विश्वचषकाचे प्रबळ दावेदार - १ - टीम ऑफ चँपियन्स की चँपियन टीम?

प्रभो's picture
प्रभो in विशेष
11 Jun 2010 - 2:27 am
फिफा२०१०

'We know the name son, take a bow son'

जगातील सगळ्यात जुन्या देशस्तरीय फुटबॉल नॉकआउट स्पर्धेत २००५ साली, या स्पर्धेतली सर्वात चुरशीची फायनल खेळताना नव्वदाव्या मिनटाला टीपीकल यॉर्कशायरी अ‍ॅसेंट मधे कॉमेंट्रेटर...स्पर्धा कोणती - FA cup...वेस्ट हॅम युनायटेड आणी लिव्हरपूल ह्यांच्यातली फायनल. आधी २-० नंतर ३-१ असे पाठीमागे असून दुसर्‍या हाफ मधे २ गोल, त्यातला एक ९०व्या मिनिटाचा २५ यार्डावरून पाईलड्रायवर गोल करून मॅच पेनल्टीमधे नेणारा कप्तान - स्टीवन जेर्राड. सध्याच्या इंग्लंड टीमचाही कप्तान आणी आधारस्तंभ.

फिफा वर्ल्डकप - पहिला अध्याय ! आपल्या डॉनरावांनी रचलाय. त्याच मालेतलं हे पुढचं पुष्प.

फुटबॉल, फुटबॉल म्हटलं की नजरेसमोर उभा राहतो इंग्लंड. MCC ह्या क्रिकेटच्या नियम बनवणार्‍या संस्थेप्रमाणेच जागतीक फुटबॉलचे ही नियम सर्वप्रथम इंग्लंडमधेच १८६३ मधे बनवले गेले. सांघीक फुटबॉल का इंग्लंडचा de facto राष्ट्रीय खेळ आहे. हा फुटबॉल फीवर इंग्लंड मधे प्लेगसारखा पसरलाय. इंग्लंड आणी इंग्लीश प्रिमीयर लीग समर्थक हुलीगन्स (कु)प्रसिद्ध आहेतच. चाळीस हजाराहून जास्त छोटे मोठे क्लब असलेल्या या आकाराने एव्ढ्याश्या देशाला फुटबॉल प्रेमात तोड नाही.

अशा या इंग्लंडचा फुटबॉल इतिहास बराच तगडा आहे. इग्लंडमधे जगातला सगळ्यात जुना फुटबॉल क्लब शेफिल्ड एफ सी आहे, सगळ्यात जुनी कार्यकारी समिती द फुटबॉल असोसिएशन , सगळ्यात जुनी राष्ट्रीय टीम, वर सांगितलेला द एफ ए कप यासोबतच द नॅशनल लीग (EPL) सुध्दा आहे. आज जगातल्या मोठ्या, अतिश्रिमंत आणी छाती ठोकून गर्व करण्यासारखा इतिहास असलेले क्लब आहेत. त्यांबद्दल नंतर कधीतरी.

वर्ल्डकपच्या इतिहासात हा देश एकदाच फायनल जिंकलाय. १९६६ साली. वेस्ट हॅम या लंडनस्थीत क्लबच्या बॉबी मूर या खेळाडूच्या नेतृत्वाखाली. या संघाचे कोच होते सर आल्फ रॅमसे. सर बॉबी चार्लटन आणी सर जिऑफ हर्स्ट सुद्धा या संघातलेच... फिफाच्या वेबसाईट वरील या दोन ओळी या संघाबद्दल. १९६६ नंतर हा संघ एकदाच उपांत्यफेरी पर्यंत पोहचू शकला १९९० मधे.
'The country that invented football, England, finally found a formula for success on the world stage. Alf Ramsey's 'Wingless wonders' overcame Final opponents West Germany thanks to Geoff Hurst's historic hat-trick, though the debate over whether his middle strike crossed the line continues to this day.'

सध्याच्या इंग्लंड संघाची रचाना बघून असे म्हटले जात आहे की सध्याची टीम ही गेल्या दोन दशकातील इंग्लंडची सर्वोत्कॄष्ट टीम आहे. तर मंडळी घेऊया या संघाचा आढावा.

