ट कर.
  • Log in or register to post comments

चेन

नीधप
Fri, 06/18/2010 - 11:25 नवीन
चेन द्यायला तो काय तिची आजी आहे का? - नी http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तेजोमय

चेन कॅंसल.

सोम्यागोम्या
Fri, 06/18/2010 - 20:43 नवीन
चेन कॅंसल. स्त्रीयांच्या मताला जास्त महत्त्व आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप

अग नी पण

संदीप चित्रे
Fri, 06/18/2010 - 21:29 नवीन
>> १०००० ची एक मस्त चैन घे आणि गिफ्ट कर. आता 'चैन' घे म्हणजे नक्की काय घ्यायचं ब्वॉ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप

+१

नितिन थत्ते
Fri, 06/18/2010 - 21:39 नवीन
सहमत आहे. कंपनी महत्त्वाची. माझा पांढर्‍या केसांचा सावध सल्ला तिच्याशी लग्न करायचा विचार असेल तरी फार महागड्या भेटी नको. शिवाय जास्त महाग भेटीने ती टर्न ऑफ होऊ शकते (विचारी असेल तर). लग्नाचा विचार नसेल (तुम्ही गर्लफ्रेंड-डेट म्हणून लिहिलंय) तर अजिबातच नको. आत्ता तुम्ही भेट दिली हे सरप्राइजच तिला खूप 'मूल्य'वान वाटेल. भेटीची किंमत महत्वाची नाही. लांब जायचीही गरज नाही. एस्सेल वर्ल्ड सुद्धा चालेल. आता गर्दी सुद्धा नसेल. दीड दोन तासात पोचता येईल असे ठिकाण शोधा. जास्त लांब गेल्यास प्रवासशीण येईल आणि मजा राहणार नाही. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तेजोमय

व्वा!

धमाल मुलगा
Fri, 06/18/2010 - 21:41 नवीन
थत्तेसाब, क्या कहीं! एकदम शंभर नंबरी बात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

बरोबर आहे

सोम्यागोम्या
Sun, 06/20/2010 - 03:26 नवीन
बरोबर आहे थत्ते साहेब ! एस्सेल वर्ल्ड पण झकास कल्पना आहे ! फारसं महागडं काही करायची माझी पण इच्छा नाहीए. दिखावा काय कामाचा. जवळपासचा पर्यात निवडतो. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

लेका , काय

टारझन
Sun, 06/20/2010 - 10:16 नवीन
लेका , काय करतोय काय ? :) कधी जाणारेस डेट वर ? बाकी काल आम्ही लोणावळ्याला जाऊन पण आलो :) मस्त अँबी व्हॅली पर्यंत बाईक रदडली ... झाप झुप झाप झुप :) पावसात भिजायला लोणावळ्याला गेलो खरा , पण पाऊस झालाच नाही ,तरीबी यंजॉय केलं .. पाऊस लागला तो रिटर्ण येताना , पणवेल पासुन पुढे =)) बाकी असे धागे आणि प्रतिक्रिया टाइप करत बसशील तर ... हॅहॅहॅ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोम्यागोम्या

डेट वर जाण्यापुर्वी

jaypal
गुरुवार, 06/17/2010 - 14:16 नवीन
"सोम्यागोम्या" हे नाव बदला. अलिबाग ,रेवदंडा, नागाव किंवा चौल वेळेच्या आवाक्यात आहे का बघा. मुंबईवरुन बोटीने अलिबाग सफर आनंददायी आहे. नेरळची मिनी ट्रेन (मोनो नाही) चालु आहे के नाही? हे त्या दिवशी रेव्लेच्या हेल्प लाईन १३९ वर विचारा. कुठेही गेलात तरी घाई गडबड करू नका वातावरण आणि सहवासाचा लुत्फ घ्या. पावसात शक्यतो रेनकोट घालुन जा. एखादे गाणे म्हटले तरी चालेल पण कृपया (आनंदातिरेकाने) नाचण्याचा प्रयत्न करु नका.चिखलात पाय घसरण्याची आणि अपघात होण्याची या दिवसात दाट शक्यता असते. थंड पदार्थ टाळुन शक्यतो गरम पदार्थावर ताव मारा. दुचाकी वाहनावरुन जाणार असल्यास दोघांनाही शिरस्त्राण आवश्यकच आहे. गाडीचे सर्व पेपर्स, गाडीची डागडुजी ई. आधीच तयार ठेवा. आधिक माहीती साठी ईथे क्लिक करा Image removed. डेट (दिनांक) निट विचार करुन ठरवा. डेट साठी माझ्या खुप शुभेच्छा . अवांतर :- फोटो रुपात आठवणी जपायच्या असतील तर मला पण बोलवा =)) =)) =)) Image removed. *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

>> फोटो

मेघवेडा
गुरुवार, 06/17/2010 - 15:13 नवीन
>> फोटो रुपात आठवणी जपायच्या असतील तर मला पण बोलवा हो म्हणजे मग 'माझे फोटोग्राफिक किडे' चा पुढचा पार्ट लौकरच येणार तर!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

पावसात

महेश हतोळकर
गुरुवार, 06/17/2010 - 16:05 नवीन

पावसात शक्यतो रेनकोट घालुन जा.
एखादे गाणे म्हटले तरी चालेल पण कृपया (आनंदातिरेकाने) नाचण्याचा प्रयत्न करु नका.चिखलात पाय घसरण्याची आणि अपघात होण्याची या दिवसात दाट शक्यता असते.
थंड पदार्थ टाळुन शक्यतो गरम पदार्थावर ताव मारा.
काय हे! शीव! शीव!! श!!! अब्रह्मण्यम्! बालमनावर किती परीणाम होतील!

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

च्यायला

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 06/17/2010 - 16:07 नवीन
च्यायला जयपाला धन्य आहेस बाबा ! हे म्हणजे इयत्ता दुसरी तुकडी ब, 'सहली आधीच्या सूचना' असे वाटतय. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

जयपाल,

सोम्यागोम्या
Fri, 06/18/2010 - 20:51 नवीन
जयपाल, विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद. >>अलिबाग ,रेवदंडा, नागाव किंवा चौल या सर्व पर्यायांचा विचार करतो. व माहिती जमवतो. >>मुंबईवरुन बोटीने अलिबाग सफर मॉनसून मध्ये बंद असते असे वाचले. >>रेव्लेच्या हेल्प लाईन १३९ क्रमांक क्रमांकाबद्दल आभारी आहे. >> अधिक माहिती डेटिंग टिप्स बद्दल धन्यु. छान आहेत टिप्स. अमेरिकेत जास्त उपयोगी. शुभेच्छांबद्दल आभारी आहे. फोटु स्वत:चे स्वत:च काढावेत म्हणतो ! (स्मायली नेहमी प्रमाणे भारी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

बा

गणपा
गुरुवार, 06/17/2010 - 14:28 नवीन
बा सोम्यागोम्या विमुक्ताचा हा अल्बम घे. पहा कुठल ठिकाण आवडत. असेल एखाद जवळपास तर जाउन ये.
  • Log in or register to post comments

गणपा, मस्त

सोम्यागोम्या
Fri, 06/18/2010 - 20:55 नवीन
गणपा, मस्त आहे अल्बम. विमुक्त खरंच भारी माणूस दिसतोय. मस्त आहेत ठिकाणं. पण आधी गेलो असल्याशिवाय त्या ठिकाणी जाता येणार नाही. जागा सापडली नाही तर पोपट व्हायच्चा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

हम-तुम(असं

Nile
गुरुवार, 06/17/2010 - 14:32 नवीन
हम-तुम(असं तुम्ही म्हणायचं, नायतर मला बोलवाल ;) ) एक कमरें मे बंद हो, और चाबी खो जाए... ;) असो, शुभेच्छा! :) -Nile
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा