पुन्हा पेच झाले; असेही, तसेही
नको तेच झाले; असेही, तसेही
जरा बोलले मी; रुढीहून काही
निराळेच झाले; असेही, तसेही
किती सोडवावे? पुन्हा उत्तरांचे
उखाणेच झाले; असेही, तसेही
मुके राहणेही विरोधात माझ्या,
पुरावेच झाले; असेही, तसेही
फुका बोलबाला ऋतूपालटाचा,
उन्हाळेच झाले; असेही, तसेही
कशाला निमित्ते हवी भेटण्याची?
दुरावेच झाले; असेही, तसेही
मला हासताना हसे शेवटी या
जगाचेच झाले; असेही, तसेही
प्रतिक्रिया
11 Jun 2010 - 2:49 pm | मदनबाण
मुके राहणेही विरोधात माझ्या,
पुरावेच झाले; असेही, तसेही
वाह...
मला हासताना हसे शेवटी या
जगाचेच झाले; असेही, तसेही
A वन !!! :)
मदनबाण.....
"Intelligence is what you use when you don't know what to do."
Jean Piaget
11 Jun 2010 - 5:39 pm | राघव
काय बोलावं आता.. असा प्रश्न पडावा इतकं छान लिहिलंय! :)
मुके राहणेही विरोधात माझ्या,
पुरावेच झाले; असेही, तसेही
कशाला निमित्ते हवी भेटण्याची?
दुरावेच झाले; असेही, तसेही
मला हासताना हसे शेवटी या
जगाचेच झाले; असेही, तसेही ... या द्विपदी विशेष आवडल्यात!!
अवांतरः कवितासंग्रह कधी काढताय ते सांगा आता आधी.
राघव
11 Jun 2010 - 5:48 pm | jaypal
क्रान्तिकारी गजल
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
11 Jun 2010 - 5:50 pm | अनिल हटेला
सहमत !! :)
बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
АНИЛ ХАТЕЛА :D
11 Jun 2010 - 5:54 pm | डॉ.श्रीराम दिवटे
तसेही ही कविता छानच आहे.
*******************************************
आमच्याशी "मराठी गप्पा" मारायला जरूर या...
11 Jun 2010 - 6:21 pm | दत्ता काळे
कविता आवडली.
11 Jun 2010 - 8:08 pm | प्राजु
व्व्वा!! व्वा!!
मस्तच!!
मुके राहणेही विरोधात माझ्या,
पुरावेच झाले; असेही, तसेही
फुका बोलबाला ऋतूपालटाचा,
उन्हाळेच झाले; असेही, तसेही
फारच सुंदर!!
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
11 Jun 2010 - 8:31 pm | वेताळ
एक प्राजुतै व दुसरी क्रांती....... ह्याच्या कविता सोप्या व आपल्याच वाटतात :\
वेताळ
12 Jun 2010 - 12:23 pm | परिकथेतील राजकुमार
वेताळोबांशी अगदी सहमत आहे.
ह्या दोघींच्या कविता वाचायला आवडतात आणी मुख्य म्हणजे त्या वाचल्यावर कळतात.
हे जबर्याच.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
11 Jun 2010 - 8:58 pm | धनंजय
वा
12 Jun 2010 - 12:48 am | चित्रा
छान कविता..
12 Jun 2010 - 2:24 am | शानबा५१२
सर्वात भारी!!!
- लोकमान्य विद्यालयचा सउशानत
12 Jun 2010 - 2:33 am | मिसळभोक्ता
मराठीत सेमिकोलन आहे का ?
मला अर्धविराम, पूर्णविराम, उद्गारवाचक चिन्ह, प्रश्नार्थक चिन्ह, अवतरण चिन्हे आठवतात. पण सेमिकोलन आठवत नाही.
नसल्यास, सेमिकोलनला पौणविराम म्हणावे का ?
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
12 Jun 2010 - 2:37 am | पंगा
त्याला अपूर्णविराम म्हणतातसे वाटते.
मी अनेकदा वापरतो. (अर्थात याने काहीही सिद्ध होत नाही म्हणा.)
पण प्रस्तुत कवितेत तो अस्थानी आहे असे वाटते.
- पंडित गागाभट्ट.
12 Jun 2010 - 4:14 am | मिसळभोक्ता
त्याला अपूर्णविराम म्हणतातसे वाटते.
आणि कोलन ला ?
ता. क. कोलन म्हणजे ":", "====" हा नाही.
(नीचभ्रू)
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
12 Jun 2010 - 4:29 am | पुष्करिणी
':' याला विसर्ग म्हणतात बहुतेक.
पुष्करिणी
12 Jun 2010 - 5:58 am | धनंजय
; अर्धविराम, : अपूर्णविराम
(इति वीरकरांचा शब्दकोश)
14 Jun 2010 - 8:57 am | मिसळभोक्ता
कोलन अपूर्ण म्हटला, तर काय काय लीक होणार ? शी !
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
13 Jun 2010 - 3:51 am | पंगा
; (सेमायकोलन) आणि : (कोलन) यांपैकी एकाला अर्धविराम आणि दुसर्याला अपूर्णविराम म्हणतात एवढे अंधुकसे आठवते. नेमका कुठला कोण याबद्दल खात्री नाही.
बहुतेक धनंजयशेठने वर दिलेले बरोबर असावे.
कोलन आडवा??????
- पंडित गागाभट्ट.
13 Jun 2010 - 10:01 am | टारझन
वरिल संभाषण पाहुन वाट्टे , पंग्यादादाला आणि भुक्त्याकाकाला वेळंच वेळ आहे ..
=)) च्यामायला .. एवढी सुंदर कविता , तिचं रसग्रहण करायचं सोडुन कसल्या कोलनच्या न विसर्गाच्या मागे लागलेत हे लोक ?
-(राजकारणी) प्रा.डॉ.दिल्लीत शिरुदे
14 Jun 2010 - 8:56 am | मिसळभोक्ता
पंगाशेठ,
अंमळ पहुडा मग,
कोलन आडवा??????
हा प्रश्न पडणार नाही.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
12 Jun 2010 - 2:41 am | शानबा५१२
कवितेबद्दल लिवा की!!
मस्त प्रश्न .......नाही खरच विचार करण्यासारख आहे नी माझ्यासारख्यांना तर होच.
पुर्णविराम,comma असला की वाचताना काय बदल करायचे ते माहीती आहे,पण ; हे असल की अशा वेळी काय करायच????
पौण????? म्हणजे???? आणि तेच का???
12 Jun 2010 - 3:19 am | भानस
वा! क्या बात हैं! :)
12 Jun 2010 - 4:11 am | पुष्करिणी
छानच कविता, आवडली.
पुष्करिणी
12 Jun 2010 - 4:16 am | मिसळभोक्ता
कविता छान आहे, पण सेमिकोलन मुळे नीट फोकस होत नाही.
स्वल्पविराम चालला असता.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
12 Jun 2010 - 6:33 am | सहज
बोंबला आता शुद्धविरामचिन्ह आग्रह देखील? बघा नको तेच झाले म्हणायचे की... :P
कशाला निमित्ते हो सेमीकोलनाची?
विरझण लावले; असेही, तसेही
कविता छान आहे पण सॅड साँग आहे :-(
12 Jun 2010 - 7:57 am | लवंगी
आणी मिभोंना सहजरावांचा टोमणासुद्धा तितकाच फक्कड ;)
14 Jun 2010 - 8:54 am | मिसळभोक्ता
लवंगीताई,
"फक्कड" हा अंमळ अश्लील शब्द आहे.
धन्यवाद.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
12 Jun 2010 - 1:32 pm | टारझन
एक काय ते ठरवा.लस्सी पीत आणि तपकीर ओढत इतरांच्या प्रतिसादांवर टीका करणार्या हिणकससम्राटांप्रमाणे 'गळ्यात कळ्यात' नको...
बाकी
"भोक्त्या -द विरजनवाला " कधीपासुन ताकाला भांडे लपवायला लागला ?
- उकळहप्ता
13 Jun 2010 - 3:54 am | पंगा
कॅन्सर म्हणजे (माझ्या समजुतीप्रमाणे) शेवटी (पेशींची) अमर्याद आणि नियंत्रण सुटलेली वाढ हे लक्षात घेता, ही कविता (सेमि)कोलन-कॅन्सरग्रस्त म्हणून घोषित करता यावी काय?
(माझी समजूत चुकीची असल्यास: चूभूद्याघ्या.)
- पंडित गागाभट्ट.
14 Jun 2010 - 8:52 am | मिसळभोक्ता
दोज हू फोकस ऑन सिंटॅक्स रादर दॅन सिमँटिक्स आर बाउंड टु गेट अफ्लिक्टेड विथ द कॅन्सर ऑफ द सेमाय कोलन.
(ता.क. अभिजात संगिताला शास्त्रीय म्हणवून घेणारे तथाकथित संगीतज्ञ्य देखील ह्याच विकाराने ग्रस्त असतात.)
क्रान्तिताईंनी स्वल्पविराम वापरायला हवा होता, एवढेच म्हणतो.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
12 Jun 2010 - 12:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडली.
-दिलीप बिरुटे
13 Jun 2010 - 10:34 am | तिमा
क्रांतिताई,
सुरेश भटांचा वारसा चालवणार तुम्ही!
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
14 Jun 2010 - 9:30 am | श्रावण मोडक
किती सोडवावे? पुन्हा उत्तरांचे
उखाणेच झाले; असेही, तसेही आवडली.
मला हासताना हसे शेवटी या
जगाचेच झाले; असेही, तसेही
या द्विपदीत 'या' आणि 'जगाचेच' तुटतात. काही वेगळे केले असते तर अधिक प्रभावी झाले असते. (ही प्रतिक्रीया वृत्त, मात्रा, छंद यांच्याशी संबंधित नाही, कारण अज्ञान!)
15 Jun 2010 - 10:18 pm | टारझन
मला क्षणभर वाटलं ही गुर्जींचीच की काय प्रतिक्रीया ... पण भुवया उंचवुन पाहिलं .. हे तर आपले श्रामो :)
असो :)
14 Jun 2010 - 9:33 am | यशोधरा
छान लिहितेस क्रांती..
14 Jun 2010 - 3:27 pm | पद्मश्री चित्रे
गझल आवडली..
15 Jun 2010 - 6:42 pm | अविनाशकुलकर्णी
कविता आवडली.