या विश्वचषकात इंग्लंड आहे ग्रुप सी मधे. या ग्रुप मधे त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत अमेरीका, अल्जेरीया आणी स्लोवेनीया.या ग्रुप मधून पुढे जाउन चषकासाठी चॅलेंज करण्याचे सर्वात प्रबळ दावेदार आहे इंग्लंड. अल्जेरीया आणी स्लोवेनीया च्या मानाने अमेरिका हा इंग्लंडाचा तुल्यबळ प्रतिस्पर्धी आहे. गेल्या कन्फेडरेशन कप मधे त्यांनी स्पेनला हारवून फायनलमधे मारलेली मुसंडी जोरदार होती. इग्लंड सध्या फिफा रँकिंग्समधे आठव्या स्थानावर आहे तर अमेरीका चौदाव्या , अल्जेरीया तिसाव्या आणी स्लोवेनीया पंचविसाव्या. अमेरीकेने उत्तर, मध्य आणी कॅरिबियन अमेरिकेत झालेल्या पात्रता स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवून विश्वचषकात प्रवेश केलाय. दुसर्‍या बाजूला अल्जेरीया चोवीस वर्षानंतर विश्वचषकाला पात्र ठरलाय. रशियन पात्रता गटातून रशिया, झेक, पोलंड अशा बलाढ्य ग्रुप मधे असतानाही पात्र होण्याची किमया केलीय स्लोवेनीयाने.

या विश्वचषकाच्या इंग्लंड संघात तेवीस खेळाडू आहेत. या तेवीस जणांमधले वेन रूनी, स्टीवन जेर्राड, जॉन टेरी, फ्रँक लँपार्ड, जो कोल, अ‍ॅश्ले कोल तसेच गॅरेथ बेरी हे खेळाडू संघासाठी फार महत्वाचे आहेत.







वेन रूनी
स्टीवन जेर्राड
जॉन टेरी
फ्रँक लँपार्ड
जो कोल
अ‍ॅश्ले कोल
गॅरेथ बेरी

वेन रूनी : बस नाम ही काफी है.....कशासाठी?? तर, प्रतीस्पर्धी संघाच्या उरात धडकी भरवायला. लोन स्ट्रायकर म्हणून खेळताना या पठ्ठ्याने मॅन यु तर्फे गेल्या मोसमात सर्व स्पर्धांमधे ३४ गोल केले आहेत. इंग्लंडच्या सर्व स्ट्रायकर्स मधे एका एकच प्राणी भरवश्याचा आहे. ही इस अ वर्कहॉर्स. गोलवरचा अ‍ॅटॅक वाया गेला असेल तर काउंटर अ‍ॅटॅक रोखण्यासाठी हा स्वतःच्या गोलच्या दिशेने संरक्षणासाठी धावतो..ते ही सर्वात जास्त वेगात. रोनाल्डो मॅन यु सोडून गेल्यावर ह्याने एकट्याच्या दिमतीवर मॅन यु ला प्रीमियर लीग जिंकण्याच्या स्पर्धेत ठेवले. पण आतापर्यंत ह्याला विश्वचषकात एकही गोल करता आला नाहीये..ही कसर त्याने भरून काढावी ही ह्याच्याकडून पूर्ण ब्रिटनला आशा आहे. ह्याच्या स्वभावाचा दुसरा पैलू म्हणजे तापटपणा. गेल्या विश्वचषकात पोर्तुगाल विरूध्दच्या सामन्यात ह्याच अतातायीपणामुळे साठाव्या मिनटाला रेड कार्ड घेऊन बाहेर पडावे लागले. हीच मॅच पेनल्टीवर जाउन इंग्लंडही स्पर्धेच्या बाहेर गेला.

स्टीवन जेर्राड :काय लिहू या प्लेयर बद्दल. जेपी ला सचीन आणी मेव्याला लक्ष्मण तर डॉन्रावांना टेरी बद्दल लिहिताना जे वाटेल ते मला ह्याच्याबद्दल लिहिताना वाटतं. एकट्याच्या जिवावर मॅच खेचायची ताकत आहे ह्याच्यात. दुसर्‍यांसाठी गोल सेट करणे हा अजून एक गूण. प्रचंड वेग आणी स्कील्स चा धनी. जेर्राड म्हटलं की नजरेसमोर येतो २००४-२००५ च्या चँपियन्स लीग मधे त्याने ९४ व्या मिनटाला केलेला ग्रीक क्लब ऑलिंपियाकोस च्या विरूध्दचा गोल करणारा जेर्राड, त्याच स्पर्धेच्या फायनल मधे हाफटाईमनंतर ३-० असे मागे असताना, ५ मिनिटानीच हेडर ने गोल करून ए सी मिलान च्या विरूध्द वातावरण चेतवणारा जेर्राड. वर लिहिल्याप्रमाणे एकट्याच्या जिवावर एफ ए कप जिंकवणारा जेर्राड. लिव्हरपूल साठी सध्या 'जस्ट बिहाइंड द स्ट्राईकर' खेळणारा जेर्राड कोणत्याही पोझीशन मधे खेळू शकतो, मग ते मिडफील्ड असो, विंग असो की सेकंड स्ट्रायकर.ह्याला स्वतःचा लीग फॉम राट्रीय स्तरावर १००% घेउन जाता आला नाहीये. ही एकच दुखरी बाजू आहे. रिओ फर्डीनांड जखमी झाल्यावर ह्याच्यावर कप्तानपदाची जबाबदारीही आहे.. तो ती समर्थपणे पेलेलच..

