ज्या गोष्टी मुळे मी फोटोग्राफी कडे आकृष्ट झालो ती म्हणजे मॅक्रो फोटोग्राफी. या पद्धती मधे लहान-लहान गोष्टींचे उदा. किडे, फुले , फुलांचे परागकण ई. जवळुन (क्लोजप) फोटो काढुन त्या मधील जास्तीत जास्त डिटेल टिपण्याचा प्रयत्न असतो. माहीत अस्लेल्या किड्यांची नावे दिली आहेत. (उरलेल्या नावांसाठी जाणकारांनी मदत करावी)
दर रविवारच्या येउर व ईतर भटकंती दरम्यान ह्या मॅक्रो फोटोग्राफीत मी लावलेले दिवे..............
ईथे मुद्दामच एकाच कोळ्याचे (हळुहळु क्लोजाप घेत) ४ फोटो दिले आहेत.
आंब्याच्या वाळलेल्या पानाच्या सुरळीत हा लपुन बसला होता. स्वतःची रगसंगती अप्रतीम रित्या त्या पानाशी मिळ्ती जुळती करुन घेतली आहे.
नुकतच कोषातुन बाहेर आलेले पाम बटरफ्लाय
घरातल्या या कोळ्याने आपले भक्ष(डास) पकडले आहे
प्रेईंगमॅटीस (गवळण)
क्रमशः
कॅमेरा निकॉन डि ९० + लेन्स नोकॉन १८-५५ व निकॉन १०५
प्रतिक्रिया
14 Jun 2010 - 11:03 am | श्रीराजे
फोटो एकदम झकास आले आहेत...
14 Jun 2010 - 11:04 am | प्रभो
लै भारी रे !!!!
14 Jun 2010 - 11:05 am | मी ऋचा
शेवटुन तिसर्या फोटोत गवळणीने एकदम ईस्माइल दिलीए..बाकी सगळेच फटु झक्कास!!!
मी ॠचा
र॑गुनी र॑गात सार्या र॑ग माझा वेगळा !!
14 Jun 2010 - 11:27 am | ज्ञानेश...
सगळे फोटो आवडले.. =D>
हे असे फोटोज घेणे फारच जिकिरीचे काम असावे !
14 Jun 2010 - 1:26 pm | भाग्यश्री
फारच भारी मॅक्रो !!!
गवळणीचे स्माईल पाहून हसू आले एकदम! :)
14 Jun 2010 - 1:35 pm | सहज
हे कोशातले फुलपाखरु वगैरे कसे सापडले?
एकातरी फोटोची सखोल माहीती कृपया द्याच. कधी घेतला, किती वेळ क्लिक, शटर स्पॉड, झूम, लाईट कंडीशन इ इ
14 Jun 2010 - 1:57 pm | राजेश घासकडवी
बेडकाचा फोटो आवडला...एकाच रंगाच्या छटा छान आल्या आहेत. प्रेइंग मँटिसचाही छान. भक्ष्य पकडतानाचे फोटो नाट्यमय. हॅट्स ऑफ!
14 Jun 2010 - 2:08 pm | गणपा
किडे मस्त आहेत आणि बेडुकही :)
14 Jun 2010 - 4:27 pm | युयुत्सु
आणि कॅमेरा मॉडेल लिहिल्या बद्द्ल आभार...
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
14 Jun 2010 - 6:34 pm | किल्लेदार
बेडकाचा फोटो मस्त.... Flash वापरला नाही तर अजून मजा येइल.
14 Jun 2010 - 6:38 pm | अस्मी
मस्त भारी फोटो :)
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
- अस्मिता
14 Jun 2010 - 7:10 pm | पाषाणभेद
जहबरा फटूग्राफी बरं का जयभौ!
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
14 Jun 2010 - 8:15 pm | पिंगू
लेका जबरी फटुग्राफी..
- पिंगू
14 Jun 2010 - 8:25 pm | गणपा
खालुन पाचवा फोटो पाहुन कोळी पाळावेत का असा विचार मनात आला :?
14 Jun 2010 - 9:06 pm | अभिज्ञ
मस्तच.
उच्च फोटोग्राफि.
पुढचे भाग लवकर येउ द्यात.
अभिज्ञ.
15 Jun 2010 - 1:58 am | भडकमकर मास्तर
मस्त फोटु...
