दिसू लागले स्पष्ट जसे हे

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
10 Jun 2010 - 4:52 pm

आमची प्रेरणा चित्त यांची नित्तांत सुंदर गझल दिसू लागले स्पष्ट जेवढे आणि मिपावरच्या गेल्या काही दिवसातील घटना

दिसू लागले स्पष्ट जसे हे पैसे सगळे धूसर झाले
सर्व निवासी परदेशी मग एक एक दृग्गोचर झाले

चुकली त्याची वाट म्हणूनच कमावलेले नाव गमवले
तोवर होता उशीर झाला आणिक मग हस्तांतर झाले

संपादक झाल्यावर शिकला विनायास प्रतिसाद खरडणे
अधी बरा तो लेखक होता, त्याचे माकड नंतर झाले

वाचन करता-करता इतका लख्ख देखणा प्रकाश फुटला
शरदिनितैंची पाटी फुटली अन् त्यांचे भडकमकर झाले

पवार थत्ते धाग्यामध्ये इतिहासाचा चोथा कुटला
जितके जितके वादळ उठले शांत कुठे सावरकर झाले

नाना, टार्‍या, बेला, पंगा, मिभो, शुचि, शिल्पा ब वगैरे...
पुर्ण वाट धाग्याची निश्चित , कैच्या कैच अवांतर झाले

आज अचानक धागे उडले, अन रोषाची रेघ उमटली
सहमतले संपादक काही , हे भलते वेषांतर झाले

जुन्या जाणत्या कंपुमधले मला आयडी काल म्हणाले,
"तिथे अता ते लपून जाती ज्या जाली ते बेघर झाले"

तिला बघितले आणि एकटक, अधाशा'परी' बघत राहिलो
मुखपृष्ठावरचे मग खाणे चवीहूनही सुंदर झाले !

विडंबन

प्रतिक्रिया

चतुरंग's picture

10 Jun 2010 - 11:52 pm | चतुरंग

गुर्जी सलाम!!!
एकदम क आणि ड आणि क!! =D>

चतुरंग

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Jun 2010 - 12:32 pm | बिपिन कार्यकर्ते

एकदम क आणि ड आणि क!!

नाही नाही नाही..... एक्कद्दम्म क्क आण्णि ड्ड आण्णि क्क !!!!!

=)) =)) =))

बिपिन कार्यकर्ते

बेसनलाडू's picture

10 Jun 2010 - 11:58 pm | बेसनलाडू

नाना, टार्‍या, बेला, पंगा, मिभो, शुचि, शिल्पा ब वगैरे...
पुर्ण वाट धाग्याची निश्चित , कैच्या कैच अवांतर झाले

भारतात पाऊल ठेवण्यापूर्वी केसुशेठनी सॅन फ्रान्सिस्को विमानतळावरच दिलेला हा घरचा आहेर पाहून मन भरून आले. भारत दौर्‍याचा नारळ जोरदार फुटला!
(अवांतर)बेसनलाडू

वाचन करता-करता इतका लख्ख देखणा प्रकाश फुटला
शरदिनितैंची पाटी फुटली अन् त्यांचे भडकमकर झाले

धन्य आहात _/\_
(टोपणनावी)बेसनलाडू

पवार थत्ते धाग्यामध्ये इतिहासाचा चोथा कुटला
जितके जितके वादळ उठले शांत कुठे सावरकर झाले

_/\_ _/\_
(देशभक्त)बेसनलाडू

प्रियाली's picture

11 Jun 2010 - 12:06 am | प्रियाली

आज अचानक धागे उडले, अन रोषाची रेघ उमटली
सहमतले संपादक काही , हे भलते वेषांतर झाले

तेवढे ते बिती ना बितायी रैना... वाह तात्या!
यांचे काहीतरी करा. :(

श्रावण मोडक's picture

11 Jun 2010 - 12:10 am | श्रावण मोडक

ओ मालक, काय झालंय तुम्हाला? कुठं अडकून पडलीय पिन तुमची?
विडंबन ठीक वगैरे सारं ठीक हो. पण तुम्ही अडकून पडताहात केवळ आंतरजालीय भंपकपणा, भोचकपणा, भामटेपणा वगैरे 'भ'काराच्या (आणि तुमच्या क्षमतेच्या दृष्टीने फुटकळ) कल्पनेपाशी (च्यायला, आता इथं कोणी भोचकपणा करून ही कल्पना कोण वगैरे विचारू नये).

केशवसुमार's picture

11 Jun 2010 - 12:13 am | केशवसुमार

पीन च ती , पुर्वी बाई बाटली बापा मध्ये अडकली होती अता मिपात अडकलीय..
(स्वगतः श्रामों कडे बघायला हवे एकदा...)

श्रावण मोडक's picture

11 Jun 2010 - 12:30 am | श्रावण मोडक

(स्वगतः श्रामों कडे बघायला हवे एकदा...)

