नमस्कार मंडळी,
अनेक मिपाकरांनी कोकणातील फोटो मिपावर टाकले आहेत त्यात माझीही थोडीशी भर. ठिकाणे आहेत गणपतीपुळे आणि आंबोली.
गणेश मंदिराचे मिपावर किमान तीन वेगवेगळ्या सदस्यांनी दिलेले फोटो आहेत. पण गणपतीपुळ्याचे फोटो द्यायचे आणि श्रींच्या मंदिराचा फोटो द्यायचा नाही ही कल्पनाच सहन होत नाही म्हणून मी पण तो फोटो देत आहे.
गणपतीपुळ्यातील गणेश मंदिर
अभिषेक बीच रिसॉर्ट मधील खोलीच्या बाल्कनीतून दिसणारे समुद्राचे दृष्य.
अगदी डोळ्यात साठवून ठेवावे असे हे दृष्य आहे. अथांग सागराच्या या एका दर्शनामुळे मी ’गुरगाव’ नावाच्या सिमेंट आणि मॉलच्या जंगलात मी गेले दोन महिने राहत होतो हे क्षणार्धात विसरून गेलो.
अभिषेक बीच रिसॉर्ट मधून गणेश मंदिर आणि समुद्राकडे जाणारा रस्ता.
गणपतीपुळ्यातील अथांग समुद्र
ढगांआडून मावळतीकडे झुकणारा सूर्य
समुद्राकडे कितीही वेळ बघत राहिले तरी समाधान होत नाही
हॉटेल अभिषेकच्या आवारातील रस्ता
आंबोलीतील कावळेसाद पॉईंटकडे जाताना
आंबोलीतील कावळेसाद पॉईंट. एकामागोमाग अनेक डोंगर रांगा या ठिकाणी आहेत.
कोकणातही ऊसाची लागवड होते हे आंबोलीला गेल्यावरच कळले.
निसर्गाने मुक्त हस्ताने केलेली अनेकविध रंगांची उधळण बघून डोळे तृप्त होतात.
ग्रीन व्हॅली या एम.टी.डी.सी च्या हॉटेलात अशी कॉटेजेस आहेत.
आंबोलीतील शिरगावकर पॉईंटवरून
आमच्या हॉटेलच्या बाजूचा परिसर
पावसाची चाहूल लागताना
कोकण दौऱ्यात थोडेथोडके नव्हे तर तब्बल ६३२ फोटो मी काढले. त्यातील थोडे इथे दिले आहेत. आंबोली हे पाचगणी-महाबळेश्वरपेक्षाही अतिशय सुंदर ठिकाण आहे. दोन्ही ठिकाणे मी बघितली असल्याने मी हे खात्रीने सांगू शकतो.
क्लिंटन
प्रतिक्रिया
15 Jun 2010 - 12:39 pm | बबलु
क्लिंटन साहेब....
पुळे हे आपलं यकदम आवडतं ठिकाण.
फोटो पाहून अंमळ ८ वर्षे मागे गेलो.
(क्यालिफोर्नियात हरवलेला),
....बबलु
15 Jun 2010 - 12:41 pm | अमोल केळकर
आंबोली हे पाचगणी-महाबळेश्वरपेक्षाही अतिशय सुंदर ठिकाण आहे - सहमत
आता पावसाळ्यात तर आंबोलीचा धबधबा पाहण्यासाठी / मजा करण्यासाठी जत्राच भरते.
वरील सर्व फोटो मस्तच
अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
15 Jun 2010 - 12:55 pm | गणपा
मस्तच.
कोकण खरच इतक सुंदर आहे. आणि गेल्या काही दिवसांपासुन आपण मिपाकरांच्या 'दृष्टीन' ते पहातोयच.
सरकारी निष्क्रियतेमुळे पर्यटाना सारख्या एका मोठ्या व्यवसायाला महाराष्ट्र मुकतोय.
आजच एक ढकलपत्र आल होत. Incredible !ndia
त्यात बर्याच राज्यांतले पर्यटन स्थळांचे फोटो होते, पण महाराष्ट्रातला एकही नव्हता :(
15 Jun 2010 - 1:03 pm | जागु
समुद्र खुप आवडला. खुप दिवसांपासुन अंबोलीला जायची इच्छा आहे. बघु कधी मुहुर्त येतोय तो !
15 Jun 2010 - 1:06 pm | दिपक
सुंदर फोटो क्लिंटनराव. गणपतीपुळे आणि आंबोली आमचे एकदम फ़ेवरेट स्पॉट आहेत.
आंबोलीत खरी मजा पावसाळ्यात.
15 Jun 2010 - 3:57 pm | mamuvinod
आम्हि गेलो होतो पुळ्याला तेव्हा एका म्हातार्या आजीच्या घरी राहिलो होतो, घरगुती सोय होती राहण्याची पण त्या कोकणी आजीच्या हातचा माशाचा रस्सा व सोलकडीची चव केवळ अप्रतिम होती. माणुसकी तिथे बघायला मिळते.
पुळ्याच्या समुद्राचा चाह्ता
मामु
15 Jun 2010 - 4:15 pm | गणपा
द्वांदा गेल्ता का :?
(हघ्या)
15 Jun 2010 - 4:02 pm | mamuvinod
आम्हि गेलो होतो पुळ्याला तेव्हा एका म्हातार्या आजीच्या घरी राहिलो होतो, घरगुती सोय होती राहण्याची पण त्या कोकणी आजीच्या हातचा माशाचा रस्सा व सोलकडीची चव केवळ अप्रतिम होती. माणुसकी तिथे बघायला मिळते.
पुळ्याच्या समुद्राचा चाह्ता
मामु