मला तर जमिनीवर आडवे पडलेले, झुडपा-पानांमध्ये घुसलेले, किड्यां-मुंग्यांची वारुळं , बेडकांचे महाल धुंडाळणारे जेपालसाएब दिसायला लागले...
15 Jun 2010 - 3:18 am | पाषाणभेद
आणखी एक आठवले. जय दादा, तुम्ही फोटो तर चांगले काढतातच पण त्या फोटोंवर काही प्रोसेसिंग करत नाही की सॉफ्टवेअर मधले पुचाट फटकारेही मारत नाही. आणखी एक, मुख्य म्हणजे तुमच्या फोटोंमध्ये बटबटीत 'वॉटरमार्क' ही नसतो.
तुमची नजर अन कॅमेरा बस्स.
पुलंचे एक वाक्य आठवले. 'खानदानी गवई तंबोर्याच्या चार तारा अन तबल्यात स्वरांचा स्वर्ग उभा करतो' अशा अर्थाचे.
जे काही आहे ती तुमची कलाकाराची नजर बघणार्यांना लगेच समजते. कला दाखवण्याचीही एक नजाकत असते ती तुमच्या फोटोंमध्ये दिसते. वर ताण करून "आहे ते तसेच घ्या" असेही तुम्ही म्हणत नाही. यात तुमचा विनय दिसतो. एका कलंदर कलाकाराचे मन दिसते. जी कला आपण केली ती आहे तशी रसिकांपर्यंत सादर करणे हे ही एक कलेचे अंग आहे. ते तुम्ही सांभाळतात. असो.
उत्तरोत्तर आम्हांस तुमची कला बघावयास मिळो ही इच्छा.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
15 Jun 2010 - 8:53 am | भारद्वाज
आपल्या फोटूग्राफीला मानचा मुजरा..
15 Jun 2010 - 9:17 am | टारझन
जैपाल दादा .... एकदम रापचिक फोटो :) झकास
15 Jun 2010 - 2:21 pm | संजा
अरे लै भारी यार,
तो कोळ्याचा फोटो निरखुन बघितला तर चक्क मीशीवाला माणुस दिसतोय.
संजा
15 Jun 2010 - 3:07 pm | जागु
नाकतोड्याचे खुप छान आलेत फोटो,
दुसर्या फोटोतल्या कोळ्याचा चेहरा तुम्हीच रंगवलाय अस वाटत.
15 Jun 2010 - 7:28 pm | धमाल मुलगा
अरे काय फोटो काढतो का मजा करतो? आँ?
एकापेक्षा एक फोटो जबरान रे! वेड...वेड आलेत फोटो.
15 Jun 2010 - 8:44 pm | jaypal
ज्ञानेशजी खरय आपल म्हणन खुप जिकीरीच काम असुन फुलपाखरांच्या बाबतीत बरीच अवधान पाळावी लागतात. खुप वेळ खाउ आणु पेशन्स पणाला लावायला लागतात.
सहजराव मी फोटो शक्यतो अॅपरचर किंवा प्रायॉरीटी मोड वर काढतो कारण मॅन्युअल मोडवर जुळवा जुळवी करे पर्यंत हे किडे आपली चाहुल लागल्याने उडुन जातात. तसेच मॅक्रो लेन्सने ट्रायपॉड शिवाय (हँडहेल्ड कॅमे-याने) फोटो काढायचे त्यात थोडा जरी वारा आला तर...(बोंबलल सगळ). त्या मुळे मी एका पेक्षा जास्तच फोटो काढतो.
लाईट कंडिशन दिवसाच्या उजेडावर अवलंबुन आहे पण शक्यतो फ्लॅश वापरत नाही. लँडस्केप फोटो मात्र मॅन्युअल मोडवर काढायला आवडतात.
किल्लेदारजी सकाळी ६.३० च्या दरम्यान लोलाईट असल्याने बेडकाच्या फोटोसाठी मला फ्लॅश वापरवा लागला.
भडकमकर मास्तर खर आहे तुमच म्हणन जमीनीवर आडव+ तिडव पडुन फोटो काढावे लागतात,
कधी काटेरी फांद्या अंगाला ओरबडतात तर कधी मुंग्या कडकडुन चावतात...
पण विक्रमादित्या प्रमाणे आम्ही आमचा हट्ट सोडला नाही (अंगात किडे आहेत ना? ;-))
सुचना अथवा सुधारणा असल्यास जरुर कळवत रहा ही सगळ्यांना नम्र विनंती :-)
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/