कधी भेटूया? सोमवारनंतर? वेळ काढतो ;) (न काढून करतो काय, काढावाच लागेल).

चतुरंग's picture

11 Jun 2010 - 1:28 am | चतुरंग

काढून टाकलीत तर ग्रेनेड फुटेल! ;)

(सुरुंग)चतुरंग

राजेश घासकडवी's picture

11 Jun 2010 - 12:48 am | राजेश घासकडवी

आज उघडले मिपा दिसांनी अन् डोळ्यांचे परणे फिटले
केसुगुर्जी विडंबनातुन, सव्वाशेर शेरावर झाले.

अभिज्ञ's picture

11 Jun 2010 - 12:27 am | अभिज्ञ

झक्कास.

पवार थत्ते धाग्यामध्ये इतिहासाचा चोथा कुटला
जितके जितके वादळ उठले शांत कुठे सावरकर झाले

हे तर फारच खास.

अभिज्ञ.

अविनाशकुलकर्णी's picture

11 Jun 2010 - 12:43 am | अविनाशकुलकर्णी

नाना, टार्‍या, बेला, पंगा, मिभो, शुचि, शिल्पा ब वगैरे...
पुर्ण वाट धाग्याची निश्चित , कैच्या कैच अवांतर झाले

मस्त श्री केशव कुमार

नंदन's picture

11 Jun 2010 - 12:45 am | नंदन

जोरदार विडंबन, गुर्जी!

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

शिल्पा ब's picture

11 Jun 2010 - 12:53 am | शिल्पा ब

विडंबन आवडले.
(अजून काही लिहिले तर कैचा कै अवांतर व्हायचे म्हणून इथेच थांबावे.)

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

पंगा's picture

11 Jun 2010 - 2:34 am | पंगा

विडंबन आवडले.
(अजून काही लिहिले तर कैचा कै अवांतर व्हायचे...)

सहमत! (वेळ कोणावरही सांगून का येते?) ;)

- पंडित गागाभट्ट.

टारझन's picture

11 Jun 2010 - 1:36 am | टारझन

ह्या विडंबणाचे काही पार्ट मी प्रसवण्यापुर्वी सोणोग्राफीमधुन वाचले होते =))
सगळी कढवी एकदम धांसु ... =)) गुर्जी गुर्जी म्हणतात ते हेच ...
बाकी नामकरण "केशेश धांसुकडवी" ठेवावं काय ? =))

- (विडंबणप्रेमी) खाजवकुमार

मस्त कलंदर's picture

11 Jun 2010 - 10:58 am | मस्त कलंदर

>>>ह्या विडंबणाचे काही पार्ट मी प्रसवण्यापुर्वी सोणोग्राफीमधुन वाचले होते

तू आणि कधीपासून प्रसवायला लागलास??? =)) =)) =))

तुला "मी ह्या विडंबणाचे काही पार्ट प्रसवले जाण्यापूर्वी सोणोग्राफीमधुन वाचले होते" असे म्हणायचे असावे असे वाटलं..

@केसु, विडंबन चांगलंय. स्पष्टोक्तीबद्दल माफ करा, पण नेहेमीसारखी मजा नाही आली..

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

टारझन's picture

11 Jun 2010 - 3:07 pm | टारझन

=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))

पंगा's picture

11 Jun 2010 - 1:38 am | पंगा

नाना, टार्‍या, बेला, पंगा, मिभो, शुचि, शिल्पा ब वगैरे...

भलभलती नावे एकत्र आणण्याच्या राजकारणाच्या किमयेबद्दल ऐकले होते. विडंबनातही असे व्हावे म्हणजे जरा जास्तच झाले.

विडंबनकाराचा निषेध!

- (स्ट्रेंज फेलो) पंडित गागाभट्ट.

शुचि's picture

11 Jun 2010 - 1:44 am | शुचि

पंगा सत्य हे नेहेमी कडू असते बरोबर? काल "अमेरीकन" म्हणजे काय या व्याख्येवर अडून बसलात. पण काय म्हणायचय हे तुम्ही लक्षात घेतलं नाहीत. शेवटी काय ना वाट लावणं सोपं असतं, एखद्याचं म्हणणं समजाऊन घ्यायला संवेदनशीलता लागते.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

स्मायली राहून गेली वाटते...

विडंबनकाराचा निषेध! ;)

(बाकी चालू द्या.)

- पंडित गागाभट्ट.

सन्जोप राव's picture

11 Jun 2010 - 6:53 am | सन्जोप राव

तुमचा हात कोण धरणार? चालू द्या, किंवा तुमच्या शब्दांत लिहायचे तर 'चलु द्या!'

सन्जोप राव
ठोकर ना लगाना हम खुद है
गिरती हुई दीवारों की तरह

नितिन थत्ते's picture

12 Jun 2010 - 2:38 pm | नितिन थत्ते

कुर्यात् गर्दभरोहणम् ;)

काही का कारण असो, साक्षात केसूंच्या विडंबनात नाव पाहून धन्य झालो.

देवकाकांनी सिद्धहस्त प्रतिसादकात माझे नाव इन्क्लूड करायला हरकत नाही. ;)

(अतिअवांतर : पवार थत्ते धागा सावरकरांविषयी नव्हता).

नितिन थत्ते

सहज's picture

11 Jun 2010 - 8:12 am | सहज

वाट धाग्याची निश्चित

हे खासच!! :-)

प्रभो's picture

11 Jun 2010 - 8:53 am | प्रभो

काय बोलू....._/\_

मी_ओंकार's picture

11 Jun 2010 - 10:21 am | मी_ओंकार

जबरा.

वेताळ's picture

11 Jun 2010 - 10:38 am | वेताळ

गुर्जी झाडावर बसुन कविता मात्र मस्त एकदम झक्कास लिहतात. जे काही लिहायचे ते एका कवितेतुन एकदमच मांडतात.

वेताळ

अवलिया's picture

11 Jun 2010 - 11:48 am | अवलिया

काही बोलण्यासारखे राहिलेच नाही... बोललो तर बोलतात वाट लावतो. :(

(दणक्यात हो... सेठ ;) )

--अवलिया

जीएस's picture

11 Jun 2010 - 12:00 pm | जीएस

मिपा समजून घेण्याच्या अभ्यासक्रमात तुमची विडंबने अनिवार्य करायला हवी...

सहज's picture

11 Jun 2010 - 12:31 pm | सहज

मिभोभौंची लेखमाला, केसुंची विडंबने अनिवार्य

जाताजाता: केसुंचा टिआरपी वाढवतो हो.

दिसू लागले स्पष्ट जसे हे, की प्रतिसाद उमटू लागले
आधीच होते मर्कट आता दिवसाढवळ्या मद्य पिउ लागले

टीआरपीच्या जमान्यात हे बोलट नाटक करू लागले
नमोगत समजूनी मिपाला, संपादका ढोस देऊ लागले

बोलट म्हणजे काय ते धमाल मुलगा यांना विचारा.:-)

अवलिया's picture

11 Jun 2010 - 12:38 pm | अवलिया

अगागागागागा

क ड क =))

च्यामारी सहजरावांची प्रतिभा की काय अगदी जोरात.. !!!

कं लिवलय ! कं लिवलय !!

--अवलिया

स्वाती दिनेश's picture

11 Jun 2010 - 1:42 pm | स्वाती दिनेश

लै भारी विडंबन...
{सहजरावांनीही अलंकरण केलं की विडंबनाचं, :) }
स्वाती

मदनबाण's picture

11 Jun 2010 - 1:56 pm | मदनबाण

दिसू लागले स्पष्ट जसे हे पैसे सगळे धूसर झाले
सर्व निवासी परदेशी मग एक एक दृग्गोचर झाले
हा.हा.हा...
ढाल लेके आ जायो !!! ;)

मिपा सलामत तो विडंबन... ;)

(माणुस)
मदनबाण.....

"Intelligence is what you use when you don't know what to do."
Jean Piaget

भडकमकर मास्तर's picture

11 Jun 2010 - 2:47 pm | भडकमकर मास्तर

एकदम शेकडो चित्रबलाकांनी येऊन आनंदाने अलारिपु आणि तिल्लाना केल्यासारखे वाटले

केशवसुमार's picture

11 Jun 2010 - 2:54 pm | केशवसुमार

नव्या कवितेतल्या ओळी वाटते.. ;)
(सुचक)केशवसुमार
(स्वगतः ओरडा आणि धिंग्गाणा म्हणायचे असेल त्यांना.. हे जालिंदरबाबा पण ना कुणाच काय करतील सांगता येत नाही...)

मस्त कलंदर's picture

11 Jun 2010 - 3:16 pm | मस्त कलंदर

नवी कुठली, जुनीच कविता आहे हो..
तावडीतून सुटली वाटतं तुमच्या!!!

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

केशवसुमार's picture

11 Jun 2010 - 10:27 pm | केशवसुमार

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!
(आभारी)केशवसुमार

II विकास II's picture

12 Jun 2010 - 2:08 pm | II विकास II

संपादक झाल्यावर शिकला विनायास प्रतिसाद खरडणे
अधी बरा तो लेखक होता, त्याचे माकड नंतर झाले

== हे सगळ्यात जास्त आवडले.

विनायक पाचलग's picture

12 Jun 2010 - 2:14 pm | विनायक पाचलग

जबरी
____/\______

विनायक पाचलग
वाँट टु टॉक

वाचन करता-करता इतका लख्ख देखणा प्रकाश फुटला
शरदिनितैंची पाटी फुटली अन् त्यांचे भडकमकर झाले

=)) =)) =))

मस्त !!
~ वाहीदा