जॉन टेरी : सहा महिन्यांपुर्वीचा Mr.England. टॉप नॉच डिफेंडर. भल्या भल्या स्ट्रायकर्सना घाम फोडणारा. रिओ जायबंदी असल्याने लेड्ली किंग सोबत डिफेंसची भिंत असणार आहे. नजाकतीने टॅकल कराणारा डिफेंडर आहे हा. डिफेंडर्समधे सर्वात कमी बुकींग्स असणारा डिफेंडर.

फ्रँक लँपार्ड : इंग्लंडचा जादूगार. जेर्राड- रूनी जिथे कमी पडतील तिथे हा नग ती जबाबदारी स्वतःवर घेतो. पेनल्टी स्पेशलिस्ट. जगातल्या ड्रिबलींग करणार्‍या मिडफिल्डर्स एवढे स्किल्स नसतील पण वर्करेट त्यांच्यापेक्षा जास्त आहे ह्याचा. जगातल्या सर्वात श्रीमंत खेळाडूत मोडूनही लंडन मधे एका फ्लॅट मधे राहणारा खेळाडू. मॉडेस्ट म्हणतो तसा एकदम मिडलक्लास विचारांचा. प्रत्येकाला आपल्या टीममधे हवासा वाटणारा.

जो कोल : वेन रूनी वन्स सेड, ' ही इज द निअरेस्ट ब्रझिलीयन थिंग हॅपन्ड टू इंल्गीश फुटबॉल'. ह्यापेक्षा काय सांगायच जास्त. दुसर्‍याने(क्रीटीक्स) केलेल्या स्तुतीपेक्षा दुसर्‍या खेळाडूने केलेली स्तुती जास्त महत्वाची असते कोणत्याही खेळाडूला. इंग्लीश टीमचा ड्रीबलींगचा बादशहा. लेफ्ट्/राइट विंगवरून हल्ले करण्यात पटाईत.

अ‍ॅश्ले कोल : जगातला सगळ्यात बेस्ट लेफ्ट बॅक. थोडीशी जागा मिळाली की डाव्या बाजूने जोरदार मुसंडी मारून गोलवर हल्ला करणारा अ‍ॅटॅकिंग लेफ्ट बॅक. डिफेंसमधे तेवढाच तत्पर. विरोधी राइट बॅकच्या नाकात दम करून सोडणारा प्लेयर.

गॅरेथ बेरी : इंग्लीश फुटबॉलमधे सध्या सगळ्यात उत्तम होल्डींग मिडफिल्डर. जेर्राड-लँपार्ड हे अ‍ॅटॅकिंग मिडफिल्डर्स आहेत. त्यांना त्यांचा नैसर्गिक खेळ करता यावा ह्यासाठी गॅरेथ बेरीची टीमला खूप गरज आहे.

वरील खेळाडूंशिवाय इंग्लंडची गोलऱक्षणाची भिस्त आहे रॉबर्ट ग्रीन या गोलकीपरवर. इंग्लंडचा हा दोन नंबरचा गोलकीपर आहे. त्या जागेचा मुख्य दावेदार आहे ३९ वर्षाचा डेव्हीड जेम्स. पण सराव सामन्यात त्यालाही छोटीशी दुखापत झाल्याने रॉबर्टवर बराच भार येणार आहे. EPL मधे रेलेगेशन झोन मधे असलेल्या टीम्स ना वर आणण्यात रॉबर्टचा हाथखंडा आहे. या एका आतिशय चपळ अशा गोलकीपर कडून बर्‍याच acrobatic बचावाची इंग्लंडला अपेक्षा आहे.


अशा या हरहुन्नरी संघाचे कोच आहेत फॅबियो कॅपेल्लो. कॅपेल्लो यांनी इटलीमधे क्लब स्तरावर ए सी मिलान्,युवेंटस, आणी ए एस रोमा या संघांसोबत तब्बल ७ वेळा इटालीयन लीग Serie A जिंकलेली आहे. मिलानसोबत चँपियन्स लीग तसेच रीयल माद्रीद सोबत दोन वेळा स्पॅनिश La Liga जिंकलेली आहे. EURO २००८ मधे पात्र होऊ न शकलेल्या इंग्लंड संघाला सध्याच्या नव्या उंचीवर घेउन जाण्यात कॅपेल्लोंच्या विनिंग मेंटॅलीटीचा मोठा सहभाग आहे आणी ही गोष्ट खेळाडूंनीही मान्य केली आहे. कॅपेल्लो इटालियन असले तरी त्यांचा फुटबॉल डिफेंसीव्ह नाही.(इटालियन फुटबॉल हा खूपच डिफेंसीव्ह असतो.) तो क्रिएटीव्ह आहे.

या इंग्लंड संघात वादग्रस्तपणे निवडले गेलेले खेळाडू आहेत तसेच गाळले गेलेले ही आहेत. २००७ मधे निवॄत्ती घेतलेल्या जेमी कॅरॅघर या उत्तम खेळाडूला कॅपेल्लोनी त्याच्याशी बोलणी करून संघात निवडले, तेंव्हा ब्रिटन मधे थोडा गदारोळ झाला. तसाच गदारोळ झाला थीओ वॉलकॉट ला वगळल्यावर. चार वर्षापूर्वी गेल्या चषकाला वयाच्या १६व्या वर्षी वादग्रस्तपणे निवड झाली होती त्याच रितीने खांद्याच्या दुखापतीतून पुर्ण फॉर्ममधे न परतल्याने यावेळेस त्याला डच्चू मिळाला. रिओ फर्डीनांड स्पर्धेच्या १० दिवस आधी गुडघ्याच्या दुखापतीमुळे माघारी गेला.

इंग्लीश फुटबॉल हा धसमुसळा खेळ आहे. हा कधीच नजाकतीने खेळला जात नाही. रॉ पॉवर आणी वेग हे या संघाच्या खेळाचे वैशिठ्य आहे. पहिल्या सामन्यासाठी गॅरेथ बेरी नसल्याने जेर्राड आणी लँपार्ड यांच्य हालचालीवर थोडी बंधने आली आहेत. तसेच राइट बॅक ग्लेन जॉन्सन ह्याच्या अ‍ॅटॅक करून गोल करण्याच्या क्षमतेवर कोणाला शंका नसली तरी त्याच्या संरक्षण करण्याच्या कामगिरीवर सगळ्यांचे लक्ष आहे. रीओ च्या अनुपस्थीतीत डीफेंसची सर्व मदार जॉन टेरी वर आहे. रूनी- जेर्राड ही स्ट्राईक पार्टनर्शीप जेवढ्या लवकर क्लीक करेल तो क्षण इंग्लंडला त्यांच्या स्वप्नाच्या एक पाउल जवळ घेउन जाईल.

थोडक्यात सांगायचं तर, प्लेयर्स टू वॉच : स्टीवन जेर्रार्ड, फ्रॅ़क लँपार्ड, वेन रूनी

सध्याची ही टीम सेमीफायनल पर्यंत मजल मारेल असा माझा अंदाज आहे. फायनल ला पोहोचेल न पोहोचेल हे त्यांच्या नशीब आणी खेळावर अवलंबून.. :)

फुटबॉल असेल आणी वॅग्स नसतील असं होणार नाही. वॅग्स म्हणजे वाईव्ह्स अँड गर्लफ्रेंडस. या इंग्लंड संघातील काही प्रसिद्ध वॅग्स जोड्या.
जॉन टेरी - टोनी टेरी , जो कोल - कार्ली झुकर , स्टीवन जेर्राड - अ‍ॅलेक्स करन , अ‍ॅरॉन लेनन - माँटॅना मॅनींग ,
फ्रँक लँपार्ड - ख्रीस्टीन ब्लेकली , पिटर क्राउच - अ‍ॅबी क्लँसी , वेन रूनी - कोलीन रूनी

सरतेशेवटी या संघास लिव्हरपूलच्या गाण्याप्रमाणे एकच गोष्ट म्हणेन 'you will never walk alone'

प्रतिक्रिया

सहज's picture

11 Jun 2010 - 2:52 am | सहज

सही रे प्रभो!

इंग्लंड फुटबॉलप्रेम अनेक क्लब वरुन आठवले "बेंड इट लाईक बेकहम" एकदम इमोसनल सिणूमा होता. कदाचित कुठल्यातरी चॅनेलवर दाखवतील फुटबॉल फिव्हर आहे म्हणून. जरुर पहा. :-)

शुचि's picture

11 Jun 2010 - 3:00 am | शुचि

पण इंग्लंडचा मुख्य खेळ क्रिकेट ना?
इंग्लंड फुट्बॉल मधे सुद्धा आघाडीवर दिसतय तर.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

सुनील's picture

11 Jun 2010 - 3:15 am | सुनील

पण इंग्लंडचा मुख्य खेळ क्रिकेट ना?

नाही. इंग्लंडमध्ये क्रिकेट हा उच्चभ्रूंचा तर फूटबॉल हा सर्वसामान्यांचा खेळ आहे.

जेन्टलमेन्स गेम मधील जेन्टलमनचा अर्थ उच्चभ्रू असा आहे (आपण त्याला "सभ्यांचा" खेळ म्हणतो, ते सोडा).

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

इंग्लंड विश्वचषकाचे प्रबळ दावेदार??

काय जोक करता काय राव? ही टीम वर्ल्डकपला क्वालिफाय झाली तेच नशीब! मी गेली ८ वर्षे लंडन मध्ये राहातोय पण इतका मोठा विनोद आतापर्यंत ऐकला नव्हता. बाकी रूनी, जेरार्ड आणि लँपार्ड वगैरे हे इंग्लिश टॅब्लॉइड मीडियाने मोठे केलेले खेळाडू आहेत, त्याना फार महत्त्व देऊ नये हे उत्तम!

बाळकराम

प्रभो's picture

11 Jun 2010 - 6:00 am | प्रभो

तुमच्या मताचा आदर आहे. पण माझ्या मते विश्वचषकात खेळणारी प्रत्येक टीम ही दावेदार असतेच. कोणीही गेम हारण्यासाठी खेळत नसावेत. (मॅचफिक्सींग नसेल तर ;) ) फिफा रँकिंग ८ हे हारून तर मिळालं नसेल ना इंग्लंडला.

>>मी गेली ८ वर्षे लंडन मध्ये राहातोय पण इतका मोठा विनोद आतापर्यंत ऐकला नव्हता.
असाच एक विनोद गेल्या महिन्यापर्यंत चालायचा. क्रिकेट मधे. टी२० चषक जिंकल्यावर त्या विनोदाचं काय झालं ते लंडन मधे राहून माहीत असेलच तुम्हाला.. ;)

बाळकराम's picture

12 Jun 2010 - 4:50 am | बाळकराम

>>विश्वचषकात खेळणारी प्रत्येक टीम ही दावेदार असतेच
या तर्कानुसार बांगलादेश सुद्धा पुढच्या वर्षीच्या क्रिकेट वर्ल्डकपची "प्रबळ दावेदार" आहे ;)
>>असाच एक विनोद गेल्या महिन्यापर्यंत चालायचा..

हा विनोद अजून चालू आहे, उलट इंग्लंडने टी-२० जिंकल्यापासून त्याविनोदाला अजून धार आलीय ;)

बाकी, यानिमित्ताने क्रिकेटची साल फूटबॉलला लावण्याचा हा प्रकार आवडला!

बाळकराम

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Jun 2010 - 12:26 pm | बिपिन कार्यकर्ते

वाचतोय.

बिपिन कार्यकर्ते

छोटा डॉन's picture

11 Jun 2010 - 12:51 pm | छोटा डॉन

भारी लिहले आहेस रे प्रभ्या.
अगदी व्यवस्थित आणि सुटसुटीत झाला आहे लेख ...

ह्याच लेखावर मी थोड्या वेळानंतर आणखी एक सविस्तर प्रतिसाद देऊन माझे मत मांडेन.
पण माझा अंदाज असा आहे की इंग्लंड जास्तीत जास्त "सेमी फायनल" गाठु शकते.
तुर्तास ही केवळ पोच ! ;)

------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

प्रभो's picture

11 Jun 2010 - 6:36 pm | प्रभो

डॉन्राव, सविस्तर प्रतिसादाच्या प्रतिक्षेत आहे मी.

मेघवेडा's picture

11 Jun 2010 - 6:49 pm | मेघवेडा

मी सुद्धा! :)

छोटा डॉन's picture

13 Jun 2010 - 2:34 am | छोटा डॉन

इंग्लंडचा चॅम्पियन्सचा संघ अपेक्षेप्रमाणे आहे "चॅम्पियन्स गेम" खेळु शकला नाही.

कोच फॅबियो कपॅलोने आश्चर्यकारकरित्या ४-४-२ ह्या बांधणीनुसार संघ मैदानात उतरवला. आज इंग्लंडला 'विंगर प्लेयर' त्यांच्या बांधणीत नसल्याचा नक्कीच तोटा झाला.
बहुतेक सगळ्यांचा नावडता पण अत्यंत गुणी खेडाळु 'हेस्की' आपल्या लौकिकाला साजेसा खेळ खेळुन गेला पण त्याला आघाडीला साथ द्यायला अजुन एक विंगर हवा होता. अमिरिकन बचावफळीने 'रुनी' आणि 'लँपार्ड' ला पक्के गुंडाळुन ठेवले होते.
मिडफिल्डच्या उजव्या बाजुला 'जो कोल' ची कमी नक्की भरभरुन जाणवली. डाव्या बाजुलाही 'मिल्नर' कमाल दाखवु शकला नाही, उलट पहिल्या हाफ नंतर त्याला एक 'पिवडे कार्ड' घेऊन आत जाऊन बसावे लागले, त्याच्या पर्यायी आलेल्या शॉन राईट फिलिप्सचे उत्तम पासेस आणि क्रॉसेस दिले पण ते व्य्वस्थित पायात घेऊन त्याचे गोलमध्ये रुपांतर करण्यात 'हेस्की' ला बर्‍यापैकी अपयश आले.
इंग्लंडच्या दोन्ही फुलबॅक्स 'अ‍ॅश्ले कोल' आणि 'जॉन्सन' ची कामगिरी नजर लागेल इतकी उत्तम झाली पण इथे सुद्धा फुलबॅक्सच्या गेमला अत्यावश्यक असणारा 'विंगर' नसल्याने त्यांच्या कामगिरीवर विरजण घातले गेले.
रियो फर्डिनांडच्या अनुपस्थितीत 'किंग'ने जॉन टेरीच्या साथीत सेंटर बॅक आणि बॉक्सचे मस्त रक्षण केले.
शेवटच्या काही मिनिटात आघाडीला आलेल्या 'पिटर क्राऊच'ने गंमतशीररित्या आपल्या उंचीचा फायदा उठवत "हवेत खेळ" करण्याचा अनाठायी प्रयत्न केला.

मॅचची सर्वात धक्कादायक घटना म्हणजे अमेरिकन मिडफिल्डरचा "डेम्प्सी"चा अत्यंत सोपा असा शॉट इंग्लंडच्या गोलरक्षक असलेल्या 'ग्रीन'कडुन त्याच्या नाठायी आत्मविश्वासामुळे हातातुन सुटला आणि अमेरिकेला बरोबर साधता आली. मात्र दुसर्‍या सत्रात अमेरिकन फॉर्वर्ड जोसी अल्टिडोरचा एक १००% गोल साधु शकणारा शॉट ग्रीनने अत्यंत उत्तम प्रकारे हाताळला व बॉल क्लियर केला.

मॅच रंगतदार झाली.
एकंदर ३० शॉट्स दोन्ही संघांनी मिळुन मारले व त्यातले तब्बल १० डायरेक्ट "ऑन गोल" होते.
दोन्ही संघाच्या गोलरक्षकांसाठी आजचा दिवस "अत्यंत बिझी" असा गेला.

इंग्लंडच्या कर्णधार 'स्टिव्हन जेरार्ड' आज अक्षरशः सेनापतीसारखा वागला. त्याचे आघाडी, मिडफिल्ड आणि काही अप्रतिम डिफेन्सिव्ह टॅकल्स अक्षरशः पाहण्यासारखे होते. बाय द वे, इंग्लंडचा एकमेव गोल ह्या जेरार्डनेच केला.

असो.
मॅचचा अंतिम निकाल १-१ असा बरोबरीत लागला.
जर नशिब किंचित इंग्लंडच्या बाजुने असले असते आणि काही चाली बरोबर रचल्या गेल्या असत्या व त्या शेवटपर्यंत पोहचवल्या गेल्या असत्या तर हाच निकाल ३-० किंवा गेलाबाजार २-० असा इंग्लंडच्या बाजुने असायला हवा होता.

असो, बेटर लक नेक्स्ट टाईम ( विथ 'विंगर' इन टीम & जो कोल इन स्कॉड ) :)

------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

मेघवेडा's picture

13 Jun 2010 - 3:15 am | मेघवेडा

छान रिव्ह्यू.. आमचे डॉन्राव सुद्धा अक्षरशः सेनापतीसारखे वागताहेत! ;)

प्रभो's picture

13 Jun 2010 - 9:47 am | प्रभो

सहमत रे डॉन्या...जो कोल ची कमी वाटली मॅच मधे....जो कोल मह्त्वाचा खेळाडू आहे हे वर म्हटलच आहे मी...ग्लेन जॉन्सनची डीफेंडीग आज मस्तच झाली.. अ‍ॅटॅक तर आधीच भारी आहे त्याचा...
अमेरिकन टीम ही चांगली खेळली. अल्टीडोर, लंडन डॉनोव्हन, टीम हॉवर्ड ही त्रयी खुप चांगली खेळली अमेरिकेकडून...

मदनबाण's picture

11 Jun 2010 - 1:01 pm | मदनबाण

वाचतोय रे...
ज्या प्रमाणे सर्व जण या खेळावर लेख लिहणार आहेत त्या प्रमाणेच फक्त स्कोअर सांगणारा एखादा धागा असावा असे मला वाटते.
या विषयी वेगळा विभाग काढणार्‍या सर्व मंडळींचे अभिनंदन आणि धन्यवाद. :)


2010 FIFA World Cup™: Schedule -

  • South Africa vs. Mexico - 11 Jun 4:00pm
  • Uruguay vs. France - 11 Jun 8:30pm
  • South Korea vs. Greece - 12 Jun 1:30pm
  • Argentina vs. Nigeria - 12 Jun 4:00pm
  • England vs. United States - 12 Jun 8:30pm
  • Algeria vs. Slovenia - 13 Jun 1:30pm
  • Serbia vs. Ghana - 13 Jun 4:00pm
  • Germany vs. Australia - 13 Jun 8:30pm
  • All times are South Africa Time
    http://www.fifa.com/worldcup/matches/index.html

    मदनबाण.....

    "Intelligence is what you use when you don't know what to do."
    Jean Piaget

    बिपिन कार्यकर्ते's picture

    11 Jun 2010 - 1:02 pm | बिपिन कार्यकर्ते

    एक धागा येईल ज्यात, सगळा ड्रॉ असेल. आणि जसजशा म्याचेस होत जातील तसतसे तो धागा अपडेट होईल. कोण जिंकले वगैरे.

    बिपिन कार्यकर्ते

    छोटा डॉन's picture

    11 Jun 2010 - 1:04 pm | छोटा डॉन

    बिकांशी सहमत.
    मदनबाणा, एक उत्तम सल्ला दिलास, आभार !

    सध्या त्यावर माझे काम चालु आहे.
    सध्या मी चार्ट बनवतो आहे की जो रोज "अपडेट" होईल.

    त्यात जिंकलेले सामने, गुण, कार्ड्स, केलेले गोल्स, गोल्डन बुटाची शर्यत आणि पुढच्या फेरीचे संभाव्य ड्रॉ आदींचा समावेश असेल.
    तुमच्या काही 'कल्पना' असतील तर कॄपया त्या इथे द्याव्यात !

    ------
    छोटा डॉन
    आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
    उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

    मदनबाण's picture

    11 Jun 2010 - 1:07 pm | मदनबाण

    सध्या त्यावर माझे काम चालु आहे.
    सध्या मी चार्ट बनवतो आहे की जो रोज "अपडेट" होईल.

    त्यात जिंकलेले सामने, गुण, कार्ड्स, केलेले गोल्स, गोल्डन बुटाची शर्यत आणि पुढच्या फेरीचे संभाव्य ड्रॉ आदींचा समावेश असेल.
    अरे वा... सह्ह्हही... :)

    मदनबाण.....

    "Intelligence is what you use when you don't know what to do."
    Jean Piaget

    गणपा's picture

    11 Jun 2010 - 1:49 pm | गणपा

    मस्त रे ..
    एकंदर ही मालिका सुद्धा विश्वचषका सारखीच उत्तरोत्तर रंगत जाणार हे निश्चित.

    मेघवेडा's picture

    11 Jun 2010 - 4:14 pm | मेघवेडा

    उत्तम लेख रे प्रभ्या! अजून येऊ दे! :)

    टारझन's picture

    11 Jun 2010 - 6:55 pm | टारझन

    जबरा रे प्रभ्या !! डाण्या आणि मेव्याचाही लेख भारी ... :)

    - (जुता-ए-सोना धारी) फुटोबा बॉलर

    स्वप्निल..'s picture

    19 Jun 2010 - 2:12 am | स्वप्निल..

    इंग्लंड ची पण वाट लागणार असे दिसतेय .. आजच्या ड्रॉमुळे ३ र्‍या स्थानावर गेलाय

    इंग्लड आवडत नसले तरी त्याच्या फुटबॉल संघाला विश्वचषक जिंकण्यास आपल्या शुभेच्छा.......
    वेताळ

    दीपक साकुरे's picture

    24 Jun 2010 - 11:00 am | दीपक साकुरे

    इंग्लड दुसर्‍या फेरीत पोहचला खरा... पण कालचा खेळ बघितल्यावर वाटतय की उपान्त्य फेरीत पोहोचायला त्यांना खुप मेहनत करावी लागनार आहे... आपले पैसे/रुपये अजुनही स्पेन वरच ;)

    Nile's picture

    24 Jun 2010 - 12:08 pm | Nile

    चला जर्मनी अन इंग्लडपैकी एक बाहेर जाईलच आता. सो हे लोक कुणाला समर्थन देतात ते बघुया. ;)

    -Nile

    गणपा's picture

    24 Jun 2010 - 1:12 pm | गणपा

    दोन्ही संघाचे (जर्मर्म/ इंग्लंड) शेवटचे साखळी सामने पहाता, दोघांनाही सारखाच घाम गाळावा लागणार हे नक्की.

    छोटा डॉन's picture

    24 Jun 2010 - 1:21 pm | छोटा डॉन

    गणपाशी सहमत ...
    जसे क्रिकेटमध्ये झिंबॉब्वे आणि केनियाचे सामने टफ होतात तशीच ही इंग्लंड आणि जर्मनी ( क्रम महत्वाचा नाही ;) ) हा सामना कडक व्हावा ह्या अपेक्षेत. :)

    बाकी इंग्लंडच संघ काय संघ आहे ?
    सगळे हौशी प्लेयर स्वतःला हवे तसे मनमौजी खेळत आहेत असे वाटत आहे.

    रुनी गोल किंवा गोल करण्यासाठी निदान जाळीवर शॉट कधी मारणार ?
    जेव्हा प्रतिस्पर्ध्यांच्या सगळ्या प्लेयरना "रेड कार्ड" दाखवुन बाहेर काढले जाईल तेव्हाच रुनीकडुन गोल होईल असे वाटते.
    'लँपार्ड' आणि मोस्ट डिस्क्स्ड 'गॅरेथ बेरी' हे दोघे बागेत फिरायला आल्यासारख्या मनोसोक्त बोंबलत हिंडत असतात, त्यांची आणि टीमची भेट फक्त सामना सुरु व्हायच्य आधी, मध्यंतरात आणि सामना संपल्यावरच होते असे ऐकले आहे.
    हेस्की काय नुसती 'पळायची प्रॅक्टिस' करायला मैदानात येतो का ? निदान बरोबर बॉल घेऊन तरी पळ म्हणावं त्याला, बरे दिसते कॅमेरा आणि फोटोमध्ये ;)
    बाकी 'ज्यो कोल' ला आफ्रिका दर्शन करायला न्हेले आहे का ?
    तसे असेल तर त्याने फावल्या वेळात बसुन "आफ्रिकानामा" नावाचे पुस्तक तरी लिहावे, आयडिया वाईट नाही ;)

    अ‍ॅश्ले कोल जर शहाणा असेल तर त्याने उगाच जीवाचे एवढे रान करणे सोडुन द्यावे, काय उपयोग होतो त्याचा ?

    बकवास !!!
    भंकस !!!

    ------
    छोटा डॉन
    आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
    उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

    Nile's picture

    24 Jun 2010 - 1:46 pm | Nile

    जसे क्रिकेटमध्ये झिंबॉब्वे आणि केनियाचे सामने टफ होतात तशीच ही इंग्लंड आणि जर्मनी ( क्रम महत्वाचा नाही Wink ) हा सामना कडक व्हावा ह्या अपेक्षेत.

    देअर यु गो!

    बाकी संघ तुल्यबळ आहेत हो! ;) (तुल्य किती हे सा न लगे!)

    अर्थात ह्या सामन्यापुरते आमचे पैसे जर्मनीवर आहेत.

    -Nile

    स्वप्निल..'s picture

    24 Jun 2010 - 8:16 pm | स्वप्निल..

    आमचे बी!! ह्या सामन्यासाठी आमचा सपोर्ट जर्मनीला :)

    ब्रिटिश टिंग्या's picture

    24 Jun 2010 - 9:33 pm | ब्रिटिश टिंग्या

    इटली बाहेर! :)

    मेघवेडा's picture

    24 Jun 2010 - 9:40 pm | मेघवेडा

    कुठे आहेत आमचे माननीय संपादकसाहेब? बोलवा त्यांना लौकर!

    ये धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड..

    शिल्पा ब's picture

    24 Jun 2010 - 10:50 pm | शिल्पा ब

    खेळातलं फारसं गम्य नाही पण वरच्या फोटोत एकपण छान चेहरा नाही...सगळे एकदम रानटी दिसतात.

    ***********************************************************
    http://shilpasview.blogspot.com/

    मेघवेडा's picture

    24 Jun 2010 - 10:52 pm | मेघवेडा

    अहो असं काय करता बै.. यांच्यावर सगळ्या ललना, मदनिका वगैरे जीव टाकतात.. जॉन टेरी तर ख्यॅ ख्यॅ ख्यॅ.. असो.

    Nile's picture

    25 Jun 2010 - 12:55 am | Nile

    आधीच आहेत त्या इंग्लिश खेळाडूंना धड खेळता येत नाही त्यात देखणे खेळाडु घेत बसलं तर झालं इंग्लंडच फदफदं!

    -Nile