केवढा मोठा जिना
ई.. कळकट आहे पण..!
मुले ओरडतात
बाप रे!
उंच इमारतीच्या
भिंतीवर आणि
लगतच्या जुन्या
जिन्यावरचे
आपलेच जाळे
खुशाल बघत
एक कोळी
पहुडला असतो
एकटाच..
न्यूयोर्कचा कोलाहल
ती घाईगडबड
रोषणाई, श्रीमंती
कशाकशाची
पर्वा न करता
अगदी माझ्याविरुद्ध!
-सोनाली जोशी
प्रतिक्रिया
15 Jun 2010 - 10:39 pm | मुक्तसुनीत
रोचक क्षणचित्र.
15 Jun 2010 - 11:13 pm | अक्षय पुर्णपात्रे
अनेक कोळ्यांना एकत्र पहूडलेले पाहिलेले नाही. त्यामुळे मुद्दाम हा शब्द कळला नाही.
15 Jun 2010 - 11:16 pm | मुक्तसुनीत
कदाचित मुद्दाम आणि एकटाच या शब्दांमधे स्वल्पविराम असावा. :-)
15 Jun 2010 - 11:21 pm | अक्षय पुर्णपात्रे
कोळ्याने स्वत: विनलेले विश्व - त्यात सापडणारे भक्ष्य, कवयित्रीचे जग लादलेले - स्वत:च भक्ष्य बनणे वगैरे विस्तार मनात आला होता पण हा कोळी फक्त (अनपेक्षित) पहुडलेलाच